कोकम मधुन कापुन त्याचे दोन भाग करा.
त्यातील बिया काढुन टाका (त्या बिया वेगळ्या भांड्यात ठेउन त्यात पाणी टाकुन गर कुस्करा आणि त्यात साखर टाकुन तात्पुरते सरबत बनवा)
आता कोकमाच्या ज्या वाट्या तयार झाल्या आहेत त्यात पुर्ण साखर भरा.
आता एक काचेची बरणी घ्या. त्यात तळाला थोडी साखर टाका व त्यात साखर भरलेले कोकम एकावर एक रचा.
परत थोडी वरुन साखर पेरा आणि बरणीचे झाकण घट्ट लावुन बरणी २-३ दिवस उन्हात ठेवा. नंतर घरात ७-८ दिवस मुरवुन घ्या.
हा सरबताचा पाक तयार होतो. ४-५ चमचे पाक ग्लासात घेउन त्यात बर्फ व पाणी घालुन गारेगार कोकम सरबत सर्व्ह करा.
एप्रिल महिना सुरुझाला की बाजारात रातांबे म्हणजेच कोकमे दिसु लागतात. पित्ताशामक म्हणुन हे प्रसिद्ध आहेत हे काही सांगायला नको. पुर्वी उन्हाळ्यात घरोघरी अशाप्रकारे कोकम सरबताच्या बरण्या तयार होत. मला आठवते आम्ही लहान असताना शेजार्यांकडे पापड लाटायला गेलो की ब्रेक मध्ये कोकम सरबत मिळायचे. खर तर त्याच आकर्षणाने पापड लाटायला जायची हौस वाटायची. तेंव्हा फ्रिज कमी असल्याने बर्फही कुणाच्यातरी घरुन वगैरे आणुन सरबते वाटाली जात. सरबताचा पाक संपला की नुसती कोकमे खायला पण मजा यायची.
खरे तर ही पद्धत आणि कोकमाचे गुण सगळ्यांना माहीतच असतील. पण हल्ली घरात काही वेगळे करायला गेले की कॅमेरा स्वस्थ बसत नाही आणि मग त्यातील फोटो माबोवर येण्यासाठी हट्टाला पेटतात.
मस्त रंग आलाय. इथे गारेगार
मस्त रंग आलाय. इथे गारेगार वाटलं.
ठाण्यात राजमाता की काय वडा
ठाण्यात राजमाता की काय वडा पावच्या दुकाना शेजारीच खास कोकम सरबत मिळते. कोकम सरबत + सोडा आणि वरुन चाट मसाला. खूपच भारी लागते ते.
या सरबतात थोऽऽडी जिरेपूड
या सरबतात थोऽऽडी जिरेपूड घालायची. उन्हातून आल्यावर असं सरबत म्हणजे स्वर्ग!
हो जिरेपुडही घालतात. मी नाही
हो जिरेपुडही घालतात. मी नाही घातलेय.
हल्ली कोकम सोडाही मिळतो.
लई भारी ! हल्ली उन्हाळ्याचा
लई भारी ! हल्ली उन्हाळ्याचा रोज कोकम सरबताचा मारा करतेय स्वतःवर. पण ते विकतचं, पाणी घालून प्यायचं सरबत आहे. असं घरगुती सरबत आई करायची आम्ही गिरगावात असताना. गच्चीतल्या कडक उन्हात घरोघरच्या बरण्या ठाण मांडून बसलेल्या असायच्या. सोबतीला सुपांमध्ये सांडगे मिरच्या, साड्यांवर पापड, प्लॅस्टिकवर बटाट्याचा किस आणि चिकवड्या पसरलेल्या असायच्या.
पहिल्यांदा पाहिले जागू. तुझे
पहिल्यांदा पाहिले जागू.
तुझे आभार. कृतीही सोपी वाटते आहे.कुठे दिसले तर करुन पाहीन नक्की.
ही पाककृती एकदम अस्सल आणि
ही पाककृती एकदम अस्सल आणि नैसर्गिक वाटतेय. टिकवणारा पदार्थ फक्त साखर!
पाकृ आवडली.
बाजारात मिळणारी सरबते उकळवून आणि टिकवणारे पदार्थ (सायट्रिक अॅसिड वगैरे) मिसळून केली जात असावीत. त्यामुळे स्वाद तर जातोच शिवाय पोषणमूल्येही कमी होत असावित.
अगं जागुतै..लाळेने तोंड भरंल
अगं जागुतै..लाळेने तोंड भरंल अगदी, ते रातांबे आणि राताआंब्याचे काप पाहुन. सरबत बाजुलाच
जागू , कोकमं आणि सरबत मस्तच
जागू , कोकमं आणि सरबत मस्तच दिसताहेत . आईच्या / आजीच्या रेसिपीची आणि त्यांच्या हातच्या सरबताची आठवण झाली .
अगं जागुतै..लाळेने तोंड भरंल
अगं जागुतै..लाळेने तोंड भरंल अगदी, ते रातांबे आणि राताआंब्याचे काप पाहुन. सरबत बाजुलाच >>>
तोंपासू
तोंपासू
पुन्हा यम्मी यम्मी !!
पुन्हा यम्मी यम्मी !!
पहिल्यांदाच ताजे कोकम कसे
पहिल्यांदाच ताजे कोकम कसे दिसतात हे कळले आणि त्याला रातांबा म्हणतात हे पण. मला ते आलु बुखार/बुखारे सारखे दिसताहेत. मी नेहमी स्वयंपाकात वापरतात ते वाळवलेले कोकमच बघीतले आहेत किंवा मग विकतचे कोकम सरबत, आगळ.
रातांब्याची(?) कोवळी पानं
रातांब्याची(?) कोवळी पानं मस्त लागतात खायला. किंचित आंबट...त्यामुळे जपून खायची. आमच्या शेजार्यांनी लावलं होतं झाड. लहानपणी आम्ही कधीतरी(च) कोवळी पानं आणायचो हळूच, नि धुवून खायचो. ते वैतागायचे. कोवळी पानं खुडली तर झाड धरणार कसं म्हणून...
जागुले... मस्तचं गं ताजे
जागुले... मस्तचं गं ताजे रातांबे बघुन जीव सुखावला
मे महिन्यात कोकणात भरपुर रातांबे नुसतेच किंवा साखर-मिठ घालुन खायचे आणि येताना मुंबईला घेऊन यायचे आणि मग आई त्याचं सरबत करायची... खुप आवडतं असं सरबत एकदम उन्हाने तळावलेल्या जीवाला थंडगार वाटतं
आता इथे फक्त देशातुन येताना आणलेल कोकम सरबत्/आगळ प्यायच ताज्या सरबताची चव, स्वाद नाही त्याला...
सिंडे, हो कोकम सोडा
सिंडे, हो कोकम सोडा ......आहाहा काय चव असते त्याची.
जागु, सोप्पी पद्धत सांगितलीस
जागु, सोप्पी पद्धत सांगितलीस की गं..
हे तयार झालेलं सिरप वरती ठेवायचं की फ्रिजात? किती दिवस टिकतं? पण पुणे मुंबईत कुठे इतकी सुंदर कोकमं मिळतात? माझी काकू त्या कोकमाच्या बिया असतात ना त्या वाळवून बरणीत ठेवते आणि कधी कधी आमटीत घालते. शिवाय सिरप काढून ह्या कोकमाच्या वाट्या उरतात त्याच्या बारिक फोडी करून्/मिक्सर मधून काढून जॅम... मला नाही आवडला पण तो प्रकार.. जरासा आंबट लागतो.
दक्षिणा अग हे वर्षभरासाठी
दक्षिणा अग हे वर्षभरासाठी म्हणुन करुन ठेवतात पण तोपर्य.न्त ठेवत का कोण ? जास्तीत जास्त २-३ महिने राहत. लहान मुल असतील घरात तर २ महिन्यात साफच.
त्या कोकमाच्या बिया.न्पासुन औषध तयार करतात. त्यातील गर तेलकटी असतो. त्याचा गोळा करुन तो तळपाय वगैरे दुखत असतील तर त्यावर चोळतात. कोकणी दुकानामध्ये विकायला असतात हे गोळे
दिनेशदा, सि.न्डरेला, प्रज्ञा, अश्विनी, नरे.न्द्र, रैना, चातक सम्पदा, आश, अखि, यो, रुनि, लाजो आउटडोअर्स धन्यवाद.
मस्त जागू आजी कोकमाच्या
मस्त जागू
आजी कोकमाच्या बियांचं हिरवी मिरची बारीक कापून, मीठ, साखर आणि पाणी घालून सरबत करते. ते आंबट, गोड आणि तिखट सरबत एकदम भारी लागतं.
कोकणात हे कोकम सरबताचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी टाक्या बनवलेल्या असतात. एकेक टाकी भरली की त्यावर लेबल लावून ठेवतात आणि विशिष्ट दिवशी उघडतात. तयार झालेला पाक गाळण्याची कृतीही एकदम बघण्यासारखी असते.
आत्ताच देसाईंच्या दुकानात
आत्ताच देसाईंच्या दुकानात पाहिले हे रातांबे.. उद्या आणते
अरे व्वा! कोकम सरबत... मुखात
अरे व्वा! कोकम सरबत...
मुखात अगदी "ट्ट्ट्टा" असं झालं.
[हा प्रतिसाद सरबतासाठी ]
मन्जु छान माहीती आणि सरबताची
मन्जु छान माहीती आणि सरबताची रेसिपी.
वर्षा फोटो टाक सरबताचा.
चातक काही खरे नाही बाबा तुझे.
फोटो पाहून डोळे निवले जागू.
फोटो पाहून डोळे निवले जागू. आमच्याकडे अगदी असेच करतात सरबत!
जागू, आम्ही लहान असताना, आई
जागू, आम्ही लहान असताना, आई हे सर्व करायची. त्याची आठवण झाली.
ठाण्यात राजमाता की काय वडा
ठाण्यात राजमाता की काय वडा पावच्या दुकाना शेजारीच खास कोकम सरबत मिळते. कोकम सरबत + सोडा आणि वरुन चाट मसाला. खूपच भारी लागते ते.
येस्स.. एका अगदीच मिनी ठाणे गटगला मी हे प्यायलेय.. एक ग्लास रिचवल्यावर परत एक घेतला
पहिल्यांदाच ताजे कोकम कसे दिसतात हे कळले आणि त्याला रातांबा म्हणतात हे पण. मला ते आलु बुखार/बुखारे सारखे दिसताहेत
माझ्या आईने मुंबईत पहिल्यांदा आलुबुखारे पाहिले तेव्हा तिला मुंबईची माणसे रातांबे अशी ढिगानी का विकताहेत नी विकत घेताहेत हा प्रश्न पडलेला आमच्या गावी रातांबे रानातनं तोडुन आणतात. कोणीही विकत नाही किंवा विकत घेतही नाही.
साधना मी लहान असताना कोकणात
साधना मी लहान असताना कोकणात गेले होते ते.न्व्हा कोकम लागलेले झाड पाहिलेले. खुप मज्जा वाटलेली ते.न्व्हा पाहुन.
स्वाती, प्रज्ञा धन्स.
आमच्या गावी रातांबे रानातनं
आमच्या गावी रातांबे रानातनं तोडुन आणतात. कोणीही विकत नाही किंवा विकत घेतही नाही. >> इथे देसांईकडे ८० रुपये किलो आहेत
वर्षा तु कुठे राहतेस गं?? आणि
वर्षा तु कुठे राहतेस गं??
आणि तसेही आंबोलीला कोकमसरबताची गरज पडण्याइतपत उन्हाळा अजुन पडलाच नाहीय. आंबोलीतले लोक रातांबे कोकमं करण्यासाठी तोडतात, सरबत करण्यासाठी नाही
वर्षा तु कुठे राहतेस गं?? >>
वर्षा तु कुठे राहतेस गं?? >> पुणे
पाठवणारेस
अगं गावी गेले तरच शक्य होईल..
अगं गावी गेले तरच शक्य होईल.. मुद्दाम इथे मुंबईत कोण पाठवणार रातांबे? पण गेले तर मात्र तुझ्यासाठी नक्कीच घेईन. येताना मला पुण्यातुनच यावे लागते. तुला बोलावेन चांदणी चौकात रातांब्याची डिलिवरी घ्यायला.
Pages