सुख

Submitted by मुरारी on 4 May, 2011 - 23:34

आज सकाळी ७.४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला, आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो, काय तो थाट. काय ती अदा अहाहा
सगळं पब्लिक आज एक दम शिस्तीत आत शिरलं, आमचा ग्रुप आधीच आतमध्ये बसून टवाळक्या करत होताच, चायला कसाऱ्याच्या चाळीतून एकदम मलबार हिल च्या बंगल्यात गेल्यासारखं वाटल, बसायला गुबगुबीत गाद्या, मोठ्या मोठ्या खिडक्या, प्रचंड वेगाचे पंखे Happy
जुन्या लोकल मध्ये फ्यान एक इंच हलतील तर शप्पथ, एकाने कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न केला, तर एक पात हल्ल ते वर्षभराची साठलेली धूळ त्याच्या मस्तकावर अर्पण करूनच, तेंव्हापासून सगळ्यांनी फ्यान हा विषय बंद केलेला ,
आज मात्र ह्या जीवघेण्या लोडशेडिंग मधून मुक्त झालो :p
आणि काय तो स्पीड .. वा वा आज ट्रेन कांजूर ला १५ च्या ऐवजी फक्त ५ मिन्तच लेट झाली Lol
.
.
.
.
.

साला खरय सुख मानलं तर कशातही मानता येत, आणि नाही तर कशातही नाही .. अगदी स्वर्गातही Happy

सुख या गोष्टीला विशिष्ट अशी व्याख्या नाही, ती व्यक्तीसापेक्ष बदलते,
प्रत्येक वेळी सुख हे पैशातच विकत घ्यायला हव असं नाही.

तुमच्याही सुखाच्या छोट्या छोट्या (किंवा मोठ्या मोठ्या) कल्पना असतील , स्वप्नं असतील, इथे मांडा Happy
म्हणजे सुख कशाकशात असू शकतं, हे कळेल , आयुष्य अजून सुंदर होईल Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान विषय चर्चेला घेतलात ..... Happy
एका प्रसिद्ध नाटककाराचं वाक्य आहे ......
"सुख हे आपल्या पायाखालच्या जमिनीत उगवतं. पण आपण मात्र त्यावर पाय देऊन उभे राहतो,
आणि दृष्टी लावतो दूर क्षिताजाकडे..... आणि मग सुरू होतात, सुखाच्या शोधाचे वांझोटे प्रयोग."

जबरदस्त आहे Happy
५ वर्षांपुर्वीची गोष्ट... मला एकदा स. ८:०५ ला नेरुळ वरुन सी.एस.टी लोकल मधे चक्क विंडो सीट मिळाली (ती पनवेल ट्रेन असते जाम पॅक नेहमीच).. काय तो अनुभव होता विचारु नका ..
पण तो फक्त एकच दिवस होता Sad

"सुख हे आपल्या पायाखालच्या जमिनीत उगवतं. पण आपण मात्र त्यावर पाय देऊन उभे राहतो,
आणि दृष्टी लावतो दूर क्षिताजाकडे..... आणि मग सुरू होतात, सुखाच्या शोधाचे वांझोटे प्रयोग."

क्या बात हे , अप्रतिम Happy

सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे.
मी दु:खाच्या पर्वतावर थोडीशी सुखाची हिरवळ पेरतो.
मग त्या हिरवळीवर बागडतानाचे सुख हे दु:ख्खाच्या टेकडीपेक्षा उच्चच असते
हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.

अरे अरे अरे काय ही मुंबईची अवस्था विंडो सीट मीळाली तरी सुखा मानता.>>> पूर्ण सहमत!

तसेच, लेखाशीही सहमत कारण फारच प्रामाणिक आणि स्वीट लेख आहे.

धन्यवाद!

माझ्या सुखाच्या व्याख्या खूप छोट्या आहेत... माझा नवरा मला अल्पसंतुष्टी म्हणतो... मी आहे! मनापासून ज्यात सुख आहे ते काम करावं... मनाविरूद्ध पाट्या टाकण्यात काय अर्थ आहे?

चर्चगेट-विरार फास्टमध्ये एकदा (च) विकडेज मध्ये चक्क चक्क बसायला मिळालं ऐसपैस... संध्याकाळच्या वेळी बायका एकमेकींशी हसून विनोद -गप्पागोष्टी करत होत्या, अज्जिबात भांडण नाही, तुझं कोपर- माझं ढोपर, तुझा धक्का, माझा बुक्का काही नाही.. मस्त गप्पागोष्टी, हलके विनोद, हास्याचे फवारे!!! त्या दिवशी मला अगदी भरून भरून आलं...

लेडीज स्पेशल मधील ग्रूप सोबतच्या गप्पा यांत तमाम मुंबईकरणींचे सौख्य सामावले असेल!

घरी आल्यावर गरमागरम वाफाळता चहाचा आयता कप हातात मिळतो तो क्षण!!!

पावसाच्या साथीला हातात कडक कॉफीचा वाफाळता कप अन जगजीतचा गंभीर स्वर सोबतीला असेल तर स्वर्ग!

मोगरीच्या अर्धवट उमललेल्या पांढर्‍याशुभ्र टप्पोर्‍या कळ्यांचा भरगच्च गजरा!

पावसाची रिपरिप झेलत नवर्‍यासोबत बाईकवरून फिरायला जाणे आणि वाटेत गरमागरम भुट्टा खाणे व्वा!!!

कधी नुसतंच घरी/मैत्रीणीला फोन करून तासन तास गप्पांमधून जुन्या आठवणींना उजाळा देणे...

कधी कपाट धुंडाळताना अचानक सापडलेलं जुनं पत्र पुन्हा पुन्हा वाचून पाहणे आणि त्या आठवणींच्या दुनियेत हरविणे!!!

माझ्या स्वप्नांची लिस्ट फार मोठी आहे... छोटी छोटी स्वप्ने आहेत हे कारण असावं काय!!!

--- स्वप्नाली

जुन्या लोकल मध्ये फ्यान एक इंच हलतील तर शप्पथ, एकाने कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न केला, तर एक पात हल्ल ते वर्षभराची साठलेली धूळ त्याच्या मस्तकावर अर्पण करूनच>>> Lol

फार छोटसं, पण छान लिहिलं आहे... Happy

सुखाची व्याख्या विचारलीस, म्हणून ह्याच प्रसंगानुरुप एक गंमत आठवली... 'चीपर बाय द डझन' या पुस्तकातली.... वडिल मुलांना आणि बायकोला घेऊन आपल्या नवीन घरी शिफ्ट होण्यासाठी जातात. ते घर जुनाट,पडक्या भींती, उडालेले रंग असे काहीसे असते. मुलांचा एकदम मूडच जातो. ह्या घरात आपण रहायचे? ह्या विचाराने त्यांचे चेहरे रडके होतात. तितक्यात वडिल खिशात हात घालतात आणि एक चिठ्ठी बाहेर काढून वाचतात. म्हणतात, अरे, हा तर चुकीचा पत्ता आहे आणि त्या दुसर्‍या 'योग्य' पत्त्यावर जातात. ते घर असते साधेच... पण आधी पाहिलेल्या घराच्या तुलनेत खुप वरचढ.... मुले जाम खुश होतात. अर्थात वडिलांनी हे मुद्दामच केलेले असते! Happy

ह्यावरुन सुखाची व्याख्या अशी करता येईल, की सुख हे सापेक्ष असते. उन्हानंतर मिळालेल्या सावलीची किंमत नेहमीच मिळणार्‍या सावलीपेक्षा कैकपट जास्त असते. दु:ख उपभोगलेले असले की मिळणारे सुख खुप सुखावणारे भासते. Happy

" सुखाची व्याख्या अशी करता येईल, की सुख हे सापेक्ष असते. उन्हानंतर मिळालेल्या सावलीची किंमत नेहमीच मिळणार्‍या सावलीपेक्षा कैकपट जास्त असते. दु:ख उपभोगलेले असले की मिळणारे सुख खुप सुखावणारे भासते. "
--> १००% बरोबर.

सानी , चैत्रा, रोहित, दादाश्री , बेफिकीर , ड्रीम गर्ल, रवींद्र किश्या, उल्हास...

आभार गाईज Happy

असेच आयुष्यभर सुखात राहा Happy

माझ्या ही सुखाच्या व्याख्या खूप छोट्या आहेत..........

गेल्या मंगळवारी जाम थकून office मधून घरी चालले होते.... मनात विचार "देवा आता जाऊन चहा करायचा सुद्धा जीव नाही..... कसं होणार आपलं...."

घरी गेले तर नवरा आधीच हजर.......... बेल वाजवली तर लवकर दार पण उघडेना.... म्हटलं झोपला कि काय? इतक्यात दार उघडलं......

आत बघते तर नवरा हातात मस्त थंड पाण्याचा ग्लास घेउन उभा........ मी उडायचीच राहिले होते.....

म्हणाला "निवांत बसून पाणी पी.... मस्त गरमागरम चहा आणतो........" (म्हटलं देवा, अरे अजि सोनियाचा दिनु........ Happy अर्थात मनातल्या मनात.... )

मग मस्त चहा पिला राहत ची गाणी ऐकत दोघांनी........... Happy

हा आनंद इतका जास्त होता की मग कंटाळा छूमंतर......... Happy त्या दिवशी फिरून पटलं, आनंद हा पिट्टुकल्या गोष्टींमध्येच असतो.......... Happy

>>साला खरय सुख मानलं तर कशातही मानता येत, आणि नाही तर कशातही नाही .. अगदी स्वर्गातही

सोलह आने सच Happy