फणसाचा तळ आणि ओतलेली भाकरी

Submitted by दिनेश. on 1 May, 2011 - 14:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
वर लिहिल्याप्रमाणे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु फोटो. फणसाची भाजी तर काही शक्य नाही इथे, पण ओतलेली भाकरी करून खाणार.
भाकरी खायला खूप आवडते. पण थापून अज्जिबात जमत नाही करायला. आता ही सोप्पी पद्धत तरी जमते का बघायचं.
दिनेशदा, ही भाकरी वातड होत नाही का ? ( पाककलेतील माझं ज्ञान म्हणजे मोठ्ठा शून्य असल्याने हा प्रश्न चुकीचा असू शकतो Happy )

व्वा... ओतलेली भाकरी.. अप्रतिम दिनेश दा.. ही पॅनकेक इतक्या जाडीची असते कि पेपर दोश्याइतकी पातळ???

ओतलेली भाकरी करून बघायला सोपी वाटतिये (दिनेशदा तुम्हाला सर्वच गोष्टी सोप्या आहेत हो म्हणजे Maths मधला D Group at ease सोडवणारे जे असतात त्यांपैकी तुम्ही आहात) आम्हाला A Group मधली २+१३+९ सुद्धा करताना तंतरायला होतं........आणि फणसाची भाजी म्हणजे.............तुम्ही असं करा १ महिना पुण्यात येऊन रहा आणि workshop घ्या.तरी मी नवर्‍याला दाखवली ही रेसिपी; (म्हणजे जरा चिमूटभर धडा तरी घेईल! kitchen मधे काम करण्याचा).पण उलटंच झालं हो,"तू प्रयत्न सुद्धा करू नकोस,इतके चांगले पदार्थ आम्ही बघू पण तू आमच्यावर अजिबात प्रयोग करू नकोस " अशी मुक्ताफळं ऐकायला मिळाली!

पण ते फणसाचा तळ म्हणजे काय ते सांगाल का? भाजीला म्हणतात की फणसाचा काही भाग असतो गरे,आठळ्यांसारखा?

वर्षू, कांदा किती बारीक कापलाय त्यावर त्याची जाडी अवलंबून असणार मी व्ही स्लाईसर वापरतो त्यामूळे कांदा अगदी बारिक चिरला जातो. शिवाय आपण ज्या जाडीची ओतणार त्यापेक्षा ती कमी जाडीची होते कारण पाणी उडून जाते. आणि हे पिठ आंबवलेले नसल्याने ती जाळीदार पण होणार नाही. पूर्ण कणकेची पण करता येईल.

शांकली, मी पण चुकतमाकतच शिकलो कि. आणि याला फक्त आवड लागते, कौशल्य आपोआप येते.
तळ हे या पदार्थाला दिलेले नाव. त्याचा संदर्भ नाही माहीत मला.

बाकी सगळ्यांनी, हि भाकरी अवश्य करुन बघा. पटकन होते. आणि चवीलाही छान लागते.

वा... भाकरी नक्की नक्की करणार. त्या बरोबर फणस न घालता नुसतेच दालफ्राय (फणस मिळणे अवघड आहे). फ्रोजन मिळते का पहावे लागेल.

मी करुन पाहिली. चांगली चव आली. काजू सोडल्यास मी सगळे जिन्नस घातले. लाल मिरच्या घातल्या.
भाकरीत थोडे किन्वाचे पीठ आहे.

fatal1.jpgobha.jpg

करुन बघते दिनेशदा. जमेल का ह्याची खात्री नाही Blush कारण मी सुद्धा पाककलेत शांकली म्हणते तशी ए ग्रुप सोडवताना तंतरणार्‍यांपैकीच आहे !

वा दिनेशदा, काय रेसिपी आहे.
लालूजी, तुम्ही तर लगेच करून पण बघितली, आणि दिनेशदांकडून चांगला शेरा पण मिळवला. Happy

दिनेशदा, फोटो मस्तच दिसतो आहे. धन्यवाद.
फणसाचा तळ , ओतलेली भाकरी - मी पहिल्यांदाच ऐकले. फणसाचे गरे मिळतील कि नाही माहीत नाही, पण भाकरी नक्की करुन पाहीन.. Happy

वा लालूची भाकरी खायलाही जावंसे वाटतेय. Happy

या भाकरींबरोबर प्रॉन्स करीही छान लागेल असं माझं मन सांगतय. हा बेत कोण ठरवेल तर मलाही बोलवा.

दिनेशदा, मी आज ती भाकरी करून बघितली,जमली आणि घरातल्या सर्वांना खूप आवडली.त्यांनी तुम्हाला धन्यवाद सांगितले आहेत. सर्वांची फर्माइश आहे की आता नेहेमी अशीच भाकरी करत जा.ती नेहेमी सारखी नको.तुम्हाला परत एकदा धन्यवाद.फणसाचा तळ पण करून बघीन.
एक विचारू का?..........टायपो म्हणजे काय?

अरे वा, सगळ्यांना आवडली ना, त्यापेक्षा आणखी काय हवे.
टायपो, म्हणजे टाईप करताना झालेल्या चुका. या अजाणतेपणीच होतात !

मी केला ओतलेली भाकरी करण्याचा प्रयत्न पण फसला .. मग धिरडी घालून खाल्ली ..

घरी होतं म्हणून नाचणीचं पीठ वापरलं पण ते जुनं झालं असावं .. कांदा सुरीने बारीक चिरला पण तो हवा तेव्हढा बारीक झाला नसावा .. तसंच पीठ मी केलं त्यापेक्षा बरंच जास्त पातळ असायला हवं बहुतेक ..

तर मला असं वाटतं की कांदा किसूनच घेतला तर? आणि तांदळाच्या पीठाचीच करायला हवी .. नाचणीचं जरा रिस्कीच!

(पण धिरडी आणि ह्यात फरक काय?)

स्वप्ना७७, ही भाकरी नेहमीच्या भाकरीपेक्षा चवीला जास्त चांगली लागते.
सशल, कांदा किसून घेऊनही मी केली आहे. चांगली होते. पिठ ओतल्यावर सहज पसरेल असे हवे. (पळीवाढे) नाचणीच्या पिठाची मात्र मी केली नाही. पहिली भाकरी नीट उलटली नाही वा तूटली, तर आणखी थोडी कणीक घालता येईल.

Pages