बाबा मला

Submitted by mitthu on 30 December, 2008 - 02:35

बाबा घरी आज लवकर येशील काय ?
फिरायला मला तू बाहेर नेशील काय ?

घरी मी कुणालाही त्रास देणार नाही
खाऊसाठी उगाच ह्ट्ट करणार नाही

संध्याकाळी आई मला तयार करून देईल
ती पण फिरायला आपल्या सोबत्त येईल

तिघे मिळून आपण जाउ तळ्याच्या काठी
जत्रा जिथे रोजच भरते छोट्या मोठ्या साठी

तिघे आपण मस्त मारू भेळीवर ताव
वेळ होता घेऊ मग घराकडे धाव

रात्री आई सुंदर अशी गोष्ट मला सांगेल
संध्याकाळ अशी बघ सुंदर आपली रगेल

मग बाबा घरी आज लवकर येशील काय ?
फिरायला मला तू बाहेर नेशील काय ?

गुलमोहर: 

मस्त कवित. अगदी वास्तवाशि निगडीत आहे .

रगेल >> हे तेवढ रंगेल करा. अर्थ फारच बदलतो आहे.. Happy

छान! अजुन येऊ देत...

मस्त Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!