बीटाचे कट्लेट्स

Submitted by cutepraju on 15 March, 2011 - 01:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ बीट आणि १ बटाटा उकडुन , आल, लसुण, मिरची , कोथिम्बीर वाटुन, बारिक रवा. तेल, थोडासा ब्रेडचा चुरा

क्रमवार पाककृती: 

बीट, बटाटा किसुन घ्यावा. त्यातच थोडासा ब्रेड्चा चुरा मिसळावा. मग त्यात वाटण मिसळुन घ्याव. चवीप्रमाणे मिठ घालाव. मग हव्या त्या आकारामधे गोळे पण जरा चपटे करुन रव्यामधे घोळवुन तेलावर शॉलो फ्राय करावेत.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणामधे १०-१२ कट्लेट कट्लेट होतील
अधिक टिपा: 

बीट खुप शि़जवु नये. मग एकदम लगदा होउन जातो.

माहितीचा स्रोत: 
सासुबाइ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं पाच मिनिटात होतं? अफाट वेग! लसूण सोलून आलं वाटायला आणि कोथिंबीर धुवून चिरायलाच पाच मिनिटं लागतात मला.

मी बीट उकडत नाही. कच्चेच खिसते. बटाटा उकडते. वाटण करण्याचे पण कष्ट घेत नाही. नुसतं तिखट-मीठ घातलं तरी झकास लागतात.