बीजिंग च्या बाहेर एका तासाच्या अंतरावर असलेल्या समर पॅलेस मागे ८०० वर्षांचा इतिहास आहे.
८०० वर्षापूर्वी मंगोल डायनेस्टी चा सम्राट कुबलाय खान,याने स्वतःसाठी हा राजवाडा बांधून घेतला.
नंतर बाराव्या शतकाच्या सुरुवातीला छिंग डायनेस्टीच्या सम्राटाने हा पॅलेस अजून वाढवून ,नव्याने भर टाकून आपल्या आईला, तिच्या साठाव्या वाढदिवशी भेट म्हणून दिला.
छिंग डायनेस्टीचा सम्राट 'शिएनफंग' याच्या झनानखान्यात १६ वर्षाची 'लान' ची जेंव्हा भरती झाली तेंव्हा कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल कि ही रखेली एक दिवस चीन वर सलग ४८ वर्षं राज्य करणार म्हणून.
सम्राटापासून तिला एक मुलगा झाला आणी लान चे नशीब फळफळले. सम्राटाच्या मुख्य कॉनक्युबाईन (रखेली / उपपत्नी) चे पद तिला प्राप्त झाले. तिचं नाव बदलून 'छ शी' ठेवण्यात आले. .. १८६० मधे सम्राटाचा मृत्यू झाल्यावर ,तिने अनेक कपट,कारस्थानं करून सम्राटाच्या पट्टराणी आणी युवराजाचा काटा काढला. आपल्या अल्पवयीन मुलाला राज्याभिषेक करून स्वतःच राज्य करू लागली. ती सिंहासनामागे एका जाळीदार पडद्याआड बसे. म्हणून तिला लेडी बिहाईंड द कर्टन असंही म्हणत.छ शी ने स्वतः च्या चैनीसाठी खूप मोठ्या प्रमाणात,मन मानेल तसा पैसा खर्च केला. २९० हेक्टेअर जागा व्यापलेल्या या महालात छ शी ने अपरंपार वैभव भोगले. नौसेनेसाठी असलेला फंड केवळ स्वतःच्या सुखविलासा करता तिने एक (न हलणारी)संगमरवरी नौका बांधण्यात खर्च करून टाकला. महालासमोर १०,००० मजूर लावून विशाल तळे बनवले.या तळ्यात छ शी ला मोत्ये आवडत म्हणून खास शिंपल्यांची शेती करण्यात येई आणी इथून निघालेले मोती सर्वच्यासर्व एकटी छ शी वापरत असे. या तलावात विहार करायला छ शी खेरीज अजून कुणालाच अनुमती नव्हती.
लवकरच तिचा मुलगा मरण पावला. तिने सर्व नियम धाब्यावर बसवून आपला पाच वर्षाचा भाचा,'क्वांग शू'ला गादीवर बसवले. क्वांअ शू ला खरोखरच प्रजेसाठी काही करावेसे वाते. छ शी च्या लक्षात आले कि जर प्रजा सुधारली तर सत्ता आपल्याहातून निघून जाईल.त्यामुळे तिने चिडून जाऊन ,'क्वांग शू' ला या समर पॅलेस मधे एका लहानश्या जागेत तो मरेपर्यन्त डांबून टाकले . ती नेहमी म्हणे कि ती क्वांग शू मेल्यानंतरच मरेल. आणी खरोखरच तसे झाले. कैदेत १५ वर्षं राहिल्यावर दुर्दैवी क्वांग शू केवळ ३४ व्या वर्षी मरण पावला. योगायोग असा कि दुसर्याच दिवशी 'छ शी' वयाच्या ७४ व्या वर्षी मरण पावली. नंतर दोनच वर्षानी, १९११ मधे छिंग डायनेस्टीचे साम्राज्य संपुष्टात आले.
समर पॅलेस च्या समोरच्या बागेत ,आपल्या आईला आरामात फिरता यावे म्हणून सम्राटाने बांधलेला हा ७२८ मीटर लांबीचा हा पॅसेज, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मधे शामिल आहे. लाँग कॉरिडॉर ला प्रवेश फी नाही.त्यामुळे इथे दिवसभर बरेच ज्येष्ठ नागरीक,पोराबाळांसमवेत बागेतून फिरायला येतात. इतकच नाही तर कॉरिडॉर च्या दोन्ही बाजूंनी कमरेइतक्या उंच ,रुंद कठड्यावर बसून पत्ते,माजोंग इ. खेळायची पण मुभा आहे.फक्त पैसे लावून जुगार बिगार खेळायला परवानगी नाही.
पॅलेस समोर,तळ्याकडे तोंड करून उभा असलेला हा क्विलिन्,रक्षणकर्त्याचे कर्तव्य पार पाडतोय
चीने च्या पॅलेसेस मधे महालाच्या प्रवेशद्वाराबाहेर पुरुष प्रधान संस्कृतीचा सिंबल म्हणून उजव्या बाजूला ड्रॅगन तर डाव्या बाजूला राणी चं सिंबल म्हणून फीनिक्स असतो. मात्र छ शी च्या राज्यात ड्रॅगन आणी फिनिक्स च्या जागा बदललेल्या होत्या उगाच नाही तिचा आज ही उल्लेख' ड्रॅगन लेडी' म्हणून केला जातो.
हीच ती ड्रॅगन लेडी,' छ शी'
महालाच्या आतल्या बाजूचे भाग, निरनिराळे महाल्,अंगणं,चौक..
या महालात छ शी ने सम्राटाच्या पुत्राला जन्म दिला. पुढे ती स्वतः शेवटपर्यन्त इथेच राहिली.
छ शी चे शयन कक्ष, येथील भांडी,पात्रं,वस्तू शुद्ध सोने आणी पाचू वापरून बनवलेल्या आहेत.
सोन्याच्या पत्र्याने मढवलेले असे अनेक हंडे त्यांच्यात पाणी भरून महालांबाहेर ठेवण्यात येत. हे त्या काळचे अग्निशामक यंत्री असत. पुढे युरोपिय सत्तेने चीन मधे आपले पाव रोवल्यावर सर्व हंड्यांवरचे सोने त्यांनी चाकूद्वारे खरवडून पळवले.
छ शी ला उधळपट्टी करायला खूप आवडे. तिच्या जेवणाकरता तीन हॉल वापरले जात. एकेका वेळी पन्नास पन्नास खाण्याचे पदार्थ टेबलावर तिला हवे असत. मग एका खोलीत ती ती फक्त जेवणाचा वास घेई, दुसर्या खोलीत थोडं चाखे,मग तिसर्या खोलीत जेवण घेत असे.
तसच तिला फुलांपेक्षा फळांचा सुवास आवडे म्हणून तिच्या खोलीत शेकड्यांनी ताजी फळं ठेवली जात्,जी दिवसातून दोन वेळा बदलली जात.
महालाच्या परिसरात अशी 'भुतहा' झाडं खूप दिसली
हा राजाचा महाल. इथे छ शी राजासोबत बसून त्याच्या रखेलींची निवड करे. राजाला आवडणार्या रखेलीला त्याच्यापासून मूल न होऊ देण्यासाठी, छ शी च्या हुकुमावरून तिच्या पाठीखाली कमरेवर लाकडाच्या ओंडक्याने खरपूस मार देण्यात येई.
राजाच्या महाला च्या आसपास च्या महालांमधून त्याच्या ३००० रखेलींचे वास्तव्य होते
सम्राटाच्या उम्मीदवार रखेल्यांचा एक फोटो इकडे ठेवण्यात आलेला आहे.या लहानग्या पोरींचे इनोसंट चेहरे पाहून मन भरून आलं
या परिसरात असलेल्या एका लहानश्या महालात बाहेर पडायच्या सर्व दरवाज्यांवर भिंती बांधून बंद करून टाकल्यात. इथेच क्वांग शू ला १५ वर्षं बन्दिवास भोगावा लागला. त्याला महालासमोरच्या छोट्याश्या अंगणात कडक पहार्यात फिरायची मुभा होती.
From Summer palace
ही च ती भिंत.. तिला पाहून सुद्धा गुदमरायला झालं
पॅलेस समोरच्या तळ्यावरून दूरवर दिसणारा पॅगोडा
आणी हे ते मोत्ये पिकवणारे, छ शी ला नावेतून सैर करवणारे सुंदर, मॅन मेड अतिविशाल तळे
आता या तळ्यात आम पब्लिक ही नौका विहार करू शकतात.. शिवाय इकडे निघणारे मोती ही विकत घेऊ शकतात.
ती फेमस मार्बल बोट
वर्षु फोटो नेहमीसारखेच
वर्षु फोटो नेहमीसारखेच अप्रतीम. माहिती सुंदर पण कथा भयंकर
ती छ शी नव्हती तर छी: शी: होती.
मस्त फोटो. आणि वर्णन पण
मस्त फोटो. आणि वर्णन पण सहीच...
त्या क्विलिन् चा जबडा पाहुन अजिबात घाबरायला होत नाही... मलातर तो डेंटिस्ट्समोर दात दाखवायला बसलाय असं वाटलं!!!
सुखलोलुप आणि स्वार्थी स्त्री (खासकरुन राजकारणात) काही नवीन नाही पण एवढे मोठ्ठे साम्राज्य बळकाउन, इतके वर्ष टिकवून ठेवणं म्हणजे कमाल झाली... ते पण खासकरुन प्रजेसाठी काही खास न करता.
ती गेल्यावर २ वर्षात छिंग डायनेस्टीचे साम्राज्य संपुष्टात आले, याला तिची स्वर्थी वृत्ती आणि प्रजेकडे केलेलं दुर्लक्ष कारणीभूत होतं का?
निलतै, बराच इतिहास खरडला
निलतै, बराच इतिहास खरडला आहेस..! प्राचिन 'चीन' संस्क्रुती बद्द्ल बरिच माहीती मिळाली...
छ शी चं राज्य इतकी वर्षं
छ शी चं राज्य इतकी वर्षं टिकण्याचं कारण म्हणजे revolutionaries, disorganized होते.त्यामुळे बंडखोरीचे प्रयत्न खूप वेळा फसले.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
अहो मिस चिन चिन चू नंतर
अहो मिस चिन चिन चू
नंतर टाकलेले फोटोज कसे कळणार ?
त्यातला त्या झाडाचा फोटो खतरनाकच आहे. तू जे वर्णन आधी केलेलं आहेस ते या झाडातून व्यक्त होतंय. लेखात उपमा द्यावी तसा या फोटोमालिकेतला हा फोटो आहे.
चिन्यांच्या कुठल्याही वास्तूत ड्रॅगन असतोच का ? त्यांचं ते शुभचिन्ह आहे का ?
केवडं अमानुष आहे हे सगळं !
केवडं अमानुष आहे हे सगळं ! एवढ्या एवढ्याश्या त्या पोरी बघून कसंतरीच झालं !
फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम. पण त्या लेकरांचा तो फोटो बघितल्यावर एकंदरीत सगळ्याच वास्तुबद्दल मनात एकप्रकारची घृणाच निर्माण झालीये. धन्स वर्षूताई !!
त्या क्विलिन् चा जबडा पाहुन
त्या क्विलिन् चा जबडा पाहुन अजिबात घाबरायला होत नाही... मलातर तो डेंटिस्ट्समोर दात दाखवायला बसलाय असं वाटलं!!! >>>
अफलातुन माहिति व नयनरम्य
अफलातुन माहिति व नयनरम्य फोटो.
@वर्षू नील संगमरवरी नौकेचा
@वर्षू नील
संगमरवरी नौकेचा फोटो नाहीये का ? अगदी बघवसा वाट्तोय!
क्रौर्याची परिसिमा आहे. त्या
क्रौर्याची परिसिमा आहे. त्या लहानग्या कसायाकडे नेणा-या गायींसारख्या भेदरलेल्या दिसतायत.
ती भिंत बघुनही मन विषण्ण झालं!
त्या छ शी बाईचे नखं म्हणायची का काय ती!!
बाकी, वर्षु तु आम्हाला घरबसल्या चीनची सफर घडवुन आणतेय्स! धन्यवाद!
छान माहिती आणि फोटो, इथे
छान माहिती आणि फोटो, इथे दिल्याबद्दल धन्यवाद
वर्षू काय गं ती तुझी छ शी?
वर्षू काय गं ती तुझी छ शी? अशी काय गं ती?
असो पण फोटो भारीच!
भन्नाट लेख आहे. अतिशय सुंदर..
भन्नाट लेख आहे. अतिशय सुंदर..
मस्त दर्शन घडवलंत.. त्या लहान मुलिंच फोटो पाहून मन उद्विग्न झालं.
बादवे, ती संगमरवराची बोट तरंगतेय कशी काय??? काही विशिष्ट योजना त्यासाठी की इतर काही???
धन्स!! स्मितहास्य. ही मार्बल
धन्स!! स्मितहास्य.
ही मार्बल बोट स्टेशनरी आहे पण हेविली अँकर्ड आहे. त्यामुळे रिपल्स मुळे पुढे पुढे चालली आहे असा भास होतो.
ही दुमजली बोट आतून बाहेरून नक्षीदार आहे. संपूर्ण संगमरवरी शिळांनी बांधलेली आहे. खिडक्या युरोपिअन स्टाईल च्या रंगीत स्टेन्ड ग्लास च्या आहेत. नेव्ही उभारण्याकरता असलेला सबंध फंड छ शी ने केवळ स्वतः च्या आरामासाठी ही नौका बांधण्यात खर्च केला. ती अधून मधून या बोटीवर जेवण घेत असे.
वर्षुताई, मस्तच आणि
वर्षुताई, मस्तच आणि माहितीपूर्ण लेख. एकदम इंटरेस्टिंग.
(No subject)
ड्रगनलेडेी
ड्रगनलेडेी
सम्राटाच्या उम्मीदवार
सम्राटाच्या उम्मीदवार रखेल्यांचा एक फोटो इकडे ठेवण्यात आलेला आहे.या लहानग्या पोरींचे इनोसंट चेहरे पाहून मन भरून आलं>>>>>>>> मी एका चिनीला तो फोटो दाखवला आणि माहिती विचारली. त्याने सांगितले कि त्या किप नाहित. सम्राटाचा त्यांच्याशी तसा संबंध येत नसे. त्या राजवाड्यात सेविका म्हणुन काम करण्यासाठी निवडत असत. पण त्यासाठी त्या 'विशिष्ठ' ( वरच्या वर्गातल्या) खानदानाशी निगडित लागत. त्या दिसायला सुंदर लागत (?). (They should be beautiful) एकदम मोठ्या मुलींना सेविका म्हणुन कामावर ठेवताना सुरक्षेचा प्रश्न होइल म्हणुन एकदम लहान मुलींपासुन ट्रेनिंगला सुरवात होइ. त्या मुली मोठ्या झाल्या कि मग 'सरकार' त्यांचे लग्न लावुन देत होते म्हणे.
खरे खोटे देव जाणे.....
तसेच, <<<<<< कैदेत १५ वर्षं राहिल्यावर दुर्दैवी क्वांग शू केवळ ३४ व्या वर्षी मरण पावला. योगायोग असा कि दुसर्याच दिवशी 'छ शी' वयाच्या ७४ व्या वर्षी मरण पावली. >>>>>> त्याच्यामते शू ला घातपात करुन मारले जेंव्हा तिला आपला शेवट जवळ आला आहे हे समजले....
: हे जस्ट माहिती मिळाली म्हणुन लिहल आहे. कदाचित चुकिचं असु शकेल. इतिहास काय फक्त आपल्याकडेच बदलतो .... राग आल्यास क्षमस्व....
माहितीपुर्ण फोटोज
माहितीपुर्ण फोटोज
त्या लहान मुलींचा फोटो पाहून
त्या लहान मुलींचा फोटो पाहून खरेच कळवळले! त्यांचं वय काय आणि त्यांनी भोगले काय! भीषण! त्या लेकरांचा तो फोटो बघितल्यावर एकंदरीत सगळ्याच वास्तुबद्दल मनात एकप्रकारची घृणाच निर्माण झालीये......
अगदी
निवांत पाटिल >> मी एका चिनीला तो फोटो दाखवला आणि माहिती विचारली. त्याने सांगितले कि त्या किप नाहित. >> कुठलीही व्यक्ती स्वतःच्या समाजातील अपकृती / अपवृत्ती वर दुसर्या समाजातील व्यक्तीकडे भाष्य करत नाही सहसा...
धन्स पल्ली @ निवांत.. माझ्या
धन्स पल्ली
@ निवांत.. माझ्या माहितीचा सोर्स पण तिकडे लिहिलेली सरकारी पाटी, गाईड आणी इतिहासाचं पुस्तक..
इतिहास थोडा तोडला मरोडला जात असेल ही कदाचित,.काय जाणे..
डोण्ट वरी.. राब बिग कुछ नही .
वर्षू, माझ्या वाचनाप्रमाणे
वर्षू,
माझ्या वाचनाप्रमाणे त्या राणीचे (रखेलीचे) नाव येहोनाला असे होते.
एल्गीन नावाच्या इंग्रज अधिका-याच्या अधिपत्याखाली १२,००० ब्रिटीश व ६,००० फ्रेंच सैन्य पेकिंग(आजचे बिजिंग) ला उतरले. तो दिवस होता ६ आक्टोबर १८६०. चीनचा सम्राट मांचू राजा त्सिन-फेंग हा जीव मुठीत घेऊन जेहोल येथे पळून गेला. एका आजाराने त्याचा तिथेच मृत्यू झाला.
काही दिवसा पुर्वी याच राजवाड्यात बंदी बनवून आणलेल्या इंग्रज सेनेची मांचू (वरील त्सिन-फेंग) राजाने कत्तल केली होती. याचा बदला म्हणून लॉर्ड एल्गिनने पेकिंगवर हल्ला केला. हा राजवाडा ताब्यात घेतल्यावर त्यानी ईथेच बस्तान मांडले होते. अन शेवटी हा राजवाडा पेटवून देण्याचे आदेश दिले. पाहता पाहता हा राजवाडा आगीच्या लाटात भस्म झाला.....
च-इन हा येहोनाला या रखेलीचा मुलगा गादीवर बसला.
त्याच दरम्यान चीन मध्ये एका शिक्षकाने ख्रीस्ती धर्म स्विकारला व मी येशूचा धाकटा भाऊ आहे. मला ईश्वराचे संदेश ऐकू येतात वगैरे दावे केले. लोकाना हे खरे वाटू लागल्यावर या शिक्षकाने थेट सैन्य उभारुन मांचू घराण्याच्या विरोधात त्यानी बंड पेटवून दिले. यालाच ताईपिंगचे बंड म्हणतात. याच येशूच्या धाकट्या भावाने चक्क चीन मध्ये दुसरे सरकार उभे करुन दाखवले. हे बंड १८६४ साली इंग्रजाच्या सहाय्याने मोडून काढण्यात आले. अन तेंव्हा पासून ही येहोनाला सर्व सत्ता ताब्यात घेऊन चीनवर राज्य करु लागली.
मी वाचलेला इतिहास वरीलप्रमाणे आहे.
--------------
आता माझे काही प्रश्न.
छिंग डायनेस्टीचा सम्राट 'छिनलोंग' >> माझ्या माहितीप्रमाणे हे नाव मांचू सम्राट त्सिन फेंग आहे. या दोन नावातील फरकाचे कारण कळले नाही.
तिचं नाव बदलून 'छ शी' ठेवण्यात आले.>> मग ही येहोनाला कोण आहे? किंवा अशी दोन दोन नावं तिकडे असतात की कसे?
थोडसं सम्राटाच्या मृत्यू बद्दल
माझ्या वाचनाप्रमाणे...
३ नोव्हे १९०८ रोजी राणीचा ७५ वा वाढदिवस होता. तिचे अष्टाभिचिंतन करण्यासाठी क्वांग-शू सम्राट हा सरदाराची टोळी घेऊन राणीच्या राजवाड्यात आला. ११ नोव्हेंबरला सकाळी सम्राटाच्या बापाला म्हणजे इ-कुआंग याला राणीने पेकिंगबाहेर धाडले. आता तो १४ नोंव्हे. पर्यंत परत येणार नव्हता. याच दरम्यान राणीला कट करायचा होता.
१२ नोव्हेंबरला राणीने पहारा वाढवला व सर्वाना राजवाड्यात प्रवेश बंद केला. १४ नोव्हेंबरला सम्राट मृतावस्थेत बेडवर पडलेला होता. लगेच दुस-या दिवशी राणी येहोनाला १५ नोव्हे १९०८ रोजी हगवणीच्या आजारानी मृत्यू पावली.
...आपण म्हणता तसं असेल तर मग हे आमचे भारतीय इतिहासकार संशोधन करतात की काय करतात?
कोणी जानकार वरील विसंगतीचा खुलासा करेल का?
माहितीपूर्ण लेख, पण फोटो का
माहितीपूर्ण लेख, पण फोटो का दिसत नाहीयेत ????
माहितीपूर्ण लेख, पण फोटो का
माहितीपूर्ण लेख, पण फोटो का दिसत नाहीयेत ????
>>>
me 2
फोतू दिसत नाहित ग्ग्ग्ग्ग
फोतू दिसत नाहित ग्ग्ग्ग्ग
माहीति मस्त ...
मलाही फोटो दिसत नाहीत
मलाही फोटो दिसत नाहीत
मला पण नाही
मला पण नाही
मलाही ....
मलाही ....
फोटो दिसत नाहीयेत...
फोटो दिसत नाहीयेत...
सगळेच पान्ढरे चौकोन
सगळेच पान्ढरे चौकोन नेहेमीप्रमाणेच
Pages