१४२० मधे मिंग सम्राटांनी बांधलेल्या या देवळात मिंग आणी छिंग डायनेस्टीचे सम्राट , २१ सप्टेंबर ला चांगला पाऊस आणी उत्तम पीक दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्याकरता तर २१ मार्चला पितरांची पूज करण्यासाठी इथं येत.ही देवळे चीन मधली सर्वात मोठी देवळे आहेत. दक्षिणोत्तर लांबी तीन किमी असून या देवळांनी २७३ हेक्टेअर जमीन व्यापलेली आहेत.
देवळाच्या भोवती दोन डबल तट आहेत. त्यापैकी उत्तरेकडचा गोल आकाराचा तट स्वर्गाचे प्रतीक तर तर दक्षिणेकडचा तट पृथ्वीचे प्रतीक म्हणून चौकोनी आहे. (त्या काळी पृथ्वी चौकोनी असल्याचा समज होता)
प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या एका उंचच्याउंच झाडाच्या सर्वात टोकाच्या फांदीवर स्वस्थपणे विराजमान झालेला हा पक्षी, अढळ स्थान मिळवलेल्या ध्रुवाप्रमाणे भासला..
देवळाचं प्रवेशद्वार
देवळाचं विस्तीर्ण आवार आणी आजूबाजूला असलेल्या विविध इमारती.ताओ धर्माची देवळं.इ.
१२५ फूट उंच,९० फूट रुंद,पांढर्या ,तिहेरी चबुतर्यावर उभे असलेल्या देवळाचे प्रथम दर्शन. ,तिहेरी छपरावर ,कळसाशी मिळणारी ५०,००० निळी कौलं,पांढरा,लाल,सोनेरी,पिवळ्या रंगांचा मिलाफ, कडेने सोनेरी नक्षी आहे. ही वास्तू बांधण्याकरता एकही लोखंडी खिळा,सिमेंट वापरण्यात आलेला नाही. हे सबंध स्ट्रक्चर लाकडी सांध्यांवर उभे आहे.
देवळाच्या आत लाल रंगाचे,२८ नक्षत्रांचे प्रतीक म्हणून २८ खांब आहेत. त्यापैकी चार मुख्य खांबांवर चार ऋतुरूपी चार ड्रॅगन आहेत.
छप्पर तोलून धरणारे खांब
इथे पितरांच्या शिळा ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासमोर बळी दिलेल्या जनावरांचे मांस ,नैवेद्य म्हणून दाखवण्यात येई.
शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेला कळस
देवळाच्या आवारातलं हे पाचशे वर्ष जुनं सायप्रस चं झाड ,मात्र त्याला अजून पालवी फुटते. या झाडाला नऊ ड्रेगन्स चं झाड ही म्हणतात. त्याच्या खोडावरच्या असंख्य गाठींमुळे त्याच्यावर खरोखरच नऊ ड्रॅगन्स सळसळतायेतसं वाटतं. हा फोटो आंतरजालावरून घेतलाय कारण मी घेतलेला छान स्पष्ट आला नव्हता .
आवडलेत. पहिला प्र चि : अकेला
आवडलेत.
पहिला प्र चि : अकेला हु मै, ईस दुनिया मै, कोई साथी है, तो मेरा साया, अकेला हु मै.
असो, अनंताक्षरी वर भेटुच
वर्षू.. छानच !!
वर्षू.. छानच !!
सुरेख फोटो आणि माहिति.
सुरेख फोटो आणि माहिति.
सुंदर ठिकाणं आहेत.
सुंदर ठिकाणं आहेत.
सर्व प्राचीन वस्तू इतक्या
सर्व प्राचीन वस्तू इतक्या काटेकोरपणे जपणे, त्यांची निगा राखणे, स्वच्छता ठेवणे याबद्दल दाद दिल्याशिवाय राहवत नाही.

अगदी !
वर्षु,
मला हे जुने ऐतिहासिक देवळांचे अजब फोटो पाहुन देखील इकडे फिरायला जावस वाटतयं, पण तुर्त तरी महाराष्ट्रातच !
(No subject)
सर्व फोटो आवडले त्याबद्दल
सर्व फोटो आवडले त्याबद्दल दिलेली माहिती हि आवडली. खूपच सुरेख जाऊ शकत नाही पण लांबून तुमच्या कडून एवढी माहिती मिळते ती आवडली.
एक विनंती आहे तो शेवटचा फोटो आहे ना त्याची वरची बाजू बघण्यास मी खूपच उसुक आहे. तिची प्रती दाखवल्यास आनंदच आहे.
Pages