प्राण्यांचं सा रे ग म

Submitted by सत्यजित on 26 July, 2009 - 14:53

एकदा जंगलात प्राण्यांनी ठेवलं सा रे ग म
गाणी गात बसले सगळे सोडुन आपली कामं

पहीला राउंड होता पाळीव प्राण्यांचा
मनीला दिला चान्स पहिला गाण्याचा
मनी गायली मन लाउन म्यॅवं म्यॅवं म्यॅवं...
जज म्हणाले बंद करा हीची ट्यॅंव ट्यॅवं...
मनी खुप चिडली म्हणाली , मला माणसं म्हणतात 'मनी'
पहीला आहे 'म' बरं का? आणि दुसरा आहे 'नी'

नंतर आला कुत्रा, भाँव भाँव.. भूंSSSS....
करत लावली वरची तान
जज म्हणाले मित्रा किती गातोस रे छान..

नंतर गाढव गायलं करत हॅहूंS हॅहूंSS हॅहूंSS...
जज म्हणाले "गाढवा, हे काय गातोस तू?"
अहो.. हिंदी मध्ये मिळाला मला वरचा 'ग' आणि 'धा'
म्हणुन तर हींदी मध्ये मला सगळे म्हणतात 'गधा'

नंतर आला राऊंड जंगली प्राण्यांचा
वाघोबाचा डाव होता प्राणी खाण्याचा

पहीलं गाणं गायला आला एक जिराफ
येवढ्या वरती माईक ओढला झाला तो खराब
मग माईक न घेताच गायला आला एक हत्ती
सोंड वर करुन जोरात गायला तो कित्ती.... हॅऋंSSSS....

लाजत मुरडत मुरके घेत, होतं हरण गात
जज म्हणाले तुझ गाणं साजुक वरण भात

सिंह महाराज आले म्हणाले "दे पट्टी, चार काळी"
सगळे हसताच चिडुन त्यांनी फोडली रे डरकाळी

डरकाळी ऐकताच सगळ्या प्राण्यांनी ठोकली धुम
गाणंबीणं काहीच नाही, झाली सगळीच सामसुम.... झाली सगळीच सामसुम....

शूंSSSS..... इतना सन्नाट क्यूं है भाई? Happy

-सत्यजित.

आहे ना, आयडीया सारेगम?

गुलमोहर: 

भन्नाट आयडीया
खुप छान
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

सत्या मस्तच रे. Happy सही आहे.

व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी ! Happy

आवडेश!

भन्नाट !

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!

सत्या अफलातुन Biggrin

सत्याभाय,
सही है रे..

- अनिलभाई
It's always fun when you connect.

छान गाणे. कुणि चाल लावली तर लहान मुलांना आवडेल म्हणायला.

मला वाटते, हिंदी सा रे ग म, मग मराठी सा रे ग म, मग लहान मुलांचे सा रे ग म. आता प्राण्यांचे हि सा रे ग म टीव्ही वर यायला हरकत नसावी. माझी खात्री आहे की बर्‍याच लोकांना आपली लाडकी मांजर किंवा कुत्रा सुरात ओरडतात अशी खात्री असेलच!
Happy Light 1

झक्की काका तुमच्याकडे मांजर आहे का हो ? Lol

छान कल्पना.
विशेषतः
मनी ची आणि गधा ची फोड आवडली

<< झक्की काका तुमच्याकडे मांजर आहे का हो ?>>
नाही हो. पण माझ्या मुलीकडे दोन बोके आहेत. त्यांचे संगिताचे शिक्षण पूर्ण व्हायचे आहे. सध्या तारस्वराचा सराव चालू आहे.

शिवाय अश्या सिरियल्स आधी इंग्लंडमधे, मग अमेरिकेत नि मग भारतात येतात.
भारतीयांनी स्वतःहून डोके लढवून काही कार्यक्रम (किंवा या बाबतीत त्याला उपद्व्याप म्हणायला पाहिजे) चालू केला तर भारतीयांना तो आवडत नाही. पण त्याची पांचट आवृत्ति अमेरिकेत झाली तर भारतीयांना आवडेल.

आता भारतात संगीत, नृत्य यात काय कमी विविधता होती का? पण तरीहि मायकेल जॅकसनला भारतात जास्त पंखे.

Happy Light 1

सत्या... आवडलं रे सा रे ग म....मस्तच....:)

..................................................................................
"Ours is Essentially a Tragic age, So we refuse to live it Tragically"

सत्या, गाण्याचे क्लासेस चालू करणार वाटतं लवकरचं. फक्त प्राण्यासाठी... चार पायांच्या.
.........................................................................................................................
भेटती अनोळखी चेहरे कधी कधी
आपले जणू नवे चेहरे कधी कधी