एक दिवसाचा पाहुणा - सनबर्ड पक्ष्याचे पिल्लू
एका सक्काळी सक्काळी दार उघडून समोर अंगणात बघतो तर काय - चक्क सनबर्ड पक्ष्याचे एक गोड पिल्लू बसलेले. ती मादी आहे हे लगेच ओळखू येत होते. मी आजूबाजूला कानोसा घेत होतो त्याच्या आई-बाबांचा, पण त्यांचा तर पत्ताच नव्हता ! मी जवळ जाऊन पाहिले तर ते पिल्लू बिचारे भेदरलेले होते. अशा पिल्लांना मांजरे, कावळे लगेच भक्ष्य बनवू शकतात हे ओळखून मी त्याला अलगद उचलून घरात आणले.
त्या गोजिरवाण्या जीवाला पाहून घरात एकदम जल्लोष उडाला. मुलींनी तर लगेच सुरुच केले - "आपण पाळू या त्याला आता".
हे एवढे शांत का बसले असावे असा मी विचार केला व नुसते म्हटले की - याने रात्रभर काही खाल्ले नसेल, उपाशीपोटी अंगात बळही नसेल बिचार्याच्या - उडण्याचेही..... हे म्हणायचा अवकाश - लगेच घरातील सर्व मंडळींनी - भाताची शिते, पोळीचे कुस्करलेले तुकडे, काय काय आणून हजर केले. मीही बिनडोकसारखे त्याच्या समोर ते धरले. ते बिचारे काय खाणार यातले ?
मनात म्हटले - हे रात्रभर उपाशी राहून या सगळ्या खाद्यपदार्थांना चोचही लावत का नाही, याची तब्येत तर नरम नसेल ?
तेव्हा बायकोची एकदम ट्यूब पेटली - अरे, हे तर फुलातला रस पिणारे - हे काय पोळी- भात खाणार ?
मग बच्चमजींकरता बाटलीतला मध आणला - मला वाटते - असा मध (बाटलीतला) खाणारे हे सनबर्डचे एकमेवच पिल्लू असणार - पुढे कधी उडताना काही अडचण आली तर त्याची आई म्हणेल देखील त्याला - "अरे, बाटलीतला मध खाल्लेला तू, तू काय असा उडणार आमच्यासारखा ?"
मध समोर दिसताच चिरंजीवांनी लगेच चोच पुढे काढून बारीक दोरी सारख्या जिभेने मधप्राशन सुरु केले आणि आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मधाने त्याला तरतरी आलीच व ते चांगले बागडू लागले.
मी विचार केला - फोटोसेशनला किती सुंदर सब्जेक्ट मिळालाय ! त्यावेळेस डीजीकॅमचे प्रस्थ फार वाढले नव्हते, माझ्याकडे पेंटॅक्सचा एस एल आर कॅमेरा होता. या पिल्लासाठी एक नवीन रोल टाकून सुरु केला फोटोसेशन !!
-पण ते तर पिल्लूच ! त्याच्या कलाकलाने फोटो काढताना तो रोल केव्हा संपला कळले पण नाही. [३६ फोटो काढता येणारा तो रोल आत टाकणे, वेगवेगळी सेटिंग्ज ठेउन फोटो काढणे (व पुढे डेव्हलपिंग, प्रिंटींग हा अजून एक पोटात गोळा आणणारा भाग) हे किती दिव्य होते - हे या डिजीकॅमच्या सुटसुटीतपणामुळे आता जाणवतंय.....]
.... आता उत्सुकता होती फोटोंची - कारण काढले होते खरे फोटो - पण प्रिंट्स कशा येतात देव जाणे !! दुसरी भिती अशी की हा एकच चान्स, परत असे जवळून थोडेच फोटो काढता येणार ?
हे सगळे होईपर्यंत दुपार टळून गेली होती, मला बाहेर कुठे तरी त्याच्या आई - बाबांचे कॉल्स ऐकू येउ लागले.
मी त्या पिल्लाला सोडून देऊ म्हणताच मुलींची रडारड सुरु झाली. अखेर माझ्या बायकोने त्यांना समजावले - ते किती लहान पिल्लू आहे, त्याच्या आई - बाबांपासून कसे दूर राहू शकेल ते ? तुम्हाला कोणी असे उचलून नेले तर आवडेल का तुम्हाला ? आणि मला, बाबांना चालेल का हे - तुम्हाला दूर नेलेलं?
कशाबशा त्या तयार झाल्या व आम्ही त्या पिल्लाला अंगणात ठेवताच ते त्याच्या आई - बाबांकडे झेपावले. आई-बाबांनी त्याची काहीतरी विचारपूस केली असावी. आपले पिल्लू व्यवस्थित आहे या समाधानात ते दोघेही गोड चिवचिवाट करत पिल्लासकट उडून गेले.
आमच्याकडे मात्र ते पिल्लू फोटोंच्या रुपात अजूनही आहेच आणि मनाच्या खोल आठवणीतही......
आंतरजालावरुन मिळालेले काही फोटो -
घरट्यावर बसलेली मादी
गडद रंगाचा नर
आपण वर पाहिलेले पिल्लू मोठे झाल्यावर असे दिसेल
शशांक.. खूप छान काम केलेत..
शशांक.. खूप छान काम केलेत.. कौतुकास्पद .. नि फोटो पण मस्तच !! तुम्हाला ही सेवा करायला मिळाली हे तुमचे भाग्य नि त्या पिल्लूला तुमचे प्रेम मिळाले हे त्या पिल्लूचे भाग्य
मस्त आहे एकदम
मस्त आहे एकदम
ग्रेट वर्क. फोटोही छान आलेत.
ग्रेट वर्क. फोटोही छान आलेत. खास करुन तो हातात बसलेला एकदम मस्त.
वा! मध खाऊन पिल्लू उडते झाले
वा! मध खाऊन पिल्लू उडते झाले ह्यापरता आनंद तो काय.
इतका नयनमनोहर किस्सा आम्हाला उपलब्ध करून दिल्याखातर मन:पूर्वक धन्यवाद!
आणि हो. पिल्लालाही अनेक हार्दिक शुभेच्छा!
मस्तच!
मस्तच!
शशांक मस्तचं.. निरागस अनुभव
शशांक मस्तचं.. निरागस अनुभव असतात असे आनंद देऊन जाणारे. तुझी बायको हुषार आहे खरचं! मध वा!!
आवडलं !
आवडलं !
खरंच कौतुकास्पद काम शशांक
खरंच कौतुकास्पद काम शशांक
आणि हो फोटो भन्नाट आले आहेत.
खुप सुंदर आहेत फोटो. आता
खुप सुंदर आहेत फोटो. आता कदाचित ते पिल्लू, घराच्या आसपास येत राहिल.
सुरेख रे.
सुरेख रे.
कसलं क्यूट आहे पिल्लू.
कसलं क्यूट आहे पिल्लू. हातावरचा मधाचा थेंब खातानाचा फोटो मस्तच आलाय. एक शंका आहे, माणसांनी हात लावलेल्या पिल्लांना पक्षी परत जवळ करत नाहीत असं म्हणतात. ते खरं आहे का?
किती गोड आहे हे सगळे. सनबर्ड
किती गोड आहे हे सगळे. सनबर्ड चिमण्यांसारखे माणसाभोवती बागडत नाहीत तरीही हे पिल्लु किती विश्वासाने हातावरती बसलेय..
सगळे फोटो अगदी मस्त आलेत. पिल्लु बोटावरचा मधाचा थेंब शोषतानाचा फोटो फारच गोड आहे.
फोटो ,पिल्लू ,त्याच मध खाण
फोटो ,पिल्लू ,त्याच मध खाण अगदी गोड .धन्यवाद .
कित्ती गोड आहे.
कित्ती गोड आहे.
खूप छान काम आणि फोटो ही!!!
खूप छान काम आणि फोटो ही!!!
शशांक, तुम्ही त्या कोवळ्या
शशांक,
तुम्ही त्या कोवळ्या जिवाला वाचवलंत, तसंच माणसांनी हाताळून देखील
त्याच्या आई-बापाने त्याचा स्वीकार केला हे वाचून खूप बरं वाटलं.
(माणसाचा हात लागलेल्या पक्ष्याला इतर पक्षी स्वीकारत नाहीत असं ऐकिवात आहे)
फोटो मस्तच आलेत.
सो स्वीट...........
सो स्वीट...........
अनुभव छानच! शिवाय तुमची
अनुभव छानच! शिवाय तुमची माणुसकी सुंदर.तिला दाद. या सर्वावर कडी म्हणजे सुरेख फोटो.व्वा क्या बात है ?
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार......
आतापर्यंत या पक्ष्याव्यतिरिक्त मी -मुनिया, बुलबुल, शिंपी व ब्राह्मणी मैना या पक्ष्यांच्या पिल्लांनाही हाताळले आहे - खाऊपिऊ घालून पाठवणी केली पण त्यांच्या आई-बाबा अथवा जातभाई यांनी त्यांना झिडकारल्याचे दिसले नाही.
लहानपणी माझी आई मात्र दटावायची - चिमणीच्या पिल्लाला हात लावू नको, इतर चिमण्या मारुन टाकतील असे काहीबाही.
प्रत्यक्ष अनुभव वर दिलाच आहे.
शशांक, कौतुक वाटले खूप, आणि
शशांक, कौतुक वाटले खूप, आणि ते पिल्लू किती गोड आहे
व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व
व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्वा!
वॉव मस्तच. फोटोही
वॉव मस्तच.
फोटोही सुंदर.
तुम्ही नक्की कुठे रहाता? असे पक्षी दारात येतात म्हणुन उत्सुकता
व्वा! झक्कास अनुभव
व्वा! झक्कास अनुभव
वॉव.. अप्रतिम फोटो... किती
वॉव.. अप्रतिम फोटो... किती गोड अनुभव ,कधीही विसरला जाणार नाही.. आणी तुमच्या लहानग्यांनी घरच्याघरी गिरवलेला भूतदयेचा हा धडा ही ते कधी विसरणार नाहीत ..सो स्वीट!!
पिल्लु फार गोड आहे.. छान
पिल्लु फार गोड आहे..

छान शशांक..
लई भारी.. फोटोज पण मस्त
लई भारी.. फोटोज पण मस्त आलेत..
एक शंका - सनबर्ड ला मराठीत काय म्हणतात? हा पक्षी कधी पाहिल्यासारखा आठवत नाही..
मराठीत सनबर्डला फुलचुखी,
मराठीत सनबर्डला फुलचुखी, शिंजीर, सूर्यपक्षी अशी नावे आहेत. वर दिलेल्या प्रचि मादीच्या आहेत. नराचे रंग फार गडद व अतिशय आकर्षक असतात. उडता - उडता फुलातील रस शोषणारा पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.
गोड!
किती गोड... कसं पिवळं धम्मक
किती गोड... कसं पिवळं धम्मक आहे पिलू... शशांक, त्यानं आई-वडिलांना जाऊन सांगितलं असणार... सगळेच कपडे घालणारे दोन पायाचे वाईट नसतात... बाटलीतला मध देतात... छान लागतो... अस्लच काय काय.
खुपच मस्त.... पील्लु तर एक्दम
खुपच मस्त.... पील्लु तर एक्दम क्युट आहे...
बोटा वरच मध पितानाचा फोटो एकदम मस्तच...
Pages