अतुल्य! भारत भाग - १३: हैदराबाद व श्रीशैलम, आंध्र प्रदेश

Submitted by मार्को पोलो on 18 March, 2011 - 06:13

हैदराबाद : हैदराबाद ला ५०० वर्षांचा ईतिहास आहे. हैदराबाद मुहम्मद कुतुब शहा ह्याने १५ व्या शतकात मुसी नदिच्या किनारी वसविले. हैदराबाद चे दोन विभाग पडतात. जुने हैदराबाद व नवे हैदराबाद. जुन्या हैदराबाद मधे चारमिनार, गोलकोंडा किल्ला, सालारजंग म्युझियम अशी ठिकाणे येतात तर नविन हैदराबाद मध्ये हाय्-टेक सिटी, हुसेनसागर तलाव, बिर्ला मंदिर अशी ठिकाणे येतात.
हैदराबाद-सिकंदराबाद पुर्ण पहायचे म्हणजे कमीत-कमी ३ दिवस पाहिजेत.
पहिल्या दिवशी गोलकोंडा किल्ला, हुसेनसागर तलाव व बुध्दमूर्ति, हुसेनसागर तलावाजवळील लेसर शो, बिर्ला मंदिर असे पाहता येईल.
दुसर्‍या दिवशी चारमिनार व सालारजंग म्युझियम पाहता येईल. चारमिनारला लागुनच ईथला "प्रसिद्ध चूडी" बाजार आहे. हैदराबाद मोत्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
तिसर्‍या दिवशी रामोजी फिल्म सिटी पाहता येईल.

चारमिनार
प्रचि १

-
-
-
हुसेनसागर तलावामधील बुद्धमुर्ती
प्रचि २

-
-
-
टँकबंड रोड
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-

गोलकोंडा किल्ला :
सध्या अस्तित्वात असलेला गोलकोंडा किल्ला ईब्राहीम कुतुबशहा वली ह्याने १५ व्या शतकात बांधला. हा किल्ला ग्रॅनाईट च्या टेकडीवर बांधलेला आहे. ह्या किल्ल्याला १० किमी ची तटबंदी असुन ८७ बुरुज, ८ मुख्य दरवाजे, सभागृहे, मंदिर, मशिद, तबेले, पागा, असे आहेत.
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
गोलकोंड्याचा परिसर व हैदराबाद.
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
रामोजी फिल्म सिटी:
रामोजी फिल्म सिटी हैदराबाद पासुन ६० किमी वर आहे. हा जगातील सर्वात मोठा फिल्म स्टूडिओ आहे. रामोजी फिल्म सिटी २००० एकरांवर पसरली आहे. हा परिसर पहायला कमीत-कमी १ दिवस पाहिजे. रामोजी फिल्म सिटी दाखवायला हैदराबादवरुन विशेष बस सेवा आहे. ह्या फिल्म सिटीतील सर्वच देखावे पहाण्यासारखे आहेत. ईथे बागा, धबधबे, उपहारगृहे, हॉस्पिटल, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गाव अशा सर्व ठिकाणांचे देखावे आहेत. ईथे रोज संध्या़काळी नृत्ये, कॉमेडी, मिमीक्री, स्टंट्स असे विवीध खेळ होतात.
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
वेस्टर्न कंट्री सेट
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
भुलभुलैया.
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
के बी आर पार्कः
हे एक भले मोठे उद्यान शहराच्या मधोमध वसले आहे. लोक ईथे रोज जॉगिंग, पक्षी-निरीक्षण यासाठी येतात. ह्या उद्यानात बरेच मोर आहेत.
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
श्रीशैलम : श्रीशैलम हैदराबादपासुन २३८ किमी वर आहे. ईथले शंकराचे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. ईथे महाशिवरात्रीला व गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते.

प्रचि ३७

-
-
-
मंदिरातील एका खांबांवरील नक्षी.
प्रचि ३८

-
-
-
श्रीशैलमचे धरण.
प्रचि ३९

-
-
-
श्रीशैलमचा परिसर.
प्रचि ४०

-
-
-
----------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
----------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

सो यु आर बॅक... Happy
अप्रतिम प्रचि रे..... काय भन्नाट क्लिक्स आहेत मित्रा तुझ्या...
निव्वळ अफलातून... Happy
चारमिनारला लागुनच ईथला "प्रसिद्ध चूडी" बाजार आहे. >>>> लाखेच्या बांगड्या मिळतात तिथे..

श्री शैल्यम, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक.. जुने दिवस चाळवलेस मित्रा.... आभार...

वा! वा! वा! काय अप्रतीम प्रची आहेत. खांबांवरील नक्षी तर अफलातून.
धन्यवाद. इथे बसून श्री शैल्यम दाखविल्याबद्दल.

मस्तच Happy

रामोजी सिटि , मंदिराचा परिसर मस्तच Happy

श्रीशैल माझ्या मुलाचे नाव आहे, आणि ते याच मंदिरावरून ठेवले आहे. आम्हाला हे नाव आवडल म्हणून , कोणी विचारले तर मी फक्त सांगायचे कि या हैद्राबादमधल्या मंदिरावरून नाव ठेवले आहे. पण प्रत्यक्षात मी हे मंदिर बघितले नाही , पण तुझ्या फोटोमधून निदान बघायला तरी मिळाले. थँक्स Happy

मस्तच फोटो. मी काहीच बघितले नाही यातले.

हे सगळे अलिकडचे दिसतेय, तो हुसेनसागरमधला पुतळा, पाण्यात बुडला होता त्या काळात मी तिथे गेलो होतो. चुडीया बाजारात भरपूर खरेदी केली होती. पण किल्ला वगैरे राहिलाच बघायचा. म्यूझियम पण नाही बघितले. (कामासाठी गेलो होतो.) पण मला तिथले झू खुप आवडले होते.
बिदरी वर्क च्या वस्तू पण खरिदल्या होत्या.

वाह अफलातून फोटोस .. श्रीशैल्यम .कित्त्ती वर्षांनी बघितले लहानपणीची सफर आठवली..रामोजी मधले फोटो किती सुरेख आहेत.. हे सगळं मेंटेन कसं करतात.

अप्रतिम !!
श्रीशैलम ला जायला हवं नेक्स्ट टाइम हैदराबाद ला येइन तेंव्हा :).
पण हैदराबाद च्या फोटो मधे एक मस्ट होता,
चार मिनार च्या बाजुच्या गल्लीतली 'लाल बाग ( उर्फ चुडी बझार), खास हैदराबादी बांगड्या- इमिटेशन ज्वेलरीनी बुजबुजलेली दुकानं, रस्त्यावर खर्‍या वाटतील अशा खोट्या मोत्याच्या माळा गजर्‍यासारख्या ढिगाने पकडून फिरत फिरत विकणारी छोटी पोरं..सही जमले असते तुमच्या कॅमेर्‍यात हे शॉट्स !
शिवाय कबाब-बिर्याणी-पान खवय्ये हैदराबाद पण आलं असतं तर आवडलं असतं .. शिल्पारामम पण सही आहे.
नेक्स्ट टाइम हे मिस करु नका :).

सर्वच प्रती खूप खूप आवडल्या जायला भेटलं तर नक्की जाईनच या ठिकाणी असच काही काही चांगल दाखवत जा. तुम्हाला सुट्टी भेटत आहेत आमच्या साहेबाची तंगडी मोडली पाहिजे सुट्टी देतच नाही कधी मागितली तर हे आपल फोटो तच दर्शन ...........

उत्तम देखाव्यांची सुरेख प्रकाशचित्रे! आवडली!!

आम्ही हैदराबाद पाहिले, तेव्हा काय काय राहून गेले ते समजले!

त्याचेच आता राहून राहून दु:ख होत आहे.

तुम्हे इदर आके गये, के बी आर पार्क में मोरांभी देखे. मै उसके बाजुच रैती ना! पार्क के बाजू मोराओं के बाजू न्है. लेकिन मेरेकु विपू नही करे. भौत बुरा लगा Happy लाइट लेलो फोटुआं अच्च्छेच है हमेशा कि तरा. बिर्यानी कलाकंद खाये कि नै?

मित्रांनो,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दिपांजली,
हो तो फोटो घ्यायचा राहिला खरा. हे सर्व फोटोज् मी हैदराबादला ३ ते ५ वर्षांपूर्वी असताना घेतलेले आहेत. त्यावेळी फोटोग्राफीबद्दल मी सिरीअस नव्हतो.
नेक्स्ट टाइम हे मिस करु नका >>> नक्कीच... Happy

आम्ही हैदराबाद पाहिले, तेव्हा काय काय राहून गेले ते समजले!>>>
त्याचेच आता राहून राहून दु:ख होत आहे.>>>
नरेंद्रजी, पुन्हा जा. it's worth it.

अश्विनीमामी,
मै जबी हैदराबाद मै कामा करताथाना तबीच ये फोटू लिया था. ईदर अबी सबको देखने के वास्ते दाल दिये... अगले वखत जबी मै ऊदर आऊंगा नै, तबी तुमको बी ईत्तला कर दूंगा...
बिर्यानी, कलाकंद, खुबानी का मिठा, हालीम ये तो मेरेकु बोत पसंद है.

Lol जुन्या आठवणी चाळविल्यास तु. धन्यवाद...
आता त्यावेळेसारखी हैदराबादी हिंदी बोलता येत नाही हे खरं...

खूपच छान....
ब-याच दिवसापासून माझी इच्छा आहे रामोजी फिल्मसिटी पहायची आहे....
आत्ता हे फोटो पाहून ती आणखी वाढली ...आत्ता मनावर घ्यायलाच पाहीजे.....

ये एकदम सहीच फोटू डाला है बॉस... आपुनभी उधर था ४साल पहिले ४ महिनोंके लिये.. ए सब कुछ देखा था उस वक्त... उधरीच वो एक गाडी बॉडी बिल्डिंगका वर्कशॉपभी हय... वो बी एकदम झकास हय.. उधर का कुच फोटू डालेगा बाद मे..

Pages