मासे २३ - चिंबोरे (खेकडे)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2011 - 08:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन वाटावे
१ चमचा गरम मसाला.
थोडी कोथिंबिर
तेल

क्रमवार पाककृती: 

चिंबोरे साफ करुन घ्यावे. साफ करुन म्हणजे चिंबोरीचे दोन मोठे नांगे काढुन घ्यायचे, बाकीच्या नांग्यांचे वाटुन गाललेले पाणि घ्यायचे त्यामुळे रश्शाला दाटपणा येतो पण हे ऑप्शनल आहे. नंतर चिंबोरे मधुन कापुन त्यातील काळी पिशवी काढून टाकायची. जर चिंबोरे छोटे असतील तर आख्खे टाकले तरी चालतील.

भांड्यात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे, मोठे नांगे टाकुन चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ, कोथिंबीर टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा. चिंबोरे शिजण्यास थोडा वेळ लागतो म्हणुन मिडीयम गॅसवर १५ मिनीटेतरी शिजु द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
लहान
अधिक टिपा: 

चिंबोर्‍यां मध्ये बरेच प्रकार आहेत. समुद्रातील चिंबोरे, शेतातील चिंबोरे, खाडितील खेकडे, डोंगरातील मुठे हे काळे कुळकुळीत असतात. समुद्रात तर बरेच प्रकारचे चिंबोरे मिळतात अगदी रंगित सुद्धा. ह्या चिंबोर्‍यांमध्ये कॅल्शियम भरपुर असत. हे गरमही असतात. काही जणांना अ‍ॅलर्जीहई असते चिंबोर्‍यांची. पण लहान मुलांना जेवणात चिंबोरे म्हणजे मेजवानीच. जर जेवणात चिंबोरा असेल तर १ तास तरी जेवणाला लागतोच. शिवाय ताटात हा पसारा होउन दोन हात खाण्यासाठी वापरावे लागतातच.

चिंबोर्‍यांचे अजुन सुप, सुके करता येते. तसेच पिठ भरुन कालवणही करतात.

चिंबोर्‍या घेताना कडक बघुन घ्यायच्या. जर चिंबोरे दाबल्यावर आत जात असतील तर ते पोकळ असतात. भरलेल्या चिंबोर्‍यांमध्ये लाख (गाबोळी मिळते) ती मिळाली म्हणजे पर्वणीच.

दिवाळीच्या आसपास खाडीत तसेच खाडीलगतच्या शेतात छोटी छोटी चिंबोरी मिळतात त्यांना पेंदुरल्या म्हणतात. ह्या पेंदुरल्या आतमध्ये पुर्ण लाखेने भरलेल्या असतात. लाख म्हणजे ह्यांची गाबोळी.

माहितीचा स्रोत: 
आई व सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या चिंबोरे
chimbore.JPG

नर व मादी चिंबोरा. मादी चिंबोर्‍यात लाख भरलेली मिळते.
chimbore1.JPG

तुम्हाला जळवण्यासाठी हा लालभडक चिंबोर्‍याचा रस्सा.
chimbore2.JPG

अरेच्चा माझी पोस्ट उडाली.. मला वाटले हा अमानवीय ईफेक्ट की काय Happy
चिंबोर्‍या..... तोंपासु... तू फोटो न टाकता असं झालय फोटो टाकल्यावर बघ काय होईल ते Proud

जागुडे!! ह्या अशा रेसिपी आणि फोटो टाकणं म्हणजे आम्हा वेजी लोकांवर अन्याय आहे!
कुठे फेडशील हे पाप?? Angry :कडाकडा बोटं मोडणारी बाहुली:

जागुले परवा लेकाला सहज हे फोटो दाखवले.. तर अजुन दाखव म्हणत होता.. मग तुझ्या माश्याच्या ४-५ रेसिपिचे फोटो दाखवले.. कसले सही एक्स्प्रेशन्स होते त्याच्या चेहर्‍यावर ( लाळगाळु ) Lol
मला म्हणे यांना मुले-मुली किती.. सांगितल्यावर म्हणे किती लकी आहे त्यांची मुलगी Happy

पन्ना, लालु धन्स.
आशुतोष मिलीग्रॅम पण नाही.
वर्षे Lol किती वर्षांचा आहे ग तुझा मुलगा ?

आले आले.. आडो, जागूने निरोप दिला तुझा. मला हे प्रकरण दिसलंच नव्हतं.
मला तो पिवळ्या डिशमधला उताणं झोपलेल्या चिंबोर्‍यांचा फोटु आवडला.

मेधा, तुम्ही लोक्स मागिलदारी भाजी पाला उगवता तसं मागिलदारीच मातीमध्ये पिल्लू चिंबोर्‍या आणून सोडा आणि चिंबोरीची शेती करा. मग वाटलं खावंसं की मागे जायचं माती उकरायची किंवा बिळात हिरकुटाची काडी खुपसून, तोंडाशी दबा धरुन बसायचं Wink

ताई, काकू, माझ्या आई सारख्या आणि माझ्या मैत्रिणी सगळे पदार्थ एकदा बनवून त्या दिवशी मला घरी जेवायला बोलवा अस दाखवून समजत नाही चव ती मला चाखून बघावी लागेल.............

मेधा, तुम्ही लोक्स मागिलदारी भाजी पाला उगवता तसं मागिलदारीच मातीमध्ये पिल्लू चिंबोर्‍या आणून सोडा आणि चिंबोरीची शेती करा. मग वाटलं खावंसं की मागे जायचं माती उकरायची किंवा बिळात हिरकुटाची काडी खुपसून, तोंडाशी दबा धरुन बसायचं >>>>सही आयडियेची कल्पना आहे तुझी अश्विनी Lol

जागू, अहो जाओ नको आणि हो, त्या चिंबोर्‍या खायला/बघायला किती भटांनी हजेरी लावली बघत्येस नां?

मस्तच्...

ह्यांनाच खेकडे म्हणतात ना? तु चिंबो-या म्हटल्यावर मला जरा शंका आली... मग वेगवेगळी नावे वाचली. मी सरसकट सगळ्यांना खेकडेच म्हणते Happy नर-मादी फोटो टाकल्यामुळे आज मला फरक कळला.

मी कधी यांच्या वाटेला जात नाही कारण रश्श्यात टाकेपर्यंत हे पाय हलवत राहतात Sad आम्ही त्यांच्या काळ्या पाठी काढुन टाकतो आणि फोटो क्र. २ मध्ये उलटा टाकलेला पांढरा भाग + नांगे घेऊन त्याचा रस्सा करतो. बाकी इतर तपशील सेम तुझ्यासारखेच. ह्या दोन भागांची पण काहीतरी नावे आहेत, आता विसरले. लेंगे आणि पेंदे बहुतेक.......

कालच लेक सांगत होती. तिच्या वर्गातली एक मुलगी मासे खाते पण तिने खेकडे कधी खाल्ले नाहीत, तिला ते आवडणार नाहीत याची खात्री होती. लेकीने तिला लगेच सल्ला दिला तु फक्त एकदाच खाऊन बघ आणि आवडले नाहीत तर माझे नाव बदलुन टाक. मैत्रिणीने घरी गेल्यावर 'खेकडे आणा' असे जाहिर केले. तिच्या आईला धक्का. तिने लगेच खेकडे आणुन मुलीला खिलवले. तेव्हापासुन त्या मुलीला घरून शाळेत खेकड्यांची भेट यायला लागली गुपचुप आणि माझी लेक व मैत्रिण गुपचुप कोप-यात बसुन त्यांचा समाचार घ्यायला लागल्या... Happy

चिंबोर्‍यांचं कालवण हा माझा परमप्रिय तोंपासू पदार्थ!!! पण हा पदार्थ मी आईच्याच रेसिपीने खाऊ शकायचे...
लग्नानंतर समजलं सासरी चिंबोर्‍या चालत नाहीत... त्यामुळे नाही खाता येत..
पोटावरच्या डिझाईननुसार डोंगरवाला नर, टेकडीवाली मादी असं ओळखायचो.. माझी बहीण तर दिव्यच... ती आमच्या गाबतीणीला (कोळणीला) सांगायची, आमच्याकडे नर चालत नाहीत तर सगळ्या माद्याच दे... Proud

आमच्याकडे चिंबोर्‍यांच्या दोन भाग काळी पाठ आणि पेंद्याचा पोटाकडचा पांढरा भाग असे वेगळे करून साफ करून काळ्या पाठीच्या कवचात बेसन, तिखट, जिरं, हळद, मीठ, तळलेला कांदा खोबरं बडीशेप, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असं (गोळ्यांच्या आमटीचे गोळे करण्यासाठी जे मिश्रण करतात ते) सारण भरून ते रश्श्यात सोडतात. अप्रतिम लागतं!!!

ड्रिमगर्ल आम्ही पण करतो तसे कालवण. पुढच्यावेळी रेसिपी टाकते.
आमच्याकडे नर चालत नाहीत तर सगळ्या माद्याच दे...
Lol
साधना Happy तुझ्या लेकीला कधी आणतेस माझ्याकडे ?

शैलजा जस गाव तस नाव अस मी नेहमीच म्हणते. आमच्याकडे जास्त चिंबोरे म्हणतात.

Pages