मनमोहक कोकण बदलून

Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 20 March, 2011 - 13:05

मनाला विलक्षण भुरळ घालणारे हे कोकण. मायबोलिवर फोटो टाकण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.
त्यामुळे भितीच जास्त आहे.
https://picasaweb.google.com/112180929727005187797/Myboli?authkey=Gv1sRg...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्राज्ञा१२३, आपण केलेला प्रयत्न खुपच छान जमला आहे.
'फ्रेम' न बसवल्यामुळे प्रचि अगदीच नैसर्गिकरीत्या सुंदर दिसत आहे.
आणखी एखाद-दोन टाकायचे होते Happy

छान Happy

साधना, ऋयाम, चातक, रोहित, जिप्सी, नीलू सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पक्क्या भटक्यांनी मला फोटो अपलोड कसे करायचे ते सांगितले, पण मला नीट जमत नाहीए. चुकत चुकत मी प्रयत्न करतेय. माझ्या चुकांना ईथे कोणी हसणार नाही याची मला खात्री आहे. समजून घ्यालच, मार्गदर्शन पण करा.

दिनेशदा, कोकण ईतक सुंदर आहे की , त्या घाटातून फोटो काढायला गाडी थांबवली तर तिथून हलूच नये असे वाटत होते. शांतपणे वाद्यसंगिताची सी.डी. लावून अवती-भवतीचा निसर्ग न्याहळताना "भान हरपून जाणे " म्हणजे काय ते कळते. अजून बरेच फोटो आहेत.
https://picasaweb.google.com/112180929727005187797/Myboli?authkey=Gv1sRg...

प्रज्ञा, लगे रहो. छान आलाय ग फोटो. बाकीचे पण टाक. आज दिवसभरात येऊ देत.
कोकण ईतक सुंदर आहे की , त्या घाटातून फोटो काढायला गाडी थांबवली तर तिथून हलूच नये असे वाटत होते. शांतपणे वाद्यसंगिताची सी.डी. लावून अवती-भवतीचा निसर्ग न्याहळताना "भान हरपून जाणे " म्हणजे काय ते कळते. अजून बरेच फोटो आहेत. ते मी ईथे देणार आहे, पण जरा.......>>>>मला जळवू नको. नाही तर......... समजून घे. Lol

प्रज्ञा, छान आलेत फोटो. वा वा . यश मिळाल तर.
ती लिंक फक्त 'मनाला विलक्षण भुरळ घालणारे हे कोकण. मायबोलिवर फोटो टाकण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.' याच्या खाली दे. म्हणजे पटकन दिसेल.

शोभा बदल केला आहे.
मार्को पोलो , तुम्हा सर्व जाणकारांपुढे माझा हा प्रयत्न म्हणजे पहिलीतल्या विद्दार्थाने वेड्यावाकड्या अक्षरात a, b, c, d काढण्यासारखे आहे. पण तरीही तुम्ही सर्वजण त्याची दखल घेताय ते बघून मला खूप बरे वाटतंय.

<<<तुम्हा सर्व जाणकारांपुढे माझा हा प्रयत्न म्हणजे पहिलीतल्या विद्दार्थाने वेड्यावाकड्या अक्षरात a, b, c, d काढण्यासारखे आहे. >>>> आधी अ, आ, इ, ई शिक. Proud

शोभा Proud

प्रज्ञा अप्रतिम आहेत प्रचि सगळ्या.... कोकण म्हणजे नुसता आनंद आनंद, हिरवळ, शांतता, कडक ऊनात मोठमोठाल्या झाडांची सावली, संध्याकाळचा थंडगार वारा, पानांची सळसळ, नदी, समुद्र आणि खुप काही आहे माझ्या कोकणात किती सांगावे तेवढे थोडेच.....
धन्स प्रज्ञा.....

साधना, ऋयाम, चातक, रोहित, जिप्सी, नीलू, दिनेशदा आता सर्व फोटो लिंकवर दिसतायत. बघा व कसे वाटतायत सांगा.

shobha123 , tyaa surangichya gajaryacha foTo aaj tula mail karate.