पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
परमिटरुमच्या चविष्ट गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा...
मनात खळखळ, उरात धडधड, हळूच येइल शिपायदादा
परमिट नाही खिशात आता पचवुन दारू नडूत मित्रा....
मुखात व्हिस्की, करात चखणा.., झणी बिपाशा दिसेल आता
नवथर कोर्या, नव्या भिडूला पुन्हा अता आवरूत मित्रा...
उगाच तूम्ही मला चिडवता, तशात दारू पुन्हा उतरते
भरून प्याले अबोल होणे, स्मरून खळखळ हसूत मित्रा...
तुडुंब भरता उदर सुरेने पुन्हा स्मरे मग सखी नशीली
अखेरची ती सिगार होती, स्मरून तिजला रडूत मित्रा...
चटावलेल्या जिभेस लहरी, हवी विदेशी मधूमदीरा
पहा कसे काजवे चमकती, पिऊन देशी पडूत मित्रा...
पहाट होता हळूच सांगू भरावयाला अजून मधुरा
नको उतारा, उगाच आता, पुनश्च प्याला भरूत मित्रा...
उतावळा तू मनात इतका कशास "विशल्या" लटपटण्याला ?
पिवून घ्यावी ! उद्यास कोठे... ? असूत किंवा नसूत मित्रा...
मायबोलीवरील एक ज्येष्ठ गझलकार श्री. निशिकांत देशपांडे यांची ही सुंदर गझल बघितल्यावर राहवले नाही. नकळत माझ्यातला ’इरसाल म्हमईकर’ जागा झाला आणि जन्माला आली एक हझल.....!! लिहू का नको, लिहू का नको करत एकदम प्रमोदकाका देव यांची आज्ञा झाली 'होळी ई-विशेषांकासाठी' काहीतरी विनोदी लिहीण्याची....
मग निशिकांतजींच्या अनुमतीनेच त्यांच्या गझलेचे विडंबन म्हणून ही हझल रचली. निशिकांतजींचे अनुमतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! निशिकांतजी कुठे चुक झाली असल्यास मनःपूर्वक क्षमस्व !!
श्री. निशिकांत यांची मुळ गझल इथे वाचा : http://www.maayboli.com/node/24018
हि रचना होळी विशेषांकात इथे वाचता येइल : http://holivisheshank2o11.blogspot.com/2011/03/blog-post_04.html
वृत्त : हिरण्यकेशी
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
नव-ग(ह)झलकार इरसाल म्हमईकर....
उत्तमच आहे...
उत्तमच आहे...
झक्कास विशाल, उघड बार देवा
झक्कास विशाल,
उघड बार देवा आता गाणं आठवलं.
रच्याकने कुठे लटपटलास ह्या वेळी ? :p
सम्या, तूला बोललो होतो ना...
सम्या, तूला बोललो होतो ना... हिच बे ती

धन्यवाद कणखरजी
विशालभौ, 'इसको लगा डाला तो
विशालभौ, 'इसको लगा डाला तो झिंगालाला' टाईप झालीये एकदम.
मूळ गझलही तितकीच सुंदर आहे मित्रा.
रानडे कधी उघडताय बार मग?
मूळ गझल सुंदर आहे म्हणून तर
मूळ गझल सुंदर आहे म्हणून तर विडंबन थोड्याफ़ार प्रमाणात का होइना जमलय नाखु
धन्स !!
खुळ्या डॉलर्सच्या प्रतिक्षेत
खुळ्या डॉलर्सच्या प्रतिक्षेत आहे, छापलेयस ना तु एवढे..
बार ची काय कमी रे, सगळे आपलेच.
हां विशल्या आठवताय्त त्या पहिल्या दोन ओळी..
विशल्या मस्त जमलंय एकदम.. न
विशल्या मस्त जमलंय एकदम..
न पिणार्याला भरीस पाडशील एकदम..
@ सम्या, दक्स : धन्यवाद
@ सम्या, दक्स : धन्यवाद
मस्तच रे
मस्तच रे
छानै... लगे रहो.
छानै...
लगे रहो.
(No subject)
हाहाहा!! बिशाला..... आपलं
हाहाहा!! बिशाला..... आपलं विशाल भाउ!! भारीच आहे हझल.
धन्यु मंडळी
धन्यु मंडळी