१ कप आर्बोरिओ किंवा तत्सम जाड, शॉर्ट ग्रेन राईस - बासमती, सोनामसूरी, जॅस्मिन वापरू नये.
तीन चार शॅलट्स किंवा एक लहान कांदा बारीक चिरून
२-३ पाकळ्या लसूण बारीक चिरून
३ टेस्पून ऑ ऑ
कोथिंबीर बारीक चिरून
अर्धा ते पाऊण पाउंड मध्यम आकाराची कोळंबी
दीड ते दोन कप नारळाचे दूध
मीठ
कोलंबीचे शेल्स काढून स्वच्छ धूउन ३ कप पाण्यात उकळून ( शेल्स , कोळंबी नव्हे ) पाणी गाळून घ्यावे - दोन -अडीच कप स्टॉक होईल. स्टॉक मंद आचेवर ठेवावा
कोळंबी स्वच्छ धुउन बाजूला ठेवावी.
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून लसूण व कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे.
कांदा पारदर्शक झाला की तांदुळ घालून २-३ मिनिटे परतावे. मग असल्यास/ चालत असल्यास अर्धा कप चांगलीशी व्हाइट वाईन घालून परतावे. सर्व वाईन आटत आली की दोन तीन टेबलस्पून स्टॉक घालून परतत रहावे. मग कोलंबी घालून परतावे. स्टॉक आटेल तसा दोन तीन टेबलस्पून घालून परतत रहावे. आच मध्यम असावी. स्टॉक संपत येईल तसा तांदूळ बोटचेपा शिजत येईल. चवी पुरते मीठ घालून मग थोडे थोडे नारळाचे दूध घालून परतत रहावे . तांदूळ पूर्ण शिजल्यानंतर अर्धा कप तरी नारळाचे दूध घालून थोडे परतावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
साधा तांदूळ वापरला तर गचका होतो.
आधी श्रींप स्टॉक मधे परतून शेवटी नारळाचे दूध घातल्याने अगदी गोडसर चव येत नाही.
श्रिंपचे शेल्स उकळताना क्लॉझेट्स बंद अन एग्झॉस्ट ऑन असावे .
भात क्रीमी व थोडा रस असलेला असावा. अगदी कोरडा असू नये.
मस्त वाटतेय रेसिपी.
मस्त वाटतेय रेसिपी.
वाचतानाच खावीशी वाटायला
वाचतानाच खावीशी वाटायला लागली.
तांदळाला पर्यात सुचवा. आंबेमोहोर चालेलसा वाटतोय.
मस्त. ते वासच टेरिफिक आहेत.
मस्त. ते वासच टेरिफिक आहेत. क्लॉझेट्स बंद करण्याची टिप जाम आवडली.
मुंबईत आर्बोरिओ तांदूळ मिळावा
मुंबईत आर्बोरिओ तांदूळ मिळावा मोठ्या दुकानात बहुतेक. इथे सुद्धा तो पुष्कळ महाग असतो बाकी तांदळाच्या मानाने , त्यामुळे भारतात मिळाला तरी भरपूर किंमत असणार. आंबेमोहर मी कधि वापरला नाही , पण क्लासिक रिसोटो मधे जसा सतत थोडे थोडे लिक्विड घालून परतत परतत शिजवतात, तसे केल्यास गचका होईल असे वाटतेय. इतके न परतता एकावेळी जास्त स्टॉक घालायचा, व तो आटत आला की परत स्टॉक घालायचा असे करून पहाता येईल.
(भारतातून आणायच्या सामानात जेमतेम २५०-५०० ग्रॅम आंबे मोहर मावतो,तो रिसोटोकरता वाया घालवायचा ? छे , शक्यच नाही )