अडई

Submitted by मिनी on 13 March, 2011 - 21:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदुळ (उकडा असेल तर उत्तम, पण नसेल तर घरात जो असेल तो चालू शकेल.)
१/२ कप चणा डाळ
१/२ कप तूर डाळ
१ चमचा उडिद डाळ
५ लाल मिरच्या (तुमच्या चवी प्रमाणे कमी जास्त करु शकता)
हिंग
बारिक चिरलेली कोथिंबिर
कढीपत्याची पानं
मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ आणि बाकीच्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवुन एका भांड्यात साधारणपणे ४-५ तास भिजत घाला. त्याच भांड्यात मिरच्यापण भिजत घाला.
2. ४-५ तासांनी भिजत घालेल्या डाळी + तांदुळ + लाल मिरच्या ह्यांचं मिश्रण ग्रांईंडर मध्ये वाटुन घ्या. वाटतांना त्यात हिंग, कढीपत्त्याची पानं आणि मिठ घाला. खूप बारीक वाटू नका, थोडसं जाडसर ठेवा.
३. वाटलेल्या पीठात बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. आणि तव्यावर डोसे घालतो त्यापेक्षा थोडं जाडसर अडई घाला.

हा फोटो:

Adaai.JPG

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ११-२२ होतात.
अधिक टिपा: 

१. तव्यावर मिश्रण टाकल्यावर कडेने थोडं तेल सोडलं की क्रिस्पी होतात अडई.
२. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116302.html?1200915323 इथे जुन्या मायबोलीवरच्या रिसिपीज आहेत. पण प्रमाण वेगवेगळं आहे.
३. नारळाच्या चटणी बरोबर एकदम मस्त लागतात.
४. मुळच्या रेसिपीमध्ये मेथीचे दाणे नव्हते, पण मी १ चहाचा चमचा मेथीचे दाणे पण वापरले.
५. ह्यात फरमेंट करायची गरज नाही. भिजवुन वाटुन लगेच करता येतं.
६. अश्याप्रकारच्या आणि अगदी ह्याच प्रमाणातली रेसिपी अंतरजालावर उपलब्ध असेल तर मला माहित नाही, आज सकाळी माझ्या मित्राने मला ही रेसिपी दिली आणि मी लगेच करुन पाहिलं. आवडली म्हणुन इथे शेअर केली.

माहितीचा स्रोत: 
तेलगु मित्र.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्याप्रकारच्या आणि अगदी ह्याच प्रमाणातली रेसिपी अंतरजालावर उपलब्ध असेल तर मला माहित नाही >>>> Lol बरं झालं लिहिलस ते... नाहितर ह्यात तुझी अ‍ॅडीशन काय तेही सांगत बसावं लागलं असतं... Proud

छान दिसतय अडई.. मधे सर्वणामध्ये खाल्ल होतं.. खूप तिखट होतं पण ते.. !

सायो आणि लाजो थेंक्यु Happy
पराग, माझी अ‍ॅडीशन टाकली आहे की मी अधिक टीपामध्ये Proud
आडो, बासमतीपण चालेल. मी बासमतीच वापरला होता.

>>>बरं झालं लिहिलस ते... नाहितर ह्यात तुझी अ‍ॅडीशन काय तेही सांगत बसावं लागलं असतं.<<<

हो बरोबर, नुसती अ‍ॅडशन काय विचारून मग लिंकही दिली असती इकडच्या सारखीच पाकृ वाटते म्हणून. Wink

मी आत्तापर्यंत अडै म्हणजे वेगळाच पदार्थ समजत होते. हा प्रकार सही आहे, मी करणार Happy
ते कढईत पीठ घालून कढई गोल फिरवत पीठ पसरवून करतात त्याला काय म्हणतात?

मंजुडी, आमच्याइथे (डोंबोलीत) अप्पम मिळतं तू म्हणत्येस त्या पद्धतीने. कढईत तेल न घालता नुसतंच पीठ घालून ती गोल फिरवतात.

अच्छा... ते अप्पम का? मग ते शहाळ्याच्या मलईबरोबर वाटून करतात ते काय?
(:हाहा: मी माझी भारी भारी अज्ञानं आता इथे उघडी करणार आहे, मला माफ करा!)

झटपट पाकृ म्हणुन छान आहे अडई. करुन पाहिन आणि कळवेन. मला जरा शंका वाटतेय की खाताना ड्राय लागतील म्हणुन.

मग ते शहाळ्याच्या मलईबरोबर वाटून करतात ते काय?

ते बहुतेक नीरडोसे म्हणजे आपले घावन असावेत. माझी एक मल्याळी मैत्रिण पिठ न आंबवता जे डोसे करायची म्हणजे नीरडोसे, त्यात शहाळ्याही मलई किंवा आपल्या नारळाचा खव वाटताना घालायची.

मंजु, आपल्या फुडकोर्टात काही दिवस संध्याकाळी अप्पम व स्ट्यु असा बेत असायचा. अगदी लहान कढईत एक डाव पिठ घालुन कढई गोल फिरवायची आणि झाकण ठेऊन अप्पम शिजवायचा. कडेने सुटायला लागला की काढुन प्लेटमध्ये टाकायचा. उलटायचा नाही. मी घरीही करुन पाहिलेले. छान लागतात.

छान लागतो हा प्रकार. मी असलेली भाजी पण त्यात ढकलतो, म्हणजे फार कोरडे लागत नाहीत.
वरुन मुळगापोडी आणि कच्चे तेल घालायचे.

साधना, मी ओल्या नारळाची चटणी केली होती सोबत खायला. मग नाही ड्राय वाटले.
बाकी सगळ्यांना थँक्स. मंजुडी, अमा करुन पहा आणि सांग कसे झाले ते.

नीरडोसा:
तांदूळ ४-५ तास भिजत घालून ते वाटून घ्यायचे. वाटताना जराही कणी रहाणार नाही इतके बारीक वाटायचे. फरमेंट करायची गरज नाही. आणि वाटून झाल्यावर चवीपुरतं मीठ घालून पातळ डोसे घालायचे. नारळाच्या चटणीबरोबर गट्टम् स्वाहा!!!!

पाण्यासारख्या पातळ पिठाचे म्हणून नीरडोसे. (सोर्स- मंगळूरी मैत्रीण)

पूर्वी खाल्ली होती.. कुक, परप्पु अडई म्हणे बहुतेक,अडईला. आंबवून करत असे ती.. मस्त लागायची.. पण मी ही अशी बिना फर्मेंटेशन ची करीन.. Happy

मीही केली या रेसिपीने, मस्त झालि होती.डाळ्-तांदुळ रात्रभर भिजवले सकाळी बारिक वाटले,लाल मिरच्या नव्ह्त्या म्हणून हि.मिरची घातली.
लेकिला करुन देताना त्यात गाजर किसुन घातले आणी वरुन श्रेडेड चिझ टाकले.

Pages