खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल्पकला, ह्या देशाच्या भरभराटिची, संस्कृतीची आणि संपन्नतेची साक्ष देणारी कलाकुसर...
आम्ही ह्या अद्भुत भूमिची सफर डिसेंबर, २००९ च्या शेवटच्या आठवड्यात केली. खजुराहो, दिल्ली पासुन रेल्वेने १० ते १२ तासांवर आहे. स्टेशन अगदी छोटेसे आणि स्वच्छ आहे. हे गाव हवाई मार्गाने मुंबई, दिल्लीला आणि कोलकत्याला जोडलेले आहे. खजुराहो गाव तसे फारच लहान आहे पण येथे अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि पंचतारांकित हॉटेल्स आहेत.
खजुराहो हे गाव प्राचिन काळी खजुरांच्या झाडांनी वेढलेले असल्याने हे नाव पडले.
ह्या गावाची लोकसंख्या जेमतेम १५००० असेल. ईथल्या लोकांची उत्पन्नाची साधने म्हणजे पर्यटन आणि शेती.
हॉटेल्स ५०० रुपयांपासुन १५००० पर्यंत मिळतात. जेवणात पराठ्या पासुन पिझ्झ्यापर्यंत आणि सांबर पासुन सिझलर्स पर्यंत सर्व काही मिळते.
ईथे गेल्यावर फिरण्याचे सोपे आणि स्वस्त साधन म्हणजे रिक्षा. ईथे मंदिरे पाहताना गाईड नक्की करा.
ईथे एव्हडे परदेशी पर्यटक येतात कि तुमच्या शेजारी उभा राहुन एखादा अगदी साधा वाटणारा गाईड अस्खलिखित फ्रेंच किंवा जपानी बोलायला लागला कि चाट पडायला होते.
खजुराहो नीट पहायचे म्हणजे कमीतकमी ३ दिवस तरी पाहिजेत.
आम्ही ह्या भूमिची सफर ईथे जवळच असलेल्या पांडव गुहांपासुन सुरु केली.
पांडव गुहांचा रस्ता पन्ना च्या जंगलामधुन जातो.
प्रचि १
पन्नाचे जंगल
असे म्हणतात की ह्या गुहांमध्ये पांडवांनी वनवासात असताना वास्तव्य केले.
असे म्हणतात की ईथे जे तळे आहे ते भिमाने गदा मारुन तयार केले. ह्या तळ्यावरील Rock Formation पहाण्यासारखे आहे.
प्रचि २
भिमाने गदा मारुन तयार केलेले तळे
परत येताना राणेह ह्या धबधब्याला भेट दिली. हा धबधबा केन नदीवर आहे. त्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धबधब्याला पाणी कमीच होते. पण पहाण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथले Rock Formation. ह्याला भारताचे Grand Canyon म्हणतात. ईथले Rock Formation ५ किमी लांब व १०० फूट खोल आहेत. हे सर्व खडक crystalline granite असुन गुलाबी, लाल, पिवळा, नारंगी, राखाडी अशा विविश रंगात सापडतात. एकाच ठिकाणाहून एव्हडे विविध दगड मिळण्याची ही भारतातली बहुदा एकमेव जागा असावी.
प्रचि ३
राणेह धबधबा
-
-
-
प्रचि ४
रॉक फॉरमेशन
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
एकाच ठिकाणाहून निघालेले विविध प्रकरचे दगड
-
-
-
पांडव गुहा व राणेह धबधबा पाहुन सायंकाळी बुंदेली नृत्य-प्रकार तसेच मंदिरांची माहिती देणारा खास रात्रीचा दृक्-श्राव्य (light and sound show) खेळ ही पाहिला.
प्रचि ७
बुंदेली नृत्ये
-
-
-
प्रचि ८
दुसर्या दिवशी आम्ही खजुराहोच्या जगप्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला निघालो. ईथली सर्व मंदिरे चंदेला राजांच्या राजवटीत, दहाव्या ते बाराव्या शतकात बांधली गेली. एके काळी ईथे ८५ मंदिरे होती. काळाच्या ओघात, दुर्लक्षिले गेल्यामुळे व आक्रमणांमध्ये बरीच मंदिरे नष्ट झाली. आता फक्त २२ मंदिरे अस्तित्वात आहेत. ही सर्व मंदिरे खजुराहोच्या दक्षिण, पुर्व व पच्शिम ह्या दिशांना पसरलेली आहेत.
आम्ही आमचा प्रवास दक्षिण-पुर्व मंदिरांच्या समुदायाकडुन सुरु केला. ह्या समुदायात चतुर्भुज, दुल्हा देव, पार्श्वनाथ आणी आदीनाथ अशी मंदिरे येतात. ईथे गाईड नक्की करावा. ते मंदिरांची फार छान माहिती देतात.
जरी सर्व मंदिरांचे स्थापत्यशास्त्र एकच असले तरी त्यांवरची शिल्पकला थक्क करणारी आहे. प्रत्येक मंदिर पायापासुन ते कळसापर्यंत शिल्पकलेने मढविलेले आहे. प्रत्येक मंदिरावर पुराणकाळातल्या कथा, त्याकाळचे लोकजीवन, नृत्ये, खेळ, शिकार, प्रणयदृष्ये असे कोरलेले आहे. ह्या सर्व शिल्पांमध्ये देव, देवता, राजा, दास, दासी, शिकार, शिकारी, दांपत्य, कुटुंब, नृत्यांगना, गायक, वादक, प्रेमी युगुल, श्रृंगार करणारी तरुणी, तरुण, अप्सरा, ललना असे सर्व काही आहे.
सर्व मंदिरे व मुर्त्या ईतक्या जिवंत, सुंदर आणी प्रमाणबद्ध आहेत की आपण त्याच काळात वावरतो आहोत असा भास व्हावा.
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
तिसर्या दिवशी आम्ही पच्शिम मंदिरांच्या समुहाला भेट द्यायला निघालो.
पच्शिम मंदिरांच्या समुहातली सर्व मंदिरे एकाच परिसरात येतात व ही सर्व मंदिरे बाजारपेठेच्या जवळच आहेत. ह्या समुहात कंदरीया महादेव मंदिर, चौसष्ठ योगिनी मंदिर, चित्रगुप्त मंदिर, लक्ष्मण मंदिर, मातंगेश्वर मंदिर व वराह मंदिर अशी मंदिरे येतात. ही सर्व मंदिरे नीट पहायची असतील तर तुमच्याकडे किमान ५-६ तास तरी हवेत.
ही सर्व मंदिरे बघताना भान हरपुन जाते. ह्या मंदिरांतला प्रत्येक दगड ईतका सुंदर घडविला आहे की थक्क व्हायला होते. हजारो हातांनी शतके राबुन घडविलेले ते काम पाहुन ऊर अभिमानाने भरुन येतो.
ईथल्या मंदिरांभोवतीच्या बर्याचशा शिल्पात आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम (ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम) सांगितले आहेत त्यांचा ऊल्लेख केला आहे. एक परीपुर्ण व सफल जीवन जगण्यासाठी व मोक्षप्राप्तिसाठी हे चारही आश्रम पुर्ण करणे अतिशय गरजेचे आहे हे वारंवार सांगितले आहे. ह्या चारही आश्रमांमध्ये करण्याची सर्व कामे प्रत्येक मंदिराच्या भोवताली कोरलेली. ईथे हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या सर्व भौतिक व शारीरीक गरजा पुर्ण करा व ते सर्व झाल्यावर त्या सर्वशक्तिमान विधात्यामध्ये विलीन व्हा. जुन्या काळी जे पुजारी सांगायचे की आधी मंदिर प्रदक्षिणा पुर्ण करा व मग नंतर गाभार्यात या हेच त्यासाठी.
प्रचि ३१
कंदरीया महादेव. (कंदरा = गुहा)
खजुराहोतील सर्वात मोठे व सर्वात भव्य मंदीर.
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
कंदरीया महादेव
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ३९
-
-
-
प्रचि ४०
-
-
-
प्रचि ४१
-
-
-
प्रचि ४२
-
-
-
प्रचि ४३
-
-
-
प्रचि ४४
-
-
-
प्रचि ४५
-
-
-
प्रचि ४६
-
-
-
प्रचि ४७
-
-
-
प्रचि ४८
-
-
-
प्रचि ४९
-
-
-
प्रचि ५०
-
-
-
प्रचि ५१
-
-
-
प्रचि ५२
-
-
-
प्रचि ५३
-
-
-
बर्याचशा गोष्टी शिकुन भारावलेल्या मनाने आम्ही ह्या जादुई देवनगरी चा निरोप घेतला ते परत येण्याच्या ईर्याद्यानेच.
-------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - आंध्र प्रदेश.
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
झकास रे!
झकास रे!
अप्रतीम (नेहमी
अप्रतीम (नेहमी प्रमाणे)...........
अप्रतिम ! [ आम्ही १९८० च्या
अप्रतिम !
[ आम्ही १९८० च्या दरम्यान गेलो होतो; जबलपूर- सतना रेल्वे स्टेशन रेल्वेने व तिथून स्पेशल बस; वाटेत पन्ना डायमंड खाणी व पांडव गुहा इथे भेट; त्यावेळी बोईंग सेवा सुरू झाली होती पण गावातील सुविधा मात्र आता खूपच सुधारल्या आहेत असं वाटतं; बसचा स्थानिक चालक अजून पन्ना जंगलात "डकाईती" चालते म्हणत होता ! आपण म्हटल्याप्रमाणे खजुराहोला चांगला गाईड अत्यावश्यक व नशीबाने आम्हाला तसा मिळालाही होता].
तुमच्या नेटक्या प्र्.चि.मुळे मिळालेल्या पुनःप्रत्ययाच्या आनंदाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
ग्रेट रे! प्रचि ३,४,५ पाहून
ग्रेट रे!
प्रचि ३,४,५ पाहून मला, इथे एकदा जायचे आहे हे पुन्हा तिव्रतेने वाटले.
बाकी प्रचि अजून पाहतोच आहे!
आ हा हा हा........बस्स इतकेच
आ हा हा हा........बस्स इतकेच लिहू शकतो रे........
मंडळी, प्रतिसादांबद्दल
मंडळी,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद...
भाऊ,
छान माहिती दिलीत...
प्रकाश,
नक्की जाऊन ये... अप्रतिम आहे सर्व काही...
धबधबे अति सुंदर !!!!!
धबधबे अति सुंदर !!!!!
चन्दन अरे किती सुन्दर फोटो
चन्दन अरे किती सुन्दर फोटो पाठवले आहेस. अगदी वेड लावणारे , थक्क करणारे
फोटो आहेत. पहिले ५ तर अप्रतिम. अवर्णनीय.
क्लास फोटो!!! मणिकर्णिका,
क्लास फोटो!!!
मणिकर्णिका, माहितीबद्दल धन्यवाद!
एकापेक्षा एक
एकापेक्षा एक प्रकाशचित्रे....
अफलातून, शब्दच नाहीत मित्रा..........!
ते ५ व्या क्रमांकाचे प्रचि विलक्षण आवडले
चंदन, नेहमीप्रमाणे
चंदन, नेहमीप्रमाणे अप्रतिम.
तुझ्यामुळे भारतातला हा अमुल्य खजिना आमच्यासमोर येतोय. लगे रहो.
सर्व फोटोअ अप्रतिम
सर्व फोटोअ अप्रतिम
मणिकर्णिका, माहितीबद्दल धन्यवाद.
अ प्र ति म ! डोळ्यांचे पारणे
अ प्र ति म ! डोळ्यांचे पारणे फिटले!
शिल्पांचा कमनिय बांधा, अर्धोन्मिलित नेत्र.... खुप सुंदर!!
तसेच प्रचि २ , १३ खासच आलेत.
व्वा! घरबसल्या (खरेतर
व्वा! घरबसल्या (खरेतर ऑफिसबसल्या) खजुराओ ची सफर झाली

अन फोटो इतके छान आलेत की पुढेमागे (मूर्तिकामाचे) संदर्भाकरीता सेव्ह करुन ठेवायचा मोह आवरता आला नाही. बहुतेक सगळे फोटो सन्ग्रही घेऊन ठेवलेत
हे सर्व डोळ्यान्चे पारणे फेडणारे अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
खूपच सुरेख बघण्यासारख भरपूर
खूपच सुरेख बघण्यासारख भरपूर काही आहे आपल्याच देशात पण इथून हलायला मिळेल तर शपथ..........सुट्टी मागितली कि नाटक सुरु
प्रतिसादांबद्दल धन्यवाद...
प्रतिसादांबद्दल धन्यवाद...
Pages