Submitted by ठमादेवी on 9 March, 2011 - 06:56
नोबुचगे नावाचा एक सैनिक गुरू हाकुइनकडे आला... त्याने विचारलं,
गुरूजी मला स्वर्ग आणि नरकातला फरक सांगू शकाल काय?
हाकुइनने विचारलं, तू कोण आहेस?
मी एक सामुराय आहे, तो म्हणाला...
तू सैनिक आहेस? तुमच्या राजाने कसले सैनिक भरून ठेवलेत? तुझा चेहरा तर एखाद्या भिकार्यासारखा दिसतोय...
नोबुचगेला राग आला आणि त्याने तलवार बाहेर काढायला सुरूवात केली... त्यावर गुरू म्हणाला, तुझ्याकडे तलवार आहे होय? पण माझं शीर कापून काढायला ती अगदीच अपुरी आणि बोथट आहे...
ते ऐकून रागावलेल्या नोबुचगेने तलवार पूर्ण बाहेर काढली... त्यावर हाकुइन म्हणाला,
इथे नरक सुरू होतो...
नोबुचगेने ऐकल्याबरोबर तलवार म्यान केली आणि मान तुकवली... हाकुइन म्हणाला
इथे स्वर्ग सुरू होतो....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठम्माबाई, कथा सांगताय खर्या,
ठम्माबाई, कथा सांगताय खर्या, पण शेवटी रस्ता दाखवण्यार्याच्या हातात काही नाही. स्वर्गात जायचं की नरकात ते चालणाराच ठरवणार
ठमा, आपण काढू ते अर्थ !!
ठमा, आपण काढू ते अर्थ !!
कोमुतै, पहिली पेक्षा या दोन
कोमुतै, पहिली पेक्षा या दोन जास्त आवड्ल्या
हे खरंय असुदे... अगदी
हे खरंय असुदे... अगदी खरं...
दिनेश, हेही अगदी खरं आहे... कथा ही कथाच... आपण काढू ते अर्थ त्यातून निघू शकतात...
आपल भविष्य हे आपल्
आपल भविष्य हे आपल् वर्तमानातील कृत्य ठरविते......
त्यामुळे तात्पर्यः जसे पेराल, तसेच उगवते.....
मस्त. या कथा मनात घोळवायच्या
मस्त. या कथा मनात घोळवायच्या आणि मनन करायचे. किती सोप्या आणि साध्या. अजिबात शब्दांचे वायफळ बुडबुडे नाहीत.
ठमादेवी यातल्या बर्याच गोष्टी
ठमादेवी यातल्या बर्याच गोष्टी ओशोनी सांगीतल्या आहेत. तुम्हि त्यावरुन तर घेत नाहि ना ?
नुसत्या कथा देण्याला हरकत नाहि पण ओशोंनी जे अध्यात्म सांगितले आहे त्याला support म्हणुन या कथा सांगितल्या आहेत तुम्हि ते न सांगितल्यामुळे त्यातला मुळचा गंध हरवुन गेला आहे.
छाण कथा
छाण कथा
ही पण छान
ही पण छान
मजा येतेय वाचायला. मराठीत
मजा येतेय वाचायला. मराठीत असल्यामुळे ती लिमलेटची गोळी आणखीनच हवीहवीशी वाटते आहे.
मुळात कुठे स्वर्ग अन कुठे नरक
मुळात कुठे स्वर्ग अन कुठे नरक हे सांगितल्यावर किंवा कळल्यावरसुद्धा काही परीणाम घडत असतीलच ना?
शोधून स्वर्ग मिळतो का कुठे?
गणु, ठमाला अध्यात्म विचार
गणु, ठमाला अध्यात्म विचार आवडत असेल असे वाटत नाही. झेन च्या कथेतला अध्यात्म विचार असा एक धागा आपण सुरु करावा.
छानच..! या झेन कथा ठमीनं शेअर
छानच..!
या झेन कथा ठमीनं शेअर कारण्याचं मनावर घेतल्यामुळे मला या कथांची ओळख झाली. नाहीतर मी या कथा कधी वाचणार होतो म्हणा?
या आधीच्या आणि या पुढील कथा मी प्रिंट काढून संग्रही ठेवणार आहे.
पुढील कथेच्या प्रतिक्षेत..!
पुढील कथेच्या प्रतिक्षेत
पुढील कथेच्या प्रतिक्षेत
झेन कथांचे अर्थ,भावार्थ,
झेन कथांचे अर्थ,भावार्थ, शब्दार्थ, अन्वयार्थ इ.इ. न लिहिण्यातच त्यांची मजा आहे. प्रत्येकाने आपपल्या वकुबाप्रमाणे अर्थ लावावा. वय, ज्ञान, अनुभव इ. प्रमाणे व्यक्तिपरत्वे त्यांचा अर्थ बदलूही शकतो.
सगळ्यांचे आभार... गणू नितीन
सगळ्यांचे आभार... गणू नितीन म्हणतात त्याप्रमाणे मी ओशो वगैरे कधी वाचलेलं नाही... अध्यात्माच्या वाटेलाही कधी गेले नाही... या कथांचं एक इंग्रजी पुस्तक आहे माझ्याकडे... त्यातून घेतेय...
आगाऊ हे अगदी करेक्ट आहे... झेन कथांचे अर्थ हे सर्व आपले आपण लावायचे असतात... मला वाटतं अशा एकसारख्याच कथा आपल्याला सूफींमध्येही आढळतात... इतरही धर्मांमध्ये असे आशय असलेल्या, दिसायला सारख्या असलेल्या कथा दिसून येतात. त्यांचा उगम अमुक एका विचारसरणीत किंवा धर्मात झाला असं सांगणं खरंच खूप कठीण आहे. पण त्या मनाला आनंद देतात हे नक्की...
असो... आणखी कथा टाकतेच आहे... प्रतिसादांबद्दल आभारी आहे...
आयला... परत झेन कथा सुरू
आयला... परत झेन कथा सुरू झाल्या वाटते....
हि पण आवडली.
हि पण आवडली.
तलवार बाहेर काढली की नरक
तलवार बाहेर काढली की नरक सुरू
तलवार परत म्यान केली की स्वर्ग
व्वा!
माझी तलवार बाहेर आली कि
माझी तलवार बाहेर आली कि स्वर्ग सुरु होतो, आणि आत गेली कि नरक
-- बे फकीर
(No subject)
आपण काढू तो अर्थ च्या
आपण काढू तो अर्थ च्या धर्तीवर
आपण काढू ती 'तलवार'
-'चांगभलं'!
मी कितीतरी जणांना माझ्या
मी कितीतरी जणांना माझ्या तलवारीने पाणी चाख्लंय
नाद कराचा नाय
-- कामा देवी
चांगभलं, हे तुमच्या
चांगभलं,
हे तुमच्या प्रतिसादांमुळे गप्पंचे वाहते पान होईल बरे??
(No subject)
खो खो सोडून बाया आता तलवार
खो खो सोडून बाया आता तलवार तलवार खेळायला लागल्या..
(No subject)
बेफिकीर,चांगभलं,जामोप्या, माझ
बेफिकीर,चांगभलं,जामोप्या,
माझे ऐका-
मोल करो तलवार का
पडी रहन दो म्यान
तात्पर्य-जसे पेराल तसे उगवते!
बे फकीर ?????
आपण काढू तो अर्थ च्या
आपण काढू तो अर्थ च्या धर्तीवर
आपण काढू ती 'तलवार'
>>> तुमच्या कडे किती तलवारी आहेत
दोन! एक अॅक्च्युअल! एक
दोन!
एक अॅक्च्युअल!
एक लेखणीची
Pages