आई बाबांचं घड्याळ झालंय
टीक टीक, टीक टीक, टीक टीक
क्षणा क्षणाला चालली असते
कीट कीट, कीट कीट, कीट कीट
वाजले सात, चालवा हात
वाजले आठ, गृहपाठ
सहाला उठून शाळेत जायचं
सातच्या आत घरात यायचं
वाजणार म्हणुन आईचा गजर
वाजले म्हणुन बाबांचा गजर
कशाला हवाय घड्याळाला गजर
गजरा आधी हेच हजर
घड्याळ तेवढं चालत असतं
घड्याळा शिवाय चालत नाही
वेळे आधी, वेळे नंतर
काही सुद्धा मिळंत नाही
चंद्रावरती देखिल मजला
दिसतात दोन काटे
सूर्याचे देखिल केलेत ह्यांनी
मोजुन बारा वाटे
इतक्याच वाजता सुर्योदय
इतक्याच वाजता चंद्रोदय
मागे पुढे झालं तर
त्यांची देखिल नाही गय
जगणं म्हणजे सारखं
घड्याळ पहात राहणं
जगणं म्हणजे क्षणांचा
हिशोब घालत रहाणं
Success Is Life बेटा
Success म्हणजे खेळ नाही
Time is Money बेटा
घालवायला वेळ नाही
माझ्याशी बोलावं तर
वेळ फुकट जातो?
माझा वेळ जावा म्हणुन
खेळणी विकत घेतो
खेळणी नकोयत मला
आता पैसे हवे आहेत
आईबांबांचे थोडे क्षण
विकत घ्यायचे आहेत
माझ्यासाठी पैसे नको
थोडे क्षण इनवेस्ट करा
जीवना पुढे धावणारं
घड्याळ अॅडजेस्ट करा...
प्लिज तेवढं... तुमचं घड्याळ अॅडजेस्ट करा...
टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...
टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...
-सत्यजित.
मुलांच्या मनातल्या भावना खूपच
मुलांच्या मनातल्या भावना खूपच प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत! छान,मस्त कविता
छान मांडलय
छान मांडलय
मोठ्यांची बालकविता. !
मोठ्यांची बालकविता. !
छान आहे गड्या
छान आहे गड्या
गजरा आधी हेच गजर खूप आवडली
गजरा आधी हेच गजर
खूप आवडली
मोठ्यांनी वाचायची बालकविता
मोठ्यांनी वाचायची बालकविता
माझ्यासाठी पैसे नको थोडे क्षण
माझ्यासाठी पैसे नको
थोडे क्षण इनवेस्ट करा
जीवना पुढे धावणारं
घड्याळ अॅडजेस्ट करा...>>>
खरचं..!
mast re Satya!
mast re Satya!
(No subject)
सूर्याचे देखिल केलेत
सूर्याचे देखिल केलेत ह्यांनी
मोजुन बारा वाटे >>>
क्या बात है!
आवडली.
सही है भाय.
सही है भाय.
सहीये. आवडली
सहीये. आवडली
मस्त रे सत्या
मस्त रे सत्या
मोठ्यांच्या डोळ्यात अंजन
मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी......सुरेख कविता.
(No subject)
आवडेश.. मस्तच !
आवडेश.. मस्तच !
धन्स मित्रांन्नो.... कधी कधी
धन्स मित्रांन्नो.... कधी कधी आत्मपरीक्षण महत्वाच असतं
मोठ्यांची बालकविता >> हो ना, कळत्या वयाच्या मुलांची कविता...