कोलिम तिन ते चार वाटे
दोन मध्यम आकाराचे कांदे चिरुन
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला
कोकम किंवा आंबोशी
मिठ
एक हिरवी मिरची मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल
पहिला कोलीम निवडून घ्यायचा. एक माचिसची/अगरबत्तीची काडी घेउन किंवा बोटाने थोडे थोडे कोलीम सारुन (तांदूळ निवडतो तसे) कोलीम निवडावा लागतो. त्यात कधी कधी पाखर असतात किंवा काही प्लास्टिक वगैरे मिक्स झालेले असतात म्हणून. ही पाखरे अगदी छोटी असतात. आता कशासारखी लिहीली तर तुम्ही इ.. करुन आणणार नाहीत किंवा किळस वाटेल पण तसे काही नाही ही पाखरे घाणेरडी नसतात. तांदळात पडलेल्या टोक्यांप्रमाणे ही काडीला चिकटून किंवा चिमटीत धरुन काढून टाकायची.
काही जण कोलिम धुवत नाहीत त्याची चव जाते म्हणून पण जर आपले मन साशंक असेल तर पिठाच्या चाळणीत किंवा रुमालात ठेउन हा कोलिम धुवावा.
आता तेलावर लसूणाची फोडणी द्यावी व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत शिजवावा. मग त्यात हिंग, हळद मसाला हे नेहमीच जिन्नस घालून त्यावर कोलीम टाकावा. आता भांड्यावर झाकणात पानी ठेउन कोलिम वाफेवर शिजु द्या. मधुन मधुन झाकण काढून परतवा. ७-८ मिनीटांनी त्यात मिठ, मोडलेली मिरची, कोकम किंवा आंबोशी, कोथिंबीर टाका व परतुन परत एक वाफ येउ द्या. मग गॅस बंद करा. आणि भाकरी सोबत खा.
कोलीम समुद्रात तसेच खाडीत मिळतो. समुद्रातील कोलीम पांढरट असतो तर खाडीतला काळा असतो. खाडीतल्या कोलमाला जास्त चव असते. कोलीम म्हणजे कोलंबीच्या जन्माची पहिली स्टेप. कोलिमाचे कालवण मी अजुन ऐकले नाही पण कोलिमाची वडी करतात. सुक्या कोलमाच्या पापडासारख्या पण थोड्या जाड वड्या बाजारात विकत मिळतात. त्या वड्या तव्यावर किंवा चुलीत भाजुन खायला मजा येते.
जागू मला अवलने सांगीतल्यावर
जागू मला अवलने सांगीतल्यावर हा मुद्दा लक्षात आला तू फोटो कृतीत न टाकता प्रतिसादात टाकतेस ते. वर कृतीत फोटो टाकत जा ना. त्यासाठी फोटो टाकलेस त्या प्रतिसादाच्या संपादन मध्ये जायचे आणि फोटो टाकलेत तो सगळा HTML कोड कॉपी करायचा. मग पाककृतीच्या संपादन मध्ये जावून हवा तिथे तो कॉपी केलेला मजकुर टाकायचा. नंतर प्रतिसादातले फोटो काढून टाक. सोप्पय ना. हाकानाका.
रुनी धन्स. वेळ मिळाला की सगळे
रुनी धन्स. वेळ मिळाला की सगळे फोटो पाकृत टाकते.
मेधा तु आलीस की लगेच गटग.
tumhaalaa hyaat javaLaa
tumhaalaa hyaat javaLaa kolaMbee hyaamche aakaar kuThe dusat aahet, malaa naahee disat aahet,.
Pages