चीन मधे हजारो वर्षांपासून प्रचलित असणारे, बारा प्राण्यांच्या नावावर आधारलेले राशीचक्र हे ,पाश्चिमात्य कॅलेंडरप्रमाणे बारा महिन्यात विभागलेले नसून बारा वर्षात विभागलेले आहे. तुम्ही जन्मलेल्या इसवी सन प्रमाणे तुमची राशी, त्या त्या प्राण्याचे सिंबल आहे.
यामागची कथा अशी सांगतात कि, निर्वाण करायच्या आधी बुद्धाने (ज्याला जेड सम्राट असे ही नांव आहे) सर्व प्राण्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. या समारंभाला फक्त बाराच प्राणी उपस्थित झाले. हे प्राणी ज्या अनुक्रमाने आले त्याच अनुक्रमात त्यांचे नांव प्रत्येक वर्षाला देऊन बुद्धाने त्यांचा सन्मान केला.
ते प्राणी असे- १)उंदीर २) बैल ३) वाघ ४) ससा ५) ड्रॅगन ६) साप ७)घोडा ८) मेंढी ९) माकड १०) कोंबडा ११) कुत्रा १२) डुक्कर
खालील तालिका वाचून तुम्ही तुमचा बर्थ अॅनिमल कोणता ते जाणू शकता
उंदीर- १९१२-२४-३६-४८-६०-७२-८४-९६-२००८
बैल- १९१३-२५-३७-४९-६१-७३-८५-९७-२००९
वाघ- १९१४-२६-३८-५०-६२-७४-८६-९८-२०१०
ससा- १९१५- २७-३९-५१-६३-७५-८७-९९-२०११
ड्रॅगन- १९१६- २८-४०-५२-६४-७६-८८-२०००-२०१२
साप- १९१७- २९-४१-५३-६५-७७-८९-२००१-२०१३
घोडा- १९१८- ३०-४२-५४-६६-७८-९०-२००२-२०१४
मेंढी- १९१९-३१-४३-५५-६७-७९-९१-२००३-२०१५
माकड- १९२०- ३२-४४-५६-६८-८०-९२-२००४-२०१६
कोंबडा- १९२१- ३३-४५-५७-६९-८१-९३-२००५-२०१७
कुत्रा- १९२२-३४-४६-५८-७०-८२-९४-२००६-२०१८
डुक्कर- १९२३-३५-४७-५९-७१-८३-९५-२००७-२०१९
प्रत्येक प्राण्यांच्या स्वभावावरून मनुष्याच्या स्वभावाचे काही ठोकताळेही,मांडलेले आहेत
उंदीर- हाजिरजबाब,हुषार,विश्वासू,अभ्यासू,चिकित्सक प्रवृत्ती , ड्रॅगन किंवा माकडाशी कंपॅटिबल
बैल- परिश्रमी, विश्वासार्हक,सुदृढ,जिद्दीने ध्येय साधणारा, एकटेपणाला घाबरणारा,कुटुंब,मित्रपरिवारात
रमणारा, साप अथवा कोंबड्याशी कंपॅटिबल
वाघ- आकर्षक व्यक्तीमत्व, नायकत्व स्वीकारणारा,स्वाभिमानी,महत्वाकांक्षी,उदार्,मूडी, कुत्रा अथवा
घोड्याशी कंपॅटिबल
ससा- प्रामाणिक,मनमिळाऊ, कुटुंबप्रिय, अगत्यशील,संघर्ष टाळणारे,मेंढी अथवा डुकराशी कंपॅटिबल
ड्रॅगन- प्रभावशाली, आकर्षक, उदार, नॅचरल लीडर,माकड अथवा उंदराशी कंपॅटिबल
साप- उदार, मोहक, अंतर्मुखी,संपन्न, विश्लेशक,जेलस,स्मार्ट, परिश्रमी,बुद्धीमान, कोंबडा अथवा
बैलाशी कंपॅटिबल
घोडा- बंधने न आवडणारा, संपत्ती सांभाळून ठेवणारा, प्रवास आवडणारा, असहनशील, प्रेमळ,उत्साही
आत्मविश्वासी,आकर्षक,तीक्ष्णबुद्धी,कुत्रा अथवा वाघाशी कंपॅटिबल
मेंढी- एकांतप्रिय, भटके, सृजनात्मक, अव्यवस्थित, दुसर्यावर विसंबून राहणारे, अतिसंवेदनशील
स्वतःला असुरक्षित समजणारे,डुक्कर अथवा सश्याशी कंपॅटिबल
माकड- उत्साही, अनियंत्रित, आनंदी, चांगले श्रोता, ड्रॅगन अथवा उंदराशी कंपॅटिबल
कोंबडा- प्रामाणिक, दक्ष, ऑब्जर्वन्ट, विश्लेशक, स्पष्टवक्ता, विश्वासनीय, व्यवस्थित, थोड्या जुन्या
वळणाचा, साप अथवा बैलाशी कंपॅटिबल
कुत्रा- प्रामाणिक, रागीट, मूडी, दुसर्यावर सहज विश्वास न करणारा, थोडेसे खोटे बोलणारा,
मूडी, स्वतःचे सिद्धांत जिद्दीने पाळणारा, संवेदनशील, घोडा अथवा वाघाशीकंपॅटिबल
डुक्कर- चांगला स्वभाव, कलागुण प्रिय, उच्च आवड असणारे, थोडेसे गर्विष्ट, बुद्धीमान, मदतशील,
नेहमी ज्ञानाच्या शोधात असणारे, ससा अथवा मेंढीशी कंपॅटिबल
आता तुम्हा सर्वांना आपला(आणी इतरांचा ही जन्मसाल माहित असेल तर) स्वभाव कोणत्या प्राण्याशी
जुळतोय ते कळेल..
हे हे हे ... मस्तच्. धन्यवाद
हे हे हे ... मस्तच्. धन्यवाद वर्षुताई.
मी माकड. कंपॅटिबिलिटी ड्रॅगन किंवा उंदराशी. पण लग्न झालय सापाशी .... हम्म्म्म तरीच!
वर्षू, मी ससा ! आता मेंढ्या
वर्षू, मी ससा ! आता मेंढ्या आणि डूकरे शोधतो.
आमची वाघ-सापाची जोडी.. तरी
आमची वाघ-सापाची जोडी..
तरी भलं चाललंय..
मी साप घोड्याच्या पदरात
मी साप घोड्याच्या पदरात पडलोय
वॉव मी साप आणि नवरोबा उंदीर,
वॉव मी साप आणि नवरोबा उंदीर, बरोबर ओळखलत घ्री काय होत असेल ते . आणि आता कळाले माझा कोंबडा (लेक) सारखा माझ्या मागे का असतो
मी कोंबडा आणी मला सापच
मी कोंबडा आणी मला सापच मिळालाय ...
मामी,नी, मोनालिप
दिनेश- लौकरच शोधा मेंढी किन्वा डुक्कर.. ये साल सश्या चंच आहे.. म्हंजे तुमचंच आहे..
आणिक गंमत म्हंजे हे साल सश्याचं असल्याने त्याला या वर्षी जीवनदान मिळालंय.. वर्षभर कुणी खाणार नाहीये त्याला..
मी कुत्रा... मस्त लेख...
मी कुत्रा... मस्त लेख... चांगली माहीती मिळाली...
मी ड्रॅगन इथे एका
मी ड्रॅगन इथे एका रेस्टॉरेन्ट मध्ये हे राशीपत्रक मॅट म्हणून आहे. आम्ही पाहुण्यांना नेउन नेहमी वाचायला लावतो.
वर्षू, मजाच चाललीय. आपल्या
वर्षू, मजाच चाललीय. आपल्या ओळखीतल्या लोकांपैकी कोण काय आहे ते बघतोय आणि स्वभाव चेक करतोय. बरोबरच येतय कि !!
(No subject)
मि घोडा तर परमेशवर डुक्कर,
मि घोडा तर परमेशवर डुक्कर, स्वभाव सांगितलेस तसेच आहेत गं
पदरि पडलं पवित्र झाल
मी वाघ... कुत्रा आणि घोडा कोण
मी वाघ... कुत्रा आणि घोडा कोण कोण आहे इथे.? आपली मैत्री जुळणार आहे. संपर्क साधा..
विभा.. मुक्ता.. हीही!!
विभा.. मुक्ता.. हीही!!
वर्षु नील - बापरे बाप. मी
वर्षु नील - बापरे बाप. मी डोळे बंद करून घेतले
कुत्रा निघाला तर .ड्र्यगण निघाला तर.
मी मात्र कुणाकुणाला जन्म साल विचारून बघणार आहे ..
बघुया जरा गमंत ..
ए प्रकाश.. पहिले स्वतःचं तर
ए प्रकाश.. पहिले स्वतःचं तर बघ.. कुणाशी जुळतेय ते?????
हाय वर्षे, मी वाघ. घोडा आणि
हाय वर्षे,
मी वाघ. घोडा आणि कुत्रा, अरे वा जुळतय कि..
वाघाशी जुळतं का पण वर्षे? :p
खुद ही ट्राय कर..म्हंजे तुला
खुद ही ट्राय कर..म्हंजे तुला आतापर्यंत समजलच नाही/??
सम्या आपलं बरं पटलं तर वाघाचं
सम्या आपलं बरं पटलं तर वाघाचं वाघाशी जमतं असं म्हणायला हरकत नाही.
हेच मुक्ता तुझ्यासाठीही
वरची तालिका थोडी चूक आहे. ४९
वरची तालिका थोडी चूक आहे.
४९ दोन वेळा लिहिल्यामुळे - बैल, वाघ - पुढचे सगळेच गडबड
एबाबा, अगदी बरोबर. वर्षू,
एबाबा, अगदी बरोबर.
वर्षू, बदलावं लागेल ग तुला पोस्ट.
इथे पहा बरोबर चायनीज झोडियाक साईन्स.
http://www.rainfall.com/horoscop/chinese.htm
अरेच्चा, असे आहे काय?
अरेच्चा, असे आहे काय? वर्षुताई, तुम्ही परीराणी सारखी हातात जादुची कांडी घ्या आणि सगळ्या प्राण्यांचे रुपांतर त्याआधीच्या प्राण्यांत करून टाका. हाकानाका.
सुरवात माझ्याकडून. हुप्प्.हुप्प..हुप्प्...हु....बँ....बँ........बँ!!!!!!!!!
भो भो...
भो भो...
मी 'घोडा'... 'ऊंदरा'सोबत
मी 'घोडा'... 'ऊंदरा'सोबत संसार करतोय...
पण 'ससा', 'घोड्या' सोबत कसा काय राहू शकेल?... हां, एकच गोष्ट कॉमन आहे दोघांच्यात - धावण्याचा वेग...
आर्च यांनी दिलेली लिंक
आर्च यांनी दिलेली लिंक पाहिली..
मी अजुन पण वाघच आहे...
@नीधप, आता तुम्ही अजुनही वाघ आहात का हे पुन्हा तपासुन पहावं लागेल..
मी पण वाघच. संसार उंदराशी
मी पण वाघच. संसार उंदराशी आणि आमच प्रॉडक्ट ड्रॅगन
आणि बरेच वाघ दिसतायत की इकडे मला
मी पण (अजून या
मी पण (अजून या राशीचक्राप्रमाणे ) "वाघ"च आहे.. लग्न झाल्यावर बघू काय होतो ते..!
एबाबा... थांकु थांकु... चूक
एबाबा... थांकु थांकु... चूक सुधारलीये.. बापरे आत्तापर्यन्त कोणी कोण कशाकशात बदलंल असेल..
सॉरी सर्वप्राणीमात्रहो
मामी
नी.. तू कोण आहेस ते पुन्हा च्येक कर बाई
मी मेंढी (की मेंढा?) आणि
मी मेंढी (की मेंढा?) आणि बायकोही मेंढीच, त्यामुळेच कदाचीत सारख्या टकरा चाल्लेल्या असतात.
रच्याकने, ते 'अतिसंवेदनशील' सोडून बाकी मेंढीचे सगळे गुण जमताहेत!
आगावा.. अतिसंवेदनशील..बहुतेक
आगावा.. अतिसंवेदनशील..बहुतेक दुसर्या प्राण्यांकरता..एक मेंढी ,दुसर्या मेंढी साठी संवेदनशील नसावी बहुतेक
पहील्या भागाची लिंक देईल का
पहील्या भागाची लिंक देईल का कुणी?
Pages