किचन डेकोर. उत्कृष्ट मॉड्युलर किचन्ससाठी पुण्यातले अग्रगण्य नाव.
मिलिंद देशमुख हे 'किचन डेकोर' चे सर्वेसर्वा. सर्वोत्तमतेचा अविरत ध्यास, कामातली सततची शिस्त, प्रयोगशीलता आणि हेवा वाटेल अशी उद्यमशीलता यांच्या जोरावर अकरा वर्षापुर्वी डेक्कनच्या पुलाच्या वाडीत थाटलेल्या छोट्या ऑफिसपासून कोथरूड आणि औंध इथे मोक्याच्या जागेवर उभ्या केलेल्या प्रशस्त आणि आधुनिक शोरूम्सपर्यंतचा केलेला प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो. आणि त्यांच्याशी बोलताना चिकाटी, आत्मविश्वास आणि 'एंडलेस जर्नी फॉर द एक्स्लन्स इज माय डेस्टिनेशन' या उक्तीचा प्रत्ययही येतो.
मिलिंद देशमुखांशी साजिरा यांनी केलेले हे छोटेसे हितगुज, खास मायबोलीकरांसाठी.
प्रश्न- कसा सुरू झाला ह्या व्यवसायाचा हा प्रवास?
मिलिंद- बी.ई. सिव्हिल पर्यंत शिकल्यावर इंटेरियरमधे आवड असल्याने यात काहीतरी चांगले काम करून दाखवण्याची मनाने उचल खाल्ली. किचन इंटेरियर हा त्यातल्या त्यात जिव्हाळ्याचा विषय. मग विचार जुळणार्या एका मित्रासोबत डेक्कनच्या अगदी छोट्या जागेत ऑफिस थाटले. 'आम्ही किचन ट्रॉलीज करून देतो' अशा छोट्या जाहिरातीपासून सुरुवात झाली. आपण यात उत्तम काम करू शकतो असा आत्मविश्वास वाटत होता. सुरुवातीचा प्रवास खडतर असतोच. पदोपदी निराशा आणि अडचणी. पहिला क्लायंट मिळाला, तेव्हा मात्र हुरूप आला. सुरूवातीला आधीच अस्तित्वात असलेल्या किचन ओट्याला ट्रॉलीज करून द्यायच्या- अशा कामांपासून ते थेट 'संपूर्ण किचन इंटेरियर' इथेपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. आज आमची वारज्याजवळ शिवणे येथे अत्याधुनिक जर्मन मशिनरीने सुसज्ज अशी फॅक्टरी आहे. आणि आमच्या कोथरूड आणि औंधच्या दोन्ही शोरूम्स मध्ये २१ मॉड्युलर किचन्स फक्त डिस्प्लेसाठी आम्ही ठेवली आहेत. आमच्या ग्राहकांना निवडीची संधी जास्तीत जास्त मिळावी, जागेचा सर्वोत्तम उपयोग आपण कसा करू शकतो- तसेच या क्षेत्रात वापरली जाणारी नवनवीन तंत्रज्ञाने आणि आधुनिक कच्चा माल आणि वस्तू यांचा उपयोग हे सारे बघायला मिळावे- हा हेतू.
स्पेशालायझेशन विचाराल, तर 'मॉड्युलर किचन्स' असेच उत्तर द्यावे लागेल.
प्रश्न- या धंद्यामध्ये कोणत्या प्रश्न-समस्यांचा सामना सतत करावा लागतो..? म्हणजे 'इश्युज- हार्ड टू डील' असं काहीतरी?
मिलिंद- समस्या म्हणता येईल की त्याला, ते नाही सांगता येणार, पण प्रत्येक ग्राहकाच्या घरातल्या जागा आणि गरजांनुरूप सर्वच बदलते- याचा थोडा त्रास होतो. आमच्या कामाचे स्टँडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करणे खूप अवघड आहे. कमीत कमी भारतात तरी सध्या ते शक्य नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्येक कामाची सुरूवातच गमभन पासून करायची! ग्राहकाच्या जागा-गरजा-बजेट यांचा मेळ आमच्या कामाशी घालण्याची सुरूवात डिझाईनपासून होते. मग त्यात एकदा किंवा अनेकदा चर्चा करून झाल्यावर फेरफार-बदल; त्यावरून होणारे कमी-जास्त होणारे बजेट इ. मग शेवटी अॅप्रुव्हल, आता या सार्यात अनेकदा आपली स्वतःची जागा, गरजा आणि बजेट याबद्दलच्या ज्याच्या त्याच्या स्वभावानुसारचे गैरसमज निस्तरणे हेही आलेच. लहरी किंवा थोडे 'हटके' असे स्वभाव असले, तर हे प्रकरण बरेच लांबते. कधी कधी खूप संयम बाळगूनही सारेच बारगळते.
दूसरे म्हणजे या धंद्याचे काही प्रमणात असलेले 'लेबर ओरिएंटेड' असे स्वरूप. कितीही अत्याधुनिक यंत्रणा, मशिनरी वापरली, तरी फॅक्टरीत थोड्याफार प्रमाणात आणि मग ग्राहकाच्या घरी बर्याच अंशी कामगार वर्गावर अवलंबून राहावे लागते. ग्राहकांच्या स्वभावांसारखेच कुशल-अर्धकुशल कामगार वर्गांच्या लहरी देखील सांभाळाव्या लागतात.
ग्राहकाला कमीत कमी त्रास होईल असे बघावे लागते. डिझाईन एकदा अॅप्रूव्ह झाले, की सारे काही काम आमच्या कारखान्यात. आणि शेवटी थेट फक्त इन्स्टॉलेशन /असेंब्लीसाठीच क्लायंटच्या साईटवर, म्हणजे त्यांच्या घरी. फर्निचरच्या निमित्ताने घरात अनेक दिवस अव्याहत आवाज, पसारा, धूळ, त्यानिमित्ताने होणार्या त्यांच्या गैरसोयी, हे सारेच टळते. यात काम चालू असताना क्लायंटने अचानक काहीतरी सुचून बदल केले तर त्रास होतो, फेर्या वाढतात, काम वाढते, लांबते. पण त्याला इलाज नाही.
एकंदरित आता या सार्या गोष्टी आम्ही कामाचा भाग म्हणून स्वीकारू लागलो आहोत. समस्यांचे- अडचणींचे निराकरण करण्याचा सतत प्रयत्न करत राहणे हा कामाचा भागच नाही का?
प्रश्न- या व्यवसायात आणखी कोणत्या नवीन संधी खुणावत आहेत? किंवा या व्यवसायाशी संबंधित नसलेले एखादे काम भविष्यात हाती घेण्याची इच्छा?
मिलिंद- 'मॉड्युलर किचन्स' ही आमची इतक्या वर्षांनंतर खासियत झाली आहेच. पण संपूर्ण घराचे इंटेरियर- असे काही प्रोजेक्ट्स हाती घ्यायचे आहेत. 'नुसते किचन का? सारेच घर आम्हाला करून द्या नव्याने' असं सांगणारे अनेक ग्राहक आहेत. मूळ कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, आणि पुरेसे यंत्रबळ, मनुष्यबळ आणि आत्मविश्वास आल्याशिवाय हे करणे योग्य नाही, म्हणून आजवर टाळत आलो. पण आता अकरा वर्षांनंतर, इतक्या वर्षांच्या अनुभवाने आणि अनेक ग्राहकांनी आमच्यावर टाकलेल्या गाढ विश्वासामुळे हे सारे सहज शक्य होईल असे वाटते आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांत सततच्या जाहिराती आमच्या चालू असल्या, तरीही चांगले काम केल्यामुळे झालेली कर्णोपकर्णी प्रसिद्धी- हा मुद्दा आम्हाला बरीच मदत याबाबतीत करेल, असे वाटते.
'अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन'चा सध्या तरी काहीही विचार नाही. भविष्यात केव्हा जमले तर बघू या.
प्रश्न- नव्याने हा व्यवसाय करू बघणार्यांना काही सांगू इच्छिता? काही आवडते, स्वतःला पटलेले असे 'कोट' वगैरे?
मिलिंद- "बी सिरियस" इतकेच. अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी प्रत्येक गोष्ट. कितीही छोटी, कमी महत्वाची असू देत. तिचे आता महत्व कमी आहे म्हणून गांभीर्याने घेतले नाही, तर नंतर तिचे वाढलेले महत्व ही किंमत आपल्याला मोजावीच लागते. 'हसतखेळत'ही अनेक गोष्टी घ्याव्याच लागतात, किंवा क्वचित प्रसंगी नाईलाजाने दुर्लक्षही करावे लागते, पण मनोमन तिचे महत्व ओळखून असावे. ते तसे ओळखलेच नाही, तर मग काही पुढे काही गोष्टी बिघडत, फसत जातात.
***
मिलिंदचे शेवटचे बोलणे ऐकले, तेव्हा हे याच नाही, तर जगातल्या कुठच्याही, छोट्या मोठ्या व्यवसायात, कामात हे तंतोतंत लागू होते- असा विचार मनात आला. 'किचन डेकोर'च्या भरभराटीसाठी शुभेच्छा देऊन आणि त्यांनी मायबोलीला दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून मी निघालो.
***
kothrud showroom- opp. yashwantrao chavan natyagruha, kothrud, pune
Aundh showroom- near sony world, near parihar chauk, aundh, pune
मिलिंद देशमुखांसाठी मायबोलीकरांचे काही प्रश्न असल्यास प्रतिसादांत कृपया विचारावेत. शक्य असल्यास इथेच प्रतिसादांत ते उत्तर देतील. धन्यवाद.
***
छान मुलाखत ही मुलाखत वाचून
छान मुलाखत
ही मुलाखत वाचून 'आत्मविश्वास हीच यशाची गुरूकिल्ली' यावर पुन्हा एकदा विश्वास बसला.
चांगली मुलाखत साजिरा. प्रश्नच
चांगली मुलाखत साजिरा. प्रश्नच प्रश्न आहेत, विचारते.
सुंदर मुलाखत. खुप अभिमान
सुंदर मुलाखत. खुप अभिमान वाटतो अशा मराठी माणसांचा.
शुभेच्छा.
शुभेच्छा.
शुभेच्छा.
शुभेच्छा.
वेल डन साजिरा! श्री मिलिंद
वेल डन साजिरा!
श्री मिलिंद ह्यांना शुभेच्छा!
प्रेरणादायी मुलाखत. ग्रेट
प्रेरणादायी मुलाखत. ग्रेट खरंच! धन्यवाद साजिरा.
मुलाखत खूपच त्रोटक
मुलाखत खूपच त्रोटक वाटली.......
बाकी मिलिंद देशमुखांना शुभेच्छा !!!
सुंदर मुलाखत शुभेच्छा !
सुंदर मुलाखत
शुभेच्छा !
श्री मिलिंद ह्यांना
श्री मिलिंद ह्यांना शुभेच्छा!
धन्यवाद साजिरा!
मंजूडीला, अनुमोदन. अश्या आणखी
मंजूडीला, अनुमोदन. अश्या आणखी सुंदर मुलाखती इथे वाचायला मिळूदेत हिच अपेक्षा.
साजिरा, वेल्डन. Who is next ?. रच्याकने, तु Advertising & Media संबंधित आहेस ना? त्याबद्दलही काही इंट्रेस्टिंग वाचायला नक्कीच आवडेल. कारण मराठीतही असे काही मात्तब्बर आहेत कि जे आज या क्षेत्रात अगदी जागतिक पातळीवर ठसा उमटवत आहेत.
छान मुलाखत, हाच व्यवसाय
छान मुलाखत, हाच व्यवसाय करणा-या भावाच्या वतीने काही प्रश्न आहेत ते मेल मधे विचारेन.
आमच्या कामाचे स्टँडर्डायझेशन
आमच्या कामाचे स्टँडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करणे खूप अवघड आहे.>> पटले.
देशमुखांना शुभेच्छा.
धन्यवाद साजिरा.
प्रश्न- भारतीय स्वैपाक प्रचंड 'हाय मेंटेनन्स' स्वरूपाचा आहे, पाण्याचा वगैरे वापर एकुणात जास्त, सांडलवड/डाग पडण्याची शक्यता जास्त, स्वैपाकघराचा वापर खूप. त्यादृष्टीने डिझाईनमध्ये काय वेगळेपणा आणावा लागतो ?
मस्त मुलाखत. जिव्हाळ्याचा
मस्त मुलाखत. जिव्हाळ्याचा विषय.
देशमुखांना शुभेच्छा..
रैनाचाच प्रश्न माझ्याकडूनही.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
उद्योजक मुलाखती आटोपशीर
उद्योजक मुलाखती आटोपशीर व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांनी वाचाव्यात या दृष्टीने मूळ मुलाखतीत निवडक पण महत्वाचे प्रश्न असावेत, अशी मायबोली प्रशासनाची सूचना आहे.
आणखी प्रश्न अर्थातच प्रतिसादात विचारता येतील. आणि ज्यांची मुलाखत घेण्यात आली आहे, ते रीतसर उद्योजक ग्रुपचे सदस्य होऊन प्रतिसादातच उत्तर देतील- अशी कल्पना आहे. जास्तीत जास्त 'इंटरअॅक्टिव्ह' अशा स्वरूपाचे हे सदर व्हावे, हा हेतू.
प्रतिसादांत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं स्वागत आहे.
साजिर्या मस्त मुलाखत
साजिर्या मस्त मुलाखत रे...
जनरली इंटीरीअर करणारे आणी करुन घेणारे टॅक्सेस भरण्याचा विचार करत नाहीत.. शक्यतो कंसल्टन्सी चार्जेस किंवा विदाउट बील चार्जेस हे प्रकारच खुप असतात.. तर या कामासाठी अॅप्लीकेबल टॅक्सेस कोणते व किती असतात.. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात रीबेट कुठला व कसा मिळतो???
प्रश्न - स्वयंपाकघराच्या
प्रश्न - स्वयंपाकघराच्या रचनेत व्हेंटीलेशनचे महत्व सांगाल का? सध्याच्या नव्या स्वयंपाकघरांमधे खिडकी जवळजवळ नसतेच, तर अशी रचना स्वयंपाक करायच्या दृष्टीने योग्य असते का?
धन्यवाद साजिरा
धन्यवाद साजिरा
रीक्षाबघुन आलो! चान्गली
रीक्षाबघुन आलो!
चान्गली मुलाखत! देशमुखान्चे अभिनन्दन आणि शुभेच्छा!
माझा प्रश्नः स्वयम्पाकघरातील सोईसुविधान्चे आरेखन करताना वास्तुशास्त्रातील तत्वान्चा वापर करता का? तसे गिर्हाईकाला सुचवता का? गिर्हाईकच तसे सुचवित असेल तर अंमलात आणता का?
(खरे तर हे प्रश्न बिल्डरलोकान्ना आधी विचारले पाहिजेत कारण त्यान्नाच यात वेळीच करण्यासारखे खूप आहे)
साजिरा धन्यवाद. जासितीत जास्त
साजिरा धन्यवाद.
जासितीत जास्त मराठी उद्यजकांची माहिती अश्या पध्दतीने पुढे यावी , त्याम्चे अनुभव शेअर व्हावेत जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल.
माझा/माझे प्रश्नः
मॉड्य्लर किचनसारख्या मार्केटमधे जिथे एस्टॅब्लिश्ड इंपोर्टेड ब्रँड्स आहेत, शिवाय चौकाचौकात लोकल सप्लायर्स आहेत, काही चांगले इंडिअन ब्रँड्सही आहेत....... अश्यावेळी काँपिट कसं करता????
आपलें वेगळेपण टिकवण्यासाठी काय योजना आखल्या आहेत????
अश्याप्रकारच्या इंडस्ट्रीत सध्या "मनुष्यबळ" विशेषत: कामगार हा कळीचा मुद्दा झालाय. तो प्रश्न कितपत भेडसावतो??? कसा सोडवता???
आफ्टर सेल्स सर्व्हिसही द्यावी लगत असेलच..... त्यासाठी काही उपाययोजना???? "अॅन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस" सारखी इंडस्ट्र्रीज मध्ये चालणारी सिस्टीम आपण राबवली आहे का??? मॉड्युलर किचनमधे "AMC (Annual Maintenance Contract)" मुळात ऑफर केली जाते का??? तसे ऐकिवात तरी नाही.
छान मुलाखत, अगदी गेल्या काही
छान मुलाखत, अगदी गेल्या काही वर्षातलीच हि सुधारणा आहे. नाहीतर घरोघरी ओटा आणि कपाट याशिवाय फार काही नसायचेच.
खुप छान आहे. सगळ्यासाथि
खुप छान आहे. सगळ्यासाथि व्यवसाय आणी सुन्दर काम.
मिलिंद देशमुख यांना
मिलिंद देशमुख यांना शुभेच्छा!
धन्यवाद साजिरा
१. डिस्प्ले साठी ठेवलेल्या
१. डिस्प्ले साठी ठेवलेल्या डिझाईन्समधून किचन निवडायचे की अजूनही ग्राहकाला वेगळे काही डिझाईन हवे असले तर तसेही करुन देता?
२. ऑर्डर दिल्यापासून, कारखान्यातून सर्व काम पूर्ण करुन ते ग्राहकाच्या घरी इन्स्टॉल करणे हे साधारण किती दिवसांत पूर्ण होते?
३. रैनाच्या प्रश्नाच्याच अनुषंगाने - डिझाईन्स बनवताना भारतीय स्वयंपाक पद्धतीचा विचार करून डिझाईन्स बनवलेली आहेत का?
4. ह्या कामाची गॅरॅंटी/ वॉरंटी असते का?
छान मुलाखत. धन्यवाद इथे
छान मुलाखत. धन्यवाद इथे टाकल्याबद्दल.
इथे जे प्रश्न विचारले आहेत
इथे जे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे कुठे आहेत? कि अजुन द्यायची आहेत??
छान मुलाखत आणि सुंदर
छान मुलाखत आणि सुंदर डिझाईन्स.
माझा प्रश्न :
या मॉड्युलर किचन साठी कुठल्या प्रकारचे मटेरियल्स वापरले आहेत?
आणि बाकीच्यांनी विचारलेले प्रश्न ही आहेतच.
>स्वयंपाकघराच्या रचनेत
>स्वयंपाकघराच्या रचनेत व्हेंटीलेशनचे महत्व सांगाल का? सध्याच्या नव्या स्वयंपाकघरांमधे खिडकी जवळजवळ नसतेच, तर अशी रचना स्वयंपाक करायच्या दृष्टीने योग्य असते का?<<<<<<<<<<<<<<
मंजूडी चा प्रश्न माझ्याही मनात,
रंगसंगती आणि प्रकाशयोजना खूपच आकर्षक, पण नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग (जो आपल्याकडे मुबलक आहे)का नाही केला जात ?
दिव्यांचा झगझगाट, खिडक्या कमी आणि एक्झोस्ट पंखे बसवून वीज बिलं वाढ्वायची....असं का ?
की हे सगळे शीतकटीबंधीय देशांचे अंधानुकरण ?
प्रेरणादायी मुलाखत.
प्रेरणादायी मुलाखत. धन्यवाद.
मिलिंद,आपल्याला शुभेच्छा.
Pages