गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.
असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.
गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.
ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.
आजची ओळ आहे.
ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही
वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा
ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा
ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा
ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)
ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा
ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा
ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा
ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा
ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा
ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा
ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच
ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच
ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा
ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच
ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा
ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.
ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा
ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा
ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा
ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा
ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.
ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा
ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,
ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा
ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा
ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा
ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा
ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
ओळ क्र. ३४: पिंजर्याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा
ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा
ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा
ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा
ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा
ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा
ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.
लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा
वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.
काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी
अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)
रदीफ - जा
ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा
ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची
ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा
आपण सांगीत ल्या प्रमाणे ओळ
आपण सांगीत ल्या प्रमाणे ओळ कोणत्याही शेरात बसवावी... मतल्याच्या सानी मिसर्यातच असावी असा आग्रह काढून टाकत आह्वे.>>
कैलासराव,
मी उलटे म्हणत आहे. ती ओळ गझलकारांनी मतल्याच्या दुसर्या मिसर्यात घ्यायला हवी असे आपण म्हणावेत असे म्हणत आहे मी!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
भूषणजींना अनुमोदन. सानी
भूषणजींना अनुमोदन.
सानी मिसर्यात असलेली जास्त चांगले
ओह... अच्छा. खरं तर तरही
ओह... अच्छा. खरं तर तरही मतल्याच्या सानी मिसर्यातच घ्यावी असा प्रवाह आहे...पुन्हा दुरुस्ती करतोय.
साती यांची
साती यांची गझल.
http://www.maayboli.com/node/23155
आनंदयात्री यांची गझल.
http://www.maayboli.com/node/23148
विजय पाटील यांची गझल.
http://www.maayboli.com/node/23145
या प्रश्नाचे उत्तर कणाला
या प्रश्नाचे उत्तर कणाला माहिती असल्यास द्यावे.
वृत्तांची नावे कोणी आणि कशी ठरवली असावी?
माझ्या मते बहुतांशवेळा वृत्ताच्या नावातून त्यातील मात्रांचाथोडाफार क्रम कळतो.
उदा.
आनंदकंद (गागालगाल)
हिरण्यकेशी (लगालगागा )
वियदगंगा (लगागागा)
मनोरमा हे नाव या वृत्ताला कसे पडले असावे? कारण लगालगा असे यात कुठेही येत नाही.
खरे आहे साती! तसेच चामरबाबतही
खरे आहे साती! तसेच चामरबाबतही आहे. कुणीतरी छंदोरचना घेऊन तपासायला हवे आहे. कारण मनोरमा व चामर यांची नावे काहीतरी वेगळी असावीत असे मलाही वाटते.
कैलासदादांच्या ओळीवर माझाही
कैलासदादांच्या ओळीवर माझाही प्रयत्न.....
आठवांचे वार झाले
दु:ख आता फार झाले!
बोलवी, तो मृत्यु आता
थांबणे बेकार झाले..!
भोगले आघात सारे
अश्रुही बेजार झाले..!
भावनांचे श्वान दारी
फार भूभू:कार झाले
कैक झाले घाव मोठे
भाव वेडे ठार झाले!
ना कशाची भीड आता
लाजणेही भार झाले
चालतो मी रात सारी
चांदणे अंधार झाले...
या.., सुखांना जोजवा रे
दु:ख आता फार झाले!
विशाल
<<१. हा धागा मुखपृष्ठावर दिसेल यासाठी प्रशासकांना विनंती करावीत. कारण या धाग्याबरहुकूम केवळ नवीन गझलाच आल्या असे नाही तर एक उपक्रम यशस्वीरीत्या राबवल जाण्यास सुरुवात झालेली आहे. >>>
बेफिकीरजींना मनापासुन, अगदी २००% अनुमोदन. माझ्यासारख्या गझलेतल्या औरंगजेबाला सुद्धा गझलेचे व्यसन लावलेय या धाग्याने. अॅडमिन, कृपा करुन एवढे मनावर घ्याच. हा धागा मुखपृष्ठावर येइल असे बघा . धन्यवाद !
सारंग रामकुमार यांची
सारंग रामकुमार यांची गझल.
http://www.maayboli.com/node/23314
मी अभिजित यांची गझल
http://www.maayboli.com/node/23314
डॉक, दु:ख फारच झालय......
डॉक, दु:ख फारच झालय......
तुम्ही काय पुढची तरही द्यायला मुहुर्त शोधताय का???? येऊ देत नवीन.
भुंग्या ...करंट्या...तु एक
भुंग्या ...करंट्या...तु एक तरी लिहिलीस का तरही ???
मग सारखं नवीन येव्य्द्या नअवीन येवुद्या काय लावलय
भुंग्या, द्या हो डॉक्टर नविन
भुंग्या,
द्या हो डॉक्टर नविन तरही.पहिली भुंगाच लिहिणार आहे.
अरे पंत यावर मी आताच गगोवर
अरे पंत यावर मी आताच गगोवर लिहिलेय........
एक "हझल" लिहायला घेतली.... "दोन होते चार झाले दु:ख्ख आता फार झाले"
पण सेम शेर हबाने लिहिलेला पाहिला.... आणि मग दुख्खाचा एवढा ढीग कोसळला डॉकवर धपाधप,
की ते वाचूनच पोट भरलं....
ते गाण्यात नसते का तानसेन आणि कानसेन..... तसं रे पंत....
आपल्याला नाही जमलं तरी उपक्रमाला दाद देत राहायची..... काय डॉक???
साती,
काश वो दिन आ जाये की मी इतक्या पटकन गझल लिहू शकेन......
अजून तरी जमलेलं नाहिये ते......
थोडा प्रयत्न झाल्यावर वाटतं गड्या आपली कविता बरी......
नवीन ओळ : थांबणे सोसेल तोवर
नवीन ओळ : थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)
कैलासराव, चालणे सोसेल तोवर
कैलासराव,
चालणे सोसेल तोवर लागते चालायला - असेही चालेल का? नाखुपणासाठी दिलगीर!
अगदीच काहीच्या बाही होती
अगदीच काहीच्या बाही होती म्हणून इथे">
काहीच्या काही कवितेत दिल्येय.
नव्या ओळीवर माझा खारीचा
नव्या ओळीवर माझा खारीचा वाटा...
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला...
आभार कैलासदादा
या आठवड्यातील तरही
या आठवड्यातील तरही रचना...
http://www.maayboli.com/node/23397 ........प्राजु
http://www.maayboli.com/node/23390 ......क्रांती
http://www.maayboli.com/node/23370 ... विदिपा
http://www.maayboli.com/node/23367 ....हबा
http://www.maayboli.com/node/23372 .... विशाल कुलकर्णी
http://www.maayboli.com/node/23346 .... मी मुक्ता
http://www.maayboli.com/node/23361 ...बेफिकिर
http://www.maayboli.com/node/23331 .... निशिकांत
http://www.maayboli.com/node/23354 .... साती
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23409
छाया देसाई यांची गझल.
ओळ क्र.७ = वादात या कुणीही
ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा
मस्त..
मस्त..
सह्हि.
सह्हि.
(कैलासजी, ओळ वाचल्यावर लगेचच
(कैलासजी, ओळ वाचल्यावर लगेचच मनात आलेले विचार,
आपले वाचून झाल्यावर काहीच्या काही मध्ये हलविले जातील!)
कुणाचे कुणावाचून अडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये
टीका झाल्यास कुणी उगा रडू नये
राग आल्यास मात्र तो दडपू नये
नाक खुपसून मळ्यात सडू नये
वादात पडुनी नको ते घडू नये
कुणाला कुणाचा शेर सलू नये
धादांत चिरफाड लीलया करू नये
येणार जे जाणार ते असू नये
लाडातही कुणाला असे आखडू नये
हा सूर्य हा जयद्रथ जरी खरे
माणसात कुणीही भेद धरू नये
व्वा अलका! मस्तच काहीच्या
व्वा अलका! मस्तच काहीच्या काहीत कशाला? वाटल्यास कविती विभागात हलवा ना!
अलकाजी,चांगल्या आशयाची कविता.
अलकाजी,चांगल्या आशयाची कविता. गझलेचे नियम पाळले नसल्याने गझल म्हणवण्यास अपात्र्,पण कविता म्हणून छानच.
धन्यवाद .
नव्या ओळीवरील
नव्या ओळीवरील रचना.
http://www.maayboli.com/node/23630 छाया देसाई यांची गझल
.
http://www.maayboli.com/node/23634 हबा यांची गझल
http://www.maayboli.com/node/23624 अजय जोशी यांची गझल.
माझाच मी मलाही का सापडू
माझाच मी मलाही का सापडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये!..........व्वा.. चांगला मतला>>>
कैलासराव,
आपला वरील प्रतिसाद वाचला. या मतल्याप्रमाणे अलामत काय ठरेल ते स्पष्ट केल्यास मीही गझल रचण्याच्या प्रयत्नात आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अरेच्या,खरंच की. मतल्याच्या
अरेच्या,खरंच की. मतल्याच्या आशयाबाबत माझा प्रतिसाद आहे. सापडू नये ही रदीफ होतेय ह्या मतल्यामुळे.....
मी दिलेल्या ओळीनुसार्,अलामत 'अ'आहे आणि काफिया 'पडू' आहे.
डॉक्टर साहेब, एक गझल लिहिली
डॉक्टर साहेब, एक गझल लिहिली बुवा एकदाची.
क्रांती यांची गझल
क्रांती यांची गझल http://www.maayboli.com/node/23650
प्राजु यांची गझल http://www.maayboli.com/node/23662
मुटेजींची गझल http://www.maayboli.com/node/23665
विशाल कुलक र्णी यांच्या गझला. http://www.maayboli.com/node/23692
http://www.maayboli.com/node/23671
भूषणजींची गझल http://www.maayboli.com/node/23652
विजय पाटील ''कणखर'' यांची गझल http://www.maayboli.com/node/23664
माझिया गीतातुनी यांची गझल.. http://www.maayboli.com/node/23653
मी मुक्ता यांची गझल http://www.maayboli.com/node/23645
निशिकांत यांची गझल http://www.maayboli.com/node/23642
कैलास यांची गझल http://www.maayboli.com/node/23699
ओळ क्र.८ = ठरेन या जगात
ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
Pages