काळा घोडा कला महोत्सव २०११,मुंबई.

Submitted by रोहित ..एक मावळा on 13 February, 2011 - 11:11

मुंबई ... एक स्वप्नांचे शहर,
धकाधकीचे शहर,
घड्याळ्याच्या काट्यावर धावणार शहर,
कधी वाहतुकीचा खोळबा
तर कधी पुरात बुडालेली मुंबापुरी
तर कधी अतिरेकींच्या हल्ल्याने होरपळलेली ,
बॉम्सस्फोटात जखमी झालेली मुंबई .

पण मुंबईने असे बरेच दु:ख पचविलेत.त्याला कारण आपला मुंबईकर.. सर्व संकटावर मात करत तो नेहमी जोशाने,नेटाने उभा राहिलाय.ही सळसळणारी उर्जाच मुंबईची शक्ती आहे.सण,उत्सव यातुनच त्याला उर्जा मिळते.खर म्हणजे ती आपली संस्कृती आहे.मग गणेशोत्सव असो वा गोपाळकाला,मॅरेथॉन असो वा दांडिया मुंबईचे एकजुटीचे दर्शन घडते.

असाच एक महोत्सव म्हणजे काळा घोडा.तस काळा घोडा महोत्सवाला मी पहिल्यांदाचा चाललो होतो.कलाकारांच्या पंढरीची ही भेट थोडीशी वेगळीच असणार असे वाटत होते.स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनस, शुक्रवार ११/०२/२०११ वेळः सायंकाळी ७ वाजता.चाकरमान्यांची घरी जायची लगभग चालली होती.जलद लोकल पकडण्यासाठी धावाधाव चालु होती.पण मी निवांत वाट पहात उभा होतो.थोड्या वेळाने इंद्रा आला.यो सुद्धा येणार होता पण कामावरुन त्याला लवकर यायला जमले नाही.मग मी इंद्रा अन त्याचा एक मित्र असे आम्ही तिघा जणांनी काळा घोडाकडे कुच केले.

कोणे एके काळी मुंबईतील काळा घोडा परिसरात खरोखरच काळ्या घोडय़ाची एक प्रतिकृती होती. याच काळ्या घोडय़ाच्या पायथ्याशी सर्व मोर्चे विश्रांतीसाठी थांबत असंत. पण कालांतराने इंग्रजांच्या अस्तित्वाबरोबरच या घोडय़ाचेही अस्तित्व संपले. असे असले तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६२ वर्षांनी हा भाग ‘काळा घोडा’ म्हणूनच ओळखला जातो.

चला तर मग कलाकारांच्या कलेची ओळख या प्रकाशचित्रांतुन करुया.

मुख्य दालनाच्या जवळ असलेला हा घोडा...

नेहमी चेहर्‍यावर हसु ठेवणारा अन दुसर्‍यांच्या ओठावर हस फुलवणारा हा किमयागार का बर असा पहुडला असावा..

मीच खरा राजा आहे मला जोकर नका बनवु... अस तर सांगत नसावा.

काळाच्या ओघात म्हणजे इंटरनेट,मोबाईल च्या जगात यांना आपण विसरत तर चाललो नाही ना...

हा काय सांगत असावा बरे ?

माणसाने कंम्पुटर बनवला ...पण उद्या त्यानेच जर....

काय अजब कलाकृती आहे ना... स्प्रिंग,नटबोल्ट,चेन यापासुन बनविलेली.

अशा एकसोएक कलाकृती बघत आम्ही एका चेंबरपाशी येवुन थांबलो.थ्री-डी फोटोग्राफीमध्ये तयार केलेली ही कला..त्याचाच हा कोलाज केलेला फोटो.
भोपाल गॅस दुर्घटना ..सगळ्या देशाला हादरवुन टाकणारी घटना.

धातुवर पेंटिंगची कला (मेटल पेंटिंग)तर लाजवाब......

या दुचाकीवर बसायला खुप मजा येईल ना......

पाउले ... आपल्या उत्क्रांतीची ,अभिमानाची,उत्कर्षाची...

विचार करा ....

अंबे से डर......

लोककला .. ही जगली पाहिजे तरली पाहिजे...
विविधतेतुन एकता म्हणजेच आपला भारत देश.कारण आपल्या देशांच्या विविध प्रांतातील कला आपल्याला जोडुन ठेवते.त्यातलाच हा एक नृत्यप्रकार भांगडा...ठेका धरायला लावणारा....

आई .. मला पण स्पायडरमॅन व्हायचय.

चित्रकला ... काय बोलणार सर्व शब्द यांच्यापपुढे थिटे पडतात.यांना फकस्त मानाचा मुजरा....

नाकातुन पिपाणी वाजवणारा हा अवलिया तर एकदम फर्मास होता.

त्याच्या लांबच लांब मिश्या लक्ष्य वेधुन घेत होत्या.

अबलक घोडा...त्याचा रुबाब तर बघा ...

खर म्हणजे या पुतळ्याची मान गायब झाली आहे.पण बघा ना कसा दिव्यज्योतीने उजळुन निघालाय.
(हा अँगल इंद्राने सुचविला होता)

हातकंदिल.....

राजस्थानी पपेटस...

धडापासुन मुंडक अलग करणारा हा जादुगार...

एक वाद्य....

नंतर आम्ही एका स्टॉलकडे वळलो.तेथे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले.

एकोणासाव्या शतकात जायचय.. का त्यांच्यासारख अस दिसायचय

अजुन एक अप्रतिम कलाकृती....

जत्रा,उत्सव म्हंटला की हे आलच...

असा हा कलेचा अविष्कार ..या उत्सवातुन आपल्या समोर येतो म्हणुन त्याचे आभारच मानायला पाहिजेत.
त्या सर्व कलाकारांना त्रिवार मुजरा...

देशी काय विदेशी काय सर्वच लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती.

हे सर्व डोळ्यात अन काळजात साठवुन आम्ही साधारणतः नऊ च्या दरम्यान परत निघालो.आता थोडीशी भुक लागली होती.मग पाणीपुरी अन वडापावची भर पोटात टाकली.
रात्रीची मुंबई अनुभवने म्हणजे एक वेगळ्याच प्रकारची नशा असते.

हुतात्मा चौक ..........

प्रकाशात झळाळुन निघालेल हे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन.......

खर म्हणजे मला निसर्गाच्या सानिध्यात रमायला जास्त आवडते पण या मानवाने केलेल्या कलाकृतींच्या सौंदर्याची मजा सुद्धा तितकीच भावली.

असो पुन्हा भेटुया.....

रोहित ..एक मावळा.

(यो रॉक्सचा मूडस ऑफ काळाघोडा फेस्टीवल ! येथे पाहु शकता.)

गुलमोहर: 

मस्त Happy

लिखाण आणि फोटो दोन्ही छान. मी एवढे दिवस काळा घोडा फेस्टीवल म्हणून ऐकुन ओळखत होते पण आता तुमच्या फोटो आणि वर्णनाने नक्की काय असते ते कळले. धन्स.

धन्यवाद ...
बित्तुबंगा,श्री ,यो,सावली,लाजो,दिनेशदा,लिम्बुजी,जागु,चातक,पियापेटी,आश्विनीके,जिप्सी.शैलजा,
आनंदयात्री...
मनापासुन धन्यवाद Happy

हातकंदीलाचा फोटो घेण्यास मनाई होती ना??? >> हो स्मितहास्य मनाई होती.पण लांबुन झुम करून काढलाय. Happy

छान Happy

धन्यवाद ... किश्या,manas,डॅफोडिल्स Happy

Back to top