Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 February, 2011 - 04:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पनिर
लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन)
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१ ते २ मध्यम कांदे चिरुन
मटार अर्धा वाटी
कोथिंबीर थोडी चिरुन
मिठ
१ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस.
तेल
थोडा गरम मसाला
क्रमवार पाककृती:
पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या. तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिरच्या घालुन शिजु द्या. मटार शिजत आला की त्यात टोमॅटो घालुन थोडा शिजवा. आता सिमला मिरच्या (तिन्ही रंगाच्या), पनिर त्यात घालुन परतवा. एक वाफ आणुन त्यात मिठ, गरम मसाला, कोथिंबीर घाला व परत एक वाफ आणुन परतुन गॅस बंद करा.
वाढणी/प्रमाण:
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा:
सिमला मिरच्या आख्या लागत नाहीत. प्रत्येकी अर्धी किंवा पाव मिरची बस होइल. बाकीच्या मिरच्यांची भाजी किंवा सुप करुन टाका.
बुरजी चविष्ट होते ह्यात शंकाच नाही. शिवाय मुल आवडीने खातात रंग बघुन.
माहितीचा स्रोत:
स्वतःचे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान, करुन बघेन आज किंवा
छान, करुन बघेन आज किंवा उद्याच
चला आता फोटो पाहुन रेसिपी
चला आता फोटो पाहुन रेसिपी बनउया.
ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या
हे आहे कुस्करलेले पनिर
हे काही लागणारे जिन्नस
फोडणीला घातलेला कांदा, मिरची, मटार. मटार लवकर शिजावा म्हणुन फोडणीत घातला आहे.
मटार शिजल्यावर टोमॅटो घातला.
सगळ्या रंगित भाज्या घातलेल्या.
पनिर घालुन तयार झालेली बुरजी.
मी पण परवा केला होता हा
मी पण परवा केला होता हा प्रकार, रात्री टाकतो फोटो.
जागुटले, त्यात थोड चीज पण
जागुटले, त्यात थोड चीज पण टाकायच एकदम तोंपासु. ब्रेडबरोबर पण मस्त लागते.
तुझी कृती मस्तच.
ह्हा..मस्त दिस्तीये.. टोस्टेड
ह्हा..मस्त दिस्तीये.. टोस्टेड सँडविच बनवून खायचे
जागू, प्रत्येक पायरीचा फोटो
जागू, प्रत्येक पायरीचा फोटो काढाण्याची तुझी कमाल आहे. असे फोटो पाहिल्यावर तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल
आणि वर प्रत्येक सिमला मिरची अख्खी लागत नाही असे म्हणालियेस, मग ती भाजी ४-५ जणांना कशी पुरेल?
याम याम
याम याम
जागुतै मस्त.. यात थोडा टॉम
जागुतै मस्त.. यात थोडा टॉम सॉस घाला, किंवा टॉम-चिली मिळतो ना तो घालायचा... टोस्टेड सँडविच, रॅप्स साठी मस्त
जागुताई, नुस्तिचं खायला काय
जागुताई, नुस्तिचं खायला काय मज्जा येईल ना...स्स्स्स्स
वा किती छान दिस्तेय भुर्जी.
वा किती छान दिस्तेय भुर्जी. फोटो काढण्याचा उत्साह नावाजण्यासारखा हं.
आमच्याकडे दोनच रंग (लाल सिमला
आमच्याकडे दोनच रंग (लाल सिमला मिर्ची, टोमॅटो आणि पनीर )
सगळ्यांच्या टिप्स आवडल्या.
सगळ्यांच्या टिप्स आवडल्या. सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
दिनेशदा फोटो पाहुन तोपासु.
कसले लाळगाळु फोटो टाकलेत
कसले लाळगाळु फोटो टाकलेत
मस्त रेसिपी
छान
छान
सुंदर
सुंदर
जागु मला हे करायच म्हण्जे
जागु मला हे करायच म्हण्जे रंगीबेरंगी भो.मि शोधायला हव्यात !
दिनेश दा मस्त फोटो!
थंड मॉल मध्ये मिळतील. मी
थंड मॉल मध्ये मिळतील. मी मॉलमधुनच आणल्या.
जागू मला पनीर नाही आवडत आणि
जागू मला पनीर नाही आवडत आणि मासे मी खात नाही, पण तु टाकतेस त्या रेसिप्या आणि त्यांचे फोटो मात्रं मी मनापासून एन्जॉय करते.
पाकृ आणि तुझी करण्याची पद्धत प्रचंड आवडते मला...
दिनेश फोटू मस्त कि हो एकदम... पण वरून तुम्ही मिरपूड घातली आहे का?
दक्षे धन्स ग माझ्या मैतरणी.
दक्षे धन्स ग माझ्या मैतरणी.
वा वा. तों पा पा पा सु ....!
वा वा. तों पा पा पा सु ....! मस्त रेसीपी..
रंगी बेरंगी भो.मि. म्हणजे अॅन्टी ऑक्सिडन्टस चा खजीनाच...!
दक्षिणा, मी वरुन तीळ आणि
दक्षिणा, मी वरुन तीळ आणि बेसिल घातले आहे. पनीर वगळूनही हा प्रकार करता येईल.
भाज्या प्रखर आचेवर परतल्यात, फार शिजवायच्या नाहीतच. खरे तर जागूच्या बुरजीपेक्षा हा फारच वेगळा प्रकार, मी आपला फोटो घुसडून टाकला !
दिनेशदा बेसिल म्हणजे काय
दिनेशदा बेसिल म्हणजे काय ?
गिरिश धन्यवाद.