Submitted by सावली on 30 January, 2011 - 21:24
भारतात पहिलीमधे प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे लागते ५ पुर्ण की ६ पुर्ण?
आणि ठाणा, मुलुंड मधल्या सेमीइंग्लिश / इंग्लिश माध्यमातल्या चांगल्या शाळा सुचवणार का?
- घोडबंदररोडवरच्या नको. (ट्रॅफिक प्रॉब्लेम मुळे)
- शाळेत मराठी मुलांची टक्केवारी साधारण जास्त हवी.
- शाळेला ग्राउंड हवं.
या माझ्या अपेक्षा आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरस्वती पाचपाखाडी अजूनही
सरस्वती पाचपाखाडी अजूनही चांगली आहे. फी पण कमी आहे. आणि उगाच फालतू खर्च पण नाहियेत.
वसंत विहार तशी महागच आहे (महिना १५०० रु.) पुस्तके आणि गणवेश यांच्यानावाखाली ते लूट करतात. यंदा गणवेशाची किंमत ८०० रु होती आणि दर्जा इतका सुमार आहे की शर्टवरच्या चुण्या इस्त्री करूनही जात नाहीत. वसंतविहारमध्ये project ही एक मोठी डोकेदुखी आहे. मुलांच्या कुवतीबाहेरचे असतात त्यामुळे सगळे पालकांनाच करावे लागते मुले फक्त बघून लिहिण्याचे आणि डेकोरेशनचे काम करतात. "जरा नेटवर शोध की. नुसते wiki वर काय बघतेस? अजूनही साईट्स बघ ना" असे सांगितल्यावर "माझ्या सगळ्या friends ना त्यांच्या आई/बाबांनीच करून दिलाय. तूच मला help करत नाहियेस" असे मलाच ऐकावे लागले होते. पण बाकी बर्याच activity चालू असतात. मुलांना त्याचा फायदा होतो.
सरस्वतीमध्ये project चा त्रास बराच कमी आहे. पण सुचना, गृहपाठ, system यांचा प्रचंड गोंधळ असतो. बाकीच्या activity बर्याच कमी आहेत.
वसंतविहारमध्ये project ही एक
वसंतविहारमध्ये project ही एक मोठी डोकेदुखी आहे. मुलांच्या कुवतीबाहेरचे असतात त्यामुळे सगळे पालकांनाच करावे लागते मुले फक्त बघून लिहिण्याचे आणि डेकोरेशनचे काम करतात. "जरा नेटवर शोध की. नुसते wiki वर काय बघतेस? अजूनही साईट्स बघ ना" असे सांगितल्यावर "माझ्या सगळ्या friends ना त्यांच्या आई/बाबांनीच करून दिलाय. तूच मला help करत नाहियेस" <<<<<< हा त्रास हल्ली सगळ्याच शाळांना सुरु झालाय
सावली, बाकी शाळांबद्दल मला
सावली, बाकी शाळांबद्दल मला माहित नाही, मी वसंत विहारबद्दल सांगते.
२००९ जूनच्या बॅचला नर्सरीला अॅडमिशन घेताना:
रीफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट - रुपये २५०००/-
अॅड्मिशन फी - रुपये २१००/
टर्म फी - रुपये २१००/-
जून महिन्याची फी - रुपये २१००/- इतके पैसे भरले. शाळा सुरू होते त्यादिवशी रुपये ७५०/- incidental charges म्हणून घेतात. त्यात वर्षभरातल्या फिल्ड ट्रिप्स, ट्रिप्स आणि स्टेशनरीचा खर्च समाविष्ट असतो. हे सगळे पैसे भरल्याच्या पावत्या मिळाल्या. नर्सरी ते सिनियर केजीला शाळेतच पोटभरीचा खाऊ देतात. आपण घरून डबा द्यायचा नसतो. हे सगळे फीमधे समाविष्ट आहे. आत्ता जुनिअर केजीची फी रुपये २३००/- आहे, स्कूलबसची फी वेगळी भरावी लागते. युनिफॉर्म आपला आपण घ्यायचा असतो. पहिलीपासून फी निम्मी होते. आत्ता पहिलीपासूनची रुपये १०८०/- आहे. पूर्ण वर्षभरात फी, टर्म फीशिवाय काहीही पैसे भरावे लागत नाहीत. बहुतेक पाचवी की आठवीपासून कॉम्प्युटर विषयासाठीची फी वेगळी भरावी लागते.
ठाण्यातल्या बहुतेक unaided/private शाळांचा फी पॅटर्न साधारण असाच आहे.
अरे वा मंजूडी धन्यवाद. हा
अरे वा मंजूडी धन्यवाद. हा काही फार खर्च नाहीये. आणि शिवाय या व्यतिरिक्त काही मागत नाहीत हे छान आहे.
ठाण्यात सरकारी अनुदान
ठाण्यात सरकारी अनुदान असलेल्या शाळा नाहीयेत का.. का त्यांची अवस्था पुण्यातल्या काही सरकारी अनुदान असलेल्या शाळांसारखी झाली आहे...
माझी मुलगी सिंघानीया मधे २
माझी मुलगी सिंघानीया मधे २ रीत शिकते. आम्हाला तरी शाळेचा खुपच चांगला अनुभव आहे. रेग्यलर फी, ट्रर्म फी, मटेरीयल फी वगैरे सोडता ईतर काही घेतले जात नाही. डोनेशनसुद्धा नाही. ह्या वर्षीचा पुर्ण खर्च २५,०००/- पर्यंत जाईल. आता दर वर्षी फी जवळपास २०० रु नी वाढते.
आणि शिस्तीबद्दल बोलायचं तर आमच्या अनुभवाप्रमाणे विद्यार्थ्यांना बर्यापईकी मॅनेजमेंटचा धाक आहे. वर उल्लेखलेले क्रुत्य निदान शाळेच्या आवारात तरी शक्य नाही. बाकी सर्वच द्रुष्टीने ही शाळा मिळाल्याचा थोडासा अभिमानच वाटतो. ठाण्यातल्या बहुतेक पालकांची इच्छा असते ईथे अॅडमिशन मिळवण्याची.
श्रद्धादिनेश हे वाचुन खरच बरे
श्रद्धादिनेश हे वाचुन खरच बरे वाटले. हे चित्र सर्वच शाळांना लागु होउदेत देवा.
निलु, तुम्ही वा.मु. मा. वि.
निलु, तुम्ही वा.मु. मा. वि. च्या का? मुलुंड? विषयांतर माझा नवरा पण... तुम्ही किति सालची बँच?
>>वा.मु. मा. वि. च्या का>>
>>वा.मु. मा. वि. च्या का>> हो. ८९ ची
निलु, तुम्हाला वि.पु. देते,
निलु, तुम्हाला वि.पु. देते, इथे विषयांतर होइल.
खरच मोनाली
खरच मोनाली
श्री श्री रविशंकर विद्या
श्री श्री रविशंकर विद्या मंदीर मुलुंड / नाहुर ला आहे. त्या बद्दल कोणाला काही माहिती?
नवीन आहे का शाळा? नाव ऐकलं
नवीन आहे का शाळा? नाव ऐकलं नाही कधी.
http://ssrvm.org/ssrvm/our-sc
http://ssrvm.org/ssrvm/our-schools/ साईट आहे. कोणाकडे काहि updates?
मलाही माहित नाहीये मोनाली.
मलाही माहित नाहीये मोनाली.
अजुन एक प्रश्न - सगळ्या इंग्रजी शाळेत मराठी शिकवतात का? कितवी पासुन?
पहिलीपासून. पण ते अगदीच
पहिलीपासून. पण ते अगदीच बाळबोध असते - अगदी सातवीपर्यंत तरी
चला नशिब ते तरी आहे. सिबिएससी
चला नशिब ते तरी आहे. सिबिएससी च्या शाळातही असतं ना?
आणि घरी शिकवते आहेच त्यामुळे ठिक आहे.
ज्यु. के. जी. ची फी फक्त २३००
ज्यु. के. जी. ची फी फक्त २३०० रुपये? कुठे आहेत असल्या शाळा?
इथे (पुण्यात ) अगदी घरगुती प्लेग्रुपची फी सुद्धा ५००० ते ६००० असते.
नाही मी SSC आणि ICSC
नाही मी SSC आणि ICSC बोर्डांचे म्हणत होतो. CBSC ची कल्पना नाही.
अश्विनी ठाण्यात ये बरं. ओह
अश्विनी ठाण्यात ये बरं.
ओह माधव.
सिबिएससी चे कुणी कन्फर्म करेल क प्लिज?
अश्विनी, २३०० रु. फी बहुदा
अश्विनी, २३०० रु. फी बहुदा मासिक आहे. कारण वर तरी जुन महिन्याची फी २१०० रु. असे लिहिले आहे ना. पुण्यात एकदाच घेतात वार्षिक फी म्हणुन.
सिबिएससी चे कुणी कन्फर्म करेल
सिबिएससी चे कुणी कन्फर्म करेल क प्लिज? >>>> they introduce Hindi alphabets from sr. kg.
based on that we can take Marathi at home.
२३००/- रुपये दर महिन्याची फी
२३००/- रुपये दर महिन्याची फी आहे.
२३००/- रुपये दर महिन्याची फी
२३००/- रुपये दर महिन्याची फी आहे.....हा.....मग ठिक आहे
माझा मुलगा सिबिएससी ला आहे. मराठी विषय नाही, पण हिंदी आहे सी. के. जी. पासून. (फक्त मुळाक्षरे). आता पहिलीला काना, मात्रा, वेलांटी इ. इ. आणि बर्यापैकी धडे, कविता आहेत.
देवनागरी असल्यामुळे, मराठी आपोआप येते, काही काही उच्चारात फरक होतो, तेवढा सांगायचा.
मुम्बईत १ लीत प्रवेश घ्यायचा
मुम्बईत १ लीत प्रवेश घ्यायचा असेल तर पाल्य आणि पालक यान्ची उपस्थीती अनिवार्य आहे काय? की यान्च्या अनुपस्थीतीत पाल्याचे आजी अजोबा फॉर्म भरण व फी भरण ई. करू शकतात ?
माझी मुलगी २०१२ जुन मधे पहीलीत जाईल (६ पूर्ण) . फोर्म मात्र २०११ सप्टे/ऑक्टो मधे निघतील. अणि आम्ही सध्या भारताबाहेर आहोत. याशिवाय काही शाळात हे वय साडे पाच आहे. जर का अम्हाला मुलीला मागच्या ईयत्तेत घालायचे असेल तर तसे करता येते काय?
तोषवी इथे वर काही जणांनी
तोषवी इथे वर काही जणांनी लिहिलं आहे की पहीली मधे घालायचे वय ५ वर्षे आहे. शिवाय मला अलिकडेच कळलेली गोष्ट म्हणजे एसएससी अभ्यासक्रमाच्या शाळा जुन मधे चालु होतात. पण सिबिएससी अभ्यासक्रमाच्या एप्रिल मधे चालु होतात. आयसिएससी माहीत नाही.
त्यामुळे ते सर्व बघुन अॅडमिशन ची चौकशी आणि भारतात जायची वेळ ठरवा.
<<पहिली प्रवेशासाठी वय 5 वर्ष
<<पहिली प्रवेशासाठी वय 5 वर्ष पूर्ण लागतं. म्हणजे आत्ताच्या 2011-12 या शैक्षणिक वर्षात जानेवारी ते डिसेंबर 2005 मधे जन्मलेली मुलं पहिलीत प्रवेश घेतील.>>
याचा अर्थ की प्रवेशा च्या वेळी ( फॉर्मभरायच्या वेळी चे )वय ५ पूर्ण असा का?
माझी मुलगी २००६ ची आहे .
तोषवी फॉर्म भरण्यासाठी कि
तोषवी फॉर्म भरण्यासाठी कि शाळेच्या पहिल्या दिवशी ते खरच माहीत नाही. पण तुझी मुलगी २००६ मधली असेल तर मग पहिली मधे अॅडमिशन बरोबर आहे असच वाटतय
पण शाळा एप्रिल की जुन मधे चालु होणार हे मात्र बघुन घ्या.
२००६ - १ली? माझा २००७ चा
२००६ - १ली? माझा २००७ चा मुलगा आता - जु.के. ला जाणार. काहीतरी घोळ आहे. भाची २००५ ची आता १लीला जाणार. both in CBSE Boards
मोनाली आम्ही २००६ चा जन्म
मोनाली आम्ही २००६ चा जन्म असलेली मुलं २०१२ जुन मधे १ली मधे जाणार असं म्हणतोय.
Pages