मक्याचे दाणे बारीक वाटून --- २ कप,
दूध -------- १/२ कप,
दही (फेटुन) -------- १/२ कप,
हिरव्या मिरच्या --- २ किंवा ३
आले ------ १/२ इंच तुकडा,
मीठ, साखर ----- अंदाजे, चवीनुसार,
फोडणीचे साहित्य- १ टे. स्पून तेल, मोहरी, जीरे, हिंग,
कोथींबीर -- सजावटी साठी
ओले मक्याचे दाणे मिक्सर मधे वाटतांनाच त्यात हिरव्या मिरच्या, आले, थोडे जीरे घाला, सरबरीत वाटून घ्या.
कढईत तेल, मोहर्या, जीरे, हिंग यांची फोडणी करा, त्यात मक्याचे वाटण घाला, थोडे पाणी घालून शिजवून घ्या.
अर्धवट शिजले, की दही आणि दुध घाला, मीठ घालून पूर्ण शिजवून घ्या. आवडीनुसार कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करा.
कोथींबीर घालून सूप बाउल मध्ये सर्व करा.
(दही + दूध यांच्यामुळे या पदार्थाला एक छान तलम, स्निग्ध पोत येतो, तो मला फार आवडतो.)
१)बाउल मध्ये सर्व करताना वरून थोडे फ्रेश क्रीम किंवा साजूक तूप घालावे.
२) फजिता म्हणजे दाटसर सूप सारखा प्रकार असतो.
३) व्हेरिएशनः फ्लॉवर चे तुकडे, गाजर, मटार वाफवून घालता येतील. ताजे मक्याचे दाणे उपलब्ध नसल्यास मक्याचा रवा वापरून सुद्धा फजीता करता येतो. मक्याचा रवा + कैरी किंवा मक्याचा रवा + आंब्याचा रस असं व्हेरिएशन सुद्धा करतात.
मला ह नाव नंतर कळलं, पण मी
मला ह नाव नंतर कळलं, पण मी बरीच वर्षे हा प्रकार करुन खातोय. मस्त लागतो.
आईने कालच करून दाखवली त्याचाच
आईने कालच करून दाखवली त्याचाच फोटो वर दिलाय ...
मस्तच आहे. करायलाही किती
मस्तच आहे.
करायलाही किती सोपं!
हो ना, एकदम सोप्पी वाटतेय
हो ना, एकदम सोप्पी वाटतेय कृती. करून बघायला हवी
मस्तंय हे. सोप्पं एकदम. आधी
मस्तंय हे. सोप्पं एकदम.
आधी फईटा बद्दल लिहिलंय का म्हणून बघायला आले कारण त्याचं पण स्पेलिंग फजिता असंच असतं ना.
रेसिपी मस्त आणि सोप्पी वाटते
रेसिपी मस्त आणि सोप्पी वाटते आहे. करून बघणार!
बादवे, फजिता/ फईटा म्हणजे मक्याच्या पिठाच्या पोळीत भाज्या/ मांसाचे स्टफिंग भरून असले काहीतरी असे मला आत्तापर्यंत वाटायचे!
फजिता/ फईटा म्हणजे मक्याच्या
फजिता/ फईटा म्हणजे मक्याच्या पिठाच्या पोळीत भाज्या/ मांसाचे स्टफिंग भरून असले काहीतरी असे मला आत्तापर्यंत वाटायचे! <<
ते फईटा. मेहिकन प्रकरण
हे वरती आहे ते वेगळं. हा देशी पदार्थ आहे.
ओह्ह! असे आहे होय! धन्स नी.
ओह्ह! असे आहे होय! धन्स नी.
बढिया पाककृती. मेथी/पालक
बढिया पाककृती. मेथी/पालक पराठ्यांबरोबर चटणीसारखं किंवा नुस्तंच खायला पण काय मस्त लागेल! आज करणार.
fajita चा उच्चार 'फाहीटा/ फाहीता'.
मी दही न घालता करते आणि
मी दही न घालता करते आणि कोथिंबीरी बरोबर थोड ओल खोबर घालते.
पण ते सुप सारख नाही तर तांदळाच्या उकडी सारख दिसत त्याला मक्याची उसळ म्हणतात.
पण आता दही घालुन करुन बघेन.
माझी फजितीच झाली सोप्पा
माझी फजितीच झाली
सोप्पा प्रकार आहे ..
आमच्याकडे मक्याचा फजिता असा
आमच्याकडे मक्याचा फजिता असा करतातः
मक्याची कणसं (शक्यतो स्वीट कॉर्न नको) किसून घ्यायची..
मोहरी जिरे मिरची कढीपत्ता हळद ह्याची फोडणी करून त्यात किसलेला मका घालायचा..
ओलं खवलेलं खोबरं घालायचं (भरपूर).
मीठ लिंबू घालायचं - एक वाफ आली की कोथिंबीर घालायची आणि गरम गरम खायचं..
अमेझिंग लागत हे !
मला पण नानबाची कृतीच माहीत
मला पण नानबाची कृतीच माहीत होती. पण तिला फजिता म्हणतात हे नाही. आम्ही मक्याची वाटली डाळ म्हणतो. खूप छान लागते.
नानबा, धन्स, पण तूम्ही लिहिलं
नानबा, धन्स, पण तूम्ही लिहिलं आहे, ती मक्याची डाळ. फजीता हा घट्ट सूप किंवा लापशी सारखा पदार्थ आहे.
लै भारी वाटतेय. ट्राय करावे
लै भारी वाटतेय. ट्राय करावे लागेल.
छान आहे पाकृ यासाठी स्विट
छान आहे पाकृ
यासाठी स्विट कॉर्नस वापरावे लागत असतील ना कंपल्सरी?
>>> यासाठी स्विट कॉर्नस
>>> यासाठी स्विट कॉर्नस वापरावे लागत असतील ना कंपल्सरी?>>
नाही, कंपल्सरी नाही.
वा छान आहे, बायकोला करायला
वा छान आहे, बायकोला करायला सांगतो...
कारण की मी फक्त खातो, बायको करते ते सगळं खातो 
कारण की मी फक्त खातो, बायको
कारण की मी फक्त खातो, बायको करते ते सगळं खातो
तरीच तुम्हाला वाइजमॅन म्हणतात !
नवीन पदार्थ समजला. आता करुन बघेन. मला वाटते थंडीच्या रविवारी सकाळी खिडकीत उन्हात बसून ओरपायचा प्रकार असणार हा..
मी फक्त आंब्याचा फजिता ऐकला
मी फक्त आंब्याचा फजिता ऐकला होता. हे नवीन कळले.
आंब्याचा फजीता फक्त ऐकूनच
आंब्याचा फजीता फक्त ऐकूनच माहित आहे मला, कुणीतरी प्लीज रेसीपी द्या ना
तरीच तुम्हाला वाइजमॅन म्हणतात
तरीच तुम्हाला वाइजमॅन म्हणतात >>>
तो स्वतःच स्वतःला वाइजमॅन म्हणवून घेतो, बाकीचे मजबूरीनं म्हणतात !
वॉव ! मस्त ! तोंपासु
वॉव ! मस्त ! तोंपासु
आंब्याच्या फजित्याची मी
आंब्याच्या फजित्याची मी वाचलेली(करून पाहिलेली नाही) ही कोकणी कृती.
एका पिकलेल्या हापूस आंब्याचा गर आणि चार वाट्या ताक एकत्र घुसळून मीठ साखर घालायचे. आणि वरून तुपातली जिरे मोहरी मेथी लाल मिरचीची फोडणी.
मला वाटतं गुजराती फजितो पण असतो. शोधून बघतो.
थॅन्क्स भरत !
थॅन्क्स भरत !
आंब्याचा फजिता पहिल्यांदाच
आंब्याचा फजिता पहिल्यांदाच ऐकला. करुन पहायला हवा आंबे मिळायला लागले की.
आंब्याचा फजिता करुन बघूया..
आंब्याचा फजिता करुन बघूया.. ताक फ्रीझ मधलं थंड वापरायचं का साधं ?
जागो मो.. प्या.. """"तरीच
जागो मो.. प्या..
""""तरीच तुम्हाला वाइजमॅन म्हणतात """"----
धन्यवाद
मस्त! करायलापण सोपं वाटत आहे.
मस्त! करायलापण सोपं वाटत आहे.
ही पाकृ सार्वजनिक करा
ही पाकृ सार्वजनिक करा कृपया... खालच्या सर्चमध्ये सापडत नाही..