शाळा पहिलीमधे प्रवेश - किमान वय? आणि ठाणा, मुलुंड मधल्या शाळा

Submitted by सावली on 30 January, 2011 - 21:24

भारतात पहिलीमधे प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे लागते ५ पुर्ण की ६ पुर्ण?

आणि ठाणा, मुलुंड मधल्या सेमीइंग्लिश / इंग्लिश माध्यमातल्या चांगल्या शाळा सुचवणार का?
- घोडबंदररोडवरच्या नको. (ट्रॅफिक प्रॉब्लेम मुळे)
- शाळेत मराठी मुलांची टक्केवारी साधारण जास्त हवी.
- शाळेला ग्राउंड हवं.
या माझ्या अपेक्षा आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्यात हवी असेल तर, होलीक्रॉस, सेंट जॉन, सिंघनिया, सरस्वती (आराधना जवळ).
पहिल्या तीन शाळांना ग्राउंड आहे. सरस्वती विषयी माहित नाहि.
मी फक्त नाव सुचविली आहेत. शिक्षणाचा दर्जा, इ. माहिती नाहि.

सरस्वतीलाही ग्राउंड आहे. सेंट जॉन नको, ते स्पोर्टस् साठी ठिक आहे. जे के (सिंघानिया) मस्त आहे. होलीक्रॉस फक्त मुलींची आहे.

पाच पेक्षा जास्त वय असावे असा दंडक आहे.

सरस्वती (मराठी) चे टिळक सरांनी भगवती विद्यालय सुरु केली आहे. सर स्वत:च एक शाळा आहेत. (चांगल्या अर्थाने).

सावली, तुम्ही ठाण्यात शाळाप्रवेश घेत आहात तर पुर्ण मराठी माध्यम हाही एक पर्याय का नाही ठेवलात?

मराठी शाळेतले सेमी इंग्रजी इयत्ता पाचवी किंवा ८वी पासुन सुरू होते आणि गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतुन घेतले जातात. बाकी सारे मराठी माध्यम. माझ्या मुलीच्या शाळेत ५वी पासुन होते. पहिलीपासुन सेमी इंग्रजी शाळा बहुतेक नाही.

अंजली,असुदे,साधना धन्यवाद Happy
चर्चशी संलग्न असणार्‍या शाळा शक्यतो नको असा एक सुर आहे घरी Happy
साधना, अगं माझा नवरा मराठी नाही. मग तो लेकीच्या शिक्षणात सहभागी होऊ शकणार नाही Sad नाहीतर मी मराठी शाळाच निवडली असती गं.
पहिलीपासुन सेमी इंग्रजी शाळा बहुतेक नाही.>> Sad

आणि शाळेत घालायच्या वयाची काय अट आहे? पाच पुर्णला घेतात का? सहा पुर्णलाच घेतात?

पाच पूर्ण ला घेत असावेत बहुधा. नक्की माहिती नाही.

माझाही वैयक्तिकरित्या चर्चशी संलग्न असलेल्या शाळांना विरोधच होता व असेल. पण म्हणून त्या शाळा वाईट आहेत असे मात्र माझे म्हणणे नाही.

कुठल्याही शाळेत घालताना इथे कळवा. काही मदत लागली तरी हक्काने सांगा.

नमस्कार लोक्स. मी आताच इथे आले. मी मुलुंडला राहाते. माझे असुदे व सावली यांना अनुमोदन. माझा मुलगा पावणेतिन वर्षांचा आहे. मलाही "सेंट" शाळेत घालायचे नाही. आय. इ.एस. चा कोणाला अनु. ?

सावली, ठाणा पु. नालंदा बद्दल चांगली माहिती मिळते. पण प्रवेश कठीण, मी प्रयत्न केलेले. वसंत विहार - ssc आणि लोक ग्रुप - cbse च्या शाळांबद्दलही चांगले कळते. माझा मुलगा २००७ चा - ज्ञानसाधना - cbse मधे नर्सरीला आहे. पण शाळेला स्वताचे ग्राउंड नाही. बाजुला १ ग्राउंड मात्र आहे. जुने पालक शाळेबाबत चांगले बोलतात. थोडेफार प्रोब्लेम सोडले तर मला अजुन तरी तसा त्रास नाही.

सावली, नव-यालाही मराठीची शिकवणी लाव ना मग... दोघेही मिळून अभ्यास करतील... तुझा त्रास तेवढाच कमी होईल (की वाढेल? एका वाढलेल्या मुलाला आणि एका लहान मुलीला एकत्र शिकवायचे.... Happy )

सेंटवाल्या शाळांमध्ये काही चांगल्याही आहेत. पण तिथे चर्चमध्ये जाणे आणि इतर काही गोष्टीत भाग घेणे अनिवार्य असते. आणि आपल्या सणांच्या अनुरोधाने काही केले तर चालत नाही. तसेही हल्ली इतर शाळांमध्येही मुलींनी हातावर मेंदी लावणे, खुप बांगड्या घालणे इ. गोष्टी चालत नाही. (माझी पुतणी पार्ले टिळकला जाते, तिथे चालत नाही.)

आय. इ.एस - म्हणजे इंडियन एजुकेशन सोसायटी का? त्यांची शाळा ठाण्यात आह?? वाशीला आहे आणि शाळा चांगली असावी. मी त्यांच्या बांद्र्याच्या शाळेतुन १०वी केले होते.

थोडेफार प्रोब्लेम सोडले तर मला अजुन तरी तसा त्रास नाही.

हे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव प्रोब्लेम्स सगळ्या शाळांम्ध्ये आहेत. तिकडे दुर्लक्ष करायचे. त्यांच्याकडे लक्ष दिले तर शाळा हा प्रकारच हद्दपार करावा असे वाटायला लागेल... Happy

पहिली प्रवेशासाठी वय 5 वर्ष पूर्ण लागतं. म्हणजे आत्ताच्या 2011-12 या शैक्षणिक वर्षात जानेवारी ते डिसेंबर 2005 मधे जन्मलेली मुलं पहिलीत प्रवेश घेतील.

बाकी शाळांविषयी थोड्या वेळाने लिहिते.

सावली, तू मुलुंडमधे राहत असशील तर तुला ऐरोलीतल्या शाळांचाही विचार करायला हरकत नाही.

आय. इ.एस - म्हणजे इंडियन एजुकेशन सोसायटी का? त्यांची शाळा ठाण्यात आह?? >> हो तिच. मुलुंडला आहे ती.

अक्ख्या ठाण्यात एकच ऊत्कृष्ट शाळा आहे (आमचीच) Happy
सरस्वती सेकंडरी स्कूल (मल्हार सिनेमाच्या समोर). अप्रतिम सुविधा, मोठे क्रीडांगण, आजवरचा अन दर वर्षीचा उत्कॄष्ट रेकॉर्ड. १ ते ४ मराठी अन पुढे ईंग्रजी (गणीत, विज्ञान) असे आमच्या वेळी होते आता माहित नाही. तो फॉर्मॅट एकदम सही होता. मुळात मराठीचा पाया पक्का होता पण गणीत आणि विज्ञान हे नंतर इंग्लीश मधून असल्याने भविष्यातही पुढील उच्च शिक्षणाला काही अडचण आली नाही.

असुदे, खरच छान वाटलं तुमच्या हक्काने सांगा असं सांगण्याने Happy
मोनालीपी धन्यवाद .तुम्ही सांगितलेल्या शाळा बघायला हव्यात. Happy
साधना Lol , त्याला येतं मराठी. पण विज्ञान,इतिहास वगरे शिकवणे म्हणजे जरा... Wink प्रॉब्लेम बद्दल खर आहे तुझं. सध्यातरी चर्च वाल्या शाळा नको असच म्हणतोय पण.
मंजूडी धन्यवाद. Happy मी ठाण्यात आहे, म्हणजे असणार आहे. ऐरोली थोडं दुर पडेल ना. शाळाप्रवेशाच्या वयावर आमचं जपानमधनं परत यायचं ठरणार आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे लेकीला २०१२ जुन पासुन शाळा सुरू करायला हवी म्हणजे या वर्षाअखेर अ‍ॅडमिशन ना?
योग धन्यवाद. हाही ऑप्शन बघते. Happy

सावली, सिंघनिया सर्वच द्रुष्टीने चांगली शाळा आहे. पण पहिली करिता प्रवेश परिक्शा द्यावी लागेल. कमी जागा आणि खुप प्रवेश्चुक असल्यामुळे प्रचंड स्पर्धा असते. नविन ईमारतीचे काम चालू आहे. त्यानंतर बर्याच जागा उपलब्ध होतील. त्यांच्या संकेत स्थळाला भेट देत रहा.

सरस्वती सेकंडरी स्कूल (मराठी माध्यम) उत्क्रुष्ट शाळा.

सावली, ओके. माझी मुलगी 'वसंत विहारला जाते. ती २०१२ जूनपसून पहिलीत जाईल.
त्यांच्याच मॅनेजमेंटची (गोएंका असोसिएटस्) कोर्टनाक्याला 'ठाणे पोलिस स्कूल' आहे. डोनेशन नाही, SSC बोर्ड.

कॅडबरी जंक्शनला सिंघानिया आहे. यांची अ‍ॅडमिशन ऑनलाईन होते. डोनेशन नाही. ICSE बोर्ड आहे.

वागळे इस्टेटला 'बिल्लाबाँग हाय' आहे. CBSE बोर्ड आहे. माझा भाचा या शाळेत जातो. शाळा चांगली आहे. भारतभर शाखा आहेत. नोकरी बदलीची असेल तर अशा शाळा उपयोगी पडतात. इतर शाखांमधे बदली प्रवेश सहज मिळतो.

ठाणे पूर्वेला हरी ओम नगरमधे 'नालंदा पब्लिक स्कूल' आहे. बहुतेक CBSE किंवा ICSE बोर्ड

सरस्वती इंग्लिश मिडियम आणि ए.के. जोशी या दोन्ही शाळा चांगल्या आहेत पण दोन्हीकडे भरमसाठ डोनेशन घेतात. SSC बोर्ड.

भगवती शाळाही चांगली असल्याचे ऐकले आहे, पण जास्तीची माहिती नाही.

मुग्धानन्द, मुलुंडमधल्या IES च्या शाळेबद्दल फारसं चांगलं ऐकलेलं नाही. Sad

मुलुंडला राणी लक्ष्मीबाई ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली आहे असं ऐकलेलं आहे.

मुलुंडमधे राहणार्‍या परीचितांची मुलं ऐरोलीच्या DAV Public School मधे जातात, काही न्यू होरायझनला तर काही ठाणे - वागळे इस्टेटच्या बिल्लाबाँग हायमधे जातात. मी फक्त शाळांची नावं सुचवतेय, या शाळांचा मला स्वतःला वैयक्तिक अनुभव काही नाही.

हो गं शाळांची नावं सुद्धा कळत नव्हती मला इथे राहुन. त्यामुळे खुप मोलाची मदत होतेय सगळ्यांचीच Happy

सावली, अगं मी ते मुलुंडमधल्या शाळांबद्दल म्हणतेय. ठाण्यातल्या शाळांबद्दल मी जरा व्यवस्थित सांगू शकेन कारण लेकीच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी हा सगळा एक्सरसाईझ केलेला होता. Happy

खरे ग बायांनो. मला पण काही नावे माहीत नाहित नव्हती.
मुलुंडला राणी लक्ष्मीबाई ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली आहे असं ऐकलेलं आहे. >>मी पण ऐकले आहे.

मुलुंडमधे राहणार्‍या परीचितांची मुलं ऐरोलीच्या DAV Public School मधे जातात, काही न्यू होरायझनला तर काही ठाणे - वागळे इस्टेटच्या बिल्लाबाँग हायमधे जातात. मी फक्त शाळांची नावं सुचवतेय, या शाळांचा मला स्वतःला वैयक्तिक अनुभव काही नाही.>> माझ्या पण परिचयातिल काही जणांची जातात. पण इतक्या लहान मुलांना हाय्वे ला नको वाटते सोडायला.

हे डोनेशन रिफंड करतात का हो? आमच्या वेळेला तरी होतं... पण मीच घेतलं नाही... अर्थात फार नव्हतं.. पण १२ वर्षं एकाच शाळेत काढल्यावर डोनेशन कशाला परत घ्यायचं त्यापेक्षा शाळेलाच उपयोगी पडेल म्हणून..

हिम्या, डोनेशन कॅशमधे स्विकारल्यावर रीफंड कसले करतात ते.... रीसीट नाही मिळत त्याची Sad

आणि त्याच्या उलट, आम्ही वसंतविहारला Security Deposit भरलंय ते व्याजासकट रीफंडेबल आहे.

मंजूडी बरंच मोठं एक्झरसाईज झालं असणार ना? >> नाही झाला. कारण SSC बोर्डचीच शाळा हवी आणि डोनेशन द्यायची नाही एवढ्याच अटी होत्या. त्यामुळे शॉर्टलिस्टींगमधे एकच शाळा उरली आणि सुदैवाने त्यांच्या स्कूल बस एरीयातच आम्ही राहत असल्याने पहिल्याच यादीत नाव लागलं. Happy

मंजूडी एकदम भाग्यवान आहेस मग Happy डोनेशन द्यायची नाही हि अट ठेवता येते हे वाचुन आनंद झाला. आम्हाला वाटत होतं कि अशा शाळा नसणारच का काय.

हल्ली ए.के.जोशी मध्ये जे भरमसाठ डोनेशन घेतात त्याची रीसीट देउ लागलेत. पण गोम अशी की मुला/मुलीच्या पालकांच्या नावे ही रीसीट देत नाहीत तर त्यांच्या कोणा जवळच्या नातेवाईकाच्या ( आजोबा/आजी, ई.) नावे देतात.

ठाणे पूर्वेला श्री मा बाल निकेतन आहे. त्या शाळेचा ही दर्जा बरा आहे असं ऐकून आहे.

Pages