संत फिलोमेना चर्च, म्हैसूर

Submitted by प्रकाश काळेल on 23 January, 2011 - 05:45

२x२ मॅट्रीक्समध्ये चार फोटो स्टीच केलेत.

गुलमोहर: 

प्रकाश - स्टीचिंग केल्याचे लक्षात येतेय आणि त्यात परस्पेक्टिव्ह ची गडबड जाणवते, बाकी रंग , कॉन्ट्रास्ट छान

चर्चची भव्यता जाणवतेय अगदी.
प्रकाश आणि पाटिल दोघांनी लिहिलेय म्हणून जाणवले (एरवी कळले नसते ) एक बाजू उचलल्यासारखी वाटतेय.

छान.
पाटिल व दिनेशदा यांना अनुमोदन.
स्टिचींग साठी फोटोज काढताना शक्यतो exposure lock वापरत जा म्हणजे exposure पुर्ण फोटोवर सारखे रहाते व स्टिचींग जाणवत नाही.
Horizon सारखे ठेवण्यासाठी शक्यतो tripod वापरत जा किंवा कॅमेरा कुठेतरी खाली ठेऊन फोटोज काढत जा.

सर्वांचे धन्यवाद.
चर्चच्या कंपाऊंड वॉलमुळे दुरुन क्लिन परस्पेक्टीव्ह मिळत नव्हते. त्यात बिना ट्रायपॉडचे हे काही फोटो स्टीच मोडमध्ये काढलेत.(फसलेले प्रयत्न)
हा अजून एक व्हर्टीकल स्टीच! हा प्रयत्न वरच्यापेक्षा थोडा बरा आहे (माझ्यामते ! Wink )

या शिवणतंत्राविषयी थोडं सांगाल का? >>>
काही खास नाही करावं लागत. कॅनॉनच्या कॅमेर्‍यामध्ये हे एक इनबिल्ट फीचर येतं. त्या मोडमध्ये फोटो काढायचे. नंतर कॅनॉनच्याच सॉफ्टवेअरमध्ये ते स्टीच करायचे. फोटो काढताना थोडी परस्पेक्टीव्हची काळजी घ्यावी लागते.
माझ्यामते नॉर्मल मोडमध्ये काढलेले फोटोही स्टीच करता येतात..पण त्यासाठी प्रत्येक फोटो सेम सेटींगवर (एक्स्पोजर, फोकल लेंग्थ, अ‍ॅपर्चर, आय एस ओ, ई.) काढलेले हवेत. (पण हे मी ट्राय केलेलं नाही)

पाटील, गदे आणि यो धन्स!

प्रकाश, चर्चचं दुसरं चित्र मस्त आलय. पण ३३३३६६ या रंगाची छटा संपूर्ण चित्रावर पसरलीय. ती काढून टाकल्यावर चित्र मूळ रंगात अजून छान दिसेल. चर्च/देऊळ हे फार छान सब्जेक्ट्स आहेत. Happy

प्रकाश, धन्यवाद. आता जरा क्यामेरा उघडून बघतो मला जमतंय का ते.

बित्तु, आँ?? नुसत्या नजरेनं रंगांचा कोड ओळखला? कमाल आहे.

बहुतेक टेंप्रेचर कमी करण्यासाठी, मी थोडी पर्पल टोन वाढविली आहे . मूळ फोटो उन्हात काढल्याने फार रखरखीत होता!
पण तू म्हणतोयस तशी ती टोन थोडी डॉमीनंट झालीये नक्की. धन्यवाद.