परवा कुठेतरी माबोवरच चर्चा चालु होती, बर्याच लोकांच असं मत आहे की अमेरिकेचा इतिहास जेमतेम ४०० वर्शाचा आहे. हा इतिहास खरा इतिहास नाही.
हे बघा माया लोकांचं अंकगणित.
हे उत्खणनात सापडलेल्य बर्याच पुराव्या पैकी एक, किती सोपी पद्धत होती बघातर.
टिपः वाद नको म्हणून आधिच देतो.
(माया लोकांनी शुन्याचा शोध लावला होता पण आपल्यासारखा वापरलेला दिसत नाही. म्हणुन आर्थभट्टाचा शुन्याचा शोध अबाधित राहतो.)
माया संस्कृती:
इ.स. पुर्व १६०० च्या दरम्यान मेक्सिको प्रांतात माया(न) सभ्यता विकासाच्या अतोच्य टोकावर होती. त्यांची स्वत:ची लिपी होती. मायान लोकांचा कॅलेंडर इतका अचुक होता की त्याच्या कालगणनेला कंम्पुटरने तपासुन पाहिल्यावर ०.०६ एवढाच फरक सापडतो. ग्वाटेमाला, मैक्सिको, होंडुरास तथा यूकाटन प्रायद्वीप या भागात प्राच्या विभागाला बरेच पुरावे सापडले. या पुराव्यांचे आधारे हे स्पष्ट होते की या माया संस्कृतीने काल गणना आणि खगोल शास्त्रात बरिच प्रगती केली होती. माया कॅलेंडरच्या अचुकते बद्दल शंकाच उरत नाही इतका महान कॅलेंडर माया लोकानी बनविला होता. माया लोकांची अशी समजुत होती की जेंव्हा त्यांच्या कॅलेंडरची शेवटची तारिख संपेल तेंव्हा या जगाचा नाश होईल. उत्खननात सापडलेल्या माया कॅलेंडरची शेवटची तारिख २१ डिसें. २०१२ आहे. या प्रमाणे या जगाचा अंत वरील तारखेला अटळ आहे असा त्या कॅलेंडर संशोधकांचा समज आहे. हा कॅलेंडर इ.स. पुर्व ३११४ ला सुरु होतो. या कॅलेंडर प्रमाणे एकाच वेळी दोन दोन काल गणना चालत असत. पहिला २६० दिवसाचा एक वर्ष व दुसरा ३६५चा एक वर्ष. ३६५ दिवसाचा एक वर्श म्हणजे ही कालगणना निश्चितच सौर गतिवर आधारित असावी. २६० दिवसाचा एक वर्ष हि काल गणना नक्की कशावर आधारीत होती हे सांगता येणे कठी आहे, पण ९ चंद्रमास मिळुन २६० चा एक वर्ष धरल्या जात असेल असा अंदाज आहे. अशा प्रकारे ४ चंद्रवर्श पुण्र झाल्यावर ३ सुर्यवर्ष पुर्ण होत असावेत. म्हणजेच आपण ज्या अमेरी़केला ४०० वर्षाचा बबलु म्हणतो तो इसापुर्व चंद्रवर्श व सुर्यवर्षाची अचुक गिनती करत होता. स्वतःची लिपी होती. स्वतःची बांधकाम कला बेजोड होती. स्थापत्यकलेत त्याच्या तोडीचा समकालीन स्पर्धक उभ्या युरोपातही होता की नाही याची शंकाच आहे. असला तरी अमेरीकनांची प्राचिन संस्कृती फार विकसीत होती याचे पुरावे आहेत. अॅझेटीक लोकांनी तर मेक्सिकोला सोन्याची नगरी बनविलं होतं. स्पॅनिशानी जहाजात भरुन भरुन हे सोनं लुटुन नेलं.
माया संस्कृतीच्या या दाव्याला खगोल वैज्ञानिकांचा एक सिद्धातं तंतोतंतो जुळतो. खगोल शास्त्रज्ञांच्या मते "प्लॅनेत एक्स निबुरु" नामक ग्रह प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेनी येत आहे. हा ग्रह २०१२ च्या डिसेंबर मधे पृथ्वीवार आदळणार असा अंदाज आहे. नासानी मात्र या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. ते काही असो माझा विषय आहे अमेरीकेची संस्कृती ही नुसती ४०० वर्षाची नसुन ईसापुर्व किमान ३५००-४००० वर्षाची आहे. इ.स. पुर्व १६०० मधे या माया लोकानी जे गाठलं त्याची सुरुवात किमान तिन साडेतिन हजार वर्शा आधि झाली असा दावा आहे. म्हणजेच माया संस्कृतीची सुरुवात इ.स. पुर्व ४००० च्या जवळपासची आहे.
या लोकांमधे आजच्या बॉस्केटबालशी बरिच साम्य असणारी स्पर्धा होत असे. त्या स्पर्धेत जी टिम जिंकेल त्यांचा देवाला बळी देण्यात येत असे. माया लोकांमधे नरबळीची प्रथा ईतकी बरिच टोकाला जाते. त्यांच्यात एक संत (ज्याला हे देवाचा दुत मानतात) होता. त्यानी नरबळीच्या विरोधात लोकांमधे जागृतीचे काम केले तरी नरबळी थांबेना. मग तो एक दिवर माया लोकांवर रागावतो व निघुन जातो. जाताना तो धमकी देतो की मी सापाच्या रुपात येऊन तुमचा नाश करेन. म्हणून जेंव्हा स्पॅनिश लोकांचे आगमन होते तेंव्हा या मायावी लोकांच्या सुधारित आवृत्तीचा नायक मोंटेझुमाला असे वाटते की स्पॅनीश जनरल दुसरा तिसरा कुणी नसुन हा तोच देव परत आला जो ह्जारो वर्षापुर्वी आपल्या पुर्वजांवर कोपुन निघुन गेला होता. त्यामुळे स्पॅनिशांचं जरी स्वगत होतं, पण आपला अंत जवळ आला अशी भितीही मनात दबा धरुन असते.
अॅझेटीक संस्कृती
मोंटेझुमाची मेक्सिको नगरी म्हणे सोन्याची होती. जनरल स्कॉर्टस (की कॉर्टस ?) नी मोंटेझुमा नावाचा शेवटचा अॅझेटिक राजा संपविला. आपण त्या नंतरचा कालच लक्षात धरतो. त्या आधिची अझेटीक संस्कृती ही एक महान संस्कृती होती. त्यांनी बांधलेले पिरॅमिडस जगप्रसिद्ध आहेत. अॅझेटीक लोकांची नगर वसविण्याची पद्धत अगदी आजच्या आधुनिक पद्धती प्रमाणे होती याचे पुरावे आहेत. ड्रेनेज सिस्टम व रस्त्यामधले चौक आजही त्यांच्या प्रगतीच्या टप्प्याचा पुरावा देतात. पुढे जाऊन ती संस्कृती कशी नष्ट झाली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या अॅझेटि़ लोकांचा अंत कसा झाला यावर इतिहासकारांचे दोन मतप्रवाह (गट) पडतात.
१) अॅझेटीक संकृतीत हे आधुनिक शहर चालविण्याचे ज्ञान फक्त उच्चवर्णीयांकडे होते. इतर समाज मागासलेला होता. या मागासलेल्या समाजाने क्रांती केली. शहरं ताब्यात घेतली, पण ते आधुनिक शहरं चालविण्याचा ज्ञान नसल्यामुळे या मागास लोकानी स्थलांतर केले.
२) अॅझेटीक संस्कृतीत गुलामांचा वापर करुन भव्य ईमारती बांधताना प्रचंड प्रमाणात निसर्गाची नासधुस झाली. दोन अॅझेटीक गटांमधे उंच पिरॅमिड बांधण्याची जणु स्पर्धा चाले. यामुळे कालांतराणे तिथली नैसर्गिक हानी या स्थराला पोहचली की, तिथे मानवाला राहण्यासाठी अनुकुल वातावरण उरले नव्हते. म्हणुन अॅझेटील लोकानी स्थलांतर केले. ईजिप्तचे पिरॅमिड हे या अॅझेटीक स्थलांतरितांचेच काम आहे असा पण कयास आहे.
आता या पुढील माहिती अमेरीका, मेक्सिकोत राहणा-यानी टाकावी. जमल्यास् ते पिरॅमिडचे फोटो टाकावे.
माहीती अतिशय छान
माहीती अतिशय छान आहे............अभ्यास जास्त आहे वाटते.......
छान माहीती आहे. धन्यवाद..
छान माहीती आहे. धन्यवाद..
प्लॅनेत एक्स निबुरु" नामक
प्लॅनेत एक्स निबुरु" नामक ग्रह प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेनी येत आहे. हा ग्रह २०१२ च्या डिसेंबर मधे पृथ्वीवार आदळणार असा अंदाज आहे.
हा ग्रह वेगाने पृथ्वी च्या दिशेने येतोय खरा.........हे मी सुद्दा वाचले आहे......पण त्याचा काळ २०१२ नाही आहे ६ ऑगस्ट ३०१५ आहे...........अजुन १००० वर्ष लागतील त्याला............पोहचायला..........
२०१२ हे कदाचीत शेवट चे वर्ष नसेल.....कारण असे पण होउ शकते कि जी काल गणना सापडली आहे ती अपुर्ण असु शकते....किंवा लिहीनार्याला तेवढीच येत असावी......या बाबतीत वाद असेल ही......
पुर्वी ची संस्कृती आपण जेवढी समजतो त्या पेक्षा कितीतरी पटी ने आधुनिक असेल......
बकासुर . छान माहीती देताहात
बकासुर . छान माहीती देताहात अजून यायला हवी असं वाटतय
छान माहिती, धन्यवाद.
छान माहिती,
धन्यवाद.
मायन संस्कृति बद्दल बरीच
मायन संस्कृति बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे, अगदी मराठीतही मीना प्रभूंच्या मेक्सिकोपर्व आणि दक्षिणरंग मधे ती आहे. तिच्या प्राचिनतेबद्दल वादच नाही पण ४०० वर्षाचा इतिहास हा उल्लेख अमेरिका देशाबद्दलचा असतो, खंडाबद्दलचा नाही.
त्यांच्याकडे लोखंड नव्हते, त्यांची अवजारेही सोन्याची असत. तिथल्या संग्रहालयात ती आहेत.
त्यांना चाकाचा वापर मान्य नव्हता. लोखंड, चाक आणि घोडा नसतना, त्यांनी एवढे बांधकाम केले ते नवल.
त्यांनी घोडा आधी बघितला नसल्याने, घोड्यावर बसून आलेल्या स्पॅनिश लोकांना ते घाबरले, कारण त्यांना तो एकसंध प्राणी वाटला.
त्यांच्या नरबळी प्रथेवर नॅशनल जिओग्राफिक मासिकात सचित्र लेख होता.
त्यांची संस्कृति लयाला जाण्याचे कारण, पर्यावरणाचा नाश, असल्याचेही वाचले होते.
लेख छान ....मी discovery वर
लेख छान ....मी discovery वर याबद्दलचा माहितीपट पहिला आहे....हि मायन संस्कृती आहे अमेरिकन नव्हे. अमेरिका जन्मास येऊन ४०० वर्ष झाली जिची संस्कृती या नेटिव मायन, रेड इंडिअन लोकांपेक्षा खूपच भिन्न आहे.
.हि मायन संस्कृती आहे अमेरिकन
.हि मायन संस्कृती आहे अमेरिकन नव्हे >> अगदि अगदि.. खर तर हि मेक्सिकन संस्कृती आहे, अमेरिकन नाहि..
त्यांची संस्कृति लयाला
त्यांची संस्कृति लयाला जाण्याचे कारण, पर्यावरणाचा नाश, असल्याचेही वाचले होते.>> माझ्या वाचनातही सेम.
छान..
छान..
(No subject)
शेकडो मेक्सिकन इन्डियन राज्ये
शेकडो मेक्सिकन इन्डियन राज्ये वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या शहरात होती सर्वात प्रमुख
ओल्मेक,
सापोतेक
मायन
इन्का
अॅझटेक.
मायन आणि इन्का यात सर्वात सम्रुद्ध आणि प्रगतीशील संस्कृती. (अॅझ्टेक समृद्ध होते पण
समृद्धीचा कालखण्ड लहान होता)
अमेरिकेत पण अनेक रेड इण्डियन राज्ये होती पण अत्यंत प्रतिकुल निसर्ग यामुळे त्यान्च्यात जास्त
सम्रुद्धी कधिच आली नाही.
१७ व्या शतकात मेक्सिको प्रगत व समृद्ध आणि अमेरिका मागासलेले गुन्हेगारांचे राष्ट्र समजत असत.
१९व्या शतकात सॅन्टा आनाच्या फौजांचा पराभव केल्यानंतर ग्रींकोकडे पहाण्याचा मेक्सिकन लोकांचा दृष्टीकोन बदलला.
पोर्तुगीजांनी तिथल्या बर्याच
पोर्तुगीजांनी तिथल्या बर्याच पुस्तकांचा नाश केला म्हणे. मानवी बळी देण्याची (नरबळी नाही. नारी बळी जास्त फेमस होता. त्यातही कुमारिकेचा) पद्धत पाहून ही कसली संस्कृती म्हणत हे काम त्या मिशनर्यांनी केले म्हणे.
अॅझटेक गोल्ड फेमस आहे.
सूर्यपूजक असलेल्या या समाजात सोने सूर्याचा धातू म्हणून देवळांत दान देणे इतक्याच कामाचा होता. मोठ्या प्रमाणावर सोने पोर्तुगीजांनी युरोपात आणले असे म्हणतात.
जे असेल ते असो. हा इतिहास पूर्णपणे जगासमोर नाही. इथली 'मूल्ये' इतर समाजांच्या मूल्यांच्या विपरीत होती. तीच काहीशी रेड इंडियनांतील काही जमातींत होती. - आपाचे(शे) इंडियन्स क्रूर होते पण शत्रूप्रति क्रौर्य हे त्यांच्यासाठी उच्च समाजमूल्य होते. तिथे enemy अन stranger यांसाठी एकच शब्द होता असे वाचनात आहे.
रच्याकने.
'अमेरिकेचा इतिहास' म्हटल्यावर उसगांव अध्यहृत असते. तिचा इतिहास उण्या पुर्या ४०० वर्षांचा असावा.. पण तो ही रेड इंडीयन लोकांना वजा केल्यासच.
एकंदरीतच गोरे लोक हे
एकंदरीतच गोरे लोक हे आजकालच्या अतिरेकी लोकांपेक्षा जास्त भयानक. जिथे जातील तिथल्या संस्कृतीचा समूळ उच्छेद करतील. साम दाम दंड भेद हे चारी प्रकार त्यांना जगातल्या सर्व लोकांपेक्षा जास्त अवगत आहेत.
@ निलिमाजी >>अमेरिकेत पण
@ निलिमाजी
>>अमेरिकेत पण अनेक रेड इण्डियन राज्ये होती पण अत्यंत प्रतिकुल निसर्ग यामुळे त्यान्च्यात जास्त
सम्रुद्धी कधिच आली नाही.<<
हे समजले नाही.
माझ्या माहितिप्रमाणे प्रचंड प्रमाणात उपलब्ध बायसन ची शिकार व 'bountiful' निसर्गामुळे रेड इंडीयन जमाती फक्त स्थलांतर करणार्या बायसन कळपांमागे भटक्याचे आयुष्यच जगत होत्या. नैसर्गिक रित्या उपलब्ध hunting & foraging मुळे त्यांनी नागरी संस्कृतीत परावर्तित होण्याचा प्रयत्नच केला नाही. एकाद्या जमातीचे उदा. Apache Nation याचा अर्थ भौगोलिक सीमांनी युक्त असा प्रदेश असे नाही. त्यांची शिकार करण्याची 'टेरिटरी' देखिल 'नेशन' च्या या अर्थछटेत येत नाही. तिथे नेशनचा अर्थ खराखुरा अर्थ तिथले लोक असा होतो. सर्व individual टोळ्या मिळून एक नेशन असा काहीसा अर्थ आहे..
या इतिहासाबद्दल अधिक वाचायला आवडेल. या विषयातील कुणी अभ्यासू इथे आहेत काय?