Submitted by मृण्मयी on 11 July, 2008 - 02:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी मुगडाळ (सालासगट चालेल)
पाव चमचा मीठ
पाव चमचा तीखट
अर्धा चमचा धने जीरे पूड
(हिरवी मिरची optional )
क्रमवार पाककृती:
मुगवड्या करायला अगदी सोप्या. पण करून अगदी कडकडित उन्हात वाळवाव्या लागतात.
** मूगडाळ ४-५ तास पाण्यात भीजत घालून उपसावी. शक्य असेल तर पाणी न घालता किंवा अगदी कमी पाण्यात मिक्सरमधून वाटावी. फार बारिक नको. वाटतानाच तिखट मीठ, मसाले घालावेत. प्लास्टिक शीटला तेलाचा हात लावून त्यावर 'हर्शी कीस' एवड्या आकाराच्या वड्या घालाव्या. २-३ दिवस उन्हात वाळल्यावर हवाबंद डब्यात भराव्या.
अधिक टिपा:
मूगवड्या हा वाळवणातला एक प्रकार. इथे US मधे भारतीय दुकानात 'मूगवडी' याच नावानं मिळतो. (त्याखाली त्याचं ईंग्रजीत बारसं केलय ' spiceball ' या नावानी! या विकतच्या वड्या मात्र पटकन शीजतात.
भारतात लोक घरी करतात या वड्या. त्या शिजायला ईतक्या सोप्या नाहीत.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात मेथि
यात मेथि पण घालतात. चान्गलि लागते.
आता ह्या
आता ह्या वापरुन भाज्या कशा करायच्या तेही लिहा ना....
(माझ्याकडे एक विकतचे पाकिट पडलेय बरेच दिवस, काही केले नाही त्याचे...)
आम्ही
आम्ही (म्हणजे आई ) साधारण अशाच ह. डाळीच्या वड्या करतो. लग्नकार्यात पण ह्या वड्यांनी सुरुवार करतात- गृहयज्ञच्या दिवशी सकाळी. का ते माहिती नाही. पण ह्याची भाजी लै भारी लागते. मी जराशा तेलात परतुन कढीत पण घालते आणि "आमच्यात" पकोडा-कढी अश्शीच करतात असं खपवते
चांगली
चांगली ट्रिक सिंडे! (नशिब नुस्त्या वड्या तळून खायला घालून 'आमच्यात पकोड्याची कृती अश्शीच असते' सांगत नाहीस :P)
मुगवड्या
मुगवड्या करायला अगदी सोप्या. पण करून अगदी कडकडित उन्हात वाळवाव्या लागतात. >>>
हे कसे करायचे इथे उत्तरेकडे?
उत्तरेकडे,
उत्तरेकडे, बर्फातून गाडी नीट चालवत देशी दुकानात जायचे. 'स्पाइस बॉल' विकत आणायचे.
छ्या... हा
छ्या... हा पर्याय काही आवडला नाही आपल्याला त्यापेक्षा फ्लोरीडावासी सुगरण मैत्रीणींकडे उन्हाळ्यात एक ट्रीप करावी आणि उन्हाळकाम करावे हे जास्त छान वाटतय.
त्या
त्या दुकानातल्या पटकन शिजायचे कारण त्यात कायच्याकाय सोडाखार टाकलेला असतो. मी देसी दुकानातून आणून जेव्हा तेव्हा भाजी केली तर पोटाला हमखास त्रास झालाय माझ्या.
त्यापेक्ष
त्यापेक्षा फ्लोरीडावासी सुगरण मैत्रीणींकडे उन्हाळ्यात एक ट्रीप करावी आणि उन्हाळकाम करावे हे जास्त छान वाटतय >>> वा वा हे मस्तच. मी पण येइन. तुम्हाला तीखट-मीठ कमी जास्त सांगायला नको का कुणी साबुदाण्याच्या पापड्या आणि बटाट्याचा किस पण करणार असालच. अर्धा कच्चा एकदम टेश्टी लागतो
उन्हाळ्या
उन्हाळ्यात फ्लोरिडाला कडकडीत(?) उन्हाबरोबर प्रचंड ह्युमिडिटी असते. तेव्हा स्पाइसबॉलला पर्याय नाही. हं, पापड्या (अर्ध्या कच्च्या) खाता येतील. तेव्हा वाळवण आणि साठवण ट्रिप नसली तरी आठवण म्हणून ट्रिप काढा.
या वड्या
या वड्या वापरून वांगी बटाटा भाजी छान लागते.
या वड्या तेलात परतून घ्यायच्या. मग वांगी बटाटा यांची आपल्या पद्धतीने भाजी करायची. त्यात या वड्या सोडायच्या. या वड्या कडकडीत वाळवलेल्या असल्याने शिजायला बराच वेळ लागतो. भाजीत थोडा रस ठेवावा. कारण मग या वड्या रस शोषून घेतात व फुगतात.
या वड्या अनेक प्रकारे करतात. इतर डाळीही मिसळतात. उडदाची डाळ थोडी तरी घालतात.
या वड्या
या वड्या वापरून वांगी बटाटा भाजी छान लागते>>>
हो आणि नुसत्या बटाट्याची कांदा-टोमॅटो घालुन केलेली रसभाजीही छान होते.
अश्याच उडदाची डाळ आणि कोहळा घालुन केलेल्या वड्या आमच्या कामवाल्या अम्माने मला करुन दिल्या आहेत.शिवाय 'अमृतसरी वडियां' म्हणुन दुकानात मिळतात. फार प्रसिद्ध आहेत उत्तर भारतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही शुभेच्छा!
खान्देशात
खान्देशात सगळ्या डाळींच्या अशा वड्या करतात (लसुण्-मिरची घालून). त्यांना आम्ही 'कर्होडे' असे म्हणतो. यांची नुसती कांदा-लसुण्-तिखट घालूनही छान भाजी होते. शेंगदाण्याची चटणी वाटूनही पातळ (आमटी सारखी) भाजी करतात. ती तर माझी अतिशय आवडती आहे.