नाताळला लावता आला नसला तरीही वेदाला २६ डिसेंबरला मात्र आकाशकंदील लावता आला रात्री! कारण आज चक्क पार्टी होती.
कालच अचानक मिळालेले तीन लाखांचे सोने सगळ्यांना सुचवून गेले होते. उद्या पार्टी तरी करा?
आणि वसंताकडे आपसूकच पार्टीच्या सर्व तयारीची जबाबदारी आलेली होती. कारण उघड होते. मिष्टान्न तोच आणणार, सर्व मोठ्यांमध्ये लहान तोच आणि सर्व लहानांमध्ये मोठा तोच!
गीतावहिनीने आज चक्क रजाच टाकली. बाकीच्यांना मात्र रजा घेणे शक्य नव्हते. राजूदादाने सकाळीच 'आज मी शाखेत जाणार नाही' हे जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला.
संध्याकाळी सात वाजता सगळे एकमेकांबरोबर स्वयंपाकघरात बसलेले होते. आज चक्क आई वाढत होत्या. सुना जेवायला बसलेल्या होत्या.
अण्णा - वसंता.. चितळे लाडवाचे भाव का वाढवत नाहीत हे तुला समजले का??
वसंता- का??
अण्णा - ते लाडवाचा आकार लहान करतात..
वसंता - काहीही... शेवटी वजनावरच विकतात..
अण्णा - किती असतो रे रोजचा गल्ला??
वसंता - तुझ्याच बॅन्केत अकाउंट आहे की?
अण्णा - भाऊ काका, लाडू घ्या... आपलंच घर समजा..
भाऊ - तुझा बाप जन्माला आला नव्हता तेव्हापासून हे घर माझं आहे... तू काल आलास...
अण्णा - अहो मुलं आहेत इथे...
भाऊ - हे तुला समजायला पाहिजे... म्हणे आपलंच घर समजा...
दादा - शरद... ते आमटीचं सरकव इकडे...
अण्णा - दादा आमटी नुसती पितो... बाकीच्यांनी भात कसा खायचा??
तारका - अहो... काय बोलताय..
अण्णा - माझा भाऊ आहे मोठा... तो अन मी बघून घेऊ... तू जेव...
दादा - हिने आमटी केली तरच मी पितो...
अण्णा - अरे वा?? इतकं प्रेम अंजलीवहिनींवर??
दादा - छे?.. हिची आमटी बिघडते हे इतर कुणाला समजू नये म्हणून..
अंजली - हो का? मग आता तारकालाच सांगत जा आमटी करायला...
दादा - अगं गंमत करत होतो...
अण्णा - दादाने कित्येक वर्षात पहिल्यांदा गंमत केली तीही अंजलिवहिनींचीच...
दादा - उमेश... बिगुलला अर्धा लाडू घाल..
उमेश - खात नाहीये तो आहे तेच...
गीता - आई तुम्ही बसा.. सगळे घेतील वाढून..
भाऊ - अशी बरी बसेल ती... थोरला दीर आहे मी...
आई - सुना बसल्या आहेत ते चालतंय वाटतं...
गीता - तुम्हाला मी वाढते...
भाऊ - गप्प बस.. ही फार चुरूचुरू बोलते नाही?? देशस्थ की कोकणस्थ..??
बाबा - अरे कालच विचारलंस ना? भागवत आडनाव आहे माहेरचं..
वसंता - भाऊ काका.. देशस्थ आणि कोकणस्थांच्या बोलण्यात काही फरक असतो का??
भाऊ - प्रचंड फरक असतो..
वसंता - काय फरक असतो??
भाऊ - देशस्थ मुद्यावर कमी बोलतात आणि कोकणस्थ मुद्दा सोडत नाहीत..
वसंता - इतकाच ना?
भाऊ - छे छे.. देशस्थांनी सोडलेला मुद्दा कोकणस्थ पुन्हा मधे आणून ठेवतात.. म्हणून तर आपण भारी असतो..
अंजली - असं काही नाही.... उलट सारासार विचार करून बोलतात देशस्थ..
भाऊ - काय वाट्टेल ते काय बोलतेस?? कोकणस्थांच्या घरात आलीस लग्न करून..
अंजली - हो पण देशस्थ वाईट असतात असे कुठे आहे??
भाऊ - हिचं माहेरचं आडनाव काय रे राम??
बाबा - कुलकर्णी..
भाऊ - तरीच..
बाबा - तुला काय लक्षात नसतात का रे आडनावं?? होतास की तिघांच्या लग्नात..
भाऊ - ते जाऊदेत... आज साधं वरण केलं नाही??
तारका - केलंय... हे घ्या..
वसंता - उमेश.. आता जेवणं झाली की डान्स आहे बर का??
वेदा - हो??
वसंता - येस्स... रेकॉर्ड आणलेल्या आहेत...
वेदा - आराधना आहे??
वसंता - सबकुछ आहे... जेवून घ्या..
आई - आता नाचूबिचू नका हं..
वसंता - नाचल्याशिवाय कसली पार्टी?? आज सगळ्यांनी नाचायचंय!
अण्णा - राजू शाखेतली कवायत करेल...
दादा - अरे असं नको बोलूस त्याला.. बिचारा तो तरी जातोय शाखेत...
अण्णा - दादा म्हणजे एक कनवाळू माणूस आहे नुसता... थट्टा करायची नाही का??
दादा - आधी सांगायचंस ना? गंमत म्हणून म्हणतोय असं..
अण्णा - वा.. म्हणजे मला रोज दुप्पट बोलावं लागेल..
गीता - खरच नाचायचंय का??
वसंता - खोट कसं नाचतात?
आई - जेवणात लक्ष द्या रे... उमेश.. पोळी घालू का??
मजेत जेवणे चाललेली होती. आवराआवर झाल्यावर सगळे तिथेच गोल करून गप्पा मारायला बसले. भाऊ काकांनी त्यांच्या पठडीतून अजब आठवणी सांगीतल्या. पुर्वीच्या स्वस्ताईवर त्यांचे आणि आई बाबांचे एकमत झाले. त्या तिघांचे एकमत होणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे हे अण्णाने जाहीर केले. तोवर वेदाने 'काका, लाव की रेकॉर्ड' म्हणून मुद्दा धरून ठेवायला सुरुवात केली.
आणि मधेच वसंता मधल्या खोलीत आला आणि काहीतरी करून पुन्हा स्वैपाकघरात आला..
कुणीतरी काहीतरी बोलत असतानाच अचानक..
'चुरालिया है ......'
आशा भोसलेचा मधूर आवाज कानावर पडला आणि एकदम 'कसला आवाज झाला' या शंकेने गप्प झालेल्या सगळ्यांना समजले... आता धिंगाणा सुरू होणार आहे..
वेदा उठली आणि उमेशला उठवून तिने स्टेप घ्यायला सुरुवात केली..
'चुरालिया है तुमने जो दिलको... नजर नही चुराना सनम..
बदलके मेरी तुम जिंदगानी... कही बदल ना जाना सनम..'
नाही म्हंटले तरी वेदाच्या स्टेप्स पाहून सगळे चकीत झालेलेच होते. खरे तर त्या काळात मुलांना इतके काही यायचे नाही. पण वेदा म्हणजे कलाकारच होती. उमेशला काही तिच्यासारखे नाचता येईना.. तरी आपला कसासा पाय उचलत होता..
आता वसंताही उठला. मनातील अनेक अनुत्तरीत प्रश्न, एक पोकळपणाची जाणीव, निरर्थकपणाची बोच, एकटेपणाची गर्दी.. या सर्व बाबी काहीश्या बाजूला सारत तोही उमेश आणि वेदाला जॉईन झाला..
सगळे हसायला लागले.. अण्णा आणि तारकाला वेदाचा डान्स बघून अभिमानही वाटत होता.. आणि...
... स्वतःच अॅरेंज केलेल्या पार्टीत वसंताचे पाय आता हळूहळू तालात यायला लागले होते... उमेश तर बघायलाच लागला.. हा चमत्कार उमेश आणि वेदाला माहीत नव्हता... आपला काका नाचत असेल याची मुळीच कल्पना नव्हती त्यांना.. आधि चकीत होणे, मग आनंद, मग निरीक्षण आणि शेवटी 'आपल्यातलाच आहे' असे मानून वसंतकाकाबरोबर दोघे नाचू लागले..
सगळेच हासत हासत बघत होते...
बहार बनके आउं कभी तुम्हारी दुनियामे
गुजर न जाये ये दिन कही इसी तमन्नामे
तुम मेरेSSS हो... ओ तुम मेरेSSS हो... आज बस इतना वादा करके जाना... चुरालियाSSS...
हे फक्त 'सुश्राव्य'च गाणं होतं! त्यामुळे 'ई, याच्यावर कसं नाचायचं' हा उद्गार वेदाच्या तोंडून निघाला आणि ताबडतोब जाऊन उमेशने पुढचं गाणं लावलं...
वसंता 'अरे? थांब ना' म्हणेपर्यंत..
दिवाने है दिवानोंको ना घर चाहिये.. ना घर चाहिये...
मुहोब्बतभरी इक नजर चाहियेSSSSSS इक नझर चाहिये...
जंजीरच्या या गीतावर एकट्या वसंतालाच नाचणे शक्य होते पुन्हा! कारण मूळ पिक्चरमध्ये ते दोघे कसे नाचले आहेत हे वेदाला आणि उमेशला माहीतच नव्हते...
"काय रे का काहीतरी..."
"तुला कुठलं पाहिजे??"
तोवर उमेशने आणखीन पुढचं गाणं लावलं!
'अरे रंग का भंग जमा हो चकाचक... फिर लो पाSSSSSन चबायेSSS
अरे ऐसन झटका... लगे जियापे... पुनरजनम हुई जायेSSS
लो खई के... लो खई के... लो खई के पान...'
आता मात्र मैफील जमली. तिघे आता मस्त नाचायला लागले...
'ओ इक कन्या कुवांरी... हमरी सुरतपे मर गयी हाय.. हाय... हाय
ओ इक मिठी कटारी.... हमरे दिलमे उतर गयी हाय.. हाय'
उमेश वेदाला उद्देशून कन्याकुवारी म्हणत असल्यामुळे वसंताला एकट्यालाच नाचावे लागत होते. उमेश आणि वेदाचे चित्रपटाचे ज्ञान पाहून कुमारदादा अवाक झालेला असतानाच...
अण्णा - दादा.. उठ की... नाच..
दादा - मी??
सगळे हसायला लागले. तोवर भाऊ काकांनी फर्मान सोडले..
"बाSSSSSSस... बास.... त्या क्यॅसेटी बंद... "
"का???"... तारकावहिनी!
"एवढी माणसे इथे असताना स्वतः भेंड्या खेळायच्या सोडून टेपा कसल्या लावताय??"
अंजलीवहिनी - अय्या हो... आपणच भेंड्या खेळू.. जेन्ट्स व्हर्सेस लेडिज..
तारका - काही नको.. त्यात अक्षरावरून गाणी म्हणायला लागतात..
अंजली - मग?
तारका - त्यापेक्षा नुसती गाणी म्हणू...
भाऊ काका - चालेल.. नुसती गाणी म्हणा...
उमेश आणि वेदा हिरमुसले असतानाच पहिला नंबर वेदाचाच आला..
वेदाने लाजत लाजत आढेवेढे घेत बालिश आवाजात शेवटी गाणे सुरू केले..
'प्यार दिवाना होता है... मस्ताना होता है
हर खुषीसे हर गमसे अन्जाना होता है..'
"ए... अन्जाना नाही.. बेगाना.."
उमेशच्या या व्यत्ययामुळे आणखीनच हिरमुसलेल्या वेदाने उत्स्फुर्त उद्गार काढला..
"कुठला तरी नाना आहे ना?? मग बास..."
भाऊ - पोराम्ना कसले रे गायला लावता?? शिकायची वयं त्यांची? संस्कार आहेत की नाही?? अरुणा.. तू गा...
आई - मी??????
केवढ्यातरी दचकलेल्या आईंच्या मागे आग्रहाची गाडी लागली पण त्या बधेनात!
शेवटी वसंता म्हणाला..
"चांगले नाचत होतो... आता कोण गातही नाहीये अन नाचतही नाहीये..."
भाऊ - का?? का गात नाही म्हणतो मी?? या पोरींना काय झालं गायला?? दाखवायला आणल्या होत्या तेव्हा माहेरचे अगदी वर्णन करून सांगत होते... आमच्या मुलीचा गळा गोड आहे.. तो गेला कुठे??
अण्णा - लग्न झाल्यावर गळा गोड राहतो का काका??
भाऊ - माझं लग्नं झालं नाही यावर थट्टा करतोस??
अण्णा - छे छे.. काहीतरी काय.. मी आपला एक निसर्ग नियम सांगीतला..
भाऊ - राजेश.. तू गायला सुरुवात कर... नाहीतर हा वसंता गाईल आणि तू नाच..
अण्णा - राजू नाचणार?? शाखेच्या कवायती करेल...
दादा - मग गीतावहिनी ते हे गाणं म्हणेल... कुठलं रे शरद?? ते संगममधलं??
अण्णा - मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया??
दादांनी केलेली थट्टा पाहून गीतावहिनी अवाकच झाली. तोंडावर हात ठेवून अंजली आणि तारकाकडे पाहू लागली. सगळे हासत होते.
वसंता - गीतावहिनी... राजू दादा काही गाणार बिणार नाही.. चला तुम्ही आणि मीच नाचू...
वसंताने सरळ गीतावहिनीला उठवून उभेच केले आणि स्वतःच गाऊ लागला..
'ए फुलों की रानी.. बहारोंकी मलिका.. तेरा मुस्कुराना गझब हो गया...
न मै होश मे हुं .. न दिल होश मे है... नजर का मिलाना गझब हो गया'
सुरुवातीला तोंडावर हात ठेवून हासणारी गीतावहिनी हळूहळू स्टेप्स घ्यायला लागली..
उमेश आणि वेदासुद्धा बघतच बसले... इतकंच काय.. राजूदादालाही आजच समजलं की आपलं कलत्र खूपच 'बरं' नाचतं...
तोवर वसंताने गाणं बदललं.. असली गाणी थोरल्या दोन वहिन्यांबरोबर म्हणण्याची त्याची हिम्मत नव्हती.. गीतावहिनीच होती म्हणून चालत होतं...
'रूप तेरा... मस्ताना... प्यार मेरा... दिवाना.. भूल कोई हमसे ना होजाये...'
हे गाणं सुरू केल्यावर राजूदादाने वसंताला पाहून हात उगारण्याची हसत हसत अॅक्शन केली.. पण हे गाणं चलतीचं असल्यामुळे वेदा आणि उमेशही नाचायला लागले.. आणि एकंदर वातावरण 'नृत्यमय' होत आहे हे पाहून आता गीतावहिनीने मोठी माणसे आजूबाजूला असल्याची लज्जा काहीशी बाजूला सारली आणि तीही नाचू लागली..
'रात नशीली... मस्त समाँ है.. आज नशेमे ... सारा जहाँ है.. हाय शराबी मौसम बहकाये..."
वसंता आणि गीतावहिनी आता एकमेकांना सामोरे होऊनच नाचत होते..
'आखोंसे आंखे... मिलती है कैसे... बेचैन होके.. तुफांमे जैसे.. मौज कोई साहिलसे मिलजाये'
आता अण्णाही उठला... त्यालाही मूड आला होता.. त्याने तारकाला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला..
राजू - अण्णा.. फरशी जुनी झालीय आपल्या स्वैपाकघराची आता..
तारकावहिनींनी राजूच्या पाठीत घातलेली थप्पड पाहून आई हसायला लागल्या. एरवी एका सुनेने तिच्या दिराला, म्हणजे आपल्या मुलाला असे काही केले असते तर चार दिवस घरात त्या सुनेच्या माहेरचा उद्धार झाला असता..
'मला असं बोलता काय' अशा आविर्भावात आता तारका उठली आणि अण्णाबरोबर नाचायचा प्रयत्न करू लागली. सुरुवातीला आईचे ते बेढब नाचणे बघून वेदा हसायलाच लागली. पण तारकाने तिच्याहीकडे बघून डोळे वटारल्यावर ती गप्प बसली. इकडे वसंता आणि गीतावहिनी पुढच्या गाण्याकडे वळले होते. वसंताला 'गळा' नव्हता. पण आज कुणालाही काहीही नसले तरी सगळेच नाचत होते, गात होते.
'हाल कैसा है जनाब का... क्या खयाल है आपका...
हम तो मचलगये ओ ह्हो ह्हो... यूंही फिसल गये आ ह्हा ह्हा'
किशोरचे 'यॉडलिंग' काही कुणाला जमेना.. त्यामुळे मधे गॅप निर्माण होऊ लागली.. आणि ती गॅप असह्य झाली आणि अचानक भरली जाऊ लागली..
दादा... कुमारदादाने चक्क यॉडलिंग केले... आणि सहीसही केले.. आता कोण त्याला खाली बसू देणार??
वसंता आणि अण्णाने दादाला उठवले... पाठोपाठ अंजलीवहिनींनाही उठायला लागले..
'गा गा' असा आग्रह सुरू झाल्यावर दादा हात जोडून खाली बसू लागला..
अंजली - इश्श... खोलीत गातात की कितीतरी वेळा..
हा कल्ला झाला या विधानावर! अंजलीवहिनींना स्वतःची 'चूक' समजेपर्यंत 'कुठले गाणे गातो दादा' ही चौकशी जोर धरू लागली...
अण्णा - बहुतेक.. जाने वो कैसे... लोग थे जिनके.. प्यार को प्यार मिला..
आता अंजलीवहिनी अण्णांच्या पाठीमागे लागल्या आणि अण्णा खोलीतल्या खोलीत पळू लागला.. सगळेच हासत होते...
पण बायकोचा अगदीच 'आबा' होऊ नये असे वाटल्यामुले कुमारदादा चक्क स्वतःहून पुन्हा उठला आणि हात वर करून म्हणाला..
"ऐका ... ऐका... मी गाऊ का??"
नुसती बोंबाबोंब!
बाबा - ए अरे आवाज करू नका ना एवढा.. उठेल गल्ली..
तोवर दादांनी खाकरत वगैरे सुरू केलेच...
'तू प्यार का सागर है.. तेरे इक बुंदके प्यासे हम..
लौटा जो दिया तुने... चले जायेंगे... जहांसे हम..'
"अँ??? दादा.. अरे हे कसलं गाणं या वेळेला??"
वसंताचे ऑब्जेक्शन ऐकून दादा बुचकळ्यात पडला..
"का रे?? चांगलं प्यार का सागर वगैरे म्हणतोय की??"
"अरे पण ते बलराज सहानी देवाला उद्देशून म्हणतो..."
"अंजली ही माझ्यासाठी देवच आहे.."
तारका आणि गीताने अंजलीची पाठ थोपटून कौतुक केले असले तरी बाकीचे हासत असल्यामुळे आता दादावर नवीन गाणे गाण्याची जबाबदारी आली..
"ठीक आहे.. ठीक आहे.... दुसरं म्हणतो..."
'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर..'
अंजलीवहिनींनी चक्क पोज घेत 'अच्छा???" म्हंटल्यावर मात्र उमेशने कपाळाला हात लावला. आता वसंता आणि गीतावहिनीही थांबून ते दृष्य पाहू लागले..
'सबको मालूम है और सबको.. खबर होगयी.."
कुमारदादा चक्क नाचतोय म्हंटल्यावर टाळ्यांचा पाऊस पडू लागला.. अंजलीवहिनीही मुरकत मुरकत नाचू वगैरे लागल्या..
'हमने तो प्यारमे ऐसा काम करदिया... प्यारकी राहो मे अपना नाम करदिया.. '
तेवढ्यात राजू कशासाठीतरी उठला आणि दादाचे गाणे बंद करून आता अण्णा गाऊ लागला.. गातानाच त्याने राजूला पुन्हा खाली बसवले..
'क्युं चले.. उठके मिस्टर क्युं चले.. प्यारसे मेरे कहो क्युं जले?? बैठ भी जाओ जाने जा..
ये बेमिसाल हुस्न..... लाजवाब ये अदा... टाली हो..... टाली हो... टाली हो...'
अण्णा चक्क चांगल्यापैकी गातो हा शोध गीतावहिनी आणि भाऊकाकांसाठी नवीन होता..
तारका मात्र 'आपण बेमिसाल हुस्न' आहोत की नाही आहोत यावर विचार करत उभी होती.
भाऊ काका - ए राजू... अरे तुला काय धाड भरलीय?? सगळं घर नाचतंय अन हा अजून मोतीबागेतच..
राजूदादाला उठवण्यासाठी वसंता पुढे झाला आणि गीतावहिनीला जरा बरे वाटले. आपला नवरा अगदीच बावळट ठरू नये असे तिला मगाचपासून वाटत होते.
राजू उठला आणि अत्यंत जोरात ओरडला..
"मला समजता काय तुम्ही सगळे?? आं?? मी गाऊ शकत नाही?? नाचू शकत नाही?? या वसंताने जितके पिक्चर गेल्या वर्षात पाहिले नसतील तितके मी माझ्या जमान्यात एका महिन्यात पाहायचो..."
" मग गा की??"
गीतावहिनींची ती लाडीक मागणी ऐकून वसंता म्हणाला..
"आय हाय हाय हाय... आत्तापर्यंत माझ्याबरोबर नाचत होती.. आता लगेच पार्टी बदलली काय?"
तोवर राजूने अण्णाला विचारले..
"ते कुठलं रे गाणं अण्णा?? तू अन मी म्हणायचो सारखं??"
"कुठलं?? तू अन मी एकत्र म्हणण्यासारखं गाणं निर्माण झालं आहे???"
"अरे ते नाही का देव आनंद ट्रेनच्य बाहेर एका बसवर असतो.. आणि ट्रेनमध्ये ती ही असते.."
"जिया हो..."
"हां... जिया हो..."
'जिया होSSSS... जिया हो जिया कुछ बोलदो... अजी हो... दिल का पर्दा खोलदो.. आह्हाहाहाहा..
जब प्यार किसीसे होत्ता है... इक दर्दसा दिलमे होत्ता है.. तुम एक हसीन हो लाखोंमे..
भला पाके तुम्हे कोई खोत्ता है.. जिया हो.... जिया हो जिया कुछ बोलदो...'
आता कुणीतरी गीतावहिनीकडे पाहायला हवे होते. काय रंग आला होता तिच्या चेहर्यावर.. पण एकटा बिगुलच आईकडे पाहात होता.. बाकी सगळे थक्क होऊन राजूकडे...
'दिल तडप तडप के कहरहा है आभी जा,, तू हमसे आंख ना चुरा.. तुझे कसम है आभी जा..'
मधली शिट्टी दादाने वाजवली तोवर गीतावहिनी डायरेक्ट कडवंच म्हणायला लागली..
'तुमसे मेरी जिंदगी का ये सिंगार है.. जी रही हुं मै के मुझको तुमसे प्यार है..'
आता भाऊ काका, आई आणी बाबा सोडले तर सगळेच नाचत होते..
'तू नही तो ये बहार क्या बहार है.. गुल नही खिले के तेरा इन्तिझार है.. के तेरा इन्तिझार है.. के तेरा..'
अण्णा - तारका, दादा - अंजली आणी राजू - गीता अशा जोड्या जमल्या.. इकडे उमेश आणि वेदा एकत्र झाले.. मग वसंताला चॉइसच उरला नाही... तो आणि बिगुल एकत्र नाचू लागले..
'मुस्कुराते प्यारका असर है हर कही.. हम कहां है दिल किधर है.. कुछ खबर नही...'
अचानक वसंता ओरडला..
"अरे आई बाबांन घ्या की???"
कालवा झाला तश्या आई दचकून दोन फूट मागे सरकल्या.. बाबा ओरडून म्हणाले..
"ऐका.. आम्हाला नाचायला लावू नका.. मी हव तर गाणं म्हणतो.."
"म्हणा..."
'ए मेरी जोहरजबीं.. तुझे मालूम नही.. तू अभीतक है हसी और मै जवां..तुझपे कुर्बान मेरी जान मेरी जान'
सर्व सुना हासत हासत ते दृष्य पाहू लागल्या. आई बाबांवर उचकलेल्याच होत्या. भाऊकाकाही आता हसू लागले होते.
'ये शोखिया ये बांखपन.. जो तुझमे है.. कही नही...
दिलोंको जीतने का फन.. जो तुझमे है.. कही नही...'
बाबांचा काहीसा पोक्त आवाज फारसा चांगला नसल्यामुळे आता वसंता आणि अण्णाही ते गाणे म्हणू लागले..
'तू मीठे मीठे बोल जो.. मुस्कुराके.. बोलदे..
तो धडकनो मे आजभी.. शराबी रंग... घोलदे..
ए सनम.. ए सनम मै तेरी आशिके जा विदा..'
आता मात्र आई आणी बाबांना उठवलंच सगळ्यांनी..
'ए मेरी जोहरजबीं' ला वन्स मोर मिळाला.. सगळे मिळून गोल करून नाचत होते एकत्र...
त्यातच 'जरा त्यातल्या त्यात' सुरेल गळा असणार्या अण्णाने नवीन गाणे सुरू केले..
आता वयाप्रमाणे सगळे आगगाडीसारखे पुढच्या कंबरेवर दोन्ही हात ठेवू लागले... आणि ती आगगाडी स्वयंपाकघरात गोल फिरू लागली.. सगळ्यात पुढे बिगुल.. मग वेदा.. उमेश.. वसंता.. गीता वहिनी.. राजू.. तारका वहिनी.. अण्णा.. अंजली वहिनी.. दादा.. आई .. आणि शेवटी बाबा कसेबसे तो वेग मॅच करायचा प्रयत्न करत...
'सासोंकी सरगम... धडकन की बीना.. सपनोंकी गीतांजली तू...
मनकी गली मे... महके जो हरदम.. ऐसी जुहीकी कली तू..
छोटा सफर हो... लंबा सफर हो.. सुनी डगर हो .. या मेला..
याद तू आये..मन होजाये.. भीड के बीच अकेला..
बादल.. बिजली... चंदन... पानी.. ऐसा अपना प्याSSSSSSर.....
लेना होगा... ज... न...
'जनम हमे' च्या वेळेस आगगाडीचे तोंड भाऊ काकांकडे झालेले होते..
ज्या माणसाने निस्वार्थीपणाने सोन्यातील एक अंशही घेतला नाही... तो 'अगदी या कुटुंबातला असा' नसल्यामुळे.. त्यांना उठवायचे सगळे विसरूनच गेलेले होते...
चेहरेच पडले सगळ्यांचे.. भाऊ काका त्रयस्थासारखे त्या आगगाडीकडे बघत असल्यामुळे...
पण ती कोंडी फुटणार कशी??? भाऊ काकांनी जाणले की सगळ्यांना अपराधी वाटतंय...
कुणालाही अजिबात जी गोष्ट शक्य वाटली नसती ती झाली...
भाऊ काका हासत हासत उभे राहिले.. बाबांच्या मागे जाऊन त्यांनी बाबांच्या कंबरेवर आपले दोन्ही हात ठेवले.. सगळे मान वळवून मागे बघत असतानाच भाऊ काका सुरू झाले..
'किसीके मुस्कुराहटोंपे हो निसार... किसीका दर्द लेसके तो ले उधार..
किसीके वास्ते हो तेरे दिलमे प्यार... जीना इसीका नाम है...'
याहीवेळेस मधली शिट्टी दादानेच वाजवली... आणि आगगाडी पुन्हा सुरू झाली...
'माना अपनी जेबसे फकीर है... फिरभी यारो दिलके हम अमीर है..
मिटे जो प्यार के लिये वो जिंदगी....
जडे बहारके लिये.. वो जिंदगी..
कहेगा फूल हर कलीसे बार बार... जीना इसीका नाम है...'
आई अगदी कौतुकाने मागे वळून आपल्या ज्येष्ठ दिराकडे पाहात होत्या. बाबांना आज मोठ्या भावाचे हात कंबरेवर असल्यामुळे लहान झाल्यासारखे वाटत होते...
बाकीच्या सर्वांना तर खूपच लहान असल्यासारखे वाटू लागले होते....
'रिश्ता दिलसे दिलके ऐतबार का.... जिंदा है हमहीसे नाम प्यार का..
के मरके भी किसीको याद आयेंगे.. किसीके आसूओंमे मुस्कुरायेंगे...
किसीको हो न हो हमे है ऐतबार.... जीना इसीका...'
'नाम है' हे शब्द घशातच विरले..
.... दारावर जोरजोरात थापा पडत होत्या... समोरच्या आक्का.. म्हणजे गौरीच्या आईंचा आवाज होता.. खूप घाबरलेला.. रडल्यासारखा... घाईघाईचा...
"कुमारच्याई... कुमारच्याई..."
वसंता दाराकडे धावला...
स्वतःच्या आयुष्याला कलाटणी मिळणारी बातमी घेऊन दारात आक्का उभ्या आहेत हे त्याला माहीत नव्हतं..
दार उघडल्यावर आत येऊन कुमारच्याईंना पाहून त्यांच्या खांद्यावर डोके टेकताना आक्का जवळपास कोसळल्याच...
"काय.. काय झालं काय???.. आक्का....????"
"गौरीकडचे सगळे शिर्डीला गेले होते... गाडीतून.. येताना अपघात झाला.. "
आक्रोशत आक्का सांगत होत्या. सगळाच आनंद संपलेला होता घरातला..
"काय.. कुणाला .. कुणाला फार लागलंय का???"
"कुमारच्याई... एकटी गौरी वाचली धडधाकट..... मुले.. मिस्टर... तिघेही..."
छानच..
छानच..
शेवटचा ट्विस्ट अपेक्षित
शेवटचा ट्विस्ट अपेक्षित होता.मस्तच!
मधला पार्टीचा किस्सा बोअरिंग झालाय.
तुम्ही मायबोलीचे 'केफिकीर" शोभता खरे!
पार्टीचा प्रसन्ग इतका
पार्टीचा प्रसन्ग इतका elaborate करन्याचि गरज नव्हति..
र्टीचा किस्सा बोअरिंग
र्टीचा किस्सा बोअरिंग झालाय........अनुमोदन.
मुद्दामहुन वाढवलाय असे प्रकर्षाने जाणवतेय. शेवटचा ट्विस्ट वाचकांची ऊत्कंठा वाढावी म्हणुन टाकलाय.
तद्दन टाईमपास. मुळीच आवडला नाहीये आजचा भाग.
चौघांचा आभारी
चौघांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
('केफिकीर' म्हणजे काय ते समजले नाही. क्षमस्व!)
मधला भाग रटाळ वाट्ला. घरगुती
मधला भाग रटाळ वाट्ला. घरगुती प्रसंगाचे वर्णन छान, पण थोडक्यात मजा आली असती.
खुप छान.
खुप छान.
जुने दिवस आठवलेत. <<< आई
जुने दिवस आठवलेत.
<<< आई अगदी कौतुकाने मागे वळून आपल्या ज्येष्ठ दिराकडे पाहात होत्या. बाबांना आज मोठ्या भावाचे हात कंबरेवर असल्यामुळे लहान झाल्यासारखे वाटत होते...
बाकीच्या सर्वांना तर खूपच लहान असल्यासारखे वाटू लागले होते.... >>>>>
मस्तच
खुप छान छान गाणि होति ति, खुप
खुप छान छान गाणि होति ति, खुप मजा आलि वाचतांना...
बेफिकिर टच मस्तच...
घरातील खेळीमेळीचे वातावरण,
घरातील खेळीमेळीचे वातावरण, मस्तच.
पु.ले.शु
अरे वा!!!!! गीतमय/ संगीतमय
अरे वा!!!!! गीतमय/ संगीतमय कथा वाचण्याचा माझा हा पहिलाच अनुभव! इतकी ही सगळी जुनी गाणी, माझ्या जन्माच्याही पूर्वीची...पण मला जवळपास सगळीच माहिती होती. जुन्या गाण्यांचे शब्द नी संगीत किती सुमधूर होते, ज्यामुळे ती अजरामर झाली आहेत... खूऊऊऊऊऊऊऊउप्प्प्प्प्प्प्प्प्प्प आवडला हा भाग.
शेवटचा ट्विस्ट रसभंग करणारा होता.... पण जाऊ दे, त्यावर मला विचारच करायचा नाहीये...
असो, तुमच्या प्रश्नाबद्दल...अहो बेफिकीरजी, एकता कपूर ह्या हिंदी सिरियल निर्मातीला कोणी ज्योतिषाने सांगितलं होतं की क तिच्यासाठी लकी आहे, तेंव्हा त्या अक्षरावरुन वरुन सिरियल्सची नावं सुरु केलीस की त्या हिट होतील. तेंव्हापासून आपल्या सगळ्या सिरियल्सची नावे ती सातत्याने आणि भक्तीभावाने क ह्या अद्याक्षराने ठेवते, त्यामुळे सगळे तिलाच केकता कपूर म्हणतात...
तिच्याशी काहीजण तुमची तुलना करतात, म्हणून तुम्ही केफिकीर... असे आहे, बरोबर ना साती?
फक्त एकच फरक.... केकता कपूर सिरियल्स मधे पाणी घालून वाढवते आणि तुम्ही ही कथा गाणी घालून वाढवलीत आणि काही लोकांना ती कंटाळवाणी वाटली. पण हा बहुतेक सध्या तुम्ही लिहित असलेल्या लेखमालिकेचा परिणाम असावा...हो ना?
असो, त्या निमित्ताने सगळया प्रसिद्ध जुन्या गाण्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. असे बदल कधी कधी रिफ्रेशिंग असतात.... मी तर गात गातच हा अख्खा भाग वाचला मला व्यक्तिशः विचाराल, तर हा भाग वाचतांना राजश्री बॅनरचे चित्रपट आठवले... त्यात काहीही स्टोरीलाईन नसतांनाही लोकांनी ते खुपच एन्जॉय केलेले होते तेंव्हा ती एक नावीन्यपूर्ण गोष्ट होती...पण नंतर काही लोकांनी त्या गोष्टीची नक्कल सुरु करुन तसल्याच चित्रपटांचा मारा सुरु केला...
सानी,बरोबर! बेफिकीर, मी तुमची
सानी,बरोबर!
बेफिकीर, मी तुमची फॅन आहे.
पण कृपया गोष्टीचा फ्लो राखण्यासाठी अवांतर प्रकारांचा संक्षेप केलात तर बरं होईल.
(अर्थात हे माझं मत आहे,तुम्ही कितिही लिहिलंत तरी मी वाचणारच म्हणा !)
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
मधला पार्टीचा किस्सा बोअरिंग
मधला पार्टीचा किस्सा बोअरिंग अ जि बा त नाहीये... रटाळ तर नक्कीच नाहिये... खूप सुंदर लिहिता राव... तुमची शैली म्हणजे.. __/\__
मस्तच.
मस्तच.
खुपच छान आणि हो आवर्जुन
खुपच छान आणि हो आवर्जुन सांगावस वाटतय पार्टीचा किस्सा सुद्धा छान रंगला,,,,,त्यांचा बालिशपणा पाहुन हसु आले ब-याचदा