अब आप सुनने जा रहे है...
फिल्म नौजवान का ये गीत.. जिसे संगीत दिया है.. एस डी बर्मनने...
... और गीतकार है...
.... साहिर लुधियानवी...
ठंडी हवाये... लहराके आये..
================================================
ऑल इन्डिया रेडिओला 'गीतकारांचे नांव तुम्ही सांगायलाच हवेत' हा आग्रह धरून तो मान्य करायला लावणारा, एस डी बर्मन बरोबर आयुष्यातील परमोच्च यशाचा काळ घालवल्यानंतर त्यांच्यापासून विभक्त होणारा, जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा..
.... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारा...
साहिर लुधियानवी हा शायर आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.
अमृता प्रीतम 'साहिरने ओढलेल्या' सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की 'आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार'!
जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो गये अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली होती.
अगदीच लहान असताना त्यांची परिस्थिती फार बिकट झाली होती. वडील अय्याश होते. ते एक लग्न झालेले असूनही वारंवार लग्न करायचे. साहिरच्या आईने शेवटी वैतागून साहिर यांच्यासकट घर सोडले. घटस्फोटही झाला. मात्र 'साहिर माझ्याकडे राहिला पाहिजे' ही मागणी वडिलांनी इतकी पराकोटीला नेली की ते साहिरच्या आईला म्हणाले 'हा जर माझ्याकडे आला नाही तर मी याला मारून टाकेन, तुझ्याकडेही राहणार नाही हा'!
पण काही परिचितांनी सतत साहिलवर लक्ष ठेवले व काही दिवसांनी त्यांच्या वडिलांनी तो नाद सोडून दिला. साहिरला घेऊन आई ज्या गरीब वस्तीत राहायला आली होती तिच्या शेजारून रेल्वे जायची. रेल्वेगाडी आली की छोटा साहिर आईला बिलगायचा कारण सपूर्ण वस्तीच थडाथडा हालत असायची. साहिर खूप घाबरायचा. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिरने स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही.
साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर!
इन्द्रकुमार गुजराल यांना भर मैफिलीत सरकारच्या निष्क्रीयतेवर सडेतोड प्रतिक्रिया देणारे साहिर हे एक बेफिकीर व्यक्तीमत्व होते.
साहिर लुधियानवी - लुधियाना हे त्यांचे जन्मगाव! अब्दुल हयी हे त्यांचे मूळ नांव! लुधियानावर त्यांचे अतोनात प्रेम होते, मात्र या गावात त्यांची फारशी कदर केली गेली नाही. मात्र नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिरने अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!
साहिर यांच्या काव्यापैकी काही मला आवडलेल्या ओळी आपल्या आस्वादासाठी!
================================================
भारत पाकिस्तानमधील युद्धाबाबत रचलेली कविता -
खून अपना हो या पराया हो
नस्ले-आदम का खून है आखिर
जंग मशरिक मे हो कि मगरिब मे (मशरिक = पुर्व, मगरिब = पश्चिम)
अम्ने-आलम का खून है आखिर (अम्ने-आलम = विश्व शान्ती)
बम घरोंपर गिरे के सरहदपर
रूहे-तामीर जख्म खाती है (रूहे-तामीर = निर्मीतीचा आत्मा)
खेत अपने जले कि औरोंके
जस्ति फाकोंसे तिलमिलाती है (जस्ति - जीस्त = जीवन)
इस लिये ए शरीफ इन्सानो
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभीके आंगनमे
शम्मअ जलती रहे तो बेहतर है
============================================
२६ जानेवारी या दिवसाबाबत रचलेली कविता -
आओ कि आज गौर करे इस सवाल पर
देखे थे हमने जो वो हसी ख्वाब क्या हुवे
दौलत बढी तो मुल्कमे इफ्लास क्यों बढा? (इल्फास = गरीबी)
खुशहालिए-आवाम के असबाब क्या हुवे? (खुशहालिए-आवाम = लोक संपन्न झाले, असबाब = कारणे)
(म्हणजे 'लोक इतके संपन्न कसे काय झाले? नक्कीच कोणतेतरी लोक गरीबीच्या खाईत ढकलले गेल्यामुळे असणार)
जो अपने साथ साथ चले कू-ए-दार तक कू-ए-दार - फाशीची कोठडी)
वो दोस्त वो रफीक वो अहबाब क्या हुवे ( रफीक - मित्र, अहबाब = साथीदार)
क्या मोल लग रहा है शहीदोंके खून का
मरते थे जिनपे हम वो सजायाब क्या हुवे? (सजायाब = शिक्षा झालेले)
बेकस बरहनगीको कफनतक नही नसीब (बरहनगी - नग्नता, नग्न प्रेताला कफनही मिळत नाही आहे)
वो वादा-हाए-अतलसो कमख्वाब क्या हुवे (महागडी वस्त्रे पुरवण्याची आश्वासने)
जमहूरियत-नवाज, बशर-दोस्त, अम्न ख्वाह
खुदको जो खुद दिये थे वो अल्काब क्या हुवे
(जमहुरियत = लोकशाही, बशर-दोस्त = मानवतावादी, अम्नख्वाह = शांतताप्रिय, अल्काब = पदव्या)
ही वरील द्विपदी सुंदर आहे.
स्वतःलाच स्वतः दिलेल्या या पदव्या, जसे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे, मानवतावादी, शांतताप्रिय, या पदव्यांचे काय झाले??
मुजरिम हूं मै अगर तो गुनहगार तुमभी हो
ए रहबराने-कौन खताकार तुम भी हो (रहबराने-कौम = नेत्यांनो, खताकार = चुकीचे)
==============================================
जश्ने-गालिब
इक्कीस बरस गुजरे आजादीए-कामिल को (स्वातंत्र्याला)
तब जाके कही हमको गालिबका खयाल आया
तुर्बत है कहा उसकी, मस्कन था कहा उसका (तुर्बत = कबर, मस्कन = निवास)
अब अपने सुखन-परवर जहनोंमे सवाल आया (कविताप्रेमी मनांमध्ये)
सौ सालसे जो तुर्बत चादरको तरसती थी (ज्या कबरीवर चादर नव्हती)
अब उसके अकीदतपे फुलोंकी नुमायश है (श्रद्धेच्या फुलांच्या माळा)
उर्दू के तअल्लुकसे कुछ भेद नही खुलता (उर्दू भाषेचा तर काही संबंध दिसत नाही.. मग....)
ये जश्न, ये हंगामा, खिदमत है कि साजिश है? (हा सोहळा एखादी वाईट योजना तर नाही?)
जिन शरओंमे गुंजी थी गालिब की नवा बरसो (नवा = आवाज)
उन शहरोमे अब उर्दू बेनामोनिशां ठहरी (उर्दूचे अस्तित्व संपले)
आजादिए-कामिल का ऐलान हुवा जिस दिन (स्वातंत्र्याची घोषणा)
मातूब जबां ठहरी, गद्दार जबां ठहरी (मातूब = शापीत, गद्दार = फितुरांची, अप्रामाणिकांची)
जिस अहदे सियासतने ये जिंदा जबां कुचली (अहदे सियासत = राजकीय युग, जबां = भाषा)
उस अहदे सियासत को मरहूमोंका क्या गम है? (मरहूम = मृत)
गालिब जिसे कहते है, उर्दूही का शायर था
उर्दूपे सितम ढाकर गालिबपे करम क्यों है? (भाषेला काहीच महत्व नाही, फक्त गालिबलाच महत्व??)
ये जश्न ये हंगामे दिलचस्प खिलौने है (हे सोहळे म्हणजे खेळणी आहेत)
कुछ लोगोंकी कोशिश है, कुछ लोग बदल जाये (काहींच्या मते काहींना 'बहकवू शकणारी')
जो वादाए-फर्दापर अब टल नही सकते है (आश्वासनांवर तर आता जनता शांत होत नाही)
मुमकिन है कुछ अर्सा इस जश्नपे टल जाये (या सोहळ्यातच तिला रमवा थोडा वेळ)
ये जश्न मुबारक हो, पर ये भी सदाकत है (सदाकत = सत्य)
हम लोग हकीकतके अहसाससे आरी है (सत्याच्या जाणीवेमुळे शरमलेले)
गांधी हो कि गालिब हो, इन्साफ की नजरो में
हम दोनो के कातिल है, दोनोंके पुजारी है
=======================================
गझलचे काही शेर
मै जिंदा हू ये मुश्तहर कीजिये (मुश्तहर - जाहिरात)
मेरे कातिलोंको खबर कीजिये
जमी सख्त है आस्मां दूर है (जगात अन्याय आहे, स्वर्ग फारच दूर आहे)
बसर हो सके तो बसर कीजिये (जगता आलं तर जगा)
सितमके बहुतसे है रद्दे-अमल
जरूरी नही चष्म तर कीजिये
(म्हणजे अत्याचारांना कशी प्रतिक्रिया द्यायची याचे अनेक प्रकार आहेत, दर वेळेस डोळ्यात पाणी आणलं पाहिजे असच काही नाही)
देखा है जिंदगीको कुछ इतने करीबसे
चेहरे तमाम लगने लगे है अजीबसे
(या शेरात 'चेहरे' हा शब्द जसा उच्चाराप्रमाणे मात्रांमध्ये बसलेला दिसत आहे तसा आपण मराठीत घेत नाही. या आघाडीवरच उर्दूत अनेक शेर सहज सोपे होऊन जातात.)
इस तरहा जिंदगीने दिया है हमारा साथ
जैसे कोई निबाह रहा हो रकीबसे (रकीब - शत्रू, प्रेमातील प्रतिस्पर्धी जो त्याच प्रेयसीवर भाळलेला असतो)
=========================================
परछाईयाँ -
जवान रात के सीने पे दूधिया आँचल
मचल रहा है किसी ख्वाबे-मरमरी की तरह
हसीन फूल हसी पत्तियाँ हसी शाखे
लचक रही है किसी जिस्मे नाजनी की तरह
फिजा मे धुल से गये है उफक के नर्म खुतूत (क्षितीजाच्या रेखा)
जमी हसीन है ख्वाबो की सरजमी की तरह
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है (तसव्वुरात - कल्पना)
कभी गुमान की सूरत, कभी यकीं की तरह (गुमान - घमेंड)
तुम आ रही हो जमाने की आंखसे बचकर
नजर झुकाये हुवे और बदन चुराये हुवे
खुद अपने कदमो की आहटसे झेंपती, डरती
खुद अपने साये की जुंबिश से खौफ खाये हुवे (जुंबिश - हालचाल)
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है
रवाँ है छोटीसी कश्ती हवाओं के रुखपर
नदी के साजपे मल्लाह गीत गाता है
तुम्हारा जिस्म हर इक लहर के झकोले से
मेरी खुली हुई बाहोंमे झूल जाता है
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है
=====================================
साहिर लुधियानवी (१९२१ - १९८०) एका रात्री हृदयविकाराच्या तीव्र आघाताने परलोकवासी झाले.
मै पल दो पल का शायर हूं
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
असे म्हणणारे साहिर खरे तर 'पल दो पल' च्या सीमेतून बाहेर येऊन अमर झालेही!
मात्र तरीही... त्यांच्या जीवनबद्दल त्यांचे स्वतःचे म्हणणे त्यांच्याच शब्दात त्यांनी एका ओळीत लिहिलेले आहे..
ती ओळ लिहून 'सुखनवर बहुत अच्छे' चा हा दुसरा भाग संपवतो.
'ख्वाबों के आसरे पे कटी है तमाम उम्र'
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
===========================================
साहीर माय
साहीर माय फेव्हरेट!
बेफिकीरराव आपले आभार!
बेफिकीर, छान लेख माझ्या
बेफिकीर,
छान लेख माझ्या आवडत्या शायर बद्दल.
धन्यवाद.
त्यांचे प्यासा तील मला आवडलेले:
तंग आ चुके हैं कश्म-कश-ए-जिंदगी से हम
ठुकरा न दे जमाने को कहीं बेदिली से हम..
हम गमजदा हैं लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम..
धन्यवाद मयुरेशराव व मन
धन्यवाद मयुरेशराव व मन १८
-'बेफिकीर'!
अरे वा ! धन्यवाद.
अरे वा ! धन्यवाद.
अहाहा!! मस्तच भूषणजी...एक नवा
अहाहा!!
मस्तच भूषणजी...एक नवा खजिनाच उघडलाय तुम्ही रसिकांसाठी...धन्यवाद!!!
साहीरने शकील च्या
इक शहेनशाह ने बनवाके हंसी ताजमहल
सारी दुनिया को मुहोब्बत की निशानी दी है.... ह्यावर,
इक शहेनशाह ने बनवाके हंसी ताजमहल
हम गरीबोंकी मुहोब्बत का उडाया है मजाक......असे लिहीले आहे..फारच भन्नाट माणूस!!!
बेफिकीर, मस्त लेख, अगदी छान
बेफिकीर,
मस्त लेख, अगदी छान जमुन आला आहे आणि त्यातही माझ्या आवडत्या 'सुखनवरा' बद्द्ल असल्याने अजुनच आवडला. साहीरशी माझी पहिली ओळख प्यासाच्या 'जाने वो कैसे' मुळे झाली आणि हा शायर अगदी आवडुनच गेला.
<<सितमके बहुतसे है रद्दे-अमल, जरूरी नही चष्म तर कीजिये>> हे तर खासच
एका सुंदर लेखासाठी अभिनंदन आणि धन्यवाद.
अमित अरुण पेठे
आह्हा.. सुंदर लेख पुन्हा
आह्हा.. सुंदर लेख पुन्हा एकदा..
साहिर जींची 'संसार से भागे फिरते हो'., मन तू काहे न धीर धरे., तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा..,
ये इश्क़ इश्क़ है ,ना तो कारवाँ की तलाश है... ही आणी इतर सर्व गाणी विस्मरणाच्या पडद्याआड कद्धीच जाऊ शकणारी नाहीत
धन्यवाद बेफिकिर जी
रच्याकने..२५ वर्षांपूर्वी साहिर चा बंगला( वर्सोवा) आमच्या बिल्डिंगला चिकटून उभा होता तेंव्हा होळीच्या निमित्ताने त्यांच्याकडे जाण्याचं धाडस केलं होतं.. पण त्यांची प्रकृती पाहता जास्त काही बोलता आलं नव्हतं त्यांच्याशी
ओह, तर त्या तुम्ही
ओह, तर त्या तुम्ही होतात.
कारण साहिरबाबत असे म्हंटले जाते की त्याची एक प्रेयसी होती (ते दिवा का काय ते घ्या बर का? पण ही कहाणी खरी आहे)
तर त्या प्रेयसीच्या वडिलांनी साहिरला तो गरीब असल्याने हाकलून दिले होते. म्हणून साहिरने श्रीमंत झाल्यावर त्यांच्या घरासमोर मोठे घर बांधले आणि मग ते गीत लिहीले..
तेरे घर के सामने .. इक बुत बनाउंगा... तेरे घर के सामने..
(पुन्हा गंमत म्हणून घ्या, पण स्टोरी खरी आहे, मात्र ती लुधियानात झालेली असावी.)
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
हजारोंनी घेतले मग
मग आत्तपर्यन्त माझं नांव.. गोंडस म्हातार्यांमधे आलं अस्तं कि वो
व्वा... साहिर... My fav...
व्वा... साहिर...
My fav... वो अफसाना जिसे अन्जाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा लिहिणारा साहिर... धन्यवाद बेफिकिरजी.. पण लिहाल तेवढ कमीच वाटत.. अजुन वाचावस वाटत...
अहल्-ए-दिल और भी है अहल्-ए-वफा और भी है
एक हम ही नही दुनियासे खफा और भी है...
-साहिर..
भूषणजी.. पुनश्च धन्यवाद या
भूषणजी.. पुनश्च धन्यवाद या लेखाबद्दल.....
कभी कभीतील त्यांच्या या ओळी पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालतात..
कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियाँ चुननेवाल्रे
मुझ से बेहतर कहने वाले,तुमसे बेहतर सुनने वाले
कल कोई मुझ को याद करे, क्युं कोई मुझ को याद करे
मसरुफ जमाना मेरे लिञे,क्युं वक्त अपना बर्बाद करे......?
मैं पल दो पल का शायर हूं...............
फक्त रसग्रहणासाठी म्हणुन...
फक्त रसग्रहणासाठी म्हणुन... या गाण्याशिवाय मनातला साहिर पुर्ण होत नाही..
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
कि जिंदगी तेरे जुल्फ़ों की नर्म छाओं में
गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी
ये रंज-ओ-गम की स्याही जो दिल पे छाई है
ये तिरागी जो मेरी जीस्त का मुकद्दर है
तेरी नजर की शुआँओं मे खो भी सकती थी
अजब न था कि मै ये बेगाना-ए-आलम हो कर
तेरे जमाल की रानाइयों में खो रहता
तेरा गुद्दाज बदन , तेरी नीमबाज आँखे
इन्ही हसीन फ़जाओं मे मै हो रहता
पुकारती मुझे जब तलखियाँ जमाने की
तेरे लबो से हलावत के घुंट पी लेता
हयात चीखती फ़िरती बरेहना-सर और मै
घनेरी जुल्फ़ों की छाओं मे छुप के जी लेता
मगर ये हो न सका
मगर ये हो न सका और अब ये आलम है
कि तू नही, तेरा गम, तेरी जुस्तुजू भी नही
गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे
इसे किसी सहारे की आरजू भी नही
जमाने भर के दुखों को लगा चुका हूँ गले
गुजर रहा हूँ कुछ अनजानी रहगुजारों से
मुहीब सोये मेरी सिमट भरते आते है
हयात-ओ-मौत के पर-हाल खार-जारों से
न कोई जदा , न मंजील, न रोशनी का सुराग
भटक रही है खयालों मे जिंदगी मेरी
इन्ही खयालों मे रह जाऊँगा कभी खो कर
मै जानता हूँ मेरे हम-नफ़स, मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
सुंदर लेख! धन्यवाद.
सुंदर लेख! धन्यवाद.
अतिशय सुंदर लेख. धन्यवाद
अतिशय सुंदर लेख. धन्यवाद बेफिकीरजी.
लेखाबद्दल धन्यवाद. अमृता
लेखाबद्दल धन्यवाद.
अमृता प्रीतमचे "रसिदी टिकीट" वाचतांना साहिर आणि त्यांच्या प्रेमाबद्दल वाचले होते, पण ते साहिर म्हणजेच साहिर लुधियानवी हे माहित नव्हते.
रूनी, उमा त्रिलोक ने लिहिलेलं
रूनी, उमा त्रिलोक ने लिहिलेलं ' अमृता-इमरोझ-अ लव स्टोरी' वाच.. साहिर बद्दल तुला अजूनही काही माहिती मिळेल.
ओक्के वर्षू, भविष्यात पुस्तक
ओक्के वर्षू, भविष्यात पुस्तक मिळवून वाचेन.
लेख आवडला. साहीरचे शब्द मला
लेख आवडला.
साहीरचे शब्द मला नेहमीच थेट, अचूक निशाणा साधणार्या बंदुकीच्या गोळीसारखे वाटत आले आहेत, तिथे उगाच शब्दांचे बावळट फाफटपसारे नव्हते, जे काही असायचे ते एकदम थेट ('वो बिबी भी है, बहेन भी है माँ भी', 'जिस कोख़ से इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया' वगैरे). प्रेमाच्या विचिध छटा दर्शवणारी गीते व नज्म त्याने लिहीलेच, पण त्याचबरोबर त्याने अगदी विलक्षण असोशीने हाताळलेले दोन थीम्स म्हणजे आईची मुलाविषयी माया ('तू मेरे साथ रहेगा, मुन्ने', 'तू मेरे प्यार क फूल है, या वो मेरी भूल है', 'तेरे बचपन को जवानी की दुवा देती हूं') व स्त्रीजीवनाची पुरुषप्रधान संस्कृतिने केलेली परवड ('औरत', 'चकले'). त्याचे अजून एक मला जाणवलेले वैशिष्ट्य 'चित्रलेखा' ह्या हिंदू संस्कृतिची पाश्वभूमि असलेल्या चित्रपटासाठी त्याने जी अजरामर गीते लिहीली ती संपूर्ण शुद्ध हिंदीतील होती, त्यात उर्दूचा लवलेशही नाही!
जाता जाता:
'तेरे घर के सामने' हसरतचे आहे, साहिरचे नव्हे.
साहिरसाऱख्या जगावेगळ्या, कलंदर कलाकाराच्या खर्याखोट्या कथा आपणा सर्वसामान्यास नेहमीच भुरळ घालणार्या असतात. त्यातील खरेखोटे काय व किती, तसेच (जे काही ऐकले/वाचले आहे ते खरे मानले तरी) त्यात नेमके शहाणपण काय होते हे प्रश्न आपले आपण स्वत:स विचारावेत. लेखात साहिरला कॉलेजातून का काढण्यात आले त्याविषयी काही माहिती आहे. मी ह्याहून अजून वेगळे (व अजून सुरम्य, आपल्याला 'मोहून टाकणारे' असे काहीसे) वाचले आहे. ते असे: साहिर एका मुलीच्या प्रेमत पडला. लखनौच्या नबाबी व खानदानी संस्कृतित वाढलेल्या त्या मुलीला हे पसंत नव्हते. तिचे पालक कॉलेजात साहिरची तक्रार करण्यास आले, तेव्हा प्राचार्यांनी साहिरला त्यांच्या व त्या मुलीच्या समोर त्याला तंबी दिली - पुन्हा तिच्या मागे लागलास, तर याद राख, तुला रस्टिकेट केले जाईल. तेव्हा (म्हणे) साहिरने तेथल्या तेथे त्या मुलीस उद्देशून म्हटले 'फिर ना कीजिये मेरी गुस्ताख़ निगाही का गिला, देखिये आपने फिर प्यार से देखा मुझ को!' पुढे काय झाले हे सांगायला नकोच!
'लताबाईंपेक्षा एक रुपया जास्त मानधनात मिळाला पाहिजे ह्या स्टोरीतील खरेखोटेपणा माहिती नाही. पण साहिरची कारकीर्द शेवटी संपुष्टात आली, लताबाईंची त्यानंतर अनेक वर्षे इतमानाने चालू राहिली हे निर्विवाद आहे!
'प्यासा'च्या यशानंतर साहिर निर्मात्यांकडे मागणी करू लागला की तत्कालिन प्रथेनुसार गीतकाराने संगीतकाराच्या 'सिटींग रूम'मधे गाणे बनवण्यास न जाता, संगीतकाराने त्याच्याकडे त्यांचे 'बाजे' घेऊन येत जावे. ह्या त्याच्या मागणीमुळे एस. डी. शी त्याची फारकत झाली. 'नया दौर नंतर ओ. पी. व त्याचेही काहीतरी बिनसले. त्यावेळच्या इतर ए-ग्रेड संगीतकारांचे स्वतःचे गीतकार होते तेव्हा त्यांनी साहिरबरोबर काम करण्याचा एरव्हीच प्रश्न नव्हता, व आलाच असता तर साहिरच्या ह्या मागणीमुळे त्याच्या बरोबर त्यांनी काम केले नसते. ही मागणी त्याचा उद्दामपणा दर्शवते खरी, पण ती अत्यंत इंप्रॅक्टिकल होती. ह्यानंतर साहिरचे कार्य एन. दत्ता, रवि, चित्रगुप्त ह्यांसारख्या गुणी पण कमर्शियल दृष्ट्या दुय्यम समजल्या गेलेल्य संगीतकारांबरोबर मर्यादित राहिले. ह्याचा त्याला आर्थिक फटका बसला का, व तो तसा असेल तर त्याचा त्याच्यावर काय परिणाम झाला ह्याविषयी काही माझ्यातरी वाचनात आलेले नाही. साहिर तडजोड करणारा नव्हता म्हटले तर तसे अगदी खरे नव्हे,-- निदान त्याच्या कारकीर्दीच्या सुरूवतीस तरी त्याने एक मोठ्ठी तडजोड केल्याची नोंद आहे. फाळणीनंतर तो पाकिस्तानात गेला. पण तिथे तो डाव्य्या विचारसरणीचा असल्यावरून त्याचे जीवन तिथे फारसे सुकर झाले नाही. नंतर तो भारतात परतला.
असे सर्व असले तरी व्यक्तिशः मला त्याच्या गीतांतील तेजाब अत्यंत प्यारा आहे! (हिंदी चित्रपटगीतकारांत मी त्याचा क्रम सर्वात वर लावतो, त्यानंतर शैलेंद्र व मग कैफी आजमी).
सर्वांचा आभारी
सर्वांचा आभारी आहे.
-'बेफिकीर'!
सुंदर लेख! गझला सर्व वाचल्या
सुंदर लेख! गझला सर्व वाचल्या नाहीत अजून, पुन्हा वाचेन. काही शब्दांचे अर्थ तेथेच दिल्याबद्दल धन्यवाद!
साहिर माझाही आवडता आहे. त्याच्याकडे हिन्दी व उर्दू (आणि खालच्या उदाहरणासारख्या लाईट गाण्यात रोजच्या वापरातील इंग्रजी सुद्धा) शब्दसंपदा अफाट असावी आणि गाण्यात/यमकात चपखल बसणारे अर्थपूर्ण शब्द योग्य वेळी त्याला बरोबर सुचत असावेत अशी त्याची गाणी ऐकून वाटते.
नौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक
अपने आगे सभी झुके है, क्या राजा क्या सैनिक
मजेदार गाणी सुद्धा टुकार न करता त्यात अर्थपूर्ण विनोदी वाक्ये लिहीता येतात आणि त्यातही चपखल यमक साधता येते हे कौशल्य जबरदस्त आहे. तसेच एका गाण्यात एकसारखे यमक असलेली बरीच वाक्ये लिहीताना सुद्धा एकूण लेव्हल सुटत नाही साहिरची - कभी कभी मधले "तेरा फूलों जैसा रंग" मधली ती "समझ हर तोहमत को ईनाम..." वगैरे वाक्ये किंवा द बर्निंग ट्रेन मधल्या कव्वालीतील शेवटच्या काही ओळी "..हर खुशी कुछ देर की मेहमान है, पूरा करले दिलमे जो अरमान है..." वगैरे.
तो वरचा तेरे घरके सामने चा जो उल्लेख आहे ते गाणे आणखी वेगळे कोणते आहे का? नाहीतर वरती प्रदीप०७०५ ने लिहील्याप्रमाणे त्या चित्रपटात हसरत जयपुरी ची गाणी आहेत (त्याची एस डी बरोबर क्वचितच असल्याने ते कॉम्बिनेशन लक्षात राहिले आहे).
अरे वा! साहीर माझाही आवडता.
अरे वा! साहीर माझाही आवडता. चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो हे माझे फेवरीट गाणे.
सुरेख लेखन आणि सुरेख
सुरेख लेखन आणि सुरेख विषय.
एकच आरोप तुमच्यावर आणि लेखनावर..... माझ्या ह्रदयावरची खपली का म्हणून काढली?
एकदाच प्यासा पाहीला आणि खूप त्रास झाला मनाला तेव्हापासून मनाला खूप जपतो आणि जाणीवपूर्वक ह्रदयाची पेटी बंद करून या व्यवहारी जगात मन मारून जगतो. स्वतःला खूप कर्म्शियल केलंय... तेही जाणीवपूर्वक. कधी काळी तुमच्यासारखे लेखक या व्यवहारी जगातून मनाला मुक्त करतात आणि खरंच त्रास होतो ... पण हा त्रास देखील हवाहवासा वाटतो. शपथ.....
पुन्हा एकदा आभार. लेखन आवडलं.
अतिशय सुंदर लेख.
अतिशय सुंदर लेख.
उगाच शब्दांचे बावळट फाफटपसारे
उगाच शब्दांचे बावळट फाफटपसारे नव्हते, जे काही असायचे ते एकदम थेट >> वा !
मस्त पोस्ट प्रदीप.
मेरा कुछ सामान- पूर्ण पंक्तींसाठी खूप खूप धन्यवाद. मी बरेच शब्द चुकीचे ऐकत होते
बेफिकिर कृपया त्या शब्दांचे अर्थ लिहीणार का?
ठीक आहे, लिहितो रैना, आपला
ठीक आहे, लिहितो रैना, आपला प्रतिसाद आत्ता पाहिला. काही वेळात माझा प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो.
एक एक कडव्याचा समवृत्तीय
एक एक कडव्याचा समवृत्तीय अनुवाद लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. गोड मानून घ्यावात रैना!
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
कि जिंदगी तेरे जुल्फ़ों की नर्म छाओं में
गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी
ये रंज-ओ-गम की स्याही जो दिल पे छाई है
ये तिरागी जो मेरी जीस्त का मुकद्दर है
तेरी नजर की शुआँओं मे खो भी सकती थी
(कधी कधी मनात हा विचारही येतो
कि कुंतलातल्या मधूर सावलीत तुझ्या
व्यतीत होतिच तर हिरवीगार होती ती
हि मनावर जि सावली व्यथा नि दु:खांची
नि हा अंधार जो नशीब सर्व जन्माचे
तुझ्याच नेत्रप्रकाशात हरवली असती)
भूषण व प्रदीप, अशा इतर
भूषण व प्रदीप,
अशा इतर शब्दप्रभूंबाबत आपण विस्ताराने लिहावे ही विनंती.
हा लेख वाचून समाधान नाही झालं (ये दिल मांगे मोअर..)
बेफिकीर
बडी तमन्ना से आए थे तेरा मयखाना देखने
गुस्ताखी माफ! बस एकही जाम पिला दिया?
अजब न था कि मै ये
अजब न था कि मै ये बेगाना-ए-आलम हो कर
तेरे जमाल की रानाइयों में खो रहता
तेरा गुद्दाज बदन , तेरी नीमबाज आँखे
इन्ही हसीन फ़जाओं मे मै हो रहता
विशेष काय जगाहून मी अलिप्तच तर?
तुझ्या रुपातल्या मधूरतेत हारवलो
तुझे शरीर घाटदार, नयन अर्धखुले
अशा वसंत ऋतूच्यात मीच हारवलो
पुकारती मुझे जब तलखियाँ जमाने की
तेरे लबो से हलावत के घुंट पी लेता
हयात चीखती फ़िरती बरेहना-सर और मै
घनेरी जुल्फ़ों की छाओं मे छुप के जी लेता
पुकारताच कटूतेत या जमान्याने
मधूर घोट मुखाचे तुझ्याच प्राशावे
हयात नग्नशिराने विलाप करताना
लपून सावलीत कुंतलांतल्या जावे
मगर ये हो न सका मगर ये हो न
मगर ये हो न सका
मगर ये हो न सका और अब ये आलम है
कि तू नही, तेरा गम, तेरी जुस्तुजू भी नही
गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे
इसे किसी सहारे की आरजू भी नही
न जाहलेच असे...
न जाहलेच असे आणि ही स्थिती आता
न तू, न तुझे दु:ख, वा न शोध तुझा
असे व्यतीत हे आयुष्य होतसे आता
जणू कुणीच सहारा न जीवनास हवा
जमाने भर के दुखों को लगा चुका हूँ गले
गुजर रहा हूँ कुछ अनजानी रहगुजारों से
मुहीब सोये मेरी सिमट भरते आते है
हयात-ओ-मौत के पर-हाल खार-जारों से
मि दु:ख शक्य तेवढी सहन करत आलो
अता नवीनच रस्ते, नवीन वाटा या
दिशा भरून भयानक विचार भवताली
हयात आणि मरण यात फक्त काटे हे
न कोई जदा , न मंजील, न रोशनी का सुराग
भटक रही है खयालों मे जिंदगी मेरी
इन्ही खयालों मे रह जाऊँगा कभी खो कर
मै जानता हूँ मेरे हम-नफ़स, मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
न लक्ष्य, ध्येय न कोठे दिशा प्रकाशाची
उगाच जन्म विचारात भटकतो माझा
प्रिये असून मला ज्ञात सर्व हे, तरिपण
कधी कधी मनात ह विचारही येतो
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
रैना, आपल्याला हवा असलेला
रैना,
आपल्याला हवा असलेला अनुवाद केला आहे. समवृत्तीय अनुवादाचा प्रयत्न केला आहे. घाईगडबडीत केल्याने काही त्रूटी असल्यास दिलगीरी!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
Pages