१ गाजर
१ छोटी सिमला मिरची
१ पोर्टेबेलो मश्रूम
४ तोफूचे तुकडे (२ इंच लांब, १ इंच रुंद, १/४ इंच जाडीचे)
२ टे. स्पू. किंवा थोडे जास्तच लांब पातळ चिरलेले आल्याचे तुकडे (Ginger julienne)
१ टे. स्पू. सोया सॉस
१/२ टी. स्पू. मध किंवा साखर
मीठ
१ टे. स्पू. तेल
गाजराचे साल काढून लांब, पातळ तुकडे करा. सिमला मिरचीचे, मश्रूमचे लांब तुकडे करा.
सोया सॉस, मध (किंवा साखर), चिमूटभर मीठ घालून चांगले हलवून एकजीव करून घ्या.
त्यात तोफूचे तुकडे दोन्ही बाजूने बुडवून घेउन किंचीत तेलावर नॉनस्टीक पॅनमधे शॅलो फ्राय करून घ्या (थोडक्यात, कॅरमलाईज्ड करून घ्या). शॅलो फ्राय करताना तोफूतल्या पाण्यामुळे तेल उडायची शक्यता आहे त्यामुळे झाकण ठेवा. थोडे मऊसर असतानाच बाहेर काढा. बाजूला ठेवा.
त्याच पॅनमधे थोडे तेल घेउन आलं घाला. गाजर, सिमला मिरची, मश्रूम घालून भराभर हलवून टॉस करत मिक्स करा. सोया सॉस-मधाचे मिश्रण घाला. चव बघून मीठ घाला. तोफू घालून परत एकदा नीट मिक्स करा. गरम गरम सर्व्ह करा.
मधामुळे किंचीत गोडसर चव येते. तशी आवडत नसल्यास मध/साखर घातले नाही तरी चालेल.
तोफू म्हणजे काय??
तोफू म्हणजे काय??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
इथे बघ भ्रमरा:
इथे बघ भ्रमरा: http://en.wikipedia.org/wiki/Tofu
थोडक्यात सोयाबीनच्या दुधाचे पनीर.
सोयाबीन्सच्या दुधापासून
सोयाबीन्सच्या दुधापासून बनवलेले पनीर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे! तोफू घरी बनवला का?
छान आहे! तोफू घरी बनवला का?
तोफू घरी बनवला का>>> नाही,
तोफू घरी बनवला का>>> नाही, इकडे तयार मिळतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोफू ऐवजी दुधाचे पनीर नाही
तोफू ऐवजी दुधाचे पनीर नाही चालणार का?? की चवीत फरक पडेल.
पनीर चिलीसारखी पाकृ आहे. सोया
पनीर चिलीसारखी पाकृ आहे. सोया सॉस + मधाची आयडिया आवडली.
तू पनीर वापरू शकतोस.
भ्रमा, पनीरपेक्षा तोफू जास्त हेल्दी आहे
आता इथे मुंबईत रेडीमेड तोफू मिळू लागलाय.
मस्तय कृती. मी वांग्याचे काप
मस्तय कृती. मी वांग्याचे काप वापरणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अस्सं होय तोफू म्हणजे
अस्सं होय तोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधाचे पनीर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण फिनलंडला असताना तोफू आईस्क्रीम खाल्ली आणि जबरदस्त आवडली. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला सोयाबीन, दूध आणि पनीर हे अज्जिबात आवडत नाही
आत्ता पाहते आहे ही कॄती.
आत्ता पाहते आहे ही कॄती. धन्यवाद अंजली
मस्तच लागेल असं वाटतंय. टोफू एक्स्ट्रॉ फर्म वापरायचं ना ?
अश्विनी, हो, तोफू extra firm
अश्विनी, हो, तोफू extra firm च वापरायचं.
मस्तच रेसिपी.आजाच केल.
मस्तच रेसिपी.आजाच केल. धन्स!
फोटो पण काढला आहे पण अप्लोड होत नहिये