फिश केक / श्रिम्प केक

Submitted by मेधा on 11 January, 2011 - 14:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन कप साफ केलेली कोलंबी किंवा दोन फिले तिलापियाचे
पातीचा कांदा - बारीक चिरुन - अर्धी वाटी
फरसबी किंवा चवळीच्या शेंगा अगदी बारीक चिरुन अर्धी वाटी
कोथिंबीर बारीक चिरुन
हिरवी मिरची बारीक चिरुन १ टी स्पून

१ टे स्पून फिश सॉस,
१ टे स्पून कॉर्न स्टार्च
१ टे स्पून रेड करी पेस्ट ( नसल्यास सांबाल सॉस, श्रीरचा सॉस, किंवा तत्सम हॉट सॉस )
१ टे स्पून चिनी सेसमी ऑइल .
१ अंडं

क्रमवार पाककृती: 

श्रिम्प किंवा फिश फुड प्रोसेसरमधून पल्स करून बारीक करुन घ्यावेत. फार वेळ फु प्रो फिरवू नये.
त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, शेंगा, फिश सॉस, हॉट सॉस / करी पेस्ट, कॉर्न स्टार्च, तेल, व फेटलेले अंडे घालून नीट मिसळून घ्यावे.
नॉन स्टिक तव्यावर थोडे सढळ हाताने तेल घालावे. हाताला पाणी लावून फिश मिश्रणाचे साधारण इंच -दीड इंचाचे चपटे गोलसर फिश केक्स घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत. सर्व्ह करताना दोन मिनिटे पेपर टावेल वर टाकून मग सर्व्ह करावेत.

पाव वाटी फिश सॉस,पाव वाटी राइस व्हिनेगर यात बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून ठेवाव्यात व हे सॉस फिश केक बरोबर सर्व्ह करावे .

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून
अधिक टिपा: 

तिखटाचे प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.

फिश सॉस अन करी पेस्ट दोन्हीमधे भरपूर मीठ असते त्यामुळे मी वेगळं मीठ घालत नाही.

माहितीचा स्रोत: 
थाय रेस्टॉ मधे खाऊन मग स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर एशियन दुकानातून आणते - ब्रॅंडकडे कधी लक्ष दिलं नाही. घरी गेल्यावर बघून सांगेन .

सोपी आहे रेसिपी एकदम. माझ्याघरी कोंदणाला जमते मस्त Happy

अरे वा, नुसती रेस्टांरटांतली डिश खावून त्यात नक्की जिन्नस काय व किती प्रमाणात घातले हे कळते?
स्वःताचे प्रयोग इतके पर्फेक्ट जमतात? जसे फिश सॉस किती,कॉर्न स्टार्च किती घातला वगैरे हि कळते तुम्हाला नुसते खावून? तुम्हाला खरेच कोंदणात बसवायला पाहिजे.:फिदी:

मिनोतीबाई येतीलच इतक्यात सांगायला कि हि रेसीपी 'अबक' ब्लॉग सारखीच आहे व देतीलच लिंक. Proud तेव्हा कोणाला क्रेडिट द्यायचे मग?

शूनूतै, एक सांगायचे राहिले तुमची ती गेल्या वेळची अवाकडो सॅलड रेसीपी मी देवाशप्पथ बर्‍याच ब्लॉगवर पाहिलेली.

मेधा, श्रिंप किंवा मासे अगदी बारीक चिरून/कापून घेतले तरी चालतील ना? फू. प्रो. मधे फिरवले तर 'मूशी' होतील ना?

अंजली, फार वेळ फिरवायचे नाहीत फु प्रो मधे , तसे केले तर मुशी होतील बहुतेक. अगदी बारीक चिरायचा उत्साह असेल तर करून पहा . नीट बारीक झाले नाहीतर बाईंडिंग होणार नाही अन तव्यावर टाकल्यावर तुकडे सेपरेट होतील असं वाटतंय.

शूनूतै,

मी कि नै परवा फिशकेक खालच्या रेसीपीप्रमाणे बनवले व तुमची एकदम आठवण झाली कारण तुमचा वरचा प्रयोग पण एकदम सारखाच बरका? काय निव्वळ योगायोग! तुम्हाला वस्तू चाखून एवढे काय काय जिन्नस आहेत व प्रमाण नीट कळतात, मानले बुवा बाकी.तुम्ही खर्‍या सुगरण. Wink

हि पण बघा ,
http://www.hub-uk.com/foodpages35/1713.htm

तुमची 'अ‍ॅडिशन' ससेमी तेल आहे . बाकी तुमचे व माझे विचार जुळतात हो एका बाबतीत, ते रेसीपी ब्लॉगर वा साईटला श्रेय देण्याबाबत व आपल्या नावावर रेसीपी खपवू नये म्हणून.:)