Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36
मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोनु णिगम
सोनु णिगम मस्तच बोलले आहेत. आदर अजुन वाढला त्यांच्याबद्द्ल.
>>> कन्दाहार
>>> कन्दाहार प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा अतिरेक्याना सोडेन असे जसवन्त सिन्गानी जाहीर केले आहे.
ही पुडी केतकरांनी काँग्रेसचे मुखपत्र "सोनियासत्ता" या "पाक्षिकात" सोडलेली असावी. या "पाक्षिकात" अशा बर्याच थापा मारलेल्या असतात.
जसवंत सिंग
जसवंत सिंग यांनी NDTVला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. त्यांच्या संकेतस्थळावर ही मुलाखत बघायला मिळेल. शिवाय सर्व वृत्तपत्रांत ही बातमी आहे.
आपल्या
आपल्या विचारसरणीला अडचणीत आणणार्या सार्या बातम्या
पुड्या आहेत असे काही जणाना वाटते.
सोनू निगम
सोनू निगम अगदी मना पासून बोलला आहे. (धन्यवाद् दीपांजलि लिंक दिल्याबद्दल)
... प्रश्न विचारनारी ने जरा गृहपाठ कमी केला असे वाटते !
हॅट्स ऑफ
हॅट्स ऑफ टू सोनू निगम...
कोणीतरी सेलेब्रिटी मनापासून 'भारतीय' आहे...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
१६३
१६३ निरपराध प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील आणि ३ दहशतवाद्यांना सोडणे हा एकमेव उपाय शिल्लक असेल तर १६३ लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ३ दहशतवाद्यांना सोडणे हा अयोग्य पर्याय नाही.
एकाही नागरिकाचे प्राण संकटात नसताना व ४० दहशतवाद्यांना सैन्याने पूर्णपणे घेरलेले असताना, त्यांना हलवा-पुरी व चिकन बिर्याणीची मेजवानी देऊन सुखरूप पाकिस्तानला जाऊन देणे या अधम आणि बेशरम कृत्यापेक्षा १६३ लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ३ दहशतवाद्यांना सोडणे हे अपरिहार्य कृत्य योग्यच होते. (१९९३ मधले हजरत बाल प्रकरण केतकरांप्रमाणेच तुम्हालाही आठवत नसेल!).
हॉटेल
हॉटेल ट्रायडेंट पुन्हा सुरु झाले. अगदीच कौतुकाची गोष्ट आहे. अतिरेकी कारवाया करणार्यांना अजुन एक चपराक. हॉटेल व्यावसाय लवकर पुर्वव्रत सुरु करणे ही 'अनेक आघाड्यां पैकी एक आघाडी' होती, त्या आघाडी वर आपण विजय मिळवला आहे.
खरि
खरि कौतुकाचि गोष्ट जेव्हा पाकिस्तान वर हल्ला करुन ७१ प्रमाणे
त्याचे चार तुकडे करु ( सिधुदेश, वजिरिस्तान,फ्रंटियर प्रॉव्हिन्स हे स्वतंत्र करु) हि आहे.
नुसते हॉटेल उघडुन काय होणार
१६३
१६३ निरपराध प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील आणि ३ दहशतवाद्यांना सोडणे हा एकमेव उपाय शिल्लक असेल
---- हो पण त्या ३ पैकी एका मधे खुप मोठी क्षमता होती हे त्यावेळी देखील सोडतांना माहित होते... आजचे १६३ आणि पुढच्या दहा वर्षाचे १६,००० पैकी आपण १६००० गमावणे पसंत करु.
मला त्या (कंदाहार) घटने बद्दल जेव्हढी चिड येते, त्या पेक्षाही जास्त चिड आज २००८ साली 'त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास... पुन्हा सोडेन' म्हणणार्या माजी परराष्ट्रमंत्र्यांची येते, काय डोके ठिकाणावर आहे कां यांचे? पुन्हा कशाला (आणि कोणाला) आमंत्रण देत आहात? काय अवशक्ता होती का असली मुक्ता फळे उडवायची? चुक मान्य करण्यात कमी पणा कां वाटायला हवा?
>>> १६३
>>> १६३ निरपराध प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील आणि ३ दहशतवाद्यांना सोडणे हा एकमेव उपाय शिल्लक असेल
---- हो पण त्या ३ पैकी एका मधे खुप मोठी क्षमता होती हे त्यावेळी देखील सोडतांना माहित होते... आजचे १६३ आणि पुढच्या दहा वर्षाचे १६,००० पैकी आपण १६००० गमावणे पसंत करु.
तुमच्या मते ३ अतिरेक्यांना सोडण्याऐवजी दुसरे काय करायला हवे होते?
त्यावेळी
त्यावेळी विमानात अडकलेल्या प्रवाश्यान्च्या नातेवाइकानी इतका गोन्धळ घातला
होता की त्या तीन अतिरेक्याना सोडण्या शिवाय उपाय नव्हता हे एकवेळ मान्य
करता येइल. पण त्यानन्तर जसवन्त सिन्ग यानी राजीनामा देणे योग्य झाले असते.
किमान आता त्या कटू प्रसन्गाची आठवण न काढणे तरी.
हा प्रश्न
हा प्रश्न नुसताच ३ वि. १६३ असा नसून, यातून असे स्पष्ट दिसते की भारतीय हे अतिरेक्यांशी वाटाघाटी करतात. म्हणजे भारतीयांना कणा नाही! नुसत्याच भावना, अहिंसा! 'देव देश अन धर्मासाठी प्राण घेतले हाती' अशी सध्या कुणाचीच भूमिका नाही. जेंव्हा अतिरेक्यांनी विमान पळवून अमेरिकन अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे नेण्याचे प्रयत्न केले तेंव्हा अमेरिकन प्रवाशांनी अतिरेक्यांशी सामना केला, स्वतःचे प्राण गमावले. आता ते मरणारच होते असे म्हणून त्यांच्या देशप्रेमाची अवहेलना करू नका. त्यांनी निदान स्वतःचा बळी देऊन अतिरेक्यांना दाखवून दिले की आम्ही असे फुकटंफाट मरणार नाही!!
बरं, सध्या तर कुणि काही विमान अपहरण केले नाहीये ना? मग हे जसवंतसिंग असे का म्हणाले नाहीत की हा प्रश्न सध्या उद्भवला नाही तेंव्हा त्याच्यावर मी आत्ता काही बोलणार नाही! त्यांना सुचवायचे असेल की असे विमान पळवून न्या म्हणजे सगळे अतिरेकी सुटतील नि आम्ही गप्प बसू!
सुरक्षा दलात असलो तर मी आजपासून जसवंतसिंगावर कडक पाळत ठेवीन. कुणाशी काय बोलतो, कुठे जातो, त्याचीच पाकीस्तानला किंवा दहशतवाद्यांना आतून फूस आहे का, ह्याची कस्सून चौकशी करीन.
बाकी सगळेच नेते दाऊदचे गुलाम आहेत भारतात! तेंव्हा हे सगळे व्यर्थ आहे.
क्रांति, क्रांति, क्रांति! बाहेरचा (अगदी अमेरिकेचा सुद्धा) एकही पैसा राजकारणासाठी वापरणार नाही, वापरल्यास फाशी जाईन, अशी कुणि शपथ घेतील त्यांनाच निवडणूकीचे तिकीट द्यावे.
तुमच्या
तुमच्या मते ३ अतिरेक्यांना सोडण्याऐवजी दुसरे काय करायला हवे होते?
---- याच बीबी वर माझे मत वाहून गेलेल्या पानांमधे गेले आहे. अतिरेक्यांची मागणी मान्य करायची नव्हती, टोकाच्या प्रसंगी १६३ लोकांना गमावण्याची तयारी ठेवायची (माझे रक्ताचे लोक त्यात अडकले आहेत हे गृहीत धरुनच मी हे लिहितो आहे) होती. जर अतिरेक्यांनी काही बरे वाईट केले असते तर जलद गतीने (म्हणजे कमीत कमी वेळात) या बाजुला अजगराला यमाच्या द्वारी पाठवायचे होते. 'भारत अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करत नाही' हे कृतीने दाखवायचे होते. आता त्या काळात आपण ती संधी गमावली, चुका सर्वच करतात पण मग आज २००८ साली का म्हणुन त्याचे लटके समर्थन? या असल्या वाक्यातून कोणाला आपण ईशारा देत आहोत?
बाकी सगळेच नेते दाऊदचे गुलाम आहेत भारतात!
--- झक्कीं यांच्या वरच्या पोस्टशी सहमत. दाऊद घातक आहेच, पण त्यापेक्षाही घातक हे असले आपले हे नेते आहेत, जे सगळ्याच पक्षात विपुल प्रमाणात आढळतात. राज्याचा ** मुख्यमंत्र्याला ताजला भेट देतेवेळी रामूची सोबत घ्यावी वाटते. नंतर त्यात काही चुक झाली नाही असेही वाटते (तुझा मित्र आहे तर त्याला घरी जेवायला बोलाव म्हणा, भेट देते वेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणुन गेला होता). किती निर्ढावलेले मन म्हणायचे? यांची बुद्धी कुठे गहाण पडली आहे समजत नाही. नंतर येणारा मुख्यमंत्र्याच्या बाबत 'मला नाही, मग तुलाही नको मिळायला, म्हणुन मग आपले एकनिष्ठ सेवक***' हे तत्व. कधी होणार ह्या वृतीची लोकं निवृत्त?
किमान आता
किमान आता त्या कटू प्रसन्गाची आठवण न काढणे तरी.
--- निव्वळ आठवण ? नाही! 'घटनेची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा सोडेल...' भाजपने यांना आता कायमचा नाराळ द्यावा... लोकांवर उपकार होतील.
उदय तुम्ही
उदय तुम्ही कॉन्ग्रेस मध्ये प्रवेश तर नाही केला ना? की लोकसत्तेत नोकरी धरली? की धर्मान्तर किंवा धर्मत्याग केला. ? की तुम्ही कुलकर्णी.चे डु. आय. डी आहात? जसवन्तने जे केले होते. त्याला ' स्ट्रॅटेजी' म्हणतात. त्या वेळच्या परिस्थितीत त्या शिवाय पर्याय नव्हता.त्यानी पुनरुच्चार केला त्याला ठामपणा म्हणतात. मुळात असं काही जसवन्त म्हणालेच नाहीत. ती पुडी आहे असंच इथल्या पंडितानी सुरुवात केली पण चिनूक्सच्या पोस्टने त्यांचे दात घशात गेले. निदान जसवन्त असं म्हणाला हे तरी मान्य करा! तो बरोबर की चूक हे नन्तर बघू हो.
बाकी सगळेच नेते दाऊदचे गुलाम आहेत भारतात! तेंव्हा हे सगळे व्यर्थ आहे.
तसं नाही झक्की, कॉन्ग्रेसचे सगळेच नेते दाऊदचे गुलाम आहेत असे म्हणायला हवे होते तुम्ही. सगळेच म्हटल्यावर अटलजी, अडवानीजी, प्रमोदजी, जसवन्तजी सगळेच येतील. तेव्हा जरा जबानको लगाम दो झकीसाहेब!
१६३ निरपराध प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील आणि ३ दहशतवाद्यांना सोडणे हा एकमेव उपाय शिल्लक असेल तर १६३ लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ३ दहशतवाद्यांना सोडणे हा अयोग्य पर्याय नाही.
काही लाजू नका माढेकरजी, भूमितीसारखी अप्रत्यक्ष सिद्धता द्यायची आवश्यकता नाही. सरल ३ दहशतवाद्याना सोडणे हा योग्य पर्याय आहे असे 'असेर्टीव्ह ' सेन्टेन्स लिहा ना! वळसे मारू नका.कारण ते तुमच्या लाडक्या नेत्यानी केले आहे ना.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
जसवंत सिंग
जसवंत सिंग नक्कीच स्वैर आणि बेताल वक्तव्य करत सुटला आहे.मागे वसुंधरा राजेंविरुध्दही तशीच आघाडी उघडली होती आणि स्वतःच्या पुस्तकाच्या वेळी तर कहरच केला होता.आताचे वक्तव्यही त्याला धरुनच आहे
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
असे म्हणता
असे म्हणता येईल का?
जसवन्तसिंह भाजपतले अंतुले आहेत

आणि नवाझ शरिफ पाकिस्तानातले अंतुले आहेत
अंतुले भारतातले नवाझ शरिफ आहेत

अंतुलेना पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे
नवाझ शरिफ याना भारतात हाकलून दिले पाहिजे.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
आय एस आय ने
आय एस आय ने डोक्याला हात मारला असेल आपण उगाचच भारताच्या वाटेला जातो आहोत तिकडे तर बरेच लोक सक्रिय आहेत. भारताला बाहेरच्या शत्रुची अवशक्ता नाही आहे.
भाजपा
भाजपा सरकारने २००० च्या कंदाहार प्रकरणी जे केले ते लाजिरवाणे पण अपरिहार्य होते. पण अतिरेक्यांना सोडावे लागले हा कलंक तथाकथित पोलादी नेतृत्वाने धुवून काढणे आवश्यक होते. अविनाश धर्माधिकार्यांच्या शब्दात सांगायचे तर हिशेब चुकता करायला हवा होता. मग ते रॉचे एजंट पाकमधे घुसवून त्या नीच अतिरेक्यांना व विमान पळवणार्यांना ठार करणे असो वा अन्य काही असो. ते करायला हवे होते आणि योग्य वेळी त्याला प्रसिध्दी द्यायला हवी होती. पण गांधीवादाच्या नशेत चूर असणार्या हाजपेयी व अन्य मंडळीना तसे काही करावेसे वाटले नाही. निव्वळ किळसवाणी, उबग आणणारी तीच तीच भाषणबाजी केली गेली. पुढे संसदेवर हल्ला झाल्यावरही तेच.
त्या दृष्टीने विचार केला तर पळपुट्या जसवंतसिहाचे वक्तव्य निन्द्य आहे. निव्वळ अतिरेक्यान्ना सोडणे हेच अभिप्रेत असेल तर भाजपाला त्याची लाज वाटली पाहिजे. नंतर आम्ही हिशेब चुकता केला नाही याची खंत असेल तर थोडी आशा आहे.
पण एकंदर रेकॉर्ड बघता भाजप तितकाच नालायक, निष्क्रिय आहे जितका काँग्रेस पक्ष.
हे
हे वाचा,
आणखी एक भारतीय..
http://www.facebook.com/topic.php?uid=8709249623&topic=5509
मुंबई
मुंबई हल्ल्यानंतर कडक कारवाई करु असे सरकारने नुसते आश्वासन दिले, राजकारणी लोकांनी आपल्या पोळ्या भाजुन घेतल्या, चेनलवाल्यांना नविन २ महीने पुरेल एवढे खाद्य मिळाले चघळायला, इथे आपण साधारण २० पाने गुणीले २५ पोस्ट अशी चर्चा केली. काही फरक पडला का? भारताच्या संसदेवर हल्ला केलेला प्राणी अजुन आपण फासावर लटकवु शकत नाही, कसाबला सुद्धा असेच टांगते ठेवतील हे लोक. त्याला माफीचा साक्षीदार पण करतील. जनता हे सर्व एखाद्या महीन्यात विसरुन जाईल व मुंबईकर परत कामाला लागतील. एवढा मोठठा हल्ला पचवुन परत मुंबईकर कसे ऊभे राहीले म्हणुन परत एकदा आपण त्यांचे कौतुक करु. मग काही दिवसांनी आणखी एक तुकडी येऊन हल्ला करेल व अमेरीका आपले सांत्वन करेल. परत एकदा आपण या किंवा अशाच षंढ सरकारला निवडुन आणु. दुष्टचक्र आहे हे सगळे.
26 नोव्हे. नंतर लगेच एक आठवड्यात ३ डीसें. ११ डीसें. ला असे लागोपाठ २ हल्ले अजुन झाले असते तर आणखी १००-२०० लोक मेले असते पण निदान या लोकांना जाग तरी आली असती असे वाटते. अर्थात तेव्हा तरी आली असती का ही शंका आहेच.
~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~
संजय दत्त
संजय दत्त लखनौ मध्ये उभा रहाणार आहे निवडणूकीला?
गुंड्,मवाली,देशद्रोही, नी अशिक्षीत लोक देशाचा कारभार सांभाळणार मग काय होणार देशाचे?
संजय दत्त
संजय दत्त का गुंड मवाली वगैरे आहे? त्याला शिक्षा झाली तेव्हा इथे बरेच रुदन झाले. बॉम्ब्स्फोटातल्या मुस्लिमांच्या पंक्तीला त्याला बसवतात म्हनजे काय हो? इथल्या काही महिलानीही भयंकर उसासे टाकले. मनोमन त्याही म्हणाल्या 'कह दो की ये झूठ है' हे झूठ आहे असे तो पहिल्यापासूनच म्हणत होता .पण न्यायमूर्तीना ते झूठ आहे असे वाटले नाही त्याने गुन्हा केला असला तरी तो हिन्दू आहे असेही इथे बजावण्यात आले. त्यामुळे मनुस्विनि,उद्या संजय दत्त नावाचा गुंड मवाली, देशद्रोही,आणि अशिक्षित निवडून आला तर त्या पापाला इथल्या काही मायबोलीकरांचा नैतिक पाठिम्बा असणारचाहे. त्यामुळे तुम्ही अरण्यरुदन करण्यात काही पॉइण्ट नाही
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
अहो ती दोन
अहो ती दोन वेगळी वाक्य आहेत. त्यात एक प्रश्ण आहे नी दुसरे statement आहे. दोन्ही तुमच्या मनाप्रमाणे रीलेट करून तुम्हाला लिहायचे तर लिवा.

पण जरा नीट एकदा वाचा बघू नी अरण्यरुदन कोण करतय? काहीही हां.
मराठीत
मराठीत statements ला काय म्हणतात?
झक्की आहेत का इथे?
statements -
statements - विधान, निवेदन, कथन
statement ला
statement ला मराठीत 'विधान' किंवा 'निवेदन' म्हणतात...
अतीरेकी
अतीरेकी हल्ल्यावरून गाडी रूळ बदलून शब्दार्थावर आली. आता खरा हा मायबोलीवरचा बाफ वाटला.
'कह दो की ये
'कह दो की ये झूठ है' >>
ते हिंदू असल्यामूळे वाचवा असे कोणी काही म्हणलेले आठवत नाही.
काही मायबोलीकरांचा नैतिक पाठिम्बा असणारचाहे >> कोण आहेत ते?
मग काय होणार देशाचे? >> आत्ता नविन काय आहे मग? कोकणातिल खास शिवी ह्या सर्वांना लागु पडते. ती तूला माहीत असेलच.
Pages