Submitted by कविन on 6 January, 2011 - 02:57
ऐक बाळा तुला सांगते एक कहाणी खरी
लाकडं तोडण्या लाकूडतोड्याची निघाली की स्वारी
लोखंडाच्या कुर्हाडीने तो झाड लागला तोडू
पाण्यात पडली कुर्हाड आणि आले त्यास रडू
ऐकून त्याचे रडणे बाहेर जलदेवी ती आली
झालं तरी काय अस्सं? त्याला ती म्हणाली
बोले लाकूडतोड्या, आता पोट कसे मी भरू?
पाण्यात पडली कुर्हाड, आता काम कसे मी करु?
प्रश्न त्याचा ऐकून देवी जलात त्या गेली
घेवूनी येते कुर्हाड वत्सा, हेची ती बोलली
येताना ती सुवर्णाची कुर्हाड घेवूनी आली
अता कसा वागतो बघुया, मनात ती वदली
म्हणे ही माझी कुर्हाड नाही, क्षमा करावी मला
जुनीच द्यावी कुर्हाड माझी, प्रिय असे ती मला
चांदीचीही कुर्हाड जेव्हा देऊ केली त्याला
ही पण माझी नाही देवी, हेची तो वदला
खरेपणाने खुष होवूनी प्रसन्न ती जाहली
सोन्याची अन चांदीचीही भेट त्यास दिधली
गुलमोहर:
शेअर करा
खुपच मस्त आहे गोष्ट ...
खुपच मस्त आहे गोष्ट ...
खूप सुंदर
खूप सुंदर
वा कवे!! खुप गोड! मस्त
वा कवे!! खुप गोड! मस्त
आवडली
आवडली
धन्स लोक्स
धन्स लोक्स
मस्तय ग कवे
मस्तय ग कवे
छान छान. दुर्गे दुर्गट
छान छान. दुर्गे दुर्गट भारीच्या चालीवर म्हणून बघा...
दुर्गे दुर्गट भारीच्या चालीवर
दुर्गे दुर्गट भारीच्या चालीवर म्हणून बघा...>> मामा काहीही
खूप छान आहे. सुरेख.
खूप छान आहे. सुरेख.
अम्या , नाही ग कविता,
अम्या :D,
नाही ग कविता, बाल/बडबडगीत खरच खूप खूप छानै...
कवे मस्त आहे
कवे मस्त आहे
कविता तुझी कविता छान झालेय.
कविता तुझी कविता छान झालेय.
कवे, छान बालकविता खरंच ,
कवे, छान बालकविता खरंच , माझ्याकडून पण आरतीच्या चालीतच वाचली गेली ती
धन्स लोक्स माझ्या लेकीसाठी
धन्स लोक्स माझ्या लेकीसाठी लिहीलेली ही बोलगाणी माबो अॅक्सेस मिळाल्या बरोबर पोस्टून मोकळी झाले
छान रचली
छान रचली