पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः
१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.
पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.
बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.
अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.
अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.
आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.
जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा
मला पित्ताचा त्रास होतो.
मला पित्ताचा त्रास होतो. केव्हा केव्हा सकाली उलति होते. औशध काय घ्याचे कलत नहि.
पित्त झाल्यास एक्-दोन लवंगा
पित्त झाल्यास एक्-दोन लवंगा किंवा तुळशीची पाने चघळावीत. गुळाचा एक खडा खाल्ला तरी पित्त कमी होते. व्हॅनिला आईस्क्रीम खाल्य्याने (विशेषतः तिखट व मसालेदार खाल्य्यानंतर) पित्त लगेच कमी होते.
आलं लिंबाचं चाटण तसंच कोकम
आलं लिंबाचं चाटण तसंच कोकम सरबत किंवा नुसती कोकमं (आमसुलं) चावून खाल्ली तरी पित्ताचा त्रास कमी होतो.
कफावर काही घरगुती औषध आहे का?
कफावर काही घरगुती औषध आहे का? प्लीज सांगा. धन्यवाद!
मध्+जेष्ठमध एकत्र करून
मध्+जेष्ठमध एकत्र करून खा...कफ लगेच कमी होतो
मनकवडा धन्यवाद!
मनकवडा धन्यवाद!
वय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७
वय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७ इंच ...
आत्महत्येच्या मार्गावर ......
माझ्या मते एवढा कमी वजन कोणाचाही नसेल...
४ वर्षांपूर्वी मला कावीळ झाली होती.. ती व्यवस्थित बरी सुद्धा झाली ..
पण माझं वजन ५४ कग वरून दिरेच्त ४२ कग वर आला.. गेली ४ वर्ष मला भूकच लागत नाही .. सगळ्या प्रकारचे उपाय, डॉक्टर , करून थकलो.. हजारो रुपये खर्च केले .. मध्ये एक वजन वाढवायची powder सुद्धा घेऊन झाली .. पण त्याने पोट अजून बिघडलं
डॉक्टर म्हणतात tension मुले असा होतंय...
पण मी काय करू आता .... खूप depression मध्ये गेलोय ...
सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत ....
जॉब ची पण खूप दगदग होते.. दिवसभर २ पोळ्या खाऊन राहतो .. पण त्याने पण अपचन होता .. सगळे खूप चिडवतात .. जगणं नकोस करून ठेवलं आहे ..... पोट अजिबात साग होत नाही .. माझ्ह्याबरोबरच का असा होतंय
प्रसन्न, जमलं तर पुण्यात येऊन
प्रसन्न,
जमलं तर पुण्यात येऊन आहारतज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाईंना भेटून आपली वजनाची समस्या सांगा व त्यांच्याकडून योग्य त्या आहाराचे मार्गदर्शन घ्या.
त्याआधी पुण्यातील प्रसिद्ध डॉ. कल्याण गंगवाल यांच्याकडून काही दिवस ट्रीटमेंट घ्या. ते अतिशय अनुभवी असून कोणत्याही आजाराचे अचूक निदान व योग्य उपचार करण्यात प्रसिद्ध आहेत. विशेषतः ते पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत. तुमच्या समस्येवर ते नक्कीच योग्य ते निदान करून तुमची समस्या सोडवतील.
मास्तुरे धन्यवद
मास्तुरे धन्यवद ............................
काही महिन्यांपूर्वी मी कफावर
काही महिन्यांपूर्वी मी कफावर काही घरगुती औषध आहे का असं विचारलं होतं. ह्या महिन्यात मला पुन्हा तोच त्रास झाला. मी नेटवर सर्च केलं तेव्हा मध, लिंबाचा रस आणि काळी मिरीपूड ह्यांचं मिश्रण करून दिवसातून २ वेळा असं ४-५ दिवस घ्यायचं असा उपाय दिसला. ह्यातून अपाय होण्याची शक्यता नसल्याने मी प्रयत्न करून पाहिला. खरंच मला खूप आराम वाटतोय.
अप्रतिम लेख. धन्यवाद.
अप्रतिम लेख.
धन्यवाद.
मला पित्ताचा खुप त्रास होतो.
मला पित्ताचा खुप त्रास होतो. डोक दुखायला लागत . उजेड, आवाज अजिबात सहन होत नाही. कुठ्लेही वास तीव्र जाणवतात. उलट्याही होतात बर्याच वेळेला. पण त्यानेही बरे वाटत नाही. रात्रीची झोप झाल्यावर बरे वाट्ते.
मला सुद्धा पित्ताचा खूप जुनाट
मला सुद्धा पित्ताचा खूप जुनाट त्रास आहे. पित्त झाले की डोके प्रचंड दुखते आणि वमन केल्याशिवाय बरे वाटत नाही. चहा आणि कॉफी घेणे पूर्ण बंद केले आहे. सकाळी गार दूध आणि कुलकंद (शारंगधरचे नवे प्रॉडक्ट) घेत आहे त्रास बर्यापेकी कमी झाला आहे. पित्त झाल्यावर आईस्क्रीम खाल्ले की बरे वाटते. कोकम सरबत सुद्धा चांगले.
डॉ. बालाजी तांबेंच्या
डॉ. बालाजी तांबेंच्या पित्तशांती गोळ्या खूप उपयोगी आहेत. माझ्या आयुर्वेदिक डॉ. ने तर नाडी बघून मला सांगइतले होते की, तुमच्या शरीरात रक्ताच्या बरोबरीने पित्त खेळते आहे. पण पंचकर्म करून घेतल्यावर खूप फायदा झाला.सकाळी उठल्यावर काळ्या मनूका खाल्ल्याने व किमान अर्ध्यातासानंतर चहा पोळीबरोबर घेतल्याने मला खूप फरक पडलाय.शिवाय डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सुंठ पावडर पाण्यात उकळून घेतल्याने उलटी होते व डोकं लगेच थांबते...पित्तात ही सुकुमार प्रक्रुती असणार्यांना खूप त्रास होतो. माझी डॉ. मला नेहमी तू राजघराण्यात जन्माला यायचे होतेस..असे म्हणते.कारण इतकी पथ्ये फक्त तिथेच पाळू शकतो आपण!! माझ्या समदुखी लोकाना पाहून मला बरे वाटले.
तूर डाळीने पित्त होते.
तूर डाळीने पित्त होते. त्याऐवजी मूग डाळ वापरावी.
एकच प्याला अगदी एकच वाटी
एकच प्याला
अगदी एकच वाटी (प्याला?? :)) तूर डाळ आमटी घेतली तर लगेच पित्त होते.
कबूल आहे.
मी स्वानुभव लिहीत आहे. गेले
मी स्वानुभव लिहीत आहे. गेले चार्,पाच महिने मला गॅसेसचा खूप त्रास होत होता. बाहेर पडत नव्हते.त्यामुळे पोट खूप जड वाटायचे,फुगायचे.severe constipation पण झाले. इसबगोल चालू केले.पण गॅसेसचा त्रास कमी होत नव्हता. माझ्या जावेला हे सांगितले ,तेंव्हा तिने बाळहिरडा थोड्या साजुक तुपावर परतल्यावर तो फुलतो .लगेच गॅस बंद करुन त्यावर काळे मीठ (पादेलोण) घालुन परतायचे.५,६ तासाने मीठ्,तूप आत शोषले जाते.मग बाळहिरडा रोज एक तोंडात ठेवून चघळुन खावुन टाकायचा असे सांगितले. मी करुन पाहिल्यावर४,५ दिवसात माझा गॅसेसचा त्रास कमी झाला. constipationचा त्रासही कमी झाला आहे.रोज १,२ पेक्षा जास्त खाऊ नये.
समई ५,६ तासाने रोज एक तोंडात
समई
५,६ तासाने रोज एक तोंडात ठेवून चघळुन खावुन टाकायचा >>> म्हणजे नक्की काय?
दररोज तुपावर भाजून, पादेलोण टाकुन बाळहिरडा तयार करायचा आणि मग ५-६ तासांनी खायचे असे का, की एकदाच हे सगळे तयार करून ठेवायचे आणि मग त्यातलाच एक तुकडा रोज खायचा?
रुनी,मी वर परत सुधारुन लिहिले
रुनी,मी वर परत सुधारुन लिहिले आहे,ते वाचावे.
पित्तावर तुळशीची पाने चघळणे,
पित्तावर तुळशीची पाने चघळणे, लवंगा चघळणे किंवा गुळाचा खडा चघळून खाणे या उपायांचाही उपयोग होतो.
मला सुध्धा पित्ताचा फार त्रास
मला सुध्धा पित्ताचा फार त्रास होत आहे. कधिपण खाज येते. मध्ये तर सकाळी ओठ टम्म सुजलेले असायचेत. उलट्या होतात. हळु हळु मि जेवणात फरक केला आहे.
टिफीन मध्ये मुग-मसुर-तांदळाची खिचडी आणि कोणतही सुप बनवुन आणते. भुक लागलिच तर फळ खाते. चहा-कॉफी साफ बंद केली आहे. नचणीच सत्व पिते. एरंडेल तेल आणी कशाच्या वाटीने तळपायाला मसाज करते. सकाळ संध्याकाळ १-१ चमचा गुलकंद खाते. (बहुतेक गोष्टी बालाजी तांबेंकडुन वाचलेल्या आहेत)
महत्वाच म्हणजे १०.३० ला झोपुन ६.३० ला उठायचा प्रयत्न करते.
बराच आराम मिळत आहे. अजुन काय करता येइल?
पोट स्वच्छ नसले,झोप पुरेशी
पोट स्वच्छ नसले,झोप पुरेशी झाली नाही,उपाशी राहिले ,दगदग फार झाली,त्रागा झाला,फार थंडी/उन्हात बाहेर जाऊन आले कि पित्ताचा त्रास होतो..यासारखे अजुन कोणतेही कारण असु शकते.पित्त झाले की डोकं,डोळे,पाय्,पाठ्,मान दुखते...या पित्तावर मी अनुभवलेला अजुन एक खात्रीलायक उपचार.ह्याने अपाय तर नक्कीच नाही..आणि एकदा ही पावडर करुन ठेवली बरेच दिवस पुरते..फक्त चवीला थोडी तुरट लागते..इसब्गोल चा चिकट्पणा/बुळ्बुळीत पणा मुळीच जाणवत नाही..
३०० ग्राम इसबगोल +१०० ग्राम आवळा पुड+१०० ग्राम हरड पुड+१०० ग्राम बेहडा पुड..असे सगळे एकत्र करायचे..हे एकुण ६०० ग्राम तयार होइल..ही पावडर २ चमचे भरुन रात्री झोपताना १ ग्लास भरुन कोंबट पाण्याबरोबर घ्यावी..पित्त झाले की लगातार ३-४ दिवस घ्यावी..एरवी आठवड्यातुन एकदा घ्यावी..पोट स्वच्छ /हलके रहाते..[जुलाब होत नाही..]शरीरात जड-पणा जाणवत नाही..त्यामुळे पित्त होतच नाही.. भुक लागते..पचनाचा त्रास असेल तर तो ही जातो..थोडक्यात "सब मर्ज की एक दवा "आहे..
रात्रीचे जेवण व झोप नीट झाली
रात्रीचे जेवण व झोप नीट झाली नाही म्हणजे पित्त होणार. ते झाले की दिवस फुकट. सकाळच्या चहाबरोबर उलटून पडले तर अर्धा दिवस वाचला तर वाचेल.
(स्वानुभव)
पित्त झाल्यावर करायच्या उपायांपेक्षा न होऊ देणंच बरं.
पित्त झाल्यावर करायच्या
पित्त झाल्यावर करायच्या उपायांपेक्षा न होऊ देणंच बरं.
अगदी सहमत...मला सकाळी जर नाष्टा किंवा काही खाणे झाले नाही तर लगेच पित्त व्हायला सुरूवात होते. आणि एकदा डोके दुखायला लागले की मग दिवस जातो कामातून...
त्यामुळे मी सकाळी तर नाष्टा नसेल तर ग्लासभरून दूध आणि त्याबरोबर ३-४ बिस्कीटे खातो.
सकाळच्या वेळी साबुदाणा खिचडी, शेंगदाणे आदी पित्त वाढविणारे तसेच तेलकट आणि तुपकट पदार्थ व्यर्ज...
दुधाबाब्त्त घोळ आहे जरा..
दुधाबाब्त्त घोळ आहे जरा.. अॅलोपथि म्हनते दुधाने पित्त वाढते ( कारन त्यात कॅल्शियम असते) आणि आयुर्वेद म्हणते दुधाने पित्त कमी होते.. होमिओपथीवाले काय म्हणतात माहीत नाही.. ( बाकी ते काय म्हणणार म्हणा.. त्यांच्या शाबुदाण्याच्या गोळ्या दुधातील मिल्क सुगर म्हणजे लॅक्टोजच्या असतात !
)
मोरावळा देखील पित्तनाशक आहे
मोरावळा देखील पित्तनाशक आहे का? कुठेतरी वाचल्यासारखे वाटते.
त्यांच्या शाबुदाण्याच्या
त्यांच्या शाबुदाण्याच्या गोळ्या दुधातील मिल्क सुगर म्हणजे लॅक्टोजच्या असतात ! फिदीफिदी )<< नाही त्या शेळीच्या दुधाच्या असतात.
पित्ता वर प्रभावी उपाय.
पित्ता वर प्रभावी उपाय.
जें व्हा तु म्हाला असीडीटी चा त्रास जा ण वे ल ते न्हा,
आपल्या उज व्या तळ हातावर डाव्या आंगठ्या ने मध्यमा जवळ दाब द्यावा. मि नीट भरा नन्तर आराम
वाटेल. ह्या उपाया ला सुजोग वा अ क्यु प्रेशर म्हणतात.
शेळीचं असलं तरी शेवटी ते दूधच
शेळीचं असलं तरी शेवटी ते दूधच ना ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरयाच लोकांच्या जिव्हाळ्याचा
बरयाच लोकांच्या जिव्हाळ्याचा (जीवघेणा) अश्या या विषयाची छान माहिती येथे मिळाली,सर्वांना धन्यवाद. मराठी ई-पुस्तकांची माहिती कुठे मिळेल? (योग-आयुर्वेदासहित)
नाईक,
उजव्या तळहातावर डाव्या अंगठ्या ने (मध्यमा जवळ?????)दाब द्यावा??? म्हणजे नक्की कुठे???
मध्यमेच्या टोकाशी की तळाशी असलेल्या फुगवट्यावर????????(बोटावर? की हातावर?)
Pages