पनीर जालफ्रेझी

Submitted by बस्के on 17 May, 2010 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर १२ oz
मोठे कांदे २
टोमॅटो प्युरी ६ oz
हिरवी सिमला मिरची २
लाल सिमला मिरची १
बटर ३-४ चमचे. ( हेल्थ कॉन्शस नसाल तर मनसोक्त!)
४-५ लवंगा
६-७ मिर्‍याचे दाणे
दालचिनी पूड
वेलदोडा पुड चिमुटभर
थोडेसे bay leaves ( =तमालपत्र का?)
कसुरी मेथी
थोडा ठेचलेला लसूण
तिखट, मीठ चवीप्रमाणे.
मी थोडा तंदुर मसाला सुद्धा घातला चवीपुरता.
लाल खाण्याचा रंग हवा असल्यास. (प्युरीमुळे रंग येतोच, त्यामुळे नसला तरी चालेल.)

क्रमवार पाककृती: 

सर्वात प्रथम कांदा बारिक चिरून बटरमध्ये परतून घ्यावा.
व नंतर मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करावी.
एकीकडे दुसरा कांदा व लाल-हिरव्या सिमला मिरच्या उभट चिरून घ्याव्यात.
पनीर मायक्रोवेव्हमधून थोडे शिजवून घ्यावेत व त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत. पनीर तळून सुद्धा घालता येतील पण नुसते असेच पांढरेशुभ्र सुद्धा छान दिसतात/लागतात!
खलबत्त्यात लवंग, मिरे, बे लिव्हज, कसुरी मेथी नीट पूड करून घ्यावेत.

बटर तापवून त्यात चिरलेला कांदा, लाल-हिरवी सिमला मिरची परतून-शिजवून घ्यावी.
ठेचलेला लसुण, कांदा व टोमॅटो प्युरी घालून नीट परतून घ्यावे.
पनीरचे तुकडे मिसळावेत.
त्यात लवंग-मिरे-बे लिव्हज-कसुरी मेथी पुड तसेच दालचिनी,वेलदोडा पुड घालावी
तिखट, मीठ व (असल्यास) थोडा तंदुर मसाला घालावा.
थोडसं एकत्र हलवून किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून शिजवून घ्यावे.

एका डिशमध्ये पनीर जालफ्रेझी व पराठा/फुलका घेऊन आधी त्याचा फोटो काढावा, मग मनसोक्त हादडावे! Happy


वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी पुरावी.
माहितीचा स्रोत: 
संजीव कपुर, तरला दलाल, व इंटरनेटवरील ब्लॉग्स वाचुन बनलेली माझी रेसिपी. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिप्ती! इतक्या लवकर रेसिपी ट्राय करून दिलेल्या अभिप्रायाबद्दल थँक्स! Happy
प्राजक्ता व इतर पराठा उत्सुक लोकहो, तो 'पिकाडेली' या ब्रँडचा प्लेन पराठा आहे.

>>>जाल्फ्रेझी कोरडी असते??>>>> बस्के, हो, आतापर्यंत खाल्लेली त्यालातरी अशी ग्रेव्ही नव्हती.

बस्के महान फोटो गं! अशी टेस्टी रेसिपी झाल्यावर फोटो काढण्यापर्यंतही धीर धरवणार नाही मला!

बस्के, या वविच्या दंग्यात राहूनच गेलं सांगायचं. शनिवारी मी ही पाकृ केली होती. कसूरी मेथी, लाल सिमला मिरची प्रकरणं नव्हती तरी जबरी स्पायसी झाली होती. आयडिया म्हणजे सकाळची उभी चिरलेली ढोबळीची भाजी खपवली. Wink मस्त गं. पण आता जेन्युइनली सगळं साहित्य गोळा करुन पुन्हा करेन. Happy

Pages