१ पुडा (१४ oz) गोडावलेलं खोबरं. (दुकानात केक सप्लाइजच्या आयलमधे मिळेल.)
२/३ कप बदामाचा अगदी बारिक चुरा
२/३ कप बारिक केलेली साखर
पाव चमचा मीठ
४ अंड्यांचा फक्त पांढरा भाग
अर्धा चमचा बदाम अर्क
अर्धा चमचा व्हॅनिला अर्क
चॉकलेटमधे घोळायचं असेल तर १ लहान पुडा चॉकलेट मेल्ट्स (कमी गोड असलेले.)
ओवन ३५० डिग्री फॅ. वर गरम करावा.
एका मोठ्या भांड्यात गोडावलेला खोबरं कीस, साखर, मीठ आणि बदाम चुरा व्यवस्थीत मिसळून घ्यावा.
वेगळ्या भांड्यात चारही अंड्याचं पांढरं आणि दोन्ही अर्क एकत्र करावे. खूप फेसाळ करंत बसण्याची गरज नाही. निव्वळ एकत्र झाले तरी पुरे.
हा अंड्याचा घोळ आता खोबरं किसाच्या भांड्यात ओतून झक्कपैकी हातानी मिसळून घ्यावा.
हे मिश्रण जरा चिकट होईल, पण मस्त लाडू वळता येतील.
आता कुकी शीटवर पार्चमेंट पेपर घालून हे लाडू ठेवावे. जास्त अंतराची वगैरे चिंता नको. कारण कुकीसारखं ह्याचं मिश्रण पसरत नाही.
ट्रे ओव्हनच्या सगळ्यात वरच्या खणात ठेवावे. खोबरं लवकर जळतं हे लक्षात असु द्यावं. (मी एक बॅच खालून करपल्यावर शिकले. :))
खोबरं किंचित गोल्डन ब्राऊन दिसायला लागल्यावर (म्हणजे साधारण ८-१० मिनिटात) मॅकरून्स तयार होतात. तेव्हडावेळ अंड्याचं मिसळलेलं पांढरं शिजायला पुरतो.
हे गोळे बाहेर काढून अगदी गार होऊ द्यावेत.
चॉकलेटमधून बुचकाळायचे झाले तर डबल बॉयलरमधे म्हणाजे खालच्या भांड्यात पाणी उकळून वरच्या भांड्यात चॉकलेट्चे तुकडे वितळवावेत. मी त्यात अगदी जरासं दूध घालते. एकतर ह्या मिश्रणात खोबर्याचे मॅकरुन गोळे अर्धे बुडवावेत किंवा ताटलीत ठेवून वरून चमच्यानं चॉकलेट ओतावं.
गार होऊन चॉकलेट नीट बसलं की फ्रीजमधे साठवावेत.
बदामाचा अर्क अतीशय उग्र असतो. जास्त घालु नये. (नसला तरी काही हरकत नाही.)
कोरडा खोबरंकीस फार पटकन करपतो, जळतो. तेव्हा ओव्हनवर लक्ष असु द्यावं. बेकींगला साधारण १० मिनिटावर वेळ लागत नाही.
चॉकलेट अगदी ऐच्छिक!! ह्यावर गुलाबी किंवा पांढर्या वितळवलेल्या चॉकलेटच्या रेघा छान दिसतात. उरक असल्यास नक्की माराव्या. (रेघा)
चॉकलेट वितळवताना दूध गरम करून घालावं. गार दुधानं वितळलेल्या चॉकलेटचा पुन्हा गोळा होतो.
(No subject)
मॄ अगदी
मॄ
अगदी यम्मी यम्मी दिसताहेत. आता करुनच बघते.
तेवढ ते साखर २/३ चमचे की कप ते टाक तिकडे.
रुनी,
रुनी, थँक्यु. केला बदल.
वाह!!!
वाह!!! हॉलिडे स्पेशल!!
मस्तच दिसतायत अन फार खटाटोप पण वाटत नाहीये. नक्की ट्राय करणार.
धन्स मृण!
ट्राय
ट्राय करायला हरकत नाही पण खाणार मात्र नाही. फुटवा टाकल्याबद्दल आभार.
का बरं
का बरं सायो? तुला नट्स्ची ऍलर्जी आहे का?
नाही
नाही ऍलर्जी नाहीये. पण मला बिस्कीटं,केक मध्ये खोबरं आवडत नाही आज्याबात.
सायो,
सायो, बिस्किटं आणि केक मधे कुठे गं खोबरं आहे ह्या रेसिपीत? खोबर्यात जराशी बदाम पावडार आणि बाकी सगळं घातलंय.
वरच्या पोस्टात मी केलेला इनोद वाया गेला.
हो गं. पण
हो गं. पण मला तेवढं खोबरंही आवडत नाही. पण करुन बघायला काय जातंय नाही का?
सॉरी, तुझा इनोद मला अजूनही कळलेला नाही.
ओह, आत्ता
ओह, आत्ता पेटली ट्युब.
म्रु ! एकदम
म्रु ! एकदम सोप्पि वाटतेय रेसिपि, करुन पाहिन.
वरुन
वरुन चॉकोलेट ओतायची आयडीया छान आहे, पदार्थ खरा कसाही दिसत असेल तरी झाकला जातो अशाने
मृ ,
मृ , अंड्याऐवजी काय घालता येईल ? अंड्याची ऍलर्जी असल्याने हा प्रश्न.