Submitted by ट्युलिप on 28 May, 2009 - 14:03
पार्ल्याची खाद्यसंस्कृती म्हणा, परंपरा म्हणा नाहीतर खादाडी म्हणा. ती चविष्ट, चारीठाव आहे ह्यात काहीच वाद नाही. अगदी बाबू वडेवाल्यापासून, शर्मा पाणीपुरीवाल्यापर्यंत आणि आरके पासून कॅफे मैलू पर्यंत ती पार्ल्याच्या गल्लोगल्ली पसरली आहे. चला तर. सगळे रेसिडेन्ट आणि नॉन रेसिडेन्ट पार्लेकर्स मिळून लिहूयात इथे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुरेपूर कोल्हापूर पार्ल्यातच
पुरेपूर कोल्हापूर पार्ल्यातच आहे. फडके उद्योगमंदिरच्या शेजारी. पार्लेश्वर देवळाच्या समोरच्या रस्त्यावर आतल्या बाजूला.
सिंडरेला.. पुरेपूर कोल्हापूर
सिंडरेला..
पुरेपूर कोल्हापूर पार्ल्यातही आहे.सीसीडी आणि तोसाच्या बाजूला.
बर बर. मला फक्त अंधेरीतले
बर बर. मला फक्त अंधेरीतले माहिती आहे.
हो, पूरेपूर कोल्हापूर आमचंही
हो, पूरेपूर कोल्हापूर आमचंही आवडतं ठिकाण. मी मराठीही मस्तच आहे. त्यातली एक मिसळ धूर काढणारी आहे.
हेलो सिंडरेला, पूरेपूर
हेलो सिंडरेला,
पूरेपूर कोल्हापूर अंधेरीला नक्की कुठे आहे ते सांगु शकाल का ??
नाही पार्ल्यातच
नाही पार्ल्यातच आहे.
फड्क्यानच्या दुकानाशेजारी.
अंधेरीला एका अंधार्या गल्लीत
अंधेरीला एका अंधार्या गल्लीत आहे बॉ सॉरी, मला नाही सांगता यायचं. मी बहिणीच्या फॅमिलीबरोबर गेले होते.
No probs, अंधेरी (पु)ला असेन
No probs, अंधेरी (पु)ला असेन तर मीच हुडकुन काढिन.
पुरेपूर कोल्हापूर, शॉप नं १
पुरेपूर कोल्हापूर,
शॉप नं १ आणि २, आदित्य अपार्टमेंट,
पार्लेश्वर रोड, पार्लेश्वर मंदिरासमोर,
विले पार्ले (पूर्व), मुंबई-५७.
फोनः ०२२-२६१३ ४५६९/२६१३ ६१८१
पुरेपूर कोल्हापूरची वेबसाईटः-
http://www.puraypurkolhapur.com/
पूरेपूर कोल्हापूरमधे
पूरेपूर कोल्हापूरमधे शाकाहारींसाठी काय व्हरायटी मिळते? ठाण्याला घंटाळीला पण झालंय ते..
धन्स अभिजीत
धन्स अभिजीत
बादवे.. पार्ला वेस्टला स्वामी
बादवे.. पार्ला वेस्टला स्वामी विवेकानंद रोडवर इर्ल्याचा बसस्टॉप आहे दादरकडे जाणार्या बाजूचा. त्या बसस्टॉपच्या मागे जो भेळ/ पापु वाला आहे त्याच्याइतकी बेस्ट भेळ आणि पापु आणि शेपु मी बाकी मुंबईभरात कुठे खाल्ली नाहीये.
-नीधप
जुहू तारा रोडवर एक
जुहू तारा रोडवर एक इटालियन-मेक्सिकन रेस्टॉ. 'लिटिल इटली' आहे. मस्त चव आहे एकदम. परत परत जाण्यासारखं.
नक्की कुठे विचारावे कळत
नक्की कुठे विचारावे कळत नाहीये.. पण मी नविन मुम्बईकर.. मला मुम्बई मधे 'मराठमोळा दिवाळी चा फराळ' कुठे मिळेल सान्गाल का? यन्दा 'चितळे ब्न्धू' ना खूप मिस करणारे....... कान्दिवली मधे आणि जवळपास च्या भागामधे हवी आहेत फराळाची दुकाने.......
जिथे जिथे मराठी वस्त्या आहेत
जिथे जिथे मराठी वस्त्या आहेत तिथे मिळेलच पण दिवाळीच्या फराळाच्या बेसिक गोष्टी आता १२ महिने १३ काळ सर्व हलवाई आणि फरसाणवाल्यांकडे मिळत असतात.
कांदिवलीचे माहित नाही पण बोरिवलीमधे नक्की मिळत असणार दिवाळी फराळ अगदी अॅसॉर्टेड पॅक्समधे.
नाहीतर पार्ल्यात आहेतच पणशीकर, फडके, रघुनाथ, रूची, चॅम्पियन, विजय स्टोर्स इत्यादी
नीधप, धन्यवाद! पणशीकर, फडके,
नीधप, धन्यवाद!
पणशीकर, फडके, रघुनाथ, रूची ही सगळी मराठी नावे ऐकून छान वाटले.. कारण इथे कांदिवली मधे सगळे गुज्जु वगैरेच आहेत. आम्ही दसरा 'जिलेबी आणि फाफडा' ने साजरा केला!
बोरिवलीमधे पण अजुन सापडले नाहीत मराठी दुकाने तशी. अजुन जास्ती भटकले नाहीये.....
मी नवीन आहे मुंबईमधे. पार्ल्यात नेमकी कुठे आहेत ही दुकाने साधारण? पूर्व / पश्चिम?
आणि हो, चांगले दुध कोणते इथे? चितळे, साने मिळतच नाहीत.. अमुल/ गोकुळ मिळते पण ते बहुधा भेसळयुक्त आहे असे वाटतेय. बा़की डेअरी आहेत बर्याच पण तेही नाही आवडले, ते अजुनच 'पाणीदार!'. माझे पिल्लू रोडावतेय...
यन्दा 'चितळे ब्न्धू' ना खूप
यन्दा 'चितळे ब्न्धू' ना खूप मिस करणारे......... डि-मार्ट गाठा, चितळेंच्या बाकरवड्या तिथे हमखास मिळतात
मराठी गोष्टी = पार्ल्यामधे
मराठी गोष्टी = पार्ल्यामधे पार्ला इस्ट.
रूचि हे नाव मराठी वाटत असले तर मालक गुज्जु आहेत बहुतेक. चॅम्पियनचं माहित नाही आणि विजय स्टोर्स साठ्यांचं आहे
पणशीकर, रघुनाथ, रूची हे सगळे हनुमान रोडवरच विविध ठिकाणी आहेत. त्यात पणशीकर आणि रूचि जवळपास आहेत. रघुनाथा पा टि व्हि च्या समोरच्या बाजूला कुठेतरी. फडके जुन्या रूचिसागर आणि आताच्या मी मराठी हाटेलाशेजारी.
चॅम्पियन आणि विजय स्टोर्स मेन मार्केटच्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी. खूण काय सांगणार. चॅम्पियन हीच मोठी खूण आहे. विजय स्टोर्स जवाहिर बुक डेपोच्या लायनीत शेजारी किंवा १-२ दुकाने टाकून.
कस्ली य पार्लेकर झाले मी ९ वर्षात..
कृष्णा चं दूध मिळतं का
कृष्णा चं दूध मिळतं का कांदिवलीमधे? चितळेंपेक्षा ते बरंय. मला तसंही चितळेंचं आवडत नाही. सानेंचं चांगलंय.
हो हो!! सुदैवाने डि-मार्ट
हो हो!! सुदैवाने डि-मार्ट सापडले! चितळे बाकरवड्या आणि श्रीखण्ड घेतलेच झडप घालून!
ह्या धाग्याचा खूप उपयोग होईल... येत्या वीक एण्ड ला 'पार्ल्या'वर स्वारी नक्की!
नीधप, खर्रच धन्यवाद! मी आपली
नीधप, खर्रच धन्यवाद!
मी आपली नवर्याला पुण्याला धाडणार होते दिवाळी च्या आधी! ( तसे ही 'भाऊबीज' वसूल करायची आहेच तिथल्या भाऊरायाकडून! )
कांदिवली इस्ट ते पार्ला इस्ट सोपे असावे येणे! हनुमान रोड नवर्याला माहितीय!
कृष्णा चं दूध पण नाही... शोध जारी आहे.....
रघुनाथ नाही ते रघूवीर आहे.
रघुनाथ नाही ते रघूवीर आहे.
नीधपने सांगीतलेल्या नावांव्यतिरिक्त- पार्लेश्वर मंदिरासमोर 'आपले दुकान' आहे तिथेही 'मराठमोळा दिवाळीचा फराळ' उत्तम मिळतो. आधी ऑर्डर नोंदवली तर जास्त चांगले.
विष्णू स्टोर्स
मालशेंचं पांचाली
रुच, चॅम्पियन कडेही मराठी पद्धतीचे फराळाचे पदार्थ मिळतात.
गोडबोले स्टोर्स फोनवरुन ऑर्डर्स घेऊन घरपोच फराळ पोचवतात. मात्र त्यांचे पार्ल्यातले दुकान बंद झालेय. दादरला आहे. त्यांच्या वेबसाईटवर तपशील बघा.
गोकूळ, वारणा, कृष्णा, थोटे इत्यादींच्या ऑफिशियल मिल्क एजन्ट्सकडून दुधाची डिलिव्हरी घ्या. म्हणजे भेसळीची शक्यता रहाणार नाही.
रघुनाथ नाही ते रघूवीर आहे.
रघुनाथ नाही ते रघूवीर आहे. <<< हा बरोबर..
विष्णू चॅम्पियनच्या समोरचं ना?
पांचाली मी पण विसरले हां. अगदी दररोज काही काळ त्यांच्याकडून पोळीभाजी आणत होते तरी विसरले.
पार्ल्यापर्यंत जायची गरज
पार्ल्यापर्यंत जायची गरज नाही.
मालाड(पश्चिम) स्टेशनजवळच...
केतकर बंधू आणि महालक्ष्मी स्टोर्स ही दोन दुकाने आहेत. इथे बारा महिने तेरा काळ दिवाळीचा उत्तम घरगुती फराळ मिळतो
गोरेगांव(पश्चिमेला) आरे रोडवर सप्रे ह्यांचे असेच दुकान/खानपान गृह आहे...इथेही बामतेका हवे ते मराठी पदार्थ मिळतात.
वेस्टर्न सबर्ब्समधे अनेक
वेस्टर्न सबर्ब्समधे अनेक ठिकाणी मराठी, गुजराथी कुटूंबांमधे मोठ्या प्रमाणावर दिवाळीचा फराळ हवा असल्यास बायकांना घरी बोलावून तो करवून घेतात. चांगल्या प्रतीच्या तेला-तुपाची हमी मिळते आणि बाहेरपेक्षा खूप स्वस्त पडतो. एका मजल्यावरच्या किंवा दोन-तीन मैत्रिणी वगैरे मिळून असा फराळ पार्ल्यात खूप ठिकाणी करुन घेतात. वर्षाचे लोणचे, मसाले वगैरेही या बायका करुन देतात.
नी, आणि शर्मिला, वर उल्लेख
नी, आणि शर्मिला, वर उल्लेख केलेयापैकी कुणीतरी ऑर्डर दिल्यास फराळ मंगळूरला पाठवू शकतात का?
>>> बोरिवलीमधे पण अजुन सापडले
>>> बोरिवलीमधे पण अजुन सापडले नाहीत मराठी दुकाने तशी. अजुन जास्ती भटकले नाहीये.....
ओवी, बोरिवली पश्चिमेला चंदावरकर रोड/ बाभई नाक्यावर 'गिरगाव कट्टा' म्हणून एक छोटं दुकान-कम-स्नॅक्स शॉप आहे. थालीपीठ, मिसळ, सा.खि. इ. मराठमोळे पदार्थ तिथे उत्तम मिळतात. त्यांच्याकडच्या मिठायांचा अनुभव नाही, पण तिथल्या फेर्यांत खास मिठाया घेण्यासाठी येणार्या गिर्हाईकांच्या संख्येकडे पाहून त्यांचा दर्जा चांगला असावा, असं वाटतं. त्याच परिसरात - म्हणजे वजिरा नाक्याजवळच्या सुविद्यालय शाळेजवळही एक-दोन विजय स्टोअर्ससारखी दुकानं आहेत.
नंदिनी, या दुकानांमधे चक्कर
नंदिनी, या दुकानांमधे चक्कर मारली मी येत्या १-२ दिवसात तर विचारेन. पण शक्यता कमी वाटतेय.
बाभई नाक्यावर 'गिरगाव कट्टा'
बाभई नाक्यावर 'गिरगाव कट्टा' >>>>
शिफ्ट झालं ते दुकान तिकडून. आता थोडं स्टेशनच्या जवळ आलय. SBI गल्लीमधून आत गेलं कि डाव्या हाताला, वसई विकास बँकेच्या शेजारी. हॉटेल झालय आता त्याचं...
वेस्टर्न सबर्ब्समधे अनेक
वेस्टर्न सबर्ब्समधे अनेक ठिकाणी मराठी, गुजराथी कुटूंबांमधे मोठ्या प्रमाणावर दिवाळीचा फराळ हवा असल्यास बायकांना घरी बोलावून तो करवून घेतात.
>>>>> या बायकांचा काही फोन नं. आहे का ? कुठे संपर्क करता येईल ? पुण्यात ही अशा बायका मिळतात का ?
Pages