भारतातील पहिले "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम"

Submitted by जिप्सी on 28 November, 2010 - 23:42

लंडनमधील मादाम तुसॉं या प्रसिद्ध वॅक्‍स म्युझियमच्या (मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय) धर्तीवर लोणावळा येथे उभारले आहे भारतातील पहिले सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. तेंव्हा आता मेणाचे पुतळे बघायला लंडनला जायची गरज नाही. Happy सुनिल कंडल्लूर या केरळ येथील तरूणाने हे म्युझियम उभारले असुन सध्या येथे २५ सेलिब्रिटींजचे मेणाचे पुतळे आहेत. १९९३ साली फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा केलेल्या सुनिलचे स्वप्न आहे मुंबईत वॅक्स म्युझियम उभारण्याचे.

सदर म्युझियम हे लोणावळ्यापासुन अंदाजे २-३ किमी अंतरावर असलेल्या "वरसोली" या गावात आहे (लोणावळा टोलगेटजवळ). हे वॅक्स म्युझियम उभारून सुनिलने जगाला दाखवून दिले आहे कि, "हम भी किसीसे कम नही".
वेळः सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत
प्रवेश फि: ७५ रुपये (प्रति माणशी)
वेबसाईट: www.celebritywaxmuseum.com
संपर्कः ०२११४ ३२३८६६/०२११४ २७७६६६
=================================================
छत्रपती शिवाजी महाराज

महात्मा गांधी
मदर तेरेसा

स्वामी विवेकानंद
पंडित जवाहरलाल नेहरू
राजीव गांधी
माता अमृतानंदमयी
अ‍ॅडॉल्फ हिटलर
रसुल पुक्कुट्टी
हरीहरन
एस्. सुब्बलक्ष्मी

ए. आर. रहमान

मायकल जॅक्सन

श्री. बालाजी तांबे

सत्यसाईबाबा

सद्दाम हुसेन

गुलमोहर: 

म्युझियमबद्दल ऐकून होतो.... फार छान माहिती मिळाली... प्रचि पाहून एवढे निश्चित की गुणवत्तेत कुठेच तडजोड नाही. Happy

अरे वा सुरेख आहे. जायला पाहीजे एकदा. मॅडम तुसॉमध्ये बच्चन व ऐश्वर्या अजिबात जमले नाहीयेत. इथे जरा आपली लोक मस्त दिसत आहेत. उदा: स्वामी विवेकानंद व नेहरुचाचा सोडल्यास बाकी बरेच जमले आहेत.

अरे वा. छान Happy केपी, बित्तुबंगा अनुमोदन.
काही ठिकाणी डोळे मात्र लाईफलेस वाटत आहेत.

मस्त..

सुब्बुलक्ष्मींच्या चेहर्‍याचे प्रचि मेणाच्य पुतळ्याचे नसून त्यांचे स्वतःचे असावे इतका तो छान जमलाय. हरिहरन आणि रसूल पोक्कुटी पण. पण नेहरू चाचा आणि मदर तेरेसाना बोनस सुरकुत्या का?

मस्तच....आता देशात गेल्यावर पहिली भेट तिथेच. धन्यवाद जिप्सी.:)
राजांचा २ नं.चा जास्त आवडला. सुब्बुलक्ष्मी मस्तच. हरिहरन तर आपल्याशी बोलतायेत असं वाटतंय.
<<बोनस सुरकुत्या का?>>....सेम वाटलं मला पण.

मला, ए र रेहमान अन मायकल जॅक्सनचा प्रचि आवडला. जल्ला एकदम खरा खुरा मेनपुतळा !

बाकी , यन्ना रास्कला .. रजनीचा पुतळा नाही. Uhoh रजनीला उपग्रहशिघ्र कॉल करावा लागेल.

मस्तच!!

मला महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांचे पुतळे आवडले. शिवाजी महाराजांचे तेजस्वी डोळे फार फार सुंदर... महात्मा गांधीच्या चेहर्‍यावरचे भाव पण सुरेख चित्रित झालेत. पण पंडित नेहरूंचा पुतळ्यासाठी त्यांची अशी उदास, निरुत्साही मुद्रा का बरं निवडली असेल?

हरीहरन, ए.आर. रहमान पण एकदम छान..

सुबुलक्ष्मी, रसूल पोक्कुटी आणि रेहमानसर खासच वाटताहेत !! बाकी पण मस्त.. अपवाद मदर तेरेसा, स्वामी विवेकानंद नि मायकल जॅक्सन !

सूकी.. यन्ना रास्कला !!! Lol त्याचा पुतळा... अपमान करतोयस तू.. Proud

आपल्याला माईका-लाल जयकिशन (मायकेल जॅक्सन) आवडला...
बाकी पण चांगले आहेत.
आता हे संग्रहालय पहायलाच हवे.
पण पंडित नेहरूंचा पुतळ्यासाठी त्यांची अशी उदास, निरुत्साही मुद्रा का बरं निवडली असेल?>>>
कारण बहुदा ह्या सर्वांमध्ये लेडी माऊंटबॅटन चा पुतळा नाहिये. Light 1

छत्रपती शिवाजी महाराज की जय!
व्वा! अप्रतिम कलाकृति. सुब्बुलक्ष्मी मस्तच. सजीवच वाटतायत.
<<बोनस सुरकुत्या का?>>....सहमत.
<<महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांचे पुतळे आवडले. शिवाजी महाराजांचे तेजस्वी डोळे फार फार सुंदर... महात्मा गांधीच्या चेहर्‍यावरचे भाव पण सुरेख चित्रित झालेत>>>सहमत.
जिप्सी धन्यवाद! तुमच्यामुळे इथे बसूनही पहाता आले.

वॉव.. किती छान केलेत सर्व पुतळे..राजीव गांधीचा खूप आवडला.. सद्दाम,हिटलर बरोब्बर भाव जमलेत.. सर्वच आवडले Happy

पण मला चाचानेहरूंचा पुतळा खरच नाही आवडला, खुपच उदास चेहरा वाटतोय. >>>

जुई, त्या दिवशी त्यांचं कबूतर उडून गेलं होतं........ Proud

मस्त म्युझिअम....... जाणे सोपे आहे. सगळीकडे रस्त्यावर आता बोर्ड लावलेत...... शोधायचा त्रास नाही होत...!!!

ऐकून आहे ह्या संग्रहालयाबद्दल. फोटो पण बघितले होते. हे मस्तच आलेत फोटो सगळे. जायला हवं एकदा.

फार पूर्वी दादरला कांबळी यांचं मेणाच्या बाहुल्यांचं प्रदर्शन पाहिल्याचं आठवतंय. मला जर बरोबर आठवत असेल तर त्या बाहुल्या हालचालीही करायच्या.

या प्रदर्शनाच्या माहिती आणि फोटोंबद्दल धन्यवाद. Happy

(हिटलरपासून बालाजी तांब्यांपर्यंतची 'रेंज' बघून मजा वाटली. :P)

खरच छान आहेत पुतळे... पण नेहरु खूप थकलेले आणि विवेकानंद जास्तच जाड वाटताहेत... पुढच्या महिन्यात जायच आहे लोणावळ्याला... तेव्हा बघायला हवेत.

Pages