टिकलं मिकलं

Submitted by गिरिश देशमुख on 25 November, 2010 - 07:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घट्ट दही - १ कप,
हिरवी मिरची (लांब, जाडी, कमी तिखट असावी) १, २
कोथिंबीर,
चवीनुसार मीठ, साखर,
मोहरी, जीरे, मेथी दाणे, कढीपत्ता आणि हींग ईत्यादि फोडणी चं साहित्य.
फोडणी पुरतं तेल किंवा तूप.

क्रमवार पाककृती: 

दह्यामध्ये साखर (आवडी नुसार) मिसळून, दही घुसळून घ्या.
हिरव्या मिरच्या थोडे तेल लावून गॅस वर (डायरेक्ट) भाजून घ्या. मिरच्या चांगल्या काळ्या होईपर्यंत भाजा.
थोडे मीठ घालून मिरच्या, कोथिंबीर एकत्र खरडून घ्या (ठेचून बारीक करा) आणि दह्यामध्ये कालवून घ्या.
थोड्या तुपात / तेलात मोहरी, जीरे, मेथी दाणे, कढीपत्ता आणि हींग घालून फोडणी करा आणि दह्यामध्ये घालून चांगले मिक्स करा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणि घालून कन्सिस्टन्सी अ‍ॅडजस्ट करा.

पोळी, पराठे, थालीपीठ, धिरडी यांच्या बरोबर (चटणी सारखे) सर्व्ह करा.

अधिक टिपा: 

*भाजलेल्या मिरची चा धुरकट वास आणि आंबट, तिखट, गोड चव ही या पदार्थाची खासियत !
*फोडणी चे साहित्य आवश्यक तो बदल करुन वापरल्यास, उपवासाला ही चालू शकते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीच तिखटी.. आम्ही भाजलेल्या मिरचीबरोबर लसूण कोथिंबीर खरडून घेतो आणि ते दह्यात मिसळून त्यात हिंग मीठ घालून ढवळून गट्टम करतो.