दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल
आता ही कृती प्रचि त टाकण्याचं कारन कि पाककृती सदरात फोटो कसा टाकायचा ते समजलच नाय मला
दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल एकत्र करून १ तास भिजवून ठेवा.
गरम निर्लेप तव्यावर १ टी स्पून तेल पसरून नेहमीप्रमाणे दोसा करा
दोन्ही बाजूने खरपूस ,सोनेरी रंग येईस्तोवर भाजा
शेंगदाण्याच्या चटणीबरोबर छान लागतो
शेन्गदाण्याच्या चटणीची कृती
एक टी स्पून तेलावर थोडा चिरलेला कांदा, कढीपत्ता,लाल ,सुक्या मिर्च्या , हे सर्व परतून ,सोललेल्या शेंगदाण्यांबरोबर,चवीपुरते मीठ,चिंचेचा कोळ मिक्स करून ब्लेंडरवर चटणी वाटावी.
वरून मोहर्या,हिंग,सुक्या लाल मिर्च्या ची फोडणी करून घालावी.
अरे वा! या पध्दतीने आता करून
अरे वा! या पध्दतीने आता करून बघणार
मला रवा डोसा खूप आवडतो. आत्तापर्यंत २-३ निरनिराळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणावा तसा जमलाच नाही पण. आता हा 'अजून एक प्रयोग' म्हणून करून पहायला हरकत नाही. मी केलेले पदार्थ न कुरकुरता (किंवा नाईलाजास्तव) खाणारी हक्काची २ गिनी पिग्ज् आहेतच ...
वर्षे, मला आत्ताच्या आत्ता
वर्षे, मला आत्ताच्या आत्ता पाठवुन दे रवा डोसा..
मी केलेले पदार्थ न कुरकुरता (किंवा नाईलाजास्तव) खाणारी हक्काची २ गिनी पिग्ज् आहेतच
>>
लले, न खाऊन सांगतील कुणाला बिचारे??
वर्षू, रव्या डोस्याची रेसिपी
वर्षू, रव्या डोस्याची रेसिपी ई-मेल फॉरवर्ड केली आहे. आता फक्त वाट बघावी लागणार, कधी मिळतोय डोसा
योडे...
वॉव.. मस्त रेसिपी हमनाम
वॉव.. मस्त रेसिपी हमनाम
ललिता.. मलापण रवा दोसा खूप
ललिता.. मलापण रवा दोसा खूप आवडतो.. ही अगदी शुअर शॉट रेसिपीये.. नक्की आवडेल तुला आणी तुझ्या गिनी पिग्स ना
धन्स.. योडे तुला इकडे यावं लागेल.. ..
सुक्या.. लौकरच दोसे काय तुला (धम्मक) लाडू सुद्धा मिळणारेत खायला
वर्षू डोसा मस्तच आहे ग.
वर्षू डोसा मस्तच आहे ग.
हे वर्षू, माझी आवडती रेसीपी
हे वर्षू, माझी आवडती रेसीपी आहे ही..... चट्णी अश्या पध्दतीने कधिच केली नाही, आता करुन बघायला पाहीजेच
वर्षू, डोसा छान आणि चटणीची
वर्षू, डोसा छान आणि चटणीची कृति तर मस्तच !
@ मृ.. सुक्या म्हंजे सुक्या
@ मृ.. सुक्या म्हंजे सुक्या लाल मिर्च्या हायेत... चुकुन तुझ्या सुक्याला टाकू नकोस
धन्स जागू,दिनेश दा..
धन्स जागू,दिनेश दा.. आमच्याकडे भारतात,बंगलोर ची कुक होती तिनेच हे आणी बरेचसे कन्नड प्रकार शिकवले होते.. चटण्या तर काय सुरेख करायची.. अगदीच वेगळ्या रेसिपीज होत्या तिच्या
मस्तच वाचून आणि बघूनच भूक
मस्तच वाचून आणि बघूनच भूक लागली आहे..
वर्षू... ती चेटकीण चटणी
वर्षू... ती चेटकीण चटणी होईल मग
आमची शेजारीण, हि चटणी तीळ
आमची शेजारीण, हि चटणी तीळ घालून करायची, ती पण छान लागायची. (तीपण कुर्गी म्हणजे कर्नाटकातलीच होती.)
जाड सालीचे एक प्रकारचे लिंबू, थेट गॅसवर भाजून पण ती एक चटणी करायची, कडवट आंबट अशी ती चटणी मस्तच लागायची.
निलतै...धम्मक लाडु कसा
निलतै...धम्मक लाडु कसा असतो?????????:अओ:
सहीच गं वर्षूताई नक्की करणार
सहीच गं वर्षूताई नक्की करणार
एक आयडिया.. पाकृ मधे जाऊन नवीन पाकृ वर टिचकी मार. त्यात तुझी रेसिपी लिही आणि इथे (या धाग्याच्या संपादनात जाव लागेल) ज्या फोटोच्या लिन्का टाकल्यायस ना त्या तिकडे डकव. नवीन पाकृमधे फोटु डायरेक्ट डकवण्याची सोय नाही.दुसरा ब्राऊझर उघडुन त्यातला एखादा बाफ उघडुन त्याच्या प्रतिक्रिया मधे लिंक टाकुन ती कॉपी पेस्टावी लागते.. द्रवीडी प्राणायाम .. आय होप तुला कळतय मला काय म्हणायचय ते
अगदीच जमला नाही तर नुसती रेसिपी लिही आणि खाली प्रतिक्रिया मधे फोटु टाक. हाकानाका
मस्त दोसे! ते बाजूचे काचेचे
मस्त दोसे! ते बाजूचे काचेचे बाऊल्स पण मस्त आहेत!
धन्स सर्वांना एन्जॉय
धन्स सर्वांना
एन्जॉय कुकिन्ग!!!
मी अगदी अस्साच करते हा डोसा.
मी अगदी अस्साच करते हा डोसा. फक्त सुकं खोबरं नाही घालत. इन फॅक्ट रव्या ऐवजी ओट्स टाकले तरी छान होतात हे डोसे. दिनेशदांच्या ओट्स्च्या धिरड्यांची कृतीही जवळपास अशीच आहे नाही का???
@ तीव्र म- सर्वच
@ तीव्र म- सर्वच दोश्या,धिरड्यांच्या कृती जवळपास सारख्याच असतात.. यात जरा वेगळे इन्ग्रेडिएन्ट्स डेसिकेटेड कोकोनट चुरा ,कढीपत्ता वापरले जातात. त्यामुळे चव छान येते
वर्षू, सही रेसिपी... तों
वर्षू, सही रेसिपी... तों पा.सु. नक्की करणार.... सगळे जिन्नस आहेत, फक्त मेन रवाच नाही... नाहीतर आजच लग्गेच केला असता मी हा दोसा नी चटणी
मस्त दिसतायत डोसे! चटणीची
मस्त दिसतायत डोसे! चटणीची वेगळीच पाकृ. उद्या डोश्याबरोबर हिच चटणी करेन.
ठॅन्कु मॅडम!
ठॅन्कु मॅडम!
थॅन्क्स.. सानी ,स्वाती,
थॅन्क्स.. सानी ,स्वाती, निलिमा
कशी झालीये ते सांगा बर्का केल्यानंतर
वा वर्षू......दोसा तर छान
वा वर्षू......दोसा तर छान आहेच पण चटणीही वेगळी आहे. करून बघीन!.........जाऊ दे .........नाहीतर असं करू का........अं............चायनालाच येऊ का हे खायला?
वर्षू, दोन्ही गिनी-पिग्जनी
वर्षू, दोन्ही गिनी-पिग्जनी मिटक्या मारत खाल्ले हे डोसे
ललिता और तुम बच गई
ललिता और तुम बच गई खानेसे???
मानुषी..तू येच्च इकडे दोसे खायला..रच्याकने चायनीज चालतील का??? आजकाल मुंबईमधे दोश्याचे मिळत असलेले प्रकार पाहून डोळे फिरले नुस्ते!!
वर्षूदी, मलापण पायजे दोसे
वर्षूदी, मलापण पायजे दोसे
रवा-ओनीयन दोसा आवडीचा
वर्षू आज करुन पाहिला झट्पट
वर्षू आज करुन पाहिला
झट्पट आणि मस्त आहे
Thanks for ths recipie
वर्षू, सिर्फ फोटू से क्या
वर्षू, सिर्फ फोटू से क्या होगा?
वर्षु, काल करुन बघितले ह्या
वर्षु, काल करुन बघितले ह्या कृतीनी. एकदम मस्त झाले. प्रमाण एकदम परफेक्ट आणि डेसिकेटेड कोकोनट, कढीपत्ता यामुळे तर छान चव आली.
Pages