डास बोध

Submitted by मंदार-जोशी on 23 February, 2010 - 22:28

हे विडंबन आणि विनोदी कविता यांचे मिश्रण आहे. म्हणून विडंबन ह्या शीर्षकाखाली टाकतोय.
ही कविता मी चक्क मला डास चावत असताना केली आहे, त्यामुळे ह्याला (मेथड अ‍ॅक्टिंग च्या चालीवर) 'मेथड कविता' असेही म्हणता येईल. Proud

daas.gif

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

डासांचा सुकाळू
मलेरियाचा आधारू
बहुत करावा भ्रष्टाचारू, पालिकेने || १ ||

असे कामगार येती
औषध मारुनिया जाती
तरी डास आम्हां चावती, दिवसाराती || २ ||

असा हा पालिकेचा फवारा
डासांनी पचविला सारा
आम्ही म्हणतो मारा मारा, डासांना या || ३ ||

कासव, गुडनाईट, जेट लावता
घरातले या डास मारता
खर्च होतो पहा, डोंगराएवढा || ४ ||

कानांशी करती पिरपिर
रक्त शोषूनी आमुचे फार
डास होती फुगीर, आवळ्याएवढे || ५ ||

रक्त शोषूनी ड्रॅक्युला थकला
पण मलेरिया त्याने नाही पसरविला
ते काम सोडले आहे, डासांसाठी || ६ ||

अशी ही आमुची डास कथा
आणि आम्ही सोसलेली व्यथा
एकूण तुम्ही झाला नसाल 'बोर'
तर समजू आम्ही आमुचे भाग्य थोर || ७ ||

|| समाप्त ||

गुलमोहर: 

झकास,:-P
आता ह्या कवितेचा प्रिंटआउट काढून खिडकीत ठेवतो बघूया डासांवर काय परिणाम होतो ते

अरे मंदार,तुझा डासबोध आवडला,पण .....
डास हे चावण्यासाठीच असतात ....
एवढ्या भल्या मोठ्या शरीरातील बिच्यारया डासांनी २-४ थेंब घेतले तर काय झालं?
म्हणुन म्हणतो दाराशी,घरात आलेल्या भुकेल्यांना डासांना थोडं रक्त (वाटावं) पिऊ द्याव ...
आणि मलेरिया,डेंग्यु सारखे साधे-साधे रोग आपणही कधी कधी "शेअर" करावं ...
Lol

नगर पालिकांना आता
"मच्छर पालिका" म्हणावे
"पावडर" मधिल सारा मलिंदा
पुढारीच खातात हे जाणावे
मग मच्छरांनी कसे मरावे
तुम्हीच सांगा मंदारभाऊ...!

बाकी विडंबन कविता जाम आवडली.

>>>कोमल के | 13 May, 2010 - 23:11
माझी एक मैत्रीण डासाना थप्पड मारायची... एका थप्पडीत डास गारद व्हायचे...<<<<

डासाला मारता थप्पड
गाल असता खप्पड
गाल लाल, डास गुल्ल!

बघता त्याच्या गाली डास
तिने मारली थप्पड खास
दात तुटले, डास उडले

तुझे नाही, डासांचे भाग्य थोर आपल्यावर कविता करणारा कवी मिळाला त्यांना म्हणुन तुझ्याजवळ जास्त येतिल ते
Lol

एक मच्छर... साला एक मच्छर...आदमी को कवी बना देता है ......साला एक मच्छर.

मस्त रे मंदार ... डासांचे सगळे सद्गुण (?) मस्त सांगितलेस ..

रक्त शोषूनी ड्रॅक्युला थकला
पण मलेरिया त्याने नाही पसरविला
ते काम सोडले आहे, डासांसाठी || ६ ||

Lol

छानच Happy

खूप छान विडंबन
या वर माझा शेर (मी केलेला नाहि)
मछछर ने आपको काटा ये उसका जुनुन था !!
आपने वहा खुजया ये आपका सुकुन था !!
लेकिन आपने उसे जान बुजके नहि मारा क्योकि वो आपकाहि खुन था !!

अगं आई गं Rofl

कानांशी करती पिरपिर
रक्त शोषूनी आमुचे फार
डास होती फुगीर, आवळ्याएवढे || ५ || >>> धम्माल Happy

कानांशी करती पिरपिर
रक्त शोषूनी आमुचे फार
डास होती फुगीर, आवळ्याएवढे || ५ ||>>>

Lol

आवळ्याएवढे काय Lol

उदय Lol

Pages