मायबोलीवरील आहार व पाककृती विभागात पाककृती कशा शोधाव्यात.

Submitted by मदत_समिती on 29 October, 2010 - 13:33

पाककृती विभागातील वर्गीकरण पद्धत :
पाककृती ग्रुपच्या पानावर जा
तिथे अवलोकन विभाग समोर असेल, त्यात सगळ्या पाककृती प्रतिसादाच्या वेळेनुसार क्रमवारित दिसतील.
अवलोकन याशेजारी विषयवार यादी असा टॅब दिसेल.

त्यावर क्लिक केले असता खालील प्रमाणे ६ ओळी दिसतील.
* आहार (940)
* पाककृती प्रकार (1056)
* प्रांत/गाव (4)
* प्रादेशिक (608)
* विषय (124)
* शब्दखुणा (1531)

आहार या विभागात पाककृतींची वर्गवारी ३ उपविभागामध्ये केलेली आढळेल.

* मांसाहारी (115)
* व्हेगन (58)
* शाकाहारी (767)

’पाककृती प्रकार’ यामध्ये सर्व पाककृतींची विभागणी ढोबळ मानाने खालील विभागात केलेली आढळेल.

* अंड्यांचे प्रकार (15)
* आमटी, कढी, पिठले (71)
* इतर प्रकार (92)
* उपवासाचे पदार्थ (24)
* उपाहार (136)
* करी (14)
* गोड पदार्थ (134)
* चटणी, कोशिंबीर, लोणचे (99)
* चिकनचे (कोंबडी) प्रकार (24)
* दिवाळी फराळ (35)
* पक्वान्न (17)
* पेये (15)
* पोळी, पराठा, पुर्‍या (24)
* बेकरी पदार्थ (46)
* भाज्या (182)
* भाताचे प्रकार (49)
* मटणाचे प्रकार (11)
* मासे व इतर जलचर (46)
* वाळवण-साठवण (7)
* सूप (15)

प्रादेशिक विभागात सर्व पाककृती त्यांच्या प्रदेशानुसार वर्गवारित आढळतील.

* अमेरिकन (39)
* इटालियन (24)
* कर्नाटकी (2)
* कोंकणी (25)
* कोल्हापुरी (9)
* खानदेशी (16)
* गुजराथी (21)
* चायनीज (6)
* थाई (3)
* दाक्षिणात्य (55)
* पंजाबी (39)
* पारंपारीक मराठी (304)
* फ्रेंच (2)
* बंगाली (7)
* बिहारी (6)
* मारवाडी (2)
* मालवणी (6)
* मेक्सिकन (8)
* मेडिटरेनियन (10)
* वैदर्भीय (22)
* सिंधी (2)

वगैरे.
यातला महत्वाचा विभाग आहे शब्दखूणा

या पानांवर आपल्याला हवे असलेले पदार्थ सहजी शोधता येतील. उदा:

केक , दिवाळी फराळ

हे सर्व वर्गीकरण पाककृतीला दिलेल्या शब्दखूणांमुळे शक्य आहे. त्यामुळे शब्दखूणा चुकल्या असतील तर कदाचित काही पदार्थ वाट चुकून इतर ठिकाणी आढळले तर नवल वाटू नये. तसेच कंसातले आकडे हे पाककृतींची संख्या दाखवतात. काही ठिकाणी ते चुकीची संख्या दाखवतात. तो एक बग आहे [सध्यातरी].

शब्दखुणा: 

याबाबतीत अजुन एक निदर्शनस आलेली गोष्ट म्हणजे पाककृती जर फक्त ग्रुपपुरती ठेवली असेल तर ती गुगल शोध वापरुन सापडत नाही. पण सार्वजनिक असेल तर सापडते.

आगरी मसाल्याची कृति ची माहिती दिसत नाहीए. कुणी सांग्८इतली तर समाधान वाटेल. कोकणातील सदस्यां पैकी कुणी देऊ शकतील असं वाटत.

पुर्वी कोणत्याही पाकृच्या पानावरील आहार व पाकृ विभाग अश्या टायटल वर क्लिक केले असता थेट आहार व पाकृ
विभागाचा मुख्य पान उघडत असे. आता तेथे त्या टायटलवर लिंक नाही.

राजु ठाकरे

लाल वर्तुळाने दाखवलेली लिंक म्हणताय ना ?

मला तरी चालू दिसते आहे
[ ती लिंक, तिच्या डावीकडची ग्रुप आणि मुख्यपृष्ठ या दोन्ही लिंका चालत आहेत. माउस पॉइंटर त्या अक्षरांवर थोडा वरती/खालती हलवून बघितले की लक्षात येईल]

नंद्या,

धन्स !! खरच जरा जास्त प्रयत्न करावा लागतो, क्लीक होत नाही म्हणुन सोडुन दिला होता प्रयत्न मी !!

माझे सदस्यत्व ललितलेखन विभागाचे आहे. मी पाककला विभागाचेही सदस्यत्व घेऊ शकते का? त्यासाठी मला काय करावे लागेल?
एका वेळी आपण 2-3विभागांचे सदस्यत्व घेतले तर चालते का?