मीमांसा शोकांतिकेचि
बुधवारि झालेल्या 'भ्याड' दहशतवादि हल्ल्याचि फार मोठि किंमत आपल्या देशाने चुकवलि आणि पुढे बराच काळ ती आपल्याला चुकवावि लागेल. पण ह्या हल्ल्याचा जो मुख्य उद्देश आहे, ह्या दहशतवादि मानसिकतेच आणि त्यांच्या मृत्युच उदात्तिकरण तो मात्र आपण सर्वानि मिळुन हाणुन पाडायला हवा. एक बंदुक घेउन जो समोर येइल त्याला गोळ्या मारत सुटणे आणि ह्या जोरावर स्वतःला 'फिदायिन' किंवा 'गाझि' म्हणवुन घेणारे केवळ भरकटलेलेच नाहित तर विकृत आहेत. खरे वीर ते आहेत सामान्य पोलिस आहेत जे हाताशि असलेल्या तुटपुंज्या शस्त्रांनिशि निधड्या छातिने मृत्युला सामोरे गेले, खर शौर्य आणि प्रसंगावधान त्या महिलेच जिने आणिबाणिच्या परिस्थितित त्या दोन वर्षाच्या ज्यु बालकाचा जीव वाचवला! त्या कमांडोंच ज्यांनि कमितकमि जीवितहानिच आव्हान स्विकारुन ह्या दहशतवाद्यांचा बीमोड केला. ह्या सगळ्या वीरांना सलाम!
"आपण सामान्य नागरिक आपण ह्याच्यावर नुसति चर्चा करु शकतो पण त्याचा काहि उपयोग आहे का?" ह्या भुमिकेशि मी सहमत नाहि. असे हल्ले परत होवु शकणार नाहित ह्याचि खातरजमा करण हे आपल्याला शक्य आहे एवढेच नाहि तर सध्याच्या परिस्थितित ते आपल कर्तव्य आहे. त्यासाठि सध्याच्या ह्या घटनेला चहु अंगांनि समजुन घेण आवश्यक आहे. आतापर्यंत मला जेवढ काहि कळल ते ह्या लेखाद्वारे इथे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे, त्या अनुषंगाने चर्चा व्हावि आणि आपल्या सगळ्यांना त्यातुन काहितरि शिकता याव हा या लेखाचा उद्देश.
आतापर्यंत ठिकठिकाणि झालेल्या चर्चेत दोन प्रमुख आरोपि समोर आलेत ते म्हणजे राजकारणि आणि (मुख्यतः) इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम. ह्यांच्या बेजबाबदार पणा बद्दल सगळिकडे जो संताप आहे त्याबद्दल दुमत असण्याच कारणच नाहि. ह्या घटनेचा राजकिय फायदा घेण्याचा प्रयत्न जो सगळ्या राजकिय पक्षांनि आणि नेत्यांनि (ह्यांना नेते तरि का म्हणाव असा प्रामाणिक प्रश्न आहे) केला तो विलक्षण घृणास्पद होता. आर आर पाटिल, विलासराव देशमुख, नरेंद्र मोदि, लालकृष्ण आडवाणि, बाळ ठाकरे, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधि हे सगळेच भारताचे गुन्हेगार आहेत.
इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंविषयि देखिल जेवढे बोलावे तेवढे कमिच आहे. सगळ्यात आधि बातमि देण्याच्या फाजिल उत्साहात अफवा पसरवणे, माहिति देण्यासाठि आलेल्या अधिकार्यांना बोलण्याचि संधिहि न देता आपापसात धक्काबुक्कि करुन महत्वाचा वेळ दवडणे, सुटका झालेल्या ओलिसांच्या मनःस्थितिचि पर्वा न करता त्यांच्या माघे प्रतिक्रियेसाठि ससेमिरा लावणे, हिंसाचाराचि, जखमिंचि दृष्य मिळवण्यासाठिचि ह्यांचि धडपड बघता ह्या माध्यमाला परिपक्व करणार्या आचारसंहितेचि असलेलि गरज प्रकर्षाने जाणवलि. मी हे लिहत पर्यंत एन डि टिव्हि ने श्रध्दांजलि म्हणुन आलेल्या एस एम एस चा आकडा सांगायला सुरुवात केलि होति पण ह्या रकमेतुन कुठलिहि मदत जाहिर करण्यात आलि नव्हति, हे समजण्यात माझि काहि चुक झालि असेल तर मला आनंदच होइल पण सध्या तरि ह्यांचि संधिसाधु वृत्ति बघुन विलक्षण उबग आलाय.
ह्याच प्रकारे ताज आणि ओबेर्रॉय सारख्या मोठ्या हॉटेल्स मधलि अत्यंत तुटपुंजि सुरक्षाव्यवस्था आणि त्यांचि पाहुण्यांच्या सुरक्षिततेचि जबाबदारि ह्याबद्दल विचार होणहि गरजेच आहे. 'बाहेर प्रवेशद्वारावर पुरेशि सुरक्षाव्यवस्था असति तरिहि हे अतिरेकि मागच्या दरवाज्याने आल्यामुळे त्याचा फारसा उपयोग झाला नसता!' अश्या अर्थाच रतन टाटांच संतापजनक विधान सी एन एन वर थोड्यावेळापुर्वि बघायला मिळाल. ह्या बड्या हॉटेल्स च्या कायम स्वरुपि अंतर्बाह्य सुरक्षेसाठि सरकारकडे पाठपुरावा करुन तशि व्यवस्था अमलात आणणे, हॉटेल्स मध्ये नोकरि करणार्या कर्मचार्यांच्या पुर्वेतिहासाचि खातरजमा करणे हे व्यवस्थापनांवर बंधनकारक असावे. ह्या हल्ल्याच्या निमित्ताने प्रकाशात आलेलि आणखि एक त्रुटि म्हणजे हॉटेल मध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक ट्रेस चा अभाव. ह्यामुळे शेवटपर्यंत आतमध्ये किति लोक अडकलेले आहेत ह्या बद्दल गोंधळ होता. तसेच ओलिसांचि आणि आत अडकलेल्यांचि सुटका होत असताना अनिश्चिततेचा फायदा घेउन काहि दहशतवादि पण पसार झाल्याचि शंका पण व्यक्त करण्यात आलि.
पाकिस्तान सरकारने परस्कृत केलेल्या दहशतवादि संघटना ह्या घटनेसाठि प्रामुख्याने जबाबदार असल्या तरि अजुन बरेच घटक असे आहेत कि ज्यांच्या जबाबदारिचि पुरेशि चर्चा कुठे झाल्याच फारस ऐकिवात आल नाहि.
पहिला घटक म्हणजे युरोपिअन आणि अमेरिकन शस्त्रात्र बनवणार्या कंपन्या. आज जगात सगळिकडेच सहजतेने बंदुका, मशिनगन्स हि सगळि शस्त्र उपलब्ध होतात हि अतिशय भयावह गोष्ट आहे. कल्पना करा कि जर मॅन्युफॅक्चरिंग लेव्हल वर ह्या शस्त्रांचे रेकॉर्ड ट्रेस होण्याच्या दृष्टिने कडक कायदे अस्तिस्त्वात असते तर इतक्या सहजासहजि एवढि संहारक शस्त्र ह्या दहशतवाद्यांच्या हातात पडलिच नसति आणि एवढा हिंसाचार आणि लष्कराला २ दिवसांपेक्षा जास्त दिवस झुंज देण त्यांना कदापि शक्य झाल नसत. रशियन सैन्याला शह म्हणुन पाकिस्तान द्वारे तालिबान्यांना शस्त्र पुरवण्याचा जो उद्योग अमेरिकेन सरकारने ८० आणि ९० च्या दशकात केला त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत. लष्करे तोयबा सारख्या प्रबळ संघटनेच पाठबळ असलेल्या ह्या अतिरेक्यांच्या जवळच नाहित तर मुम्बइ अंडरवल्ड च्या गुंडाजवळ जी संहारक शस्त्र सापडतात त्याने जिवाचा थरकाप उडतो. ह्या पार्श्वभुमिवर 'कायद्याच राज्य' हि आपल्या सारख्या सर्वसामान्यांचि अपेक्षाच केविलवाणि वाटते.
दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ह्या दहशतवाद्यांना पैसा पुरवणारि व्यवस्था. सौदि अरेबिया हा देश राजेरोसपणे ह्या मुलतत्ववाद्यांना पैसा पुरवतो हे सत्य आज प्रत्येकाला माहिति आहे पण त्याचा परिणाम शुन्य! स्वीस बँकांच्या थ्रु जगभर वाहणारा बेकायदेशिर पैसा, हवाला सारखि पर्यायि व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टि आज जगभर निरपराधांच्या गळ्यातिल फास बनत चालल्या आहेत.
एक उदाहरण म्हणुन बघा, ह्या (आणि ह्या आधिच्या जवळपास सगळ्या)अतिरेक्यांच्या कटाच्या वर्षभर चालेल्या तयारित त्यांना सगळ्यात जास्त मदत कुणाचि झालि असेल असा तुमचा अंदाज आहे? माझ्या मते त्यांच्या बेकायदेशिर पैश्यांवर आणि शस्त्रास्त्रांवर पोसलेल मुम्बइच्या अंडर्वल्डचि, आणि हेच अंडर्वल्ड बॉलिवुड साठि प्रमुख फायनांसर आहे! म्हणजे एका अर्थाने आजच्या काळात चित्रपट बघणे म्हणजे दहशतवादाला आधार आहे. हा काहि प्रमाणात वस्तुस्थितिचा विपर्यास असला तरि दहशतवादाचि पाळमुळ किति सहज आपल्यापर्यंत येउन पोहचतात हे लक्षात याव.
ह्या घटनेसाठि जबाबदार असणार्यांच्या यादितुन आपण आपल्याला म्हणजे सर्वसामान्य जनतेला वगळु शकत नाहि. अजुनहि 'एक भारतिय हि माझि सर्वात पहिलि ओळख' ह्या भुमिकेपासुन आपण किति दुर आहोत हे प्रकर्षाने जाणवले. मी आधि भारतिय मग हिंदु किंवा मुसलमान, मराठि किंवा बिहारि, मुम्बई किंवा दिल्लिकर ही मनोभुमिका आपण सर्वझण जितक्या लवकर अंगि बाणवु तितक आपल्या साठि चांगल. अतिशय प्रक्षोभक भाषेतले अतिरेक्यांचे संदेश सातत्याने प्रसारित होउनहि कुठेहि सांप्रदायिक तणाव निर्माण झाला नाहि हि खुपच आशादायक गोष्ट आहे. पण एवढ्यावर संतुष्ट होउन चालणार नाहि.
ह्या पुढे कायदा आणि सुव्यस्थेच्या कार्यक्षम अंमलबजावणिसाठि आपण सरकारवर दबाव आणायला हवा. अंडर्वल्ड च्या मुसक्या बांधल्या जाण्याचा आग्रह धरायला हवा. अर्थात हे सगळ करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होण्यासाठि आपल्याला नियमांचा आदर करण्याचि सवय अंगि बाणावि लागेल. 'नियम हे मोडण्यासाठिच असतात' हा आपला अतिशय लोकप्रिय समज आहे. वाहुतिकिचे नियम मोडुन शक्य्तोवर पोलिसाच्या हातावर तुरि देवुन निसटण आणि ते जर जमल नाहि तर कमित कमि पैशात मांडवलि करण हि बहुतेकांना मर्दुमकि वाटते. लहान सहान कामांसाठि वेळ लागु नये इ. कारण पुढे करुन टेबला खालुन नोटा सरकवणे, रस्त्यावर थुंकु नये/कचरा टाकु नये ह्या सारखे लहान सहान नियमहि पाळण्याचि तसदि न घेणे हे सगळ करणारि जनता कुठल्या तोंडाने सरकार समोर कायदा आणि सुव्यवस्थेचा आग्रह धरणार?
दहशतवादाला खतपाणि घालणार्या व्यवस्थेचा जनाधार काढुन घेतला जाण्यासाठि प्रय्त्न व्हायला हवेत. उदा. खनिज तेलाला पर्याय ठरु शकणार्या साधनांच्या संशोधनाचा आग्रह, स्वीस बँका, हवाला ह्याद्वारे फिरणार्या बेकायदेशिर पैशावर आळा, सैन्य आणि पोलिसदलाच्या कर्मचार्यांच्या पगारात आणि निवृत्तिवेतनात आणि त्यांना पुरवण्यात येणार्या शस्त्र आणि ट्रेनिंग मध्ये वाढ, गुन्हेगारि पार्श्वभुमि असलेल्या उमेदवारांना निवडणुक लढवण्याचि बंदि अश्या सारख्या मुद्यांवर ह्या पुढच्या निवडणुका लढल्या जायला हव्यात.
हे सगळ एका रात्रितुन होणार नाहि मान्य पण हे सगळ प्रत्यक्षात येउ शकत अशि इछ्छाशक्ति आपण आपल्यात निर्माण करायला हवि. सध्या राजकाणात असलेले नेते कुचकामि आहेत हे तर उघड आहे. पण त्यांना पर्याय शोधण्याचि जबाबदारि आपलिच आहे. असे पर्याय जर उपल्ब्ध नसतिल तर ते निर्माण करण्याचि वेळ आलेलि आहे. अतिशय थोड्या प्रमाणात असे प्रयत्न होत आहेत, (प्रोफेशनल्स पार्टि ऑफ इंडिया ह्या नव्याने स्थापन झालेल्या राजकिय पक्षाबद्दल नुकतेच वाचले, त्या आधि आय आय टि च्या विद्यार्थ्यांनि 'भारतोदय मिशन' द्वारे असाच प्रयत्न केला होता, प्रामाणिक शासकिय अधिकारि निर्माण करण्याचे प्रयत्न अविनाश धर्माधिकारि आपल्या चाणक्य मंडळाद्वारे करत आहेत) गरज आहे ति त्यांना अधार देण्याचि. ह्यातले काहि प्रयत्न फसतिलहि पण असे प्रयत्न सातत्याने व्हावेत ह्या साठि वातावरण निर्माण होण आवश्यक आहे आणि ती आपलिच जबाबदारि आहे.
शेवटि आणखि एका मुद्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. अश्या प्रकारच्या अकस्मिक आपत्तिनंतर होणार्या मनुष्य हानिकडे सगळ्यांच लक्ष वेधल जात आणि ते आवश्यकहि आहे पण त्याच वेळि इतर ठिकाणि होणार्या मनुष्यहानिचा विसरपडु देता कामा नये. हा मुद्दा थोदा अजुन स्पष्ट करुन सांगु इछ्छिते. कारगिल युध्धात किंवा नुकत्याच झालेल्या दहशतवादि हल्ल्यात धारातिर्थि पडलेल्यांबद्दल आपल्याला जेवढ्या तीव्रतेने वाटते तेवढयाच तीव्रतेने सीमेवर रोज आपल्यासाठि प्राणार्पण करणार्या जवानांबद्दलहि वाटायला हवे. सुनामि, भुकंप, बॉम्बहल्ल्यात निष्कारण जीवाला मुकलेल्या निरपराध लोकांप्रमाणेच भुकबळि आणि कुपोषण ग्रस्त बालके, आत्महत्त्या करणारे शेतकरि, सर्वबाजुंनि पिचलेले आदिवासि ह्यांच्या बद्दल हि वाटायला हवे. प्रत्येक मानवि जीव हा अमुल्य आहे आणि तो वाचवण्यासाठि सर्वतोपरि प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे ह्याचा आपल्याला कदापि विसरपडता कामा नये.
या
या घटनेच्या संदर्भात कुठल्याही एका भाषिक गटाची टिंगल करणारे विकृत मनोवृत्तीचे आणि असंवेदनशीलच म्हटले पाहिजेत.
ATS चे कार्यक्षेत्र हे तपासकामापुरते मर्यादित होते. 'घटनेदरम्यानची कारवाई'साठी त्यांच्याकडे पुरेशी संसाधने नसावीत, म्हणजे अशी परिस्थिती हाताळायला आवश्यक असे प्रशिक्षित लोक, अवजारे, साधने इ. त्यांच्याकडे नव्हती. खुद्द करकरेसुद्धा 'operation'वाले नसावेत. रॉ, विदेशातील अनुभव, आतापर्यंतची ATS ची वाटचाल हे बघता त्यांचे तपासकामातील कौशल्य दिसून येते. RPF, RAF आदींनासुद्धा वेगळ्या परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण असते, उदा. दंगल. पण अतिरेकी हल्ल्याला कसे तोंड द्यावे यासाठी खास प्रशिक्षित तुकड्या फक्त सैन्यदलातच आहेत, त्या आता पोलिसांकडेही येतील आणि दहशतवादविरोधी पथकाचे स्वरूपही विस्तारेल असे वाटते. गुप्तवार्तासंकलन हा मला फार दुखरा विषय वाटतो. वास्तविक, मुंबई पोलिसांचे खबर्यांचे जाळे व्यापक आहे व जगातील एका उत्तम खबरी-जाळे म्हणून ते गणले जाते असे मी ऐकले आहे. पण धर्मयुद्धाची नशा चढलेल्यांना फितूर करणे फारच अवघड असावे. भ्रमनिरास करणे, लालूच दाखवणे इ. उपाय पूर्णतया भारलेल्या लोकांसाठी कितपत प्रभावी ठरतील ? शिवाय, आता हे अतिरेकी व्यावसायिक कौशल्याने या हल्ल्यांचे नियोजन करत आहेत. त्यामुळे तिथे आपला खबरी घुसवणे, प्रत्यक्ष हल्लेखोरांना फारशी माहिती नसणे इ. प्रश्न असतीलच.
आता आपल्या पोलिसांकडची किंवा गुप्तचर यंत्रणेची SIGINT, ELINT प्रणाली किती प्रभावी आहे याची मला कल्पना नाही (कोणी जाणकार यावर कृपया प्रकाश टाकू शकतील का ?). पण दुर्दैवाची बाब अशी की या प्रणालींना अंगभूत मर्यादा आहेत. अमेरिकेसारख्या तांत्रिक गुप्तवार्तासंकलनात अतिशय निष्णात असलेल्या देशाला अजूनही बिन लादेन सापडत नाही. म्हणजे तिथे शेवटी मानवी हस्तक्षेप लागतोच. तरीही, या घटनेमुळे तांत्रिक-अत्याधुनिकीकरणाला चालना मिळेल असे वाटते.
एकीकडे गुप्तवार्तासंकलनाला अशा परिस्थितीजन्य मर्यादा तर दुसरीकडे तांत्रिक मार्गांना असलेल्या अंगभूत मर्यादा अशा कात्रीत सर्वच गुप्तचर यंत्रणा आहेत. त्यातच, सर्व स्रोतांकडून आलेली माहिती संकलित करणे, छाननी, पडताळणी करणे, विश्लेषित माहिती योग्य त्या विभागाला पाठवणे, हे करणारी व माहितीसंकलन व पुरवठ्याचा समन्वय करणारी आपली केंद्रीय प्रणाली अजूनही परिणामकारक ठरत नाहीये असे दिसते. (गुजरातकडून आलेल्या माहितीचे योग्य विश्लेषण महाराष्ट्रातील यंत्रणा नेहमीच करू शकेल का ? मुळात या यंत्रणांचा आवाका हा राज्यस्तरीय आहे.) या घटनेमुळे हे काही बदल घडतील असे वाटते.
(या सर्व लेखनाला चू.भू.द्या.घ्या.)
'कायद्याच
'कायद्याच राज्य' हि आपल्या सारख्या सर्वसामान्यांचि अपेक्षाच केविलवाणि वाटते. >>> टू द पॉइंट.
प्रतिक्रि
प्रतिक्रिये साठि धन्यवाद दोघांनाहि.
स्लार्टि, नेहमिप्रमाणे अतिशय मुद्देसुद आणि संतुलित लिखाण.
<<<<पण अतिरेकी हल्ल्याला कसे तोंड द्यावे यासाठी खास प्रशिक्षित तुकड्या फक्त सैन्यदलातच आहेत, त्या आता पोलिसांकडेही येतील आणि दहशतवादविरोधी पथकाचे स्वरूपही विस्तारेल असे वाट्ते.>>>>>
ह्या हल्ल्यानंतर देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात पंतप्रधानांनि दहशतवाद विरोधि दलाचि संघटना देशपातळिवर असावि अस म्हंटल होत. हे जास्त संयुक्तिक वाटत नाहि का? एन एस जी च्या धर्तिवर अशि संघटना जिचे प्रमुख पंतप्रधांना/संरक्षणमंत्र्यांना रिपोर्ट करतिल. ह्या मुळे रॉ आणि राज्यपोलिस ह्यामधिल विसंवादाचा दर वेळेस फटका बसणार नाहि.
> आपल्याला
> आपल्याला नियमांचा आदर करण्याचि सवय अंगि बाणावि लागेल.
अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. ज्या पोलिसांनी या हल्ल्याच्या वेळी जनतेचे रक्षण केले त्यांचा उदो उदो केला जातो आहे आणि ते अगदी योग्य देखिल आहे. त्यांचे जरी ते कर्तव्य असले तरी अनेकदा त्यांना त्यांच्या कर्तव्यपुर्तीखातर जिवावर ऊदार व्हावे लागते. या उलट त्यांच्यातीलच काही (अनेक?) सडके आंबे आधी छोट्या व नंतर मोठ्या लाचा घेऊन देशाला कमजोर बनवतात. आपण जर मनाचा निग्रह करुन तेवढी एक बेकायदेशीर गोष्ट करण्यापासुन जरी स्वतःला थांबवु शकलो तरी बरेच साध्य होईल. Right To Information मुळे आधी अशक्य असलेल्या अनेक गोष्टी आता किंचीत सोप्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे
स्वानुभावावरुन सांगतो की लिखित तक्रारीला बरेच महत्व आहे. वार्षीक अहवालांमध्ये ते गणल्या जातात आणि कर्मचार्यांचा नेहमीच प्रयत्न असतो की त्यांच्याविरुद्ध काही लेखी स्वरुपात असु नये. प्रत्येक नागरीकाने याचा वापर लाचलुचपत थांबवण्याकरता करायला हवा.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
अगदी टू दी
अगदी टू दी पोईंट लेख.. स्लार्टी तुझे मुद्देही पटले. आज खरच जबाबदार नागरीकांची गरज आहे देशाला जे स्वतः शिस्तबध्द, सावधान असतीलच पण राजकारण्यांना जाब ही विचारतील. काहीतरी खीळ बसेल ह्या राजकारण्यांना जर सर्वसामान्य जनता जागृत झाली तर. किमान ही मेंढरं नाहीत आणि आपण हाकू तशी ती मागंमागं येणार नाही तर जनता आपल्या नाकर्तेपणाचा जाब विचारेल हा संदेश आज सगळ्या सुजाण नागरिकांनी मिळून राजकारण्यांना देणे मला सद्यपरिस्थितीत गरजेचे वाटते म्हणजे किमान मुंबईतील घटनेचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग कोणताही राजकिय पक्ष करु धजणार नाही.
अजुनही
अजुनही कोमात आहे, असे वाटते आहे.
प्रत्येक युध्दानंतर होते, तशी 'कारणे आणि परिणाम' यावर भरपूर चर्चा आता होईल. राजकारण्यांच्या अकलेचे वाभाडे निघाले. रीतसर पंचनामे, राजीनामेही झाले. पोलिसांच्या कार्यपध्दतीबद्दल चर्चा झाली. आपल्या सुरक्षा-व्यवस्था-पध्दतीबद्दल परदेशी संस्था-सरकारांची 'एक्स्पर्ट ओपिनियन्स'ही आली. एनएसजीला वेळ का लागला इथपासून ताज-ओबेरॉय एवढे गाफील कसे राहिले- असे प्रश्न उपस्थित झाले. नेहेमीप्रमाणे मोदी-अडवाणी-लालू-राज यांचे राजकीय फायदा घेऊ पाहाणारी वक्तव्ये झाली. गल्लीबोळांत नगरसेवकांच्या-नेत्यांच्या खर्चाने काळी पोस्टरेही लावून झाली.
मायबोलीवरही बरीच चर्चा झाली. त्या सगळ्यांच्या मतांचा आदर राखून, त्याव्यतिरिक्त आणखी काही सांगावेसे वाटले, म्हणून हे पोस्ट.
या सगळ्यानंतरही प्रश्न उरतोच- आपण सामान्य माणूस म्हणून काय केले, काय करणार आहोत..? नुसतीच वांझोटी चर्चा करून सर्वसामान्य असल्याचा जुनापूराणा तोच फेमस झालेला फायदा आपण घेणार आहोत? 'मी सामान्य माणुस. मी काय करणार. माझ्या एकट्याने काय होणार?' हे लाडके पालूपद आळवत..?
एक शिस्तप्रिय देशाभिमानी एकसंध समाज म्हणून आपण आहोत का? समूदाय म्हणून एकत्र वावरण्याची आपली बेशिस्त-स्वार्थी पध्दत जगत इतरत्र कुठे सापडेल का? भडक प्रतिक्रिया व्यक्त करून झाली की आपले काम संपले, अशा भ्रमात आपण देश बुडेपर्यंत राहणार आहोत का? वरून माझा देश 'महासता' होणार हे बोथट झालेले महावचन?
इथे हे सर्व विचित्र वाटेल, पण आपल्या 'समाज म्हणून एकत्र जगण्याच्या' बेशिस्त पध्दतीमूळे या घटना इथेपर्यंत जातात असे मला प्रामाणिकपणे वाटते. अगदी प्राथमिक पातळीवर, म्हणजे माझा स्वतःचाच मी विचार केला, तर या देशाचा आदर्श नागरिक म्हणून माझी लायकी नाही असे मनापासून वाटते.
अगदी रोजच्या जगण्यातल्या क्रियाही मी काहीतरी नियम पाळून, गंभीरपणे, काहीतरी जबाबदारीची जाणीव ठेवून पार पाडतो, असे मला वाटत नाही.
मी रस्ते वापरतो, रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल बोलण्यात पुढे असतो. पण याच रस्त्यावर सिग्नल पाळायची वेळ आली, की माझ्या पोटात दुखते. पोलिसाने अडवलेच, तर हॉस्पिटल, इमर्जन्सी असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. नाहीच त्याने ऐकले तर पैसे घ्या अन मिटवा एकदाचे, असे त्याला सांगतो. तो पोलिसही माझ्यासारखाच- नाही का? याउलट दुसर्याने सिग्नल तोडल्यास 'अगदीच कशी नाही बुवा शिस्त आजकाल' असे म्हणतो. मी पदवी किंवा द्विपदवीधर असतो, पण रस्त्यात पॅनिक होऊन कर्कश हॉर्न वाजवतो. याउलट दुसर्याने-माझ्या मागच्याने तसे केले तर त्याच्याकडे रागाने बघतो. आडमूठ्या-बेशिस्त पध्दतीने गाडी लावतो, पण दुसर्याने तशी लावलेली आढळली, तर मला गाडी काढता येत नाही म्हणून कातावतो. रिक्षावाले मध्येच थांबतात, प्रदूषण करतात असे रिक्षावाल्यांवर तोंडसूख घेणे हे मला आवडतेच, पण रिक्षा लागते, तेव्हा तिला भर रस्त्याच्या मध्यभागीच थांबवतो. साधी मोटरसायकल घसरून पडली, तर सगळी कामे सोडून ती गंमत बघणे मला आवडते. रस्त्यावरच्या फालतू भांडणांतही बघ्यांच्या गर्दीत मीही एक असतोच. पण ताजभोवती बघ्यांनी गर्दी केली म्हणजे कमाल आहे बुवा- असे मत अजिब्बात वेळ न दवडता मांडतो!
साधा रस्ता ओलांडण्याचीही शिस्त मला माहिती नाही. माझ्या मुलांनाही तसे काही शिकविण्याची जबाबदारी मी घेत नाही. पण 'शाळा काय शिकवतात, कुणास ठाऊक!' हा माझा गप्पांचा आवडता विषय असतो. रस्त्यातच गाडी थांबवून भाज्या फळे घेतो, पण त्या घ्यायच्या नसतील, तेव्हा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबद्दल चिडतो. नगरसेवकांबद्दल, पालिकेच्या कारभाराबद्दल गरळ ओकतो, पण त्याच नगरसेवकाने आपले एखादे काम 'शॉर्टकट' मध्ये केले म्हणून त्याला निवडून देतो. पालिकेत भ्रष्टाचार होतात, म्हणून टॅक्स भरायचेच नाकारतो, मात्र नागरी सुविधांवर माझा पहिला हक्क म्हणून गाजवतो..
मी मनसेचा असेल तर विलासरावांना शिव्या घालतो. झोपडपट्टीत राहत असेल तर इमारतींत राहणार्यांचा दु:स्वास करतो. बंगल्यात राहत असेल, तर झोपडीवासीयांच्या गुन्हेगारीबद्दल गळा काढतो. पण ऑफिसर असेल, डिपार्टमेंटला असेल, तर लाच खाण्याच्या नवनवीन जागा शोधून त्या झोपडीवासीयांपेक्षा कित्येक पटीने गंभीर गुन्हे करतो. एखाद्या ठिकाणी सिक्यूरिटी टाळून 'मागून' एंट्री मिळाली तर ते फुशारकी मारत सर्वांना सांगतो. पण ताजमध्ये मागून अतिरेकी घुसले, म्हणजे कमाल आहे बुवा- असे म्हणतो. उगीच कटकट नको म्हणून चोर-लंफंग्यांना पकडून देण्याऐवजी तिथून पळ काढतो, पण अतिरेकी सामानासह इतक्या ठिकाणी दिसले, तरी लोक कसे बुवा रिपोर्ट करीत नाहीत पोलिसांना?.. असे महान आश्चर्य व्यक्त करतो. अतिरंजित चित्रे रंगवल्यामूळे मेडियावाल्यांवर चिडतो, पण इतर वेळी यापेक्षा फालतू बातम्या- निरूपद्रवी म्हणून पुन्हा पुन्हा पाहतो, चघळतो. एक हिंदू वाईट आहे, म्हणून आम्ही सगळे वाईट आहोत काय? असे खडसावून विचारतो, पण त्याचवेळी एक दुसर्या धर्माचा अतिरेकी आहे, म्हणून त्या संपूर्ण धर्माचा 'होलसेल' मध्ये पराकोटीचा द्वेष करतो. 'ही जमातच असली' असे म्हणून पुढच्या दंगलींची, भांडणांची पाळेमूळे घट्ट रुजवतो.. या कधीच न संपणार्या चक्राला जन्माला घालतो. आणि मग स्वतः चक्रव्यऊहात फसल्याचा वांझोटा राग करतो, त्या रागापोटी काय वाट्टेल ते करायला तयार होतो..
मंत्री-नेते असोत की पोलिस खाते. एनएसजी असो की चक्रम मेडियावाले. ही सर्व आपलीच प्रतिबिंबे नाहीत का? हे लोक आपल्यातूनच तिथे गेलेले नाहीत का? आपल्याच विचार-आचारसरणीची प्रतिबिंबे त्यांच्या विचार-वागणूकीतून दिसणार नाहीत का?
जर असे असेल, तर जे घडले त्याची थोडी तरी जबाबदारी घेऊन यापूढे माझे जगणे बदलण्याचा मी प्रयत्न करणार आहे की नाही? कमीत कमी सुरूवात तरी?
ममो, आशिष
ममो, आशिष आणि साजिरा यांच्या पोस्टाला अनुसरून (आणि अर्थातच अनुमोदन देऊन)...
कायदापालन का करायचे ? तर शिस्तशीर, सुसंस्कृत जगता यावे म्हणून. असे जगणे 'एकट्याने' करता येत नाही. त्यासाठी आपोआपच दुसर्यांचा विचार आवश्यक ठरतो. हे माझ्यासाठीच आहे, माझ्या भल्यासाठी आहे. कायदा पाळण्यात माझा स्वार्थ आहे. त्यामुळे माझी कृती दुसर्यांच्या कायदापालनावर अवलंबून राहत नाही. कायदा तोडताना 'का तोडायचा?' हा प्रश्न विचारून फायदा नसतो, कारण मुळात तो प्रश्न विचारलाच जाऊ शकत नाही हे लक्षात घेणे मला फारच महत्त्वाचे वाटते.
मी काही करतो हे अर्धवट जबाबदारी घेणे झाले, मी काही परिणामकारकरित्या करणे म्हणजे पूर्ण जबाबदारी घेणे झाले. ते मला जास्त महत्त्वाचे वाटते. 'समाज' या संकल्पनेसारखी फसवी आणि भ्रमकारक संकल्पना दुसरी कुठली नसेल. सर्वात परिणामकारक गोष्ट ती जी मला बदलते/बदलायला भाग पाडते, 'समाजा'ला नव्हे.
शेवटी, नियम पाळणे हे जेव्हा मी स्वीकारतो, तेव्हा ते पूर्णत्वाने स्वीकारतो. म्हणजेच, नियम पाळला गेला नाही तर शिक्षा भोगणे हेही 'नियम पाळणे' यात अंतर्भूत आहे. ते वेगळे नसते.
'तत्त्वज्ञान' स्वतःच्या दैनंदिन जीवनाच्या पातळीला आणता येते हा धक्का माझ्यासाठी जबरदस्त होता. उलट प्रश्न विचारता येऊ लागल्यावर एकदा चमकलेली गोष्ट म्हणजे ते 'कुठेही' विचारता येऊ शकतात आणि एका 'सुलट'ला अनेक उलट असतात. त्यामुळे, कायदा पाळताना आता 'का पाळायचा ?' असा प्रश्न विचारतो आणि याचे उत्तर जेव्हा आणि जिथे 'बडग्याच्या भीतीमुळे' असे येते, तिथेच स्वतःला बदलण्याच्या प्रक्रियेची पहिली पायरी मानतो.
फार
फार सुव्यवस्थीत चर्चा चालु आहे हे वाचुन आनंद झाला ! एकुणच राजकारण आणि राजकारणी यांना शिव्याशाप देण्या ऐवजी योग्य चर्चा चालु आहे... ! मराठमोळी, साजिरा, स्लार्टी तुम्हा सगळ्यांनाच भरघोस अनुमोदन. अतीशय योग्य पाउल असेल स्वयंशासन हे !
एकुणच घटनाक्रम लक्षात घेता, एक गोष्ट लक्षात येते की या अतिरेक्यांची तयारी वर्षभर आधी चालु होती असे सर्वांनीच ग्राह्य धरलेले आहे. किंबहुना टी.व्ही वरच्या सातत्याने दाखवल्या जाणार्या बातम्या ते मनावर ठसवत आहेत.
जर अतिरेकी वर्षभर पाकिस्तानात ट्रेनिंग घेत असतील तर त्या वर्षभरात भारतात काय घडामोडी घडवल्या गेल्या यांचा आपल्याला अंदाज आहे ?
जो अतिरेकी आत्ता मुंबईवरच्या हल्ल्यानंतर सांगत आहे की त्याच्यावर मुंबईतल्या योग्य जागा शोधायची कामगिरी सोपवली होती, आधी असा कुणालाच संशयही आला नाही ?
आता जरा मागच्या आणि मुंबई बाहेरच्या घटनांकडे नजर टाकु या !
दोन वेळा कोकणातल्या किनारपट्टीला अनोळखी जहाजे लागली .....
एका वेळी एक रिकामा ट्रॉलर सापडला........
भरकटलेली असे जरी म्हंटल्या गेले तरी त्यांची मालकी कुणिच का सांगीतली नाही ! बरं भरकटलेल्या जहाजात माणसे, सामान असे काहीच नाही असे शक्य आहे का ?
काही ठिकाणच्या हॉटेलांच्या चौकशीत असे उतारु सापडत आहेत ज्यांची रजिस्टर्आ मधली माहीती खोटी आहे......
कदाचीत २६/११ हा हल्ला लक्ष वेधुन घेण्यासाठी केलेलं प्रयोजन असेल, मुळ उद्देश दुसरीकडे घडणारी एखादी मोठी घटना किंवा उलाढाल लपवणे असु शकेल.
एक प्रशीक्षीत अतीरेकी लोकांच्यात मिसळला तर तिथल्या स्थानिकांच्या भावना भडकावुन त्यांना गरजेइतका शस्त्रपुरवठा करु शकेल ! जरुरी ट्रेनिंग देउ शकेल. थोडक्यात तो अनेक दहशतवादी तयार करु शकेल. असे घडत राहीले तर ? .......
... तर कदाचीत भारत जेंव्हा पाकिस्तानशी युध्द पुकारेल तेंव्हा आपल्या शेजारच्या घरातुन एखादा दहशतवादी आपल्यावर हल्ला करु शकेल.. त्यांचे जिहाद चे युध्द शब्दशः घरा घरातुन लढले जाईल. हीच युद्धनिती दुसर्या महायुद्धात दोस्तराष्ट्रांनी फ्रांसला मुक्त करण्यासाठी वापरली होती. फ्रेंच नागरीकांना शस्त्रपुरवठा केला गेला होता......
अर्थातच तो स्वातंत्रलढा होता,... पण जर इथल्या मुस्लिमांसाठी भारताशी युद्ध म्हणजे स्वातंत्र्यलढा वाटणार असेल तर ?????
.................................................................................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग ........... !
साजिरा,
साजिरा, फार छान लिहिलय... भारतीयान्ची नियम न पाळण्याची सवय आणि 'हा' हल्ला यान्ची चान्गली सान्गड घातली आहे. दुसर्याच्या द्रुश्टिकोनातून विचार करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही... तसा प्रयत्न जरी सर्वानी केला तर दुसरे काहीच नको.
प्रतिक्रि
प्रतिक्रियेसाठि सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. साजिरा तुमच्या पोस्ट मधिल प्रत्य्क वाक्याशि सहमत! 'भारताचे आशास्थान(?) राहुल गांधि' यांना एकंदर सामान्यांचि किति पर्वा आहे हे दर्शवणारि एक लिंक मी जिथे ह्या बॉम्बस्फोटांचि चर्चा सुरु आहे त्या बीबी वर टाकलिये. एकदा नक्कि नजरेखालुन घाला.
ह्या
ह्या सगळ्या गोष्टींना अजुन एक परिमाण आहे ते म्हणजे लोकसंख्या. ज्याचा आजपर्यंत कधीच गांभिर्याने विचार झाला नाही. गोष्टी हाताबाहेर जाण्याला महत्वाचं कारण लोकसंख्या हे आहे. त्यामुळेच आज ना माणसाला माणसाच्या जीवाची किंमत आहे, ना कोणती शिस्त आहे ना साधनशुचेतेची चाड. survival instinct मुळे आज माणुस कुठल्याही स्तराला जाऊ शकतोय - की अतिरेक्यांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत करणे - जसे की १००-२०० रुपयांसाठी बनावट रेशनकार्ड, लायसन्स करुन देणे, बेकायदेशीर वास्तव्य करायला मदत करणे. कमांडोज आपलं काम करत असताना ताजच्या आसपासच्या बघ्यांची संख्या काय सांगते की आमच्या देशात किडामुंगीसारखी माणसं आहेत, त्याना भरपुर वेळ आहे (कारण काम नाही) आणि त्याना स्वतःच्या/दुसर्याच्या जीवाची पर्वाही नाही. लोकसंख्येमुळे सगळ्याच व्यवस्थेवर किती ताण पडतोय ह्याचा विचार केला आहे कोणी? सतर्क रहायला हवं हे मान्य पण खरंच अशी किडामुंगीसारखी माणसं पसरली असताना, कुठे कुठे आणि किती सतर्क राहणार आहोत आपण? लूप होल्स अगणित रहाणारच.. कोणताही लढा सर्वव्यापी होऊच नाही शकत अशा परिस्थितीत कारण ह्या ११०+ कोटी लोकांना एखाद्या मुद्यावर एकत्र आणणं किती अवघड गोष्ट आहे... ईतर सर्व पातळ्यांवर लढताना लोकसंख्येचा भस्मासूर (आता तरी) आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे..
सजिरा,
सजिरा, विचारप्रवृत्त लिहिले आहेस! त्या पुढे जाऊन नक्की काय करशील सामान्य माणूस म्हणून तेही लिही जमत असल्यास. सामान्य माणसाला देखील आपल्या देशासाठी खूप काही करता येऊ शकते. कायदा पालन हे एक गोष्ट झाली, समाजसेवा ही दुसरी गोष्ट झाली. विचार केला तर अजून काही सुचेल.
साजिरा,
साजिरा, खरच अनेक विचारधारा योग्यप्रकारे पकडल्या आहेत. मी अनेकांना हा धागा पाठवला आहे.
बी, सामान्य माणसाने काय करायला हवे हे त्या लिखाणातच आलेले नाही का? निदान तेवढे जरी केले तरी बरेच साध्य होऊ शकेल.
सरिविना, लोकसंखेचा मुद्दा देखिल महत्वाचा आहे.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
फक्त या
फक्त या घटनेपुरतंच बोलायचं झालं तर 'मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो' अशी माहिती दिली गेली होती हे उजेडात आलं आहे. त्याकडे पुरेश्या गांभिर्याने लक्ष दिले नाही आणि निष्काळजीपणा झाला असं वाटतंय. ते कसे येऊ शकले? एकदा मुंबईत त्यांचा प्रवेश झाल्यावर मग त्यांना थोपवणे हे किती अवघड आहे हे सहजच लक्षात येते. सध्या तरी या "माहिती" वरच खूप भर असला पाहिजे. स्लार्टीच्या पहिल्या पोस्टमध्ये हा मुद्दा आला आहे. याच विषयाशी साधारण मिळतेजुळते लेख(दुसरा जास्त) रविवारच्या पोस्ट मध्ये आलेत त्याच्या लिन्क्स देत आहे.
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2008/11/28/AR200811...
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2008/11/28/AR200811...
म्हणूनच ममो तू हॉटेल्सच्या सुरक्षा व्यवस्थेला दोष दिलास ते पटले नाही. अश्या प्रकारच्या घटनांपासून लोकांना सुरक्षा देणे ही त्यांची जबाबदारी नाही. ते सामान्य व्यावसायिक आहेत, त्यांच्यावर आणि बाकी जनतेवर हा बोजा पडणार असेल तर त्याचा अर्थ ज्या लोकांचे हे काम आहे ते लोक नीट करत नाहीत असा होतो.
सरिविना, अत
सरिविना,
अतिशय बरोबर लिहिले आहेस..... लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे की कसला कायदा आणि कसली सुव्यवस्था... कायद्याचे पालन करणे, जागरूक असणे वगैरे शब्दही माहिती नसलेले असंख्य पोटार्थी लोक मुंबईत असतील... त्यात बांग्लादेशातुन बेकायदेशीर स्थलांतरित भारतात येतात... त्यामुळे साजिर्याशी मी सहमत असलो तरी ह्या गोष्टींमुळे बॉम्बस्फोट व्हायचे थांबतील असं काही वाटत नाही..... अतिरेकी कारवायांना जाणून-बुजून मदत करणार्यांना कडक शिक्षा, बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे, बॉर्डर पॅट्रोल वाढवणे, पोलीस भरती आणि प्रशिक्षण यासारखे मोठ्या स्केलवरचे उपाय केलेच पाहिजेत आणि ते सरकारच करू शकते.
नाहीतर सात वर्षात अमेरिकेमध्ये एकदाही अतिरेकी हल्ला झाला नाही हे लक्षात घेता तेथील जनता ही सर्वाधिक नैतिकतेने वागते असे म्हणावे लागेल... सुशिक्षित आणि जागरूक म्हणवून घेणारे येथील असंख्य नागरिक विमानतळावर सुरक्षा तपासणीच्या वेळी पोलीस बूट काढायला लावतात म्हणून त्यांच्यावर चिडणारे मी पाहिलेले आहेत (हे सगळं त्यांच्याच साठी चालले आहे हे माहीत असून सुद्धा)....... म्हणून कायद्याचा बडगा हा पाहिजेच...