कोजागिरीच्या दूसर्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजसमोरील चौकात ट्राफिक पोलीसनामक डोमकावळे टपून बसलेले.
या चौकात वाहतूक पोलिसांनी कॉलेजमधून बाहेर पडणार्यास मूलांच्या गाड्या अडवून तपासायला सुरूवात केली.
या वेळी निमीत्त्य होते ते गाड्यांच्या मागे असणार्या नंबर प्लेट्स.
बर्याचदा या प्लेट्सवर खाली अगदी बारीक अक्षरात ‘साई ऑटो’ ‘पाषाणकर ऑटो’ असे काहीतरी लिहीलेले
असते.
पोलिस नेमके यालाच आक्षेप घेऊन मूलांची अडवणूक करत होते.
मूलं बिचारी निमूटपणाने पावती फाडून अथवा पैसे देऊन पुढे जात होती.
याच कॉलेजमधल्या आमच्या एका मित्राने मात्र याला जोरदार विरोध केला.
सिग्नलवर अथवा चौकात ट्राफिक पोलिस बर्याचदा अडवल्यावर गाडीची चावीच काढून घेतात.
नियमाप्रमाणे असे करणे चूक आहे.
आमच्या या मित्राने ‘ गाडीला हात लाऊ नका, मी स्वतःहून गाडी लाऊन तूमच्या कडे येतो’ असे त्यांना बजावले
आणि गाडी शेजारी लावली.
तेंव्हा ट्रा.पो. सुद्धा जरा चपापलाच
.
गाडी रस्त्याशेजारी लाऊन मित्राने ड्रायव्हिंग लायसंस आणि पि.यु.सी. दूरूनच पोलिसांना दाखवले.
( पोलिस लायसंस आपल्याकडे ठेऊन घेतात आणि आपण पैसे न दिल्यास/पावती न फाडल्यास ते परत करत
नाहीत. यावर आम्ही मित्रांनी शोधून काढलेला हा उपाय आहे.)
एवढं होऊनही त्यांनी पावती फाडायला सुरूवात केल्यावर मित्राने आवाज थोडा वाढवला.
नंबर प्लेट तपासायचे आदेश असल्यास पोलिसांना त्याने या कारवाईच्या आदेशाची प्रत दाखवायला सांगितली.
अशी कारवाई करण्याचे वरीष्ठांचे आदेश आहेत असे फक्त मित्राला सांगण्यात आले. आणि हे आदेश दाखवायला
आम्ही बांधील नाही हे पोलिसांचे त्यावरचे उत्तर.
त्यावर मित्राने वाद घातल्यावर त्याला ‘पोलिस कारवाईत अडथळा आणला म्हणून अटक करीन, डोळ्यात पाणी
आणीन’ अशा धमक्या मिळू लागल्या.
ताबडतोब मित्राने भर चौकात जाऊन एकट्यानेच मोठमोठ्याने घोषणा द्यायला सुरूवात केली.
’’दादागिरी नही चलेगी,
नही चलेगी, नही चलेगी.’’
’’अटक मटक चवळी चटक.
परवानगीशिवाय करतात अटक’’
पोलिस तर चाटच पडले.
त्यांना अशी काही अपेक्षाच नव्हती.
काय करावं हेही त्यांना कळेना.
त्यातला एकजण मित्रावर जोरजबरदस्ती करून त्याला चौकातून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला.
मित्राने शांतपणे पाठीमागे हात बांधून सांगितले की अंगाला हात लावाल तर मारहाण केली म्हणून केस करीन.
अटक करायची असेल तर पेट्रोलिंगला बोलवा. माझी अटक करून घेण्याची तयारी आहे.
(नियमाप्रमाणे वाहतूक पोलिसांना सामान्य नागरिकांना अटक करण्याचे अधिकार नसतात. त्यासाठी त्यांना
पेट्रोलिंगला बोलवावं लागतं.)
रीतसर पेट्रोलिंगला फोन करून बोलवण्यात आले.
एव्हाना बघे जमलेच होते. मित्राने जमलेल्या मूलांना ‘’यांना लायसंस देऊ नका ‘’ म्हणून सांगायला सुरूवात केली.
मूलींना अडवणार्या ट्रा.पो.ना विरोध करायला सुरूवात केली.
कारण पुरूष ट्रा.पो. मूलींच्या गाड्या अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने अडवत होते.
(इथेही नियमाप्रमाणे, मूलींना अडवून तपासणी करायची असल्यास अशी कारवाई करायला एखादी महिला
ट्रा.पो.सोबत असणे गरजेचे असते)
इकडे पेट्रोलिंगची गाडी येईपर्यंत मित्राच्या घोषणा सुरूच होत्या.
पेट्रोलिंगच्या गाडीमधून मित्राला मॉडर्न पोलिस चौकीवर नेण्यात आले.
गाडीत पोलिस अत्यंत उर्मटपणे वागले.
आता बघ बेट्या कशी चामडी लोळवतो तूझी वगैरे धमक्या तर सुरूच होत्या.
तिथे मित्राने वरीष्ठ पोलिस अधिकाऋयासमोर पोलिसांच्या या अरेरावीचा पाढा वाचला.
पैसे खाण्यासाठी अशा क्षुल्लक कारवाया करण्यापेक्षा इतर अनेक कामे करण्यासारखी आहेत ती करा असेही
बजावले.
पोलिसच असे उद्दामपने वागले तर आम्ही कुणाकडे पाहायचे?
असा आदेश काढन्यापूर्वी जरा लोकांना कळवायला हवं. पूर्वसूचना द्यायला हवी.
‘’तूम्ही फार बोलता हो..जरा शांत व्हा.. ‘’ इति वरीष्ठ.
’’अहो तूम्ही बोलायला भागच पाडता. तूम्ही वरीष्ठ आहात, एवढे शिकलेले आहात म्हणून सभ्यपणे बोलताय.
पण हे ट्रा. पो. सामान्यांशी काय भाषेत बोलतात ते एकदा ऐका.
मला मीरा बोरवणकरांचा नंबर द्या, मला त्यांच्याशी बोलायचयं’’ आमचा मित्र म्हणाला.
मीरा बोरवणकरांचा फोन नंबर द्यायला आम्ही तूम्हांला बांधील नाही असे वरीष्ठ म्हणताच मित्राने सांगितले की
माहिती अधिकार नियम 4 प्रमाणे पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि इतर अधिकार्यांची नावे आणि
त्यांचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून पोलिस चौकीत लावणे बंधनकारक आहे.
तूमच्या चौकीत असे काही बोर्ड लावलेले दिसत नाही.
मी जाफर भाईंना फोन करून तक्रार करू का? मित्राने विचारले.
(पी.ए.जाफरभाई हे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि वाहतूक शाखेचे माहिती अधिकारी आहेत. एक
अतिशय उत्तम अधिकारी म्हणून ओळखल्या जातात)
ही मात्रा बरोबर लागू पडली.
ताबडतोब मीरा बोरवणकरांना फोन लावण्यात आला.
मित्राने सगळी परिस्थीती सांगून हे कसं चूक आहे हे त्यांना सांगितलं.
मीरा ताईंनी सगळं ऐकून घेऊन त्या वरीष्ठांशी बोलून ताबडतोब ही कारवाई बंद करायला सांगितली.
मूद्दलात वरीष्ठांचे असे काही आदेश नव्हतेच.
(आणि असले असते तरी नागरीकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक होते).
त्यानंतर वरीष्ठांनी फर्ग्युसनवरच्या ट्रा.पों.ना फोन करून कारवाई बंद करायला सांगितली आणि ही टीम परत
बोलवण्यात आली.
ही लोकं खरच परत येतात का हे पाहायला मित्र तिथेच थांबला. आणि ते सगळे परतल्यावरच
तिथून हलला.
गंमत म्हणजे तो त्या वरीष्ठांना म्हणाला,
साहेब इथे आणलत खरं पण आता परत सोडायची काही तरी व्यवस्था करा ना’’
एका हवालदाराच्या गाडीवर बसून मित्र परत कॉलेजला पोहचला !
काही मूद्दे-
हे सगळं करायला माहिती अधिकारातल्या काही नियमांची माहिती करून घ्यावी लागते. थोडी हिंमत दाखवावी
लागते आणि पोलिसांना प्रश्न विचारावे लागतात हे जरी सगळं खरं असलं तरी आपण असं काही केल्याशिवाय
पोलिस यंत्रणा ताळ्यावर येत नाही हेही तेवढच खरं.
ड्रायव्हिंग लायसंस नसल्यास 1000 रूपयांचा दंड मागणारे हे डोमकावळे नंतर 100 रूपयांची लाच घेऊन
आपल्याला सोडतात.
प्रत्यक्षात, हा दंड केवळ 200 रूपये आहे. नो पार्किंगसाठी 100 रू तडजोड रक्कम तर गाडीची कागदपत्रे नसतील
(हा त्यांचा हूकमी एक्का!) 100 रूपये तडजोड रक्कम भरावी लागते.
प्रत्यक्षात अव्वाच्या सव्वा दंड सांगून
आपल्याला धमक्या दिल्या जातात. आणि आपण नेमके इथेच फसतो.
(दंडाविषयीची ही सर्व माहिती आम्ही मित्रांनी महिती अधिकार नियम 2005 खाली रीतसर मागवलेली आणि
ऑथेंटिक आहे.आम्ही तर याच्या फोटो कॉपी काढून मित्रांमधे वाटल्यात आणि त्या नेहमी सोबत ठेवतो.)
अर्थात, मित्राने केला तो सगळा खटाटोप सगळ्यांनी करायची गरज नाही. पण प्रश्न तर आपण नक्कीच विचारू
शकतो.
आम्हांला ना कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे ना पुण्यातले कुणी ‘दादा’ ‘ताई’ अथवा ‘साहेब’ आमच्या
पाठीशी उभे आहेत.
(या मोठ्या नावांच्या आधाराने चाललेल्या मूजोरीचे अनेक किस्से आहेत, पण इथे तो विषय नको)
स्वतःच्या हिमतीवर आणि आणि माहिती अधिकाराच्या मदतीने आम्ही हे करू शकलो तसं कुणीही हे करू शकेल
हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून लिहीण्याचा खटाटोप.
लिहीण्यात काही चूका झाल्या असल्यास सांभाळून घ्यावे.
@ admin : हा अनुभव नेमका कुठे टाकावा हे न कळाल्याने मी सध्या 'लेखा'त टाकला आहे.
तूम्हांला योग्य वाटेल त्या ठिकाणी तो हलवलात तरी चालेल.
जबरी !! : कौतुकाने बघणारी
जबरी !! : कौतुकाने बघणारी बाहुली :
सsssssही!!! मानलं तुमच्या
सsssssही!!!
मानलं तुमच्या मित्राला...
भारीये हा किस्सा!
भारीये हा किस्सा!
साहेब इथे आणलत खरं पण आता परत
साहेब इथे आणलत खरं पण आता परत सोडायची काही तरी व्यवस्था करा ना अरे वा लय भारी...
(No subject)
तुमच्या मित्राचं अभिनंदन आणि
तुमच्या मित्राचं अभिनंदन आणि हा किस्सा इथे टाकल्याबद्दल शतशः आभार!
> (दंडाविषयीची ही सर्व माहिती
> (दंडाविषयीची ही सर्व माहिती आम्ही मित्रांनी महिती अधिकार नियम 2005 खाली रीतसर मागवलेली आणि
ऑथेंटिक आहे.आम्ही तर याच्या फोटो कॉपी काढून मित्रांमधे वाटल्यात आणि त्या नेहमी सोबत ठेवतो.)
ही माहिती स्कॅन करून अपलोड करता येईल का ?
व्वा ग्रेट ..
व्वा ग्रेट ..
काहो सागर, तुमचा मित्र अजून
काहो सागर, तुमचा मित्र अजून सुखरूप आहे ना? त्याला काही अपघात वगैरे तर झाला नाही ना? अजून?
आपली सहज चौकशी केली. असा पोलिसांशी पांगा घेतला की आमच्याकडे काहीतरी होते लोकांना.
मागल्या आठवडयात RTI Online
मागल्या आठवडयात RTI Online course बद्द्ल पेपरात वाचलं. http://rtiocc.cgg.gov.in/ चकटफू आहे हे सांगायला नकोच.
झक्की काका, मित्र उत्तम
झक्की काका, मित्र उत्तम अवस्थेत आहे
ट्रा.पो. नी अजून एकदा आमच्या वाटेला जावं ही ईच्छा आहे आता !
@ swapna_raj
असा course आंध्र प्रदेश शासनाने खूप पूर्वीच सुरु केलाय.. link ईथे दिल्याबद्दल धन्यवाद.
वाहतूक पोलिसांच्या अधिकृत
वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर (http://mahapolice.gov.in/ - trafic offences and punishments) अनेक वाहतूक संबंधी गुन्हे आणि त्यासाठी लागू दंड यांची यादी दिली आहे. यात ‘तडजोड रक्कम’ कुठेही नाही याची नोंद घ्यावी. प्रदूषण वगळता बहुतेक गुन्ह्यांसाठी दंड रु. १०० इतकाच आहे.
याची छापील प्रत आपल्याजवळ ठेवायला हरकत नाही!
लायसन्स किंवा अन्य कागदपत्रे दाखवण्यासाठी किती मुदत आहे, दंडाची पावती कोणत्या दर्जाचा अधिकारी देवू शकतो, वगैरे माहिती याचं संकेत स्थळावर असेल, पण मला पटकन सापडली नाही.
या तडजोड रकमेच्या नेमक्या
या तडजोड रकमेच्या नेमक्या अर्थाचा आम्ही देखिल शोध घेतोय. पण आजवर या शब्दांमुळे काही अडचण आली नाही. ही माहिती 21 महिन्यांपूर्वी मिळालेली आहे.नियम आणि दंडात बदल झाला आहे का,या आणि इतर माहितीसाठी लवकरच मी RTI टाकणार आहे.अनुभवाने आता RTI टाकण्यात नेमकेपणा आला आहे,त्याची मदत होईल.त्याचे उत्तर आल्यावर ईथे update करेनच.
Pages