लेमन चिकन

Submitted by अल्पना on 11 November, 2010 - 12:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन, २ मोठ्ठ्या लसणाच्या गड्ड्या, एक मोठ्ठा आल्याचा तुकडा, ४-५ हिरव्या मिरच्या, १ अमुल बटरची वडी, मीठ, मिर्‍याची पुड, एक लिंबु

क्रमवार पाककृती: 

एका कढईमध्ये अमुल बटर तापवून घ्यावे. त्यात ओबडधोबड वाटलेले आलं-लसुण आणि हिरवी मिरची घालून परतावे. लसूण, हिरवी मिरची व आल्याचे वाटण अंदाजे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त असावे आणि त्याची पेस्ट न करता अर्धवट ठेचून बटर मध्ये परतावे. एखाद्या मिनिटानंतर त्यात चिकन चे तुकडे घालावेत. चिकन परतावे. चवीप्रमाणे मीठ अन मिरेपुड घालावी. परतत राहवे. २-३ मिनिटांनी त्यावर लिंबु पिळावे. चिकन शिजेपर्यंत मधून अधून परतत रहावे
चिकनचे तुकडे छोटे असावेत . याप्रकारामध्ये बोनलेस चिकन पन वापरले तर चालू शकेल.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर अवलंबून. परवाच साडेतिन किलो चिकन १० जणांनी संपवलं, जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून. :)
अधिक टिपा: 

हे चिकन गरम गरम खायला छान लागते. थंड झाल्यावर बटर आळल्यामूळे चव चांगली लागत नाही.
चिकन संपल्यावरही खाली भरपुर बटर अन थोडा आलं लसणाचा मसाला उरतो. त्यात केलेला भात अप्रतिम लागतो. Happy
मी आज चिकन ऐवजी बटण मश्रुम वापरुन भाजी केली होती. मस्त लागली.

माहितीचा स्रोत: 
दीर अन जाऊबाई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहिये अल्पना, आमच्याकडे जरा वेगळे प्रकार हवेच असतात, हे बरंय एकदम सोप्प Happy मश्रुम कुठले वापरतेस, फ्रेश का कॅनमधले?

सुटसुटीत पाककृती. आवडली.

एव्हरीबडी लव्ज रेमंडमधल्या डेब्राच्या फ्येमस लेमन चिकनची पाकृ हीच असावी काय? Happy

१०० ग्रॅम असते एक वडी. आख्खी न वापरता थोडीशी कमी वापरली तरी चालेल. सॉल्टेड बटरच वापरा, साध्या बटरनी चव बदलेल असं मला सांगितलं गेलं. नायतर गावाकडे घरंच लोणी वापरून करा असा सल्ला साबा कडून मिळाला होता. Happy
मेधा ऑ ऑ वापरुन बघ अन मलाही सांग.
सिंडी, बटाटे अन पनीर पेक्षा बेबीकॉर्न आणि मश्रुम जास्त छान लागतिल. मश्रुम तर मी काल रात्रीच खाल्लेत.
आडो, हे चिकन स्टार्टर म्हणून खायला छान आहे. ग्रेव्ही नसतेच यात.

अल्पना सान,
२५० ग्रॅम मश्रुम्सना पण १ आक्खी १०० ग्रॅम ची वडि घ्यायची का?? पाव किलोचं प्रमाण सांगा ना!!

नाही नाही, अगं एक किलो चिकनला १०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा किंचित कमी बटर घ्यायचे. २५० ग्रॅम मश्रुमसाठी मी त्या अमुलच्या वडीचा पावपेक्षा थोडा जास्त भाग घेतला होता. बाकी लसूण अन आलं वैगरे पण कमीच केलं होतं. १०-११ लसूण पाकळ्या अन तेवढाच आल्याचा तुकडा. एकच हिरवी मिरची (लहान मुल खाणार होतं म्हणून), २-३ चिमुट मिरे पुड असं सगळं घातलं होतं.

रैना, आयाम नुसतीच मश्रुमची भाजी खात बसला होता काल. त्याचं जेवण झाल्यावर माझ्या ताटातली पण बरीचशी तशीच पोळीला न लावता खाल्ली भाजी.
करुन बघ, इराला पण आवडु शकेल. Happy

मस्त रेसिपी Happy

एक वडी म्हणजे किती वजन असतं अमूल बटरच ?
ऑ ऑ घालून करुन पाहीन म्हणतेय! >> ही दोन वाक्यं एकापाठोपाठ आल्यामुळे शोनू "किती ते बटर ऑ ... किती ते बटर ऑ ! " असं म्हणत म्हणत बटर भांड्यात काढताना डोळ्यांसमोर आली. नंतर अल्पनाची पोस्ट वाचली तेव्हा ऑ ऑ चा अर्थ लागला Proud

फुलगोभी वापरुन केला हा प्रकार. मस्त झालाय. थोडं जास्तच तिखट लागतय त्यामुळे पोळीबरोबर खाल्ला Happy

हा प्रकार करून बघितला. जबरदस्त लागला. बटर म्हणून स्मार्ट बॅलन्स (US मधे मिळत) ते वापरल. कोथिंबीरी शिवाय पान हालत नाही म्हणून वरून ती सुद्धा बारीक चिरून घातली. बरोबर जीरा-राईस आणि टॉमेटो-बीट सूप.

मी पण काल करताना भरपूर कोथिंबीर घातली. छान चव आली. उरलेलं थोडंस चिकन आणि त्याचा मसाला वापरून आज भात केला. तुपावर जीरे, कांदा परतून थोडीशी धण्याची पूड घातली आणि त्यात हे चिकन घालून भात केला. आज दुपारचे मस्त जेवण झाले. Happy

आज हे चिकन बटर ऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरुन केले. चिकन बनल्यावर फ्लेवरसाठी थोडं बटर पण घातलं आणि वरुन पुदिना पावडर घातली गार्निशिंगसाठी. छान चव आली पुदिना+ लिंबाची.

मी चिकनऐवजी बेबी कॉर्न - सिमला मिरची - पनीर वापरून स्टार्टर केले होते. हिरवी मिरची घातली नाही. वरून मिरपूड घातली. मस्त झालं होतं स्टार्टर Happy

काल मी हे टोफू वापरुन केलं. (चिकनला पर्याय मश्रुम आणि मश्रुमला पर्याय टोफू Sad ). चांगलं झालं होतं. नवर्यालाही आवडलं. त्यावरुन अंदाज आला चिकन आणि मश्रुम कसलं भारी लागेल.

आज या पद्धतीने लेमन मश्रुम स्टार्टर्स केले होते. आणि थोडेसे स्टार्टर्स आणि मसाला शिल्लक ठेवून त्यात भात केला. फारच सुंदर झाले दोन्ही पदार्थ. पुढच्या वेळेला स्टार्टर्स न करता फक्त लेमन मश्रुम राईस करणार.