कथा;- अनिल तापकीर

माळरानी खड्कात जेव्हा रुजते बियाणे

Submitted by अनिल तापकीर on 10 July, 2012 - 06:59

यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता.

गुलमोहर: 

वारीच्या निमित्ताने (आगळा वेगळा वारकरी)

Submitted by अनिल तापकीर on 29 June, 2012 - 08:12

वारीच्या निमित्ताने एक घटना आठवली जी मी कधीही विसरू शकत नाही. घटना साधारणता सहा सात वर्ष्यापुर्वी ची. पालखी निघायला अवघे सात दिवस शिल्लक होते. त्यामुळे वारीला जाणाऱ्यांची कामे उरकायची धावपळ चालू होती. एकदा पेरण्या झाल्या कि बिनघोर दिंडीबरोबर चांगले पंधरा दिवस जाता येत होते. म्हणून वारकरी मंडळी आपापली कामे उरकण्यात दंग होते . मी हि दिवसभर शेतात काम करून घरी आलो. घरी आल्या आल्या आई म्हणाली तात्यांना (चुलत चुलते ) दवाखान्यातून सोडलंय पर त्यांना काय बरं वाटत न्हाय बाबा.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कथा;-    अनिल तापकीर