नमस्कार मंडळी! कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या अधिवेशनाचे कार्यक्रम आता जवळपास निश्चित झाले आहेत! काही कार्यक्रमांचे करार होणे अजून बाकी आहे. पण कार्यक्रमांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर ते बघून आपल्याला जेवढा आनंद होईल तेवढीच "कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको!" अशी आपली अवस्था व्हायची दाट शक्यता आहे! ह्याचं कारण असं, की भारतातून दर्जेदार कार्यक्रम तर आपण आणतोच आहोत, पण उत्तर अमेरिकेतल्या विविध प्रांतातील उत्तमोत्तम कार्यक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत.
BMM २०१७.. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ह्या १८व्या अधिवेशनात तुमचे सहर्ष स्वागत! महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट (MMD) जुलै २०१७ मध्ये, केवळ नॉर्थ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांचा पाहुणचार करण्यास उत्सुक आहे. एवढं मोठं अधिवेशन करायचं म्हणजे सोपं काम नाही. पण डेट्रॉइटच्या माणसांनी दाखवलेली कष्टाची तयारी, इतर मंडळांनी दाखवलेला विश्वास आणि देऊ केलेला मदतीचा हात, ह्या जोरावर आम्ही हे शिवधनुष्य पेलण्यास सज्ज होत आहोत.
Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 February, 2017 - 15:07
मंत्र श्रमाचा, ध्यास गतीचा
गर्व मराठी संस्कृतीचा!!
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १८ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.
(जुलै २०१७) मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.
म्यु जर्सीत थर्मोकोलचे (रेडीमेड) मखर कुठे मिळते? (गणेश मुर्ती १७ इंच उंचीची आहे)
समजा न्यु जर्सीत नाही तर ऑनलाईन कुठले पोर्टल आहे का जिथुन मागवता येइल?
बी एम एम २०१५ , माझं पहिलच अधिवेशन, तेही आमच्या एलेनी होस्ट केलेलं , तीन चार दिवस जाम धमाल केली, कितीतरी प्रोग्रॅम्स ची ट्रिट , अनेक मित्र मैत्रीणींना भेटायची संधी मिळाली, ड्रेसप करायला मिळालं , या शिवाय ओपनिंग सेरिमनीच्या ओपनिंग डान्स मधे असल्याने गेले ४ महिने डान्स प्रॅक्टीस सेशन्स आणि तयार झालेलं वातावरण थेट कुठल्या ग्रँड वेडींग ची तयारी करतोय असं वाटत होतं , अर्थात आमचे ४ महिने हे इतर व्हॉलेंटिअर्स नी दिलेल्या वेळेपुढे काहीच नवह्ते, त्यांची लगिनघाई गेले २ वर्षं चालु होती !
असो, तर आधी अॅक्चुअल कन्व्हेन्शन बद्दल , मी अटेंड केलेल्या प्रोग्रॅम्स बद्दल स्मित